....बर...!!!
......बर .....................!!
गर्दी जमलीये कसलीतरी
बघू बघू काय झालं ...
"अगं धरपडशील कुठेतरी
मुली …..हो मागं तू ....."
......बर .....................!!
बाई मी सांगू ,मी सांगू ...
जमलंय मला …..
“आलंय तुला उत्तर तर शांत बस ,
बाकीच्यांना विचार करू दे जरा ......”
......बर .....................!!
व्वा मस्त पाऊस पडतोय
सगळे चाललेत भिजायला .......
“हे बघ.... मुलीच्या जातीनं जास्त उंडारु नये ...
बस ….वाचत काहीतरी ......”
......बर .....................!!
हेही नाटक मीच लिहिलंय ...सर
यावेळी एखादा रोल पण करेन म्हणते ....
"good good ..... नाही पण backstage लाही
असेलंच की एखादं prize यंदा !!"
......बर .....................!!
इतक्यात घाई कशाला करायची
बघुना काही दिवसांनी ....
“ते करीअर बिरीअर कर गं लग्नानंतर ..
उगीच आत्ता आमच्या जीवाला घोर .....”
......बर .....................!!
आपल्या engagement ला
माझे सगळे friends येणार आहेत.....
"अरे व्वा ! ... ते मैत्रीणींचं ठीक आहे ......
पण बाकी जरा कमीच कर ......"
......बर .....................!!
“ए शुभ्र ढगा .....तुच एक आहेस बघ जवळचा , मला....”
" अगं .........
शेवटच्या घडीला बोलणार नाही खोटं ,
पण तुझ्याशी मैत्री करायला भाग्य हवंय मोठं !
माझा न रंग ठरलेला न रूप ,
न धड पाणी साठवतो न धूप ,
कधी सूर्याबरोबर तर कधी चंद्राबरोबर ,
माझी न कुणाला सोबत न कुणाला धास्ती ,
मला न थोबाडीत मारू शकशील न मिठी ,
माझ्यावर न कुणाच्या उपमा न कुणाच्या कविता ......
पण हसून हसून आज किती मारल्यास गं बाता ...
भरून आलोय बघ ...बरसून संपेन मी आता .........."
...........बर ...................!!!
आता तस काही नाही राहीलय हो...
काय सांग्ता? आम्च्या गावाकड
बर!!
छान
बर ....
(No subject)
आवडली कविता. अंमळ कालबाह्य
खूप आवडली. निव्वळ अप्रतिम!!!
सुरे़क्ख !
आवडली कविता!
प्रतिसाद आवडला.
कविता चांगली आहे. कधी कधी