Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user शैलेश हिंदळेकर
Submitted by शैलेश हिंदळेकर on Sun, 03/03/2013 - 22:03
नाही विसरलो तुम्हा स्मॄती अजुन जपल्या प्रिय होतात रे तुम्ही परिवारात आपल्या परिवार म्हणजे मी आणि भावंडे तुमची घट्ट होती अशी मैत्री तेव्हा आपली सर्वांची होतो एकसाथ जेव्हा किती वाटायचे छान सारे लोक न्याहाळती रोज वळून पाहून कसे गेलात सोडून एक एक ते करुन नाही पाहिलेत तुम्ही पुन्हा मागेही वळून वा-यावरती तुमचे भुरभुरून उडणे आठवते मज आता येते मनात रडणे जाण्यामुळे तुमच्या रे झाले आहे मी टकला कंगवाही कधीचा मी अडगळीत टाकला

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 03/03/2013 - 22:08

Permalink

काय राव...

शेवटच्या चार ओळींनी जीवाभावाच्या माणसापेक्षा कंगव्याचे दु:ख अधोरेखित करणं आपल्याला महत्त्वाचं वाटलेलं दिसतं. काय बोलू.... :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sun, 03/03/2013 - 22:18

In reply to काय राव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुमच्या या प्रतिसादामुळे मी

तुमच्या या प्रतिसादामुळे मी शेवटच्या चार ओळी वाचल्या. मलाही ते खटकलं. म्हणून मग कविता पुर्ण वाचली तेव्हा लक्षात आलं की हे टक्कल पडलेल्या माणसाचं रडगाणं आहे. :D @शैलेशरावः गिर्‍हाईक खेचण्याची आयडीया अफलातून आहे. लगे रहो. !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 03/03/2013 - 22:24

In reply to तुमच्या या प्रतिसादामुळे मी by धन्या

Permalink

हाहाहा

>>>> टक्कल पडलेल्या माणसाचं रडगाणं आहे. हाहाहा. च्यायला, मी आपलं सिरियस झालो होतो. ''वा-यावरती तुमचे भुरभुरून उडणे'' इथे दौट आला होता. पण, म्हटलं सालं कवीच्या कोणी जवळचं-बिवळचं... असो. त्यामुळे कविता आली असावी. इथे तर कवीनं आमची विकेट काढली. धन्य आहे. शाब्बास अजून येऊ दे भो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 03/03/2013 - 23:27

In reply to तुमच्या या प्रतिसादामुळे मी by धन्या

Permalink

गिर्‍हाईक खेचण्याची आयडीया

गिर्‍हाईक खेचण्याची आयडीया अफलातून आहे. लगे रहो. !!!>>> +++++++१११११११११ ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 03/04/2013 - 00:12

In reply to गिर्‍हाईक खेचण्याची आयडीया by अत्रुप्त आत्मा

Permalink

कवि यशोधन वाळिंब्यांचे गुरू शोभतात!

धाग्यांमुळे तुमच्या रे गेलो आहे मी पकला विचारतोय कधीचा मी का उघडला? का उघडला?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sun, 03/03/2013 - 22:09

Permalink

काय राव...

कोण गेलं हे वाचायला धागा उघडला होता... हल्ली लेखनाला "कॅची" नावे देण्याची फॅशन आलेली दिसतेय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 03/03/2013 - 22:12

In reply to काय राव... by धन्या

Permalink

>>> कोण गेलं हे वाचायला धागा

>>> कोण गेलं हे वाचायला धागा उघडला होता. सेम टू सेम... वाटलं. >>> हल्ली लेखनाला "कॅची" नावे देण्याची फॅशन आलेली दिसतेय. काय बोलू... पुन्हा तुम्ही म्हणाल. लिहिणार्‍याला आंजारुन-गोंजारुन सांगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by लौंगी मिरची on Sun, 03/03/2013 - 22:15

Permalink

श्रद्धांजली .

श्रद्धांजली . वाचुन मीहि तेच पहायला आले कि आता आणखी कोण ?? पण शेवटच्या ओळीतलं दु:ख आधीच्या कडव्यांना स्पर्शहि करत नाहि हे खासकरुन नमुद करावेसे वाटले म्हणुन हा प्रतिसाद .
  • Log in or register to post comments
Profile picture for user शैलेश हिंदळेकर

Submitted by शैलेश हिंदळेकर on Sun, 03/03/2013 - 22:49

In reply to श्रद्धांजली . by लौंगी मिरची

Permalink

आधीच्या कडव्यांबद्दल

सस्पेन्स राखायचा प्रत्यत्न होता तो, आधीच्या कडव्यात कळलं असतं तर काय मजा होती, तुम्ही पूर्ण कविता वाचलीत याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 03/03/2013 - 22:56

Permalink

मजेशीर

पण डारेक्ट श्रद्धांजलि? रजनीभाईसारखा फ्याशनेबल विग घाला की राव!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 03/04/2013 - 07:16

In reply to मजेशीर by पैसा

Permalink

होय !

होय ! नाही तर काय? अहो सर सलामत तो विग पचास! उगा श्रद्धांजली कशाला ? जाहीरात नाही करायची.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 03/04/2013 - 08:31

Permalink

तुमच्या दुखावर उतारा

तुमच्या दुखावर उतारा Image removed. रजनी ही वापरतोImage removed.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2729 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com