Skip to main content

चुकवू नयेत असे चित्रपट - डॉ. झिवागो

रविवार, 10/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बनवणे हि फार मोठी कला आहे. त्या मधे बाकी सर्व कलांचा अन्तर्भाव होतो. जसे की साहित्य, संगीत, अभिनय, production design साठी लागणारी सृजनता. ह्या सर्व बांधुन ठेवतो तो Director. Good Movies should be watched few times to understand the intricacies of film making. माझा असा अनुभव आहे की उत्तम चित्रपट पहिल्या वेळेस बघताना अचंबित करतो, नंतर काहि दिवस सतत डोक्यात रहातो. पुन्हा पुन्हा बघितला की त्यामधिल आधि miss झालेल्या गोष्टी ही जाणवतात. हा जो चित्रपट आहे तो सुद्धा कमीत कमी २-३ वेळेला तरी बघाच. हा प्रसिद्ध चित्रपट आहे त्यामुळे आपल्यापैकी बर्‍याच लोकांनी बघितला असेलच. ----- Doctor Zhivago : - हा सिनेमा १९६५ साली तयार केला आहे आणि बोरिस पास्तरनाक ( Boris Pasternak ) ह्या प्रसिद्ध लेखकाच्या ह्याच नावाच्या कादंबरी वर बेतला आहे. ह्या लेखकाला Nobel Prize जाहिर झाले होते. ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन म्हणजे "Passionate Movie about Passionate People in Passionate Times" ( Rotten Tomato ). Love Story in epic proportion with backdrop of Country in Civil War. Backdrop of Civil war and end of a Culture ह्या दोन गोष्टी "Gone With the Wind" आणि ह्या चित्रपटात सारख्या आहेत. थोडक्यात कथावस्तु - चित्रपट Russian Revolution च्या थोडा आधी चालु होउन काही वर्षा चा काळ दाखवतो. कहाणी एका पॅरीस हुन डॉक्टर होउन आलेल्या तरुणा ची आहे. केन्द्र्स्थानी ड्रॉ. युरि झिवगो, त्याची प्रेयसी /बायको Tanya, नंतर ची प्रेयसी "लारा" ही पात्र आहेत. त्यांच्या आजुबाजुला तितकिच महत्वाची "पाशा" ( Pavel Pavlovich ), विक्टोर ( Victor Komarovsky ), युरी चे वडिल अशी पात्र आहेत. रशियन क्रांती मुळे जे तिथले समाज जीवन पूर्णपणे उद्वस्त झाले, त्याच मोठा फटका नायक आणी त्याच्या कुटुंबाला बसतो कारण ते लोक तसे वरच्या वर्गातले असतात. त्यांना पुढे सोसायला लागलेल्या हालअपेष्टा, झालेली ताटातुट. नायकाचे दुसर्‍या स्त्री मधे मन गुंतणे आणि त्यातुन होणारी फरफट हे दाखवले आहे. आवर्जुन काय बघावे - - मानवी मनाचे अतिशय सुंदर चित्रण. प्रत्येक पात्र बघण्या सारखे आहे. - भव्य Canvas - एखादे ४ फुटांचे चित्र आणि एखादे भव्य, मोठी भिन्त व्यापुन राहिल असे चित्र ह्या मधला जो फरक आहे तो हा चित्रपट बघताना जाणवत रहातो. - Omar Sharif चा उत्तम अभिनय. Underplay केलाय खूप पण डोळ्या मधे जी आर्तता त्यानी दाखवली आहे त्याला तोड नाही. - Production Values - रशिया चे सगळे वातावरण जसे च्या तसे उभे केले आहे आणि ते सुद्धा स्पेन मधे. माझी अशी request आहे की प्रत्येक सीन बघताना विचार करा कि हा सेट कसा उभा केला असेल? किती कष्ट पडले असतील? थोड्या ऊणिवा - - लांबी ३ तासा हुन जास्त आहे. - शेवट जास्त रेंगाळतो. - संवाद जास्त effective पाहिजे होते. --------------- आपल्या अभिप्रायाची वाट बघतोय. पण हा सिनेमा नक्की बघा आणि मग कळवा. चुकवु नये असे चित्रपट - कॅसिनो : http://misalpav.com/node/23875
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4316
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मला संवादात्मक सिनेमे जास्त आवडत नाहीत.. त्यामुळे, वेळ मिळाला तर नक्की बघीन..

हा सिनेमा राहूल ७० एमेम पुणे येथे पाहिल्याचे आठवते. त्यावेळी एकूण आवड गन्स ऑफ नॅवरॉन टाईप असल्याने हा चित्रपट नक्की कसा होता हे आठवत नाहीये. पण याचे दिगदर्शुक डेव्हीड लीन याना मात्र मी मानतो. विल्यम वायलर, रोनाल्ड नीम , स्टीवन स्पीलबर्ग प्रमाणे हे अगदी उच्च दर्जाचे दिगदर्शक आहेत. (होते) .

फार अपुरे ! कॉलेजमधे असताना आमच्या पिढिला या चित्रपटाने भारुन टाकले होते. त्यातील कवितेचे मी भाषांतरही केले होते. त्यातील एक गंमत म्हणून खाली देत आहे. - दरवाजातून आत बघितले माझेच घर मला ओळखू येईना अचानक तिच्या जाण्याने घराचा आणि मनाचा कसा गोंधळ उडाला आहे भयानक. ठणकणारर्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू समजून नाही देत या अवस्था झालेल्या जखमा कशा मोजता येतील ? आणि कशाने ? त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होते तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले..... या कवितेकडे फार लक्ष देऊ नये..... पण या चित्रपटाचे परिक्षण आपण परत लिहावे असे वाटते.........

In reply to by जयंत कुलकर्णी

अपुरे झाले असे तुम्हाला वाटते हे बरोबर च आहे. त्याला २ कारणे आहेत. मला नीट लिहिता येत नाही आणि मनातले सगळे शब्द्बबद्ध करता येत नाही. दुसरे कारण हे की, चित्रपटाची कथा आस्वादात लिहिणे मला बरोबर वाटत नाही. चित्रपट एक अनुभवण्याची गोष्ट आहे, कथा हा त्यातला एक भाग आहे. एक तर कथा टंकायचा कंटाळा येतो आणि ज्यांना पाहिजे त्यांना आंतरजाला वर ती उपलब्ध असतेच. हे लिहिण्या मागचा उद्देश फक्त pointer देणे इतकाच आहे.

In reply to by काळा पहाड

प्रसाद१९७१ = अनुराधा१९८० असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? तसे असेल तर मला माहीत नाही.... पण तसे दिसतेय वरच्या प्रतिसादावरुन........

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रसाद१९७१ = अनुराधा१९८० अगदी तसेच नाही, पण बरेसचे तसेच. आपल्या संस्कृतीत नवरा बायको एक च समजले जातात ना. :-( घरात एकाच मशीन ( Computer ) असल्याचा दुष्परिणाम. बाई साहेबांनी काल login केलेले दिसतय

डॉ. झिवागो हा माझ्या आवडत्या सिनेमा पैकि एक आहे.... साम्यवादी राजवटित एका कविमनाच्या नायकाची कुतरओढ ओमार शेरिफ ने समर्थ पणे दाखवली आहे.. डॉ. झिवागो ट्युन तर लोकप्रिय झालीच होति त्या काळात.. लाल क्रान्तिचे चित्रण प्रभावि पणे झाले आहे.. चार्लि च्यापलिन ची मुलगी जेरोल्डाईन हिचे काम पण प्रभावी आहे... चित्रपट सन्थ गतिने पुढे सरकतो पण लाल क्रान्तिचा कालखन्ड सामाजिक विषमता व त्या वेळचे समाज जिवन उलगडुन दाखवतो... आवडेश....

"Passionate Movie about Passionate People in Passionate Times". १००% सहमत...

३-४ वेळा पाहीलाय .. लहान असताना पाहीला होता तेंव्हा नक्की काय मेसेज आहे हेच समजलं नव्हतं. धावत्या ट्रेनमधे मृत बालक हातात धरुन चढणारी बाई याच चित्रपटात आहे ना?