जन्ता अनाडी और नेता खिलाडी!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
6 Dec 2012 - 6:49 am
गाभा: 

नुकतेच भारतीय ऑलिंपिक संघटनेला जागतिक ऑलिंपिक संघटनेने निलंबित केले. कधी नव्हे ते सहा पदके मिळवणार्‍या भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकला कायमचे मुकावे लागणार की काय असे वाटू लागले आहे.
ह्याचे कारण साधे सोपे आहे की क्रीडा क्षेत्रात नको इतका राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार ह्यांचा बुजबुजाट झाला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेने भारताचे नाक कापले आहे.
http://www.esakal.com/esakal/20121204/4945269043476996758.htm

पुण्याची शान समजले जाणारे भ्रष्टाचाराचे श्यान आकंठ खाणारे महान नेते सुरेश कलमाडी ह्यांच्या अथक परिश्रमांना शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचपावती मिळाली आहे असे समजायला हरकत नाही. तुरुं़गवास, थोबाड रंगवणे असे कार्यक्रम झाले आता आंतरराष्ट्रीय मानहानीची भर पडली म्हणायचे!

हाही लेख वाचनीय आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/very-good-snout-break-20842/

विविध पक्षांचे लोक ज्यात भाजपाही सामिल आहे, हे क्रीडाक्षेत्रातील मानाची स्थाने कशी उपभोगत आहेत ह्याचे सुरस वर्णन वाचायला मिळेल.
आपले जाणते राजेही ह्यात मागे नाहीत. माझे सासरे क्रिकेटपटू होते ह्या जोरावर ते क्रिकेटवर आपला हक्क सांगत आले आहेत असे ऐकिवात आहे. अर्थात हे राजेसाहेब चेंडूपेक्षा नोटांचे खेळ खेळण्यात माहिर आहेत हे सर्वज्ञात आहेच!
क्ष.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार

मुद्रणसुलभ आवृत्ती
59 वाचने
वाचनखुणा साठवा

मिपावरती काही सदस्यांनी सुरु केलेल्या 'रोजचे वर्तमानपत्र' ह्या सेवेला मिपाकरांनी असा दुर्लक्षीत प्रतिसाद दिलेला बघून शरम वाटली.

आनन्दा's picture

6 Dec 2012 - 3:20 pm | आनन्दा

पैश्याकडे पैसा जातो, तसे प्रतिसादाकडे प्रतिसाद जात असावेत बहुधा.

ऋषिकेश's picture

7 Dec 2012 - 4:25 pm | ऋषिकेश

अरे परा, खेळाडूंच्या भवितव्याची फिकीर (मी सोडून) कशी कुण्णा कुण्णालाच नाहिये आणि सरकार तर खेळाडूंच्या वैटावरच टपलेलं आहे असे गृहित धरून आततायी फेसबुकी गदारोळ घालणार्‍यांबद्दल (त्यात बहुतांश मिडीयाही आलीच) न बोललेलेच बरे असा सुज्ञ विचार मिपाकरांनी केला असेल ;)

(ज्या आपण तिघांनी प्रतिसाद दिलाय ते सुज्ञ नाहित असे सुचवण्याचा हेतू नाही ;) )

हुप्प्या's picture

7 Dec 2012 - 11:10 pm | हुप्प्या

सरकारला खेळाडूंचे भले व्हावे असेच वाटते आहे. म्हणूनच कलमाडींजींसारखे प्रख्यात क्रीडापटू विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांकरता रक्त आटवत असतात (करदात्यांचे).
मग त्या करता अल्पसा कारावास भोगावा लागला तरी बेहत्तर!
ह्या बाजीगर खेळाडूकरता तमाम पुणेकर पुन्हा एकदा त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्याला भरघोस मताने निवडून त्याला पुन्हा क्रीडाक्षेत्राची सेवा आणि त्याकरता उचित मेवा प्राप्त करण्याची संधी देतील ह्याबद्दल तिळमात्र शंका नाही.