दुधी ना मुठिया

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
1 Mar 2013 - 5:27 am

साहित्यः

१ वाटी किसलेला दुधी
पाऊण वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी रवा
१/२ वाटी बेसन
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून धणे-जीरेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
१ टेस्पून आले+लसूण+मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून साखर
२-३ चिमूट खायचा सोडा
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून पांढरे तीळ
१/४ टीस्पून हींग
५-६ कढीपत्ता

.

पाकृ:

एका भांड्यात दुधीचा कीस,गव्हाचे पीठ, रवा, बेसन, हळद, धणे-जीरेपूड, बडीशेप पावडर, लिंबाचा रस, मीठ, साखर, खायचा सोडा, आले+लसूण+मिरची पेस्ट व थोडीशी कोथींबीर घालून एकत्र करुन सैलसर पीठ भिजवावे.
दुधीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शक्यतो पीठ भिजवताना पाण्याचा वापर करु नका, अगदीच लागले तर किंचित पाणी घालून पीठ भिजवा.

आता तेलाच्या हाताने छोटे-छोटे उंडे करुन घ्या.
तेल लावलेल्या चाळणीवर तयार उंडे ठेवून,ती चाळणी पाणी घातलेल्या मोठ्या भांड्यात ठेवून, झाकून १५-२० मिनिटे वाफवून घ्या.
इडलीपात्रात किंवा कुकरला ही वाफवून घेऊ शकता.
वाफवलेले उंडे थोडे गार करुन घ्या.

.

गार झालेल्या उंड्यांचे स्लाईसेस करुन घ्या.
कढईत तेल गरम करुन मोहरी-तीळ,हींग,कढीपत्त्याची फोडणी करुन घ्या .
त्यात मुठियेचे स्लाईसेस व कोथींबीर घालून चांगले परता.

.

आवडत असल्यास वरुन थोडे सुके खोबरे घाला.

.

गरमा-गरम दुधी ना मुठिया खाण्यासाठी तयार आहे :)

.

नोटः

अशाच पद्धतीने तुम्ही मुळ्याचे, कोबीचे,पालक-मेथी मिक्स किंवा नुसत्या मेथीचे मुठिये बनवू शकता.

प्रतिक्रिया

हम्म. छान. उद्याच करण्याचा विचार आहे, पण कोबीचे. बाकी नेहमीचाच प्रतिसाद समजून घ्यावा.

बाकी नेहमीचाच प्रतिसाद समजून घ्यावा.

प्रतिसाद टंकण्याचे माझे कष्ट वाचवल्याबद्दल आभार्स... ;-)

सध्या वाचनखूण साठवून ठेवतो.. एकदा हे पथ्याचे प्रकरण आटोपले की सवडीने दुधी ना मुठिया बनवेन..

मनीषा's picture

2 Mar 2013 - 9:52 am | मनीषा

चविष्ट आणि पौष्टीक पाककृती.

पैसा's picture

2 Mar 2013 - 10:06 am | पैसा

आणखी काय म्हणू ग?

धनुअमिता's picture

2 Mar 2013 - 3:06 pm | धनुअमिता

खुप छान, आवडले.

दिपक.कुवेत's picture

2 Mar 2013 - 3:29 pm | दिपक.कुवेत

एकदम मस्त, सोपी आणि चविष्ट पाकॄ.

अनन्न्या's picture

2 Mar 2013 - 7:42 pm | अनन्न्या

मस्त!!

मस्तच पाकृ गं.... करुन बघायला पाहिजे.. पण कोबीचे... इथे दुधी मिळणे मुश्किल.

कहाँ गये वो लोग????????????

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2013 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

मला फोटू का दिसत नैत ? :-(

कोबीचे मुठीये करून बघितले. खूपच चांगल्या चवीचे झाले होते.

कच्ची कैरी's picture

4 Mar 2013 - 11:49 am | कच्ची कैरी

मुलांना डब्याला द्यायला पण छान !! पाककृती आणि फोटो मस्तच !!!
http://mejwani.in/

कधीपासून ही रेसिपी हवी होती गं......... एकदम झकास :)
लग्गेच करुन बघणार :)

इशा१२३'s picture

4 Mar 2013 - 7:58 pm | इशा१२३

मेथीचे केलेले आहेत..आता असेही करुन बघते...

खादाड's picture

5 Mar 2013 - 3:20 pm | खादाड

मुठीये करून बघितले. खूपच चांगल्या चवीचे झाले होते. आणि विषेश म्हणजे शेजारी राहाण्यार्या गुजराथी वहिनी आहेत त्यांना ही आवडले !! धन्यवाद :)

अक्षया's picture

5 Mar 2013 - 5:01 pm | अक्षया

नेहमीप्रमाणेच छान रेसीपी, छान फोटो..

मस्त आहे रेसिपी, शेवटचा फोटो जबरदस्त!

माझी आई असेच साहित्य वापरून मुठीये बनवते . पण कणिक जाडसर वापरते . ती भाजून घेते आणि कणिक थंड झाल्यावर त्यात बाकीचे साहित्य घालते. मग फ्राय pan वर कडेने तेल सोडून भाजते . पण ती वाफवून घेत नाही. असेही खमंग आणि खरपूस खायला छान लागतात.

आयुर्हित's picture

18 Jul 2014 - 11:20 pm | आयुर्हित

सुंदर फोटो व उत्कॄष्ट आरोग्यदायी पाकॄ!
धन्यवाद.