✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राज ठाकरेंनी अखेर बोनीकपूर च्या कार्यक्रमाचा विरोध थांबवला..!

क
कॉमन मॅन यांनी
गुरुवार, 09/06/2012 - 18:19  ·  लेख
लेख
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही चार खडे बोल वगैरे सुनावले होते.. भारताविरुद्ध रोज उठून काहीना काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या, प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कलाकारांना इथे बोलावून त्यांच्याकरता रेड कारपेट घालण्याची काय गरज आहे? असे मुद्दे घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.. जाहीर भाषण करून आशाताईंनाही फटकारले होते, त्याचप्रमाणे विविध वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमात मनसेच्या पित्त्यांनी सदर कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार.. तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते.. परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..! आशाताईंसारख्या महान कलावंताला या कार्यक्रमात भाग न घेण्यासाठी जाहीरपणे चार खडे बोल सुनावणाऱ्या राज ठाकरेंनी त्या बोनी कपूरसमोरशी समझौता कसा केला ?? [संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10541 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

>>>शेवटी 'पैसा बोलता है.. '

नाना चेंगट
गुरुवार, 09/06/2012 - 18:23 नवीन
>>>शेवटी 'पैसा बोलता है.. ' हेच खरं..! संपला विषय. हे सुद्धा तुम्हाला राजकडूनच शिकावं लागलं तर. असो.* * माझा आणि मनसेचा काहीही संबंध नाही. खुलासा अशासाठी की राजवर गरळ ओकणारे माझ्यावर सुद्धा घसरतील म्हणून. असो.
  • Log in or register to post comments

नान्या

कुंदन
गुरुवार, 09/06/2012 - 18:45 नवीन
नान्या , तुला मी मागेच बोललो होतो ना , प्यार्-ब्यार , एथिक्स्-बिथिक्स सगळे झुठ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

पैसा देवो भव

गणपा
गुरुवार, 09/06/2012 - 18:27 नवीन
आताच मिडियाकडुन ऐकले की साहेब स्वःच बोलुन गेले ".......पैसा* दे हो भाव!" बादवे प्रत्यक बातमीचा धागा झालाच पाहिजे या अट्टाहासास अनुमोदन.
  • Log in or register to post comments

वास्तव.

तर्री
गुरुवार, 09/06/2012 - 18:28 नवीन
हे वास्तव आहे. राजू चा इतिहास कच्चा आहे. वर्तमानाचे वास्तव आपण लिहिलेच आहे. आता असे चालूच राहिले तर भविष्य उज्वल मात्र आहे.
  • Log in or register to post comments

परंतु पैसा हा देशापेक्षाही,

सुहास..
गुरुवार, 09/06/2012 - 18:48 नवीन
परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले >>> ???? संपादित.काल-परवाच राज ठाकरेंनी मिडीया ला झोडुन काढण्याची भाषा केली आहे ..मिडीया तुटुन पडणारच !! ...असो ...
  • Log in or register to post comments

आपल्याला असे म्हणायचे आहे का

कॉमन मॅन
गुरुवार, 09/06/2012 - 18:57 नवीन
आपल्याला असे म्हणायचे आहे का की सदर बातमी ही धादांत खोटी आहे? तसे असेल तर आम्ही आमचे शब्द त्वरीत व बिनशर्त मागे घेतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

या बातमीत तथ्य किती काय ते

हारुन शेख
गुरुवार, 09/06/2012 - 19:01 नवीन
या बातमीत तथ्य किती काय ते कळेलच पण लेखाची भाषा आवडली नाही.(अगदी शीर्षकापासून )
  • Log in or register to post comments

राज ठाकरेंनी त्या यःकश्चित

सुहास..
गुरुवार, 09/06/2012 - 19:08 नवीन
अरेच्च्या ! प्रश्न तुलाच पडला आणि उत्तर ही तुच देणार का ? म्हणून एक सल्ला दिला, तो कसला वैयक्तीक , जागतिक सल्ला आहे तो. शिवाय तुमच्या सारख्यांना अशीच भाषा समजते, असा आमचा अनुभव आहे , दुसरे म्हणजे दिसली बातमी ( विषेशता कॉन्ट्रॉव्हर्सल ! ) की युनीवर्सल ट्रुथ सांगीतल्यासारखे घावत पळत येवुन तुम्ही धागे काढुन ट्यारप्या घ्यायचे धंदे करता असे ही एक आमचे ऑब्जर्वेशन आहे .. बाकी , आंजावर धागे काढुन , उखाळे-पाखाळे काढणार्‍यांना आमचा आधी ही दंडवत होताच, आता तुम्हालाही ! धन्यवाद ! ( आणी पुन्हा संपादकांची धमकी देवु नये ! )
  • Log in or register to post comments

तो कसला वैयक्तीक , जागतिक

कॉमन मॅन
गुरुवार, 09/06/2012 - 19:23 नवीन
तो कसला वैयक्तीक , जागतिक सल्ला आहे तो.
आवश्यकता आणि सहमती नसली तरी आपल्या सल्ल्याचा आदर आहे..
दुसरे म्हणजे दिसली बातमी ( विषेशता कॉन्ट्रॉव्हर्सल ! ) की युनीवर्सल ट्रुथ सांगीतल्यासारखे घावत पळत येवुन तुम्ही धागे काढुन ट्यारप्या घ्यायचे धंदे करता असे ही एक आमचे ऑब्जर्वेशन आहे ..
ऑब्जर्वेशन अथवा ऑब्जेक्शन, काहीही असले तरी त्याचा आम्ही आदर करतो..ज्या सामजिक विषयावर आम्हाला इथे लिहावेसे वाटेल त्या विषयावर आम्ही इथे लिहायचे नाही का, इतकेच सांगावे.. आपण मूळ विषयावर प्रतिक्रिया न देता आम्ही हा धागाच मुळात का काढला असा आपला प्रश्न आहे.. अर्थात, तो आपण विचारू शकता, परंतु मूळ विषयावरही आपण काही प्रतिक्रिया दिली असतीत तर बरे झाले असते..
( आणी पुन्हा संपादकांची धमकी देवु नये ! )
आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आपल्याला कुठलीही धमकी वगैरे दिलेली नाही..तरीही आपणास तसे वाटत असल्यास आम्ही आपली मनापासून क्षमा मागतो..वास्तविक एकेरी, अरेरावीची भाषा आपणच वापरत आहात असे आम्हाला जाणवते..असो. बाय द वे, सदर बातमी खोटी आहे का? असे आम्ही विचारले होते.. त्याचे उत्तर दिले असतेत तर बरे झाले असते. असो, मर्जी आपली. तिचा आदर आहेच..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

बाय द वे, सदर बातमी खोटी आहे

किसन शिंदे
गुरुवार, 09/06/2012 - 19:41 नवीन
बाय द वे, सदर बातमी खोटी आहे का? असे आम्ही विचारले होते.. त्याचे उत्तर दिले असतेत तर बरे झाले असते. असो, मर्जी आपली. तिचा आदर आहेच..!
अरेच्च्या!! आश्चर्य वाटतंय तुमच्या दुतोंडी वागणूकीचं. कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ बातमीवरून जोशात येत तुम्ही वर धागा काढलाय आणि परत प्रतिसाद कर्त्यालाच विचारताय बातमी खरी आहे का म्हणून. तरी म्हटलं तुमचं 'आजच्या शिळ्या बातम्या' नावाचं सदर काही दिवसांपासून दिसलं कसं नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ

कॉमन मॅन
Fri, 09/07/2012 - 12:19 नवीन
कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ बातमीवरून जोशात येत तुम्ही वर धागा काढलाय
आमच्या मते कुठूनतरी ऐकलेली ही बातमी फुटकळ नव्हे. आजच्या वर्तमानपत्रातदेखील ही बातमी आली आहे.. वर्तमानपत्रवाले जर मुख्य पानावर ही बातमी देतात तर त्या बातमीसंदर्भात आम्ही इथे एक धागा काढला आहे त्यात आमचं काही चुकलं आहे असं आम्हाला वाटत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आम्हाला तेव्हा राजसाहेबांची

गोंधळी
गुरुवार, 09/06/2012 - 19:14 नवीन
आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार.. तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते.. ओ कॉमन मॅन राज यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे. .. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क तोडपाणी -मांडवली झाली म्हणे..! उगाच कोणाचा राग कोणावरही काढु नका.जरा सबुरी ठेवा.
  • Log in or register to post comments

थोsssडे कष्ट

अन्या दातार
गुरुवार, 09/06/2012 - 19:17 नवीन
परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क तोडपाणी -मांडवली झाली म्हणे..!
हे लिहिण्यापूर्वी थोssssडे कष्ट घेतले असते तर धागा काढायची वेळ आली नसती. लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या या बातमीनुसार: "यापुढे पाक कलाकारांना घेऊन असे कार्यक्रम करणार नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले." सबब नांगी कुणी कुणासमोर टाकली हे कळतच आहे. अर्थात तुमच्या धागाप्रेमाबद्दल मी काही वेगळे बोलण्याची गरज नाही. इतिहास तुम्हालाही माहितच आहे. पुन्हा समोर आणायची वेळ येऊ देऊ नका इतकेच सांगतो.
  • Log in or register to post comments

यापुढे पाक कलाकारांना घेऊन

कॉमन मॅन
गुरुवार, 09/06/2012 - 19:26 नवीन
यापुढे पाक कलाकारांना घेऊन असे कार्यक्रम करणार नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले.
हा भविष्यातील मुद्दा आहे. परंतु सध्या जो कार्यक्रम सुरू होणार आहे त्या संदर्भात मनसेवाल्यांनी जो देशाभिमान दाखवला होता, आशाताईंना सुनावले होते त्याचे काय झाले? या बाबत लोकसत्तेचा कुठला दुवा आपण कृपया देऊ शकाल का? धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

तोडपाणी झाल्याचा कुठला पुरावा

अन्या दातार
गुरुवार, 09/06/2012 - 19:33 नवीन
तोडपाणी झाल्याचा कुठला पुरावा देऊ शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

असा आमचा अंदाज आहे..

कॉमन मॅन
गुरुवार, 09/06/2012 - 19:41 नवीन
असा आमचा अंदाज आहे.. काल-परवापर्यंत साक्षात आशाताईंचादेखील देशाभिमान जागृत करू पाहणार्‍या मंडळींनी आज बोनी कपूर त्यांना भेटल्यानंतर एकदम अबाउट टर्न कसा काय केला हे सजमले नाही.. त्यावरून आम्ही तोडपाणी झाल्याचा अंदाज बांधला होता.. आमच्या लेखनातून आमचा तसा 'अंदाज' नसून 'आरोप' आहे असे जर कुणाला वाटत असेल तर कदाचित तो आमच्या लेखनाचा दोष असेल.. तोडपाणी झाले असा आमचा अंदाज आहे, आरोप नाही.. - हे आम्ही या प्रतिसादाद्वारे स्पष्ट करू इच्छितो.. त्यातून राज ठाकरे अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे आपल्याला वाटत असल्यास त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आरोपच!

अन्या दातार
गुरुवार, 09/06/2012 - 20:11 नवीन
आपल्याच लेखात हे एक वाक्य सापडते बघा:
परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.
याचाच अर्थ तुम्ही थेट आरोप करत आहात राज ठाकरेंवर. मग "..... असा आमचा अंदाज आहे, आरोप नाही" अशी मखलाशी का करता? वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हणता की राज ठाकरे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे आपल्याला वाटत असल्यास त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही... निदान आत्ताच्या प्रकरणाचा विचार करता आपली राज्यघटना असे मानते की सिद्ध होईपर्यंत आरोपीस निर्दोष मानावे. तसेच एखाद्यावर बेलगाम आरोप केल्यास व ते सिद्ध करण्याची जबाबदारीही येते. इतके दिवस राज्यघटना राज्यघटना म्हणून शहाणपण शिकवत धागे काढणार्‍या आयडीस या गोष्टींचा विसर पडावा? पब्लिक फोरमवर धागे काढण्यास मज्जाव नसला तरी गेलाबाजार पब्लिकला पकवू तरी नये असे माझे वैयक्तिक मत आहे. आग्रह/हुकूम्/आज्ञा नाही हे ध्यानात घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमन मॅन

पब्लिक फोरमवर धागे काढण्यास

कॉमन मॅन
Fri, 09/07/2012 - 12:19 नवीन
पब्लिक फोरमवर धागे काढण्यास मज्जाव नसला तरी गेलाबाजार पब्लिकला पकवू तरी नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे.. परंतु आमचे नांव वाचून आमचा धागा उघडूच नये आणि पकवून घेऊ नये हेही पब्लिकच्या हातात आहे असे आम्हाला वाटते..
आग्रह/हुकूम्/आज्ञा नाही हे ध्यानात घ्यावे.
आभारी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

वाट्टेल ते

श्रीरंग
गुरुवार, 09/06/2012 - 19:41 नवीन
तोड्पाणी / मांडवली झाल्याची "बातमी", की अंदाज??
  • Log in or register to post comments

आरं तेजायला

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 09/06/2012 - 19:48 नवीन
समदा मामला आंदासपंचे हाय व्हय! चालुंद्या चालुंद्या ...
  • Log in or register to post comments

वाटलच होतं!!

अर्धवटराव
गुरुवार, 09/06/2012 - 19:54 नवीन
या देशातील " आम आदमी" असले निर्बुद्ध विचार करतो म्हणुन देशाचं "छान" चाललय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अंतरे कोsपि हेतु?

सुधीर काळे
गुरुवार, 09/06/2012 - 20:15 नवीन
"छोटे उस्ताद" या कार्यक्रमाला १०-१२ वर्षांच्या पाकिस्तानी किशोर-किशोरींना बोलवून असाच एक गायनस्पर्धेचा कार्यक्रम (मला वाटते) झी या वाहिनीवर चालू होता. (मला वाटतं ३-४ वर्षे झाली असावीत.) त्या स्पर्धेला समर्थन देताना मी म्हटले होते कीं राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या पातळीवर वैर असल्यामुळे दोन्ही देशातील आम जनतेला फारच एकांगी मतं वाचावी, ऐकावी आणि पहावी लागतात. कांहीं खरी असतात तर कांहीं प्रचाराचा भाग असल्यामुळे खोटी असतात. या विषारी वर्तुळातून (vicious circle) बाहेर पडायचे असेल तर अशा तरुण-किशोर वयातील जनतेचा आपापसात संबंध वाढला पाहिजे. तसे झाले तर कित्येक गैरसमज दूर होतील व पुढची पिढी तरी मैत्रीच्या दिशेने मोकळ्या मनाने प्रयत्न करेल. म्हणून अशी कलावंतांची, लेखकांची आणि सामान्य जनतेची आवक-जावक ही निरोगी धोरणाच्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे असे मला मनापासून वाटते. फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे प्रयत्न फक्त आपणच (भारतच) करतो. आपण गुलाम अली, स्व. मेहदी हसन यांना इथे डोक्यावर घेऊन नाचतो. राहत फते अली इथे गायक म्हणून आपला जम बसवतात पण तशी दिलदारी आपल्या कलाकारांच्या वाट्याला पाकिस्तानकडून येत नाहीं. त्यामुळे आपले कलाकार तिकडे जाताना व तिथल्या मंचावर आपल्या कलेची अदाकारी पेश करताना दिसत नाहींत. थोडक्यात टाळी तर वाजायलाच हवी आहे, भारत त्या दिशेने सकारात्मक प्रयत्नही करताना दिसतो पण तसे सकारात्मक प्रयत्न पाकिस्तानकडून झालेले माझ्या माहितीत तरी नाहींत. असे प्रयत्न पाकिस्तानच्या बाजूनेही व्हायला हवेत. आता राज ठाकरे यांनी आणि बोनी यांनी आपापसात काय बोलणी केली व कुठल्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आपला विरोध मागे घेतला याची अद्याप माहिती नसल्यामुळे त्याबाबत सध्या कांहीं मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाहीं.
  • Log in or register to post comments

फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे

कॉमन मॅन
Fri, 09/07/2012 - 12:22 नवीन
फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे प्रयत्न फक्त आपणच (भारतच) करतो.
आणि तोवर इथे भारतात पुन्हा एखादा पाक-पुरस्कृत बाँबस्फोट होतो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

'मनाचे श्लोक'

सूड
गुरुवार, 09/06/2012 - 20:17 नवीन
'मनाचे श्लोक' नावाचे नवीन सदर सुरु करावयाची सुचवणी करावयांस हवी, असा विचार धागा वाचून सहज येऊन गेला. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

घ्या! मग आमचे सोकाजीनाना

सोत्रि
गुरुवार, 09/06/2012 - 20:52 नवीन
घ्या! मग आमचे सोकाजीनाना चावडीचर काय वेगळे म्हणाले होते ? :) - (चावडीवरचा) सोकाजी
  • Log in or register to post comments

आयला सोकाजीनाना अंतर्यामी

गोंधळी
गुरुवार, 09/06/2012 - 21:42 नवीन
आयला सोकाजीनाना अंतर्यामी आहेत कि त्यांची डिटेक्टीव एजन्सी आहे ?
  • Log in or register to post comments

खोके पोचले असावेत.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/06/2012 - 21:45 नवीन
खोके पोचले असावेत. चुलत्याच्या पावलावर पाऊल ठेवणे चालू आहे असे दिसते. ज्याचे उपद्रव मूल्य जास्त त्यालाच जास्तीत जास्त किंमत मिळते हेच खरे. - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

आयला अजुन एक अंतर्यामी.

गोंधळी
गुरुवार, 09/06/2012 - 22:34 नवीन
आयला अजुन एक अंतर्यामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

प्रतिसाद अतिशय आवडला..

कॉमन मॅन
Fri, 09/07/2012 - 12:11 नवीन
प्रतिसाद अतिशय आवडला.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

खोके पोचले असावेत.

पक पक पक
Fri, 09/07/2012 - 19:34 नवीन
खोके पोचले असावेत. चुलत्याच्या पावलावर पाऊल ठेवणे चालू आहे असे दिसते. ज्याचे उपद्रव मूल्य जास्त त्यालाच जास्तीत जास्त किंमत मिळते हेच खरे. - जय महाराष्ट्र :crazy: :crazy: :crazy: अप्पा जोगळेकर मुळ्चे बिहारी आहात का.. ? असा प्रश्न तुम्हाला कोणी कसा विचारला नाही अजुन..? जय बिहार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

एवढीच प्रतिक्रिया

चौकटराजा
Fri, 09/07/2012 - 08:51 नवीन
वॉर बिटवीन टू नेशन्स इज नेव्हर अ वॉर बिटवीन द पीपल बट बिटवीन द टू मेंटॅलिटिज ओफ द प्रिमियर्स. जगात राष्ट्रे कधीही एकमेकात भांडत नाहीत त्यांचे राष्ट्रप्रमुख आपल्या स्वार्थासाठी ही भांडणे लावत असतात. असा म्हणे युद्ध शास्त्रातील नियम आहे.
  • Log in or register to post comments

कॉमन मॅन च्या धाग्याला काय

अमोल खरे
Fri, 09/07/2012 - 10:18 नवीन
कॉमन मॅन च्या धाग्याला काय सिरिअसली घेतायत लोकं काही कळत नाही. मागे अण्णा हजारेंच्या आंदोलनावर पण हा आयडी असाच तुटुन पडला होता. कोळसा घोटाळा, लवासा प्रकरण ह्यावर काही धागा काढत नाही हा आयडी, त्यावरुन समजुन घ्या ना राव. आता परत सरकारी बढतीत आरक्षण द्यायला घटना बदलणार आहेतच ना, मग लोकपाल च्या वेळी काय प्रॉब्लेम होता, पण कॉमन मॅनने तेव्हा घटना बदलतायत म्हणुन आरडाओरड केली होती, आता ह्यावेळी धागा काढल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments

मग लोकपाल च्या वेळी काय

कॉमन मॅन
Fri, 09/07/2012 - 12:11 नवीन
मग लोकपाल च्या वेळी काय प्रॉब्लेम होता, पण कॉमन मॅनने तेव्हा घटना बदलतायत म्हणुन आरडाओरड केली होती,
'घटना बदलतायत..' अशी आरडाओरड आम्ही कुठेही केलेली नाही. कृपया दाखवून द्यावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

clay feet

रमेश आठवले
Fri, 09/07/2012 - 11:08 नवीन
आशा भोंसले यांच्या सारख्या मुंबईत महाराष्ट्रात व देशात अतिशय लोकप्रिय असलेल्या जेष्ठ कलावंतांनी नियोजित केलेला कार्यक्रम उधळून लावण्यासाठी मुंबईतील जनतेचे पुरेसे पाठबळ मिळणार नाही अशी शंका निर्माण झाल्यामुळे निषेधाची चळवळ मागे घेतली असावी. कपूर यांनी केलेल्या विनंतीचे निमित्त केले असावे असे वाटते. इतर देवाण घेवाण झालीच असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

संपादितः मूळ धाग्यातील भाषा

कॉमन मॅन
Fri, 09/07/2012 - 12:21 नवीन
संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे.
संपादकांनी केलेला बदल आम्हाला शिरोधार्य आहे..
धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती.
आम्हीही काही सन्माननीय सदस्यांना हेच सांगत होतो..
वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील.
अत्यंत आभारी आहे. मिपा संपादक मंडळावरील आमचा विश्वास दृढ झाला आहे..
  • Log in or register to post comments

मला एका जुन्या आयडीची

कवितानागेश
Fri, 09/07/2012 - 12:28 नवीन
मला एका जुन्या आयडीची प्रकर्षाने आठवण होत आहे. :) बाकी चालू द्या....
  • Log in or register to post comments

माउ

इरसाल
Fri, 09/07/2012 - 12:35 नवीन
मय भी यहीच आठवनेका प्रयत्न कर रहा था की, तबतलग तुमने बीच मे बोल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तंतोतत!

किसन शिंदे
Fri, 09/07/2012 - 13:47 नवीन
अगदी काडीचाही फरक नाही. 'हा' आयडी अगदी सेम टू सेम 'त्या' आयडी सारखाच लिहितोय/वाद घालतोय/ संपादकांवरचा दृढ विश्वास वैगेरे... तेव्हा कौलं होती आता काथ्या आहे बाकी काडीचाही फरक नाही. उगा पब्लिकची सहानुभूती मिळवण्याकरता जातो असं म्हणायचं नि नाव बदलून परत इथेच यायचं..करायचे कशाला असले उपद्व्याप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मी पहिल्या धाग्यालाच पकडलेला

स्पा
Fri, 09/07/2012 - 14:04 नवीन
मी पहिल्या धाग्यालाच पकडलेला होता.. तुम्हाला आज कळतंय होय ? :D परा सर कुठे हात हो? तुमच्या विद्यार्थ्याला समज द्या जरा
  • Log in or register to post comments

मिपावरती

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/07/2012 - 14:18 नवीन
आजवर वाचलेल्या काही अविस्मरणीय वेडझव्या लेखांपैकी हा एक लेख आहे.
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता
आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..!
तुम्हाला ज्या कार्यक्रमाला विरोध आहे / होता तो कार्यक्रम नक्की कुठल्या वाहिनीवरती येतो ते माहिती नाही, तुम्हाला समझौता झाला, का तोडपाणी झाले हे नक्की माहिती नाही, मग नक्की कशाच्या आधारावरती ही फालतू बडबड करायला उभे झालात तुम्ही ? माहिती नसेल तर ज्ञानात थोडी भर घालून घ्या. आजवर जेवढ्या भागांचे चित्रिकरण झाले आहे ते भाग फक्त दाखवले जातील आणि ह्यापुढे वाहिनीच्या कुठल्याही कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकार अथवा नागरीकांचा सहभाग नसेल ह्या अटींवर वाहिनीला परवानगी देण्यात आलेली आहे. उगाच कळफलक समोर आहे म्हणून काही बडवत बसू नका अशी विनंती. आणि हो, एक वेळ तुमचे लेखन परवडले, पण प्रत्येक प्रतिसादावरती तुमची उपप्रतिसाद द्यायची खोड अक्षरशः किळस आणते. बाकी,
[संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]
हे वाचून अक्षरशः खदखदून हसलो. कॉमनमॅन ह्यांनी काय लिहिले ते माहिती नाही, पण बहूदा ते दोडके असल्याने त्यांना तंबी मिळाली असावी. अन्यथा काका /मावशी / आत्या/ ताई / मामा करत संपादकांच्या खरडवह्यात मुंगळ्या सारखे चिकटलेले जेंव्हा स्वतःचे संस्कृतचे अगाध ज्ञान दाखवत इतर सदस्यांना गांडू वैग्रे म्हणून घेतात, त्या सदस्यांच्या मातांची चौकशी करतात तेंव्हा ते प्रतिसाद उडतानाही दिसत नाहीत आणि अशा तंब्या देखील दिसत नाहीत. उलट अशा प्रतिसादाखाली एखाद्या संपादकाचा धाग्यावरती दिलेला प्रतिसाद बघून अजून मौज वाटते. हेच लाडके सदस्य जेंव्हा आपल्या 'पालक' संपादकांचा हवाला देत कट्ट्यावरती 'आज चावडीत काय झाले, कोणाच्या लेखावर कोण काय बोलले, कोणा विषयी काय लेखी तक्रार आली आहे, कोणी कोणाला पाठीशी घातले' हे अगदी नावासकट जाहिररीत्या सांगतात तेंव्हा तर अजूनच मौज वाटते. असो...
  • Log in or register to post comments

टाळ्या.

गणपा
Fri, 09/07/2012 - 16:23 नवीन
टाळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शिट्ट्या.

बॅटमॅन
Fri, 09/07/2012 - 17:49 नवीन
शिट्ट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

यांचे पालक संपादक कोण आहेत हे

नाना चेंगट
Fri, 09/07/2012 - 17:59 नवीन
यांचे पालक संपादक कोण आहेत हे सुद्धा जाहीर करुन द्णका देऊन टाका. अतिशय संतापजनक वाटचाल आहे सदर संपादकाच्या या लाडक्या पुत्राची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

होय तेचायला. एकदा काय ती पालक

बॅटमॅन
Fri, 09/07/2012 - 18:19 नवीन
होय तेचायला. एकदा काय ती पालक आणि पाल्यांची नावे जाहीर करूनच टाका म्हंतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

कोण रे तो?

पैसा
Fri, 09/07/2012 - 21:06 नवीन
कट्ट्याला जाऊन माझं नाव सांगणारा? बरं, असो. मला ८-१० पाल्यांची (पाल्ल्यांची हां, नाहीतर भाजीपाल्यांची म्हणाल) भरती करायची आहे. कोण कोण तयार आहेत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अच्छा

इरसाल
Sat, 09/08/2012 - 09:14 नवीन
तुमचे "पालक"त्व कधीपर्यन्त टिकते त्यावर पाल्य भरतीचा निकष अवलंबुन असेल. आमचे नाव नोंदवा. कोणाच्याही विरोधी कंपुत सामील होवु पाहणारा..... इरसाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फेटे उडवले

पप्पु अंकल
Sat, 09/08/2012 - 13:57 नवीन
फेटे उडवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हेच लाडके सदस्य जेंव्हा

सुहास..
Fri, 09/07/2012 - 14:35 नवीन
हेच लाडके सदस्य जेंव्हा आपल्या 'पालक' संपादकांचा हवाला देत कट्ट्यावरती 'आज चावडीत काय झाले, कोणाच्या लेखावर कोण काय बोलले, कोणा विषयी काय लेखी तक्रार आली आहे, कोणी कोणाला पाठीशी घातले' हे अगदी नावासकट जाहिररीत्या सांगतात तेंव्हा तर अजूनच मौज वाटते. >>> =)) =)) तुझ्या कळफलकाला काही हाड-बिड आहे की नाही रे ! ;) एका वेळेस किती धोतरांना फटाके लावशील ;)
  • Log in or register to post comments

एका वेळेस किती धोतरांना फटाके

पक पक पक
Fri, 09/07/2012 - 19:21 नवीन
एका वेळेस किती धोतरांना फटाके लावशील पराच्या एकाच प्रतिसादात दिवाळी साजरी झाली ... :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

एका वेळेस किती धोतरांना फटाके

विजुभाऊ
Fri, 09/07/2012 - 14:58 नवीन
एका वेळेस किती धोतरांना फटाके लावशील इथे कोणी धोतर वापरणारे असतील असे वाटत नाही. तसेच धोतर हे वस्त्रप्रावरण केवळ समाजाचा एकच घटक ( पर्यायाने पुरुष ) वापरतो. सबब " धोतर" हे सामान्यनाम वापरून सदस्यांत डिस्क्रिमिनेशन कशासाठी? उगाचच पाशवीशक्ती दाक्षीण्य दाखवू नये
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा