" रविवार आज रविवार -" (बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 Mar 2013 - 9:48 am

रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !

मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !

दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !

नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !

दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !

रविवार हो रविवार
आमचा आवडता वार
घरात आणि मैदानात
दंगामस्ती चालणार !
.

बालगीत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2013 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

निवेदिता-ताई's picture

17 Mar 2013 - 10:21 am | निवेदिता-ताई

छान छान

सस्नेह's picture

17 Mar 2013 - 2:03 pm | सस्नेह

हम्म...
रविवार खरा, पण उद्या आहे गणिताचा पेपर..! तेव्हा अभ्यासातून सुटका नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Mar 2013 - 3:44 pm | अविनाशकुलकर्णी

निरागस कविता

पक पक पक's picture

18 Mar 2013 - 1:35 pm | पक पक पक

खरच निरागस.. ;) पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना राव आता कसला रविवार.. ? :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2013 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा

@आता कसला रविवार..? >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-alien008.gif खरं आहे,आता कसला रविवार..? -आता रवि वरच वार ;-)