✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संवाद-३ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

च
चाणक्य यांनी
Mon, 07/07/2008 - 09:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4343 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

म
मनिष Mon, 07/07/2008 - 10:03 नवीन

दोन्ही बाजू पटतात....

पण, एक महत्वाची गोष्ट म्हणजे - अशा विधायक कार्यासाठी मदत स्वतःहून, मनापासून आली तर उत्तम; ती अशी 'समजावून' देऊ नये. जेव्हा आतून वाटेल तेव्हा ती व्यक्ती यथाशक्ती, किंबहुना त्यपेक्षाही अधिक करेल.
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/07/2008 - 18:02 नवीन

ह्म्म्म्म्म

अनोळखी गरिबांना मदत करायच्या फंदात मी आता पडत नाही. आणून दिलेले कपडे नी वह्या पुस्तकं विकायचे प्रकार घडले आहेत. मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला होणार असेल तर हरकत नाही. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 07/07/2008 - 23:58 नवीन

संवाद

वैचारिक आहे. (शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?) संवाद वाचून इस्लामातील "ज़कात" किंवा ख्रिस्ती लोकांचा "टाइथ" हा प्रकार मनात येतो. मिळकतीचा साधारण १/१० भाग दानधर्मासाठी वापरावा, असे काही धार्मिक कर्तव्य असते. हिंदू धर्मात असा कुठला आकडा सांगितलेला नाही, पण जितके अधिक दान करावे तितके चांगले, अशी कल्पना रूढ आहे. खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत. मी स्वतः पैसे देणे हे धर्मकर्तव्य मानत नाही. परंतु काही बाबतीत स्वतःऐवजी सामाजिक कार्यांत पैसे खर्च करण्यात मलाच दूरगामी फायदा आहे असे मला वाटते. तो नेमका फायदा काय याचे बुद्धिबळातल्यासारखे खेळींसारखे गणित करता येत नाही. त्यामुळे हा स्वार्थी विचार पाताळयंत्री नाही, असे मला वाटते. या स्वार्थासाठी मी काही थोडे पैसे लोकांवर खर्च करतो. पैसे मागणार्‍या भिकार्‍यांना सहसा भीक देत नाही. पण बेघर लोकांना रात्रीच्या आसर्‍यासाठी शहरात संस्था आहे, तिला थोडे पैसे देतो. रात्री भिकार्‍यांनी माझ्या घरासमोर बसून कुडकुडू नये, त्यांच्या कुडकुडण्याच्या दर्शनाने माझ्या हृदयात कालवाकालव होऊन घराबाहेर मित्रांशी मस्तपैकी गप्पा मारताना विरस होऊ नये, हा स्वार्थ इथे अगदी उघड आहे. अशा प्रकारे आणखी काही संस्थांना पैसे देतो, पण स्वार्थ नेहमीच इतका स्पष्ट नाही. वह्या पेन्सिली देण्यातली गंमत मला मागच्याच वर्षी कळली. (मला हा अनुभव घृष्णेश्वराच्या देवळाबाहेरच्या बाजारात आला). ही भीक मागण्याची कल्पक युक्ती बघून मला त्या मुलाचे कौतूक वाटले. म्हणून मी त्याला पेन विकत घेऊन दिले - भीक म्हणून नव्हे तर त्याच्या कल्पकतेने माझे मनोरंजन केल्याचे शुल्क म्हणून. बहुधा हे बिझिनेस मॉडेल त्या मुलाच्या सुपीक डोक्यातले नव्हते - पण माझ्यासाठी नवीन होते. आता पुन्हा त्याच युक्तीने माझे मनोरंजन होणार नाही, आणि मी पेन किंवा वही विकत घेऊन देणारही नाही.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 07/08/2008 - 00:09 नवीन

मनीष

मनीष म्हणतो तशा दोन्ही बाजू पटतात... :)... सुरुवातीला तर संवाद एकदम खटकेबाज आणि उत्तम... शेवटी जरा लांबल्यामुळे मजा कमी झालीय...पण एकूण छान चाललंय .. लिहित राहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/08/2008 - 08:06 नवीन

दोन्ही

दोन्ही बाजू पटतात... मलाही, पण केलेल्या मदतीचा गैरफायदा घेतलेलाही २-३ दा पाहिलेले आहे, लक्षात आले आहे, म्हणून आता मदत करताना दहावेळा विचार तरी नक्कीच करावासा वाटतो...
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 07/08/2008 - 09:26 नवीन

धन्यवाद....!

खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत.
बरोबर आहे, परंतू आर्थिक मदत मिळवण्यासाठी नेहेमीच 'तुम्हाला फक्त अमुक ईतकेच पैसे भरावे लागतील / किंवा ईतका खर्च करणं तुम्हाला कसं सहज शक्य आहे' हे पटवून देण्याचा प्रयत्न असतो. विक्री (सेल्स) मध्ये एक मुलभूत सिद्धांत आहे, ग्राहकाला वस्तूच्या किमती पेक्षा त्या वस्तूमुळे होणारा फायदा समजवून द्यावा. परंतू फार थोड्या लोकांना हे माहीती असते. किंबहूना माहिती असलं तरी अमलात फार थोडी लोकं आणतात. एडी, यशोधरा, मनिष तुमच्यासारखाच माझाही अनुभव आहे. खर म्हणजे हा संवाद माझ्याच मनातला संघर्ष आहे. कधी एक बाजु पटते तर कधी दुसरी. धनंजयने चांगला सुवर्णमध्य साधला आहे.पण तरीही एडी म्हणतात तसं मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला व्हावी असं वाटत. शेवटी कुठेही गेला तरी चालेल असं म्हणायला आपला पैसा काही काळा पैसा नाही. कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. तो योग्य ठिकाणीच खर्च व्हायला हवा.
(शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?)
पुढच्या वेळी जरूर विचार करीन.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 07/08/2008 - 11:07 नवीन

हम्म

सवांद आवडला. दोन्ही बाजु पटतात. पण अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की. त्या दृश्टीने पटवुन देणे सोपे जाइल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 07/08/2008 - 15:01 नवीन

प्रश्न पैश्यांचा नाहीये

अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की.
प्रश्न पैश्यांचा नसून धनंजय म्हणाले तसा, पैसे द्यावेत की न द्यावेत हा आहे. मला पैश्यांची गरज असताना मी दुसर्‍या कुणाला पैसे का द्यावेत असे त्या संवादातल्या पात्राचे म्हणणे आहे. आणि हे म्हणतानाच 'माझी गरज मीच ठरवणार' असंही तो म्हणतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/09/2008 - 09:19 नवीन

संवाद

संवाद आवडले, धन्याशेठचा प्रतिसादही आवडला... चाणक्यराव, येऊ द्या अजूनही. चांगलं लिहिताय! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा