"तुम्ही मिसळपाव डॉट कॉमवर नाही आहात का? एकदा या आणि बघा तरी.", ब्लॉगवाचक यकु एक दिवस ईमेलमधून वदला.
मी आलो. काही जोरदार चर्चा वाचल्या. "अमुक विधानाची गंमत वाटली", "ड्वाले पाणावले", "मोठे व्हा" वगैरे .. सॉरी वैग्रे वैग्रे काहीकाही वाचत होतो. बर्याच मिपा मेंबरांचे वाढदिवस इतरांकडून लक्षात ठेवले जातात अशीही माझी समजूत झाली, कारण तेवढ्या थोड्या दिवसांतही "वाढदिवसाच्या शुभेच्छा.. हॅपी बड्डे" वगैरे आपल्याशी मतभेद असलेल्या व्यक्तीलाही दिल्या जात होत्या.
विक्षिप्त आदिती, विसोबा खेचर, धमाल मुलगा, बेसनलाडू,टारझन,पंडित गागाभट्ट, गोगोल, गांधीवादी, छोटा डॉन, परिकथेतील राजकुमार अशा बर्याच रंगीबेरंगी वाटणार्या आयडींनी लक्ष वेधलं जात होतं.
पण सदस्य झाल्याशिवाय तितकी खास मजा नाही असं यकुने लक्षात आणून दिल्यामुळे मी एक सदस्यनाव घेऊन अॅप्लाय केलं. सदस्यत्व ताबडतोब मिळत नसून ते यथावकाश, संमतीनंतर मिळेल असं लक्षात आल्याने मी वाट पाहिली आणि विसरून गेलो. तीनचार दिवसांनी एकदम आठवण झाली म्हणून पाहिलं तर अॅप्रूव्हल नाहीच. नंतर दुसर्या नावाने परत अॅप्लाय केलं. पुन्हा वाट पाहिली. मग म्हटलं, जाऊ दे.. मला ब्लॉगरपणाच्या हवेत खूप मजा येत होती. मिसळपाव बिसळपाव काही मला अॅक्सेप्ट करत नाहीये, जावदे..
मग अचानक एक ईमेल आली. खातं चालू झाल्याची. लॉगिन केलं आणि हे सगळं सुरु झालं ते या क्षणापर्यंत चालू आहे.
आधी मी असं पाहिलं की इथे ब्लॉगपेक्षा बरंच जास्त चलनवलन, दळणवळण आहे. प्रतिक्रिया आणि चर्चाही एकदम गरमागरम आणि सदैव चालू उपसा असलेल्या..
"लेखन करा" च्या लिंकवर गेलो. ब्लॉगवरुन एक विमान कसं चालवावं याविषयीचा लेख चोप्य पस्ते केला. (हॅ हॅ हॅ... हे चोप्य पस्ते, असले अच्र्त ब्व्लत शब्द ही मिपाचीच भेट.)
यामागे सरळ विचार असा होता की पब्लिकशी ओळख नाहीये, उगाच काथ्या कुटायला घेतला आणि झाला भडिमार तर काय घ्या? त्यापेक्षा आपल्या पक्क्या कॉन्फिडन्सवाल्या विषयावरचा लेखच पेस्टूया..
लेख प्रकाशित केला न केला आणि धडाधड प्रतिक्रियांना सुरुवात. आयला.. तशा तर माझ्या ब्लॉगवरही बर्यापैकी संख्येने प्रतिक्रिया येतच होत्या. पण तुलनेत इथे प्रतिक्रियांचा धोंदाणाच..
रॉयल रिजन्सी नावाच्या कोण्या हॉटेलातला बुफे "ब्रेकफास्ट" आणि मामा काण्यांच्या स्वच्छ उपाहारगृहातली नाश्त्याची झुंबड इतका संख्यात्मक फरक होता..
मग काय.. मी ब्लॉगवर आधी लिहिलेले लेख उचलून दणादणा मिसळपाववर टाकायला लागलो. त्याच्यावरही बरेच प्रतिसाद येत गेले. ब्लॉगच्या पद्धतीमधे प्रत्येक वाचकाच्या उत्तराला वेगळं प्रत्युत्तर लिहिण्याची पद्धत पाहिली होती. त्यामुळे इथेही प्रत्येकाला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. मी वाचक "मेंटेन" करण्यासाठी योग्य "कर्टसी" दाखवत होतो.. माझ्यामते.
सकाळी एक लेख, संध्याकाळी एक लेख. मग कसाबसा एक दिवस थांबून अजून एक लेख.. असं चालू झालं.
परिकथेतील राजकुमार या आयडीने हळूहळू माझ्या लेखांवर डायरीची चित्रं डकवायला सुरुवात केली. "तुम्हाला डायरी भेट द्यायला हवी", "वा वा, मिपाच्या गगनात तुमच्याच विहार्या दिसत आहेत", "कधीकधी मी मिपावर आलोय की तुमच्या ब्लॉगवर तेच कळत नाही" अशा कॉमेंट्स टाकायला सुरुवात केली.
त्रासदायक आयडी दिसतोय.. याला काय बरं उत्तर द्यावं असं म्हणत मी वेगवेगळ्या पद्धतीने या आयडीला उत्तरंही दिली. लगेचच काही जणांनी मला पाठिंबाही दिला, इत्यादिं इत्यादि. पण हा परिकथेतील राजकुमाराचा तिरकसपणा जाईना.
मग मी काहीतरी टोकाचं उत्तर दिलं. वादावादी मनस्ताप इत्यादिंमधून जरा शांत झाल्यावर मला लक्षात आलं की हा माझा ब्लॉग नाहीये. हे पब्लिकचं संकेतस्थळ आहे. विमानोड्डाण शिकताना आणि करताना आपण एका एरोस्पेसमधले सर्व विमानांचे पायलट्स मिळून एकच रेडिओ फ्रीक्वेन्सी वापरुन एअरपोर्टशी आणि एकमेकांशी संवाद साधत असतो. ती आपल्या घरच्या टेलिफोनची लाईन नसते.
तसंच इथे मिसळपाववर कोणताही नवा धागा टाकला किंवा कोणत्याही धाग्याला प्रतिसाद आला की तो धागा पहिल्या पानाच्या पहिल्या नंबरवर येतो आणि सर्व धाग्यांना एक एक अशा मात्रेने खाली ढकलतो. पहिल्या पानावर जे काही आहे त्याला लक्ष मिळतं. दुसर्या पानावर सरकलं की ते इतिहासजमाच, जवळजवळ.
हे मला माहीत नव्हतं. किंवा दिसत असलं तरी लक्षात आलं नव्हतं असं म्हणू. माझं सगळं लक्ष लेख टाकून प्रतिक्रिया वाचण्यात अन सुखावण्यात होतं. मी मिसळपावचे नियम किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न यापैकी काहीच वाचलेलं नव्हतं. सगळा रोख हा मिळालेल्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्याकडे होता.
परिकथेतील राजकुमार हे केवळ एक निमित्त झालं मला या सर्व गोष्टी जाणवण्याचं. त्या आयडीने वाईटपणा घेऊन मला हे जाणवून दिलं आणि ते आवश्यकच होतं. त्याबद्दल त्या आयडीचा मी आभारी आहे. याचा अर्थ लगेच परिकथेतील राजकुमार हा त्रासदायक आयडी नाही असं समजण्याची आवश्यकता नाही. तो अत्यंत हलकट आयडी आहे याबद्दल दुमत नसावं.
दणादणा पोस्टे टाकणं कमी झालं आणि इतर लोकांचं लिहिलेलं वाचण्याची अक्कल आली. मग सुरु झाली एक नवी मिपा लाईफस्टाईल. काय लिहितात लोक इथे.. वा.
एकोळी धाग्यापासून ते पूर्ण महाभारताच्या आकारापर्यंत. पण खरी मजा धाग्यात नसते. ती असते प्रतिसादांमधे. मला वाटतं नव्याकोर्या धाग्याच्यासुद्धा नावावर क्लिक न करता थेट नवीन प्रतिसादांच्या लिंकवर क्लिक करुन आधी प्रतिसाद वाचणारी आणि नंतर वाटल्यास संदर्भासाठी मूळ धागा पाहणारी मंडळी कमी नसावीत.
मिपावर रुळतारुळता त्या वेळचे लक्षात राहिलेले हायलाईट्स म्हणजे जागुताईचे जिताडा आणि मांदेली हे एरवी पाककृतीमधे फारसे न दिसणारे पण घरोघरी खाल्ले जाणारे मासे. या माश्यांची पूर्ण सीरीज वाचताना आपल्याला इतक्या माश्यांची नावंही माहीत नाहीत हे समजून थक्क व्हायला होत होतं. वामेपासून तिसर्यांपर्यंत सगळं कव्हर केलं होतं. समुद्रखजिना..
टारझन हे त्या क्षणी मिसळपाववर माजी व्यक्तिमत्व होतं. या आयडीचं अस्तित्व खुद्द तो आयडी जागृत नसूनही धाग्याधाग्यात जाणवायचं. टारु, टारबा असे उल्लेख आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या खमंग कॉमेंटसचे क्वोट्स वगैरे यायचे. त्याची आठवण काढली जायची. बसवला टेंपोतचा हा जनक आहे अशी माझी माहिती आहे. मला आठवतंय, त्याचं आफ्रिकेचं प्रवासवर्णन हा मिपाच्या इतिहासात जतन करुन ठेवावा असा ठ्ठोवा , सॉरी ठेवा आहे. एक दिवस नोटिफिकेशन निघून टारबा परत आले आणि आल्यापासून त्यांच्या प्रतिक्रियांनी ठ्ठो करुन हसायला लावलं. हजरजबाबीपणाचा अद्वितीय नमुना. नंतर परत गायब.. अजूनही कधीतरी परत येईल अशी आशा, किंवा आलाही असेल..या संशयित आयडींतला नेमका कोण टारबा ते कळायला हवं इतकंच.
पंडित गागाभट्ट यांच्या करड्या पांढुरक्या हायलाईट्स वापरुन दिलेल्या प्रदीर्घ प्रतिक्रिया वाचून डोळे थकायचे, पण त्यातला मुद्देसूदपणा आणि बिनतोडपणा लाजवाब होता. कितीही कीस पडला तरी चालेल पण मुद्द्याची सालं काढण्याचं काम ते अत्यंत चिकाटीने करत. आणि नुसता वादासाठी वाद नव्हे, त्यासोबत ठाम मत आणि तीक्ष्ण विनोदबुद्धीही. शंका हा पंगाशेटचा ट्रेडमार्क. "एक शंका" अशा टायटलने हे अशा काही शंका विचारत की धागाकर्ता गरगरलाच पायजे. पंडित गागाभट्ट ऐवजी "शंकित काकाभट्ट" असाही आयडी त्यांनी घ्यायला हरकत नव्हती.
यात संपादक नेमके कोण आहेत हे काही कळायचं नाही, अजूनही कळत नाही.. म्हणजे कळतं पण नेमकं कळत नाही. पण मधेच लाल रेघ आली की काहीतरी इचकलंय इतकं समजायचं .. एखादा बळी रोजचाच असतो.. पण कधीकधी साठसत्तर प्रतिसादांचं सामूहिक हत्याकांडही होतं. या ठिकाणी "हत्या" की "वध" यावर वाद हा मिपाचा पेटंटेड वाद असल्याने तो मोकळा ठेवतो.
स्पा या पात्राची प्रसिद्धी एका जबरी निराशावादी धाग्यामुळे झालेली होती. नंतर मात्र हे व्यक्तिमत्व अवली (अवलिया नव्हे) असल्याचं लक्षात आलं. हे साधारणपणे भीतीदायक कथा लिहितात असं दिसत होतं. अधेमधे भेळ वगैरे पदार्थांना पाककृतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कामही त्यांनी केलं. नंतर हळूहळू तो स्पावड्या झाला. यथावकाश पाहतो तो काय, आम्ही दोघे एकाच इमारतीत नोकरीला आलो आहे हे लक्षात आलं. "वर्ल्ड इज स्मॉल"चं इथलं पहिलं उदाहरण.
चोता दोन हे प्रकरण आधी कळलं नव्हतं. पण ब्लॉग माझा स्पर्धेत टीव्हीवर झळकलेला लांब केसांचा तरुण तोच हा "छोटा डॉन" हे नंतर लक्षात आलं. वायदेआझम हे नाव याला का पडलं असावं यावर तेव्हाही प्रश्न पडला होता आणि आताही आहे.
ज्याने मिपा सुचवलं ती खुद्द यशवंत कुलकर्णी ही व्यक्ती त्यावेळी काहीतरी तुफान पंगे घेऊन गच्छंती अवस्थेत होती. यथावकाश त्याला मिपाशिवाय स्वस्थ झोप येईना म्हणून यशवंत एकनाथ बनून तो परत आला. त्यावेळी यूजी सीरीज आणि कासाराचा गोईदा , गुंजग्रामीचे दिवस या वाचकाला अडकवून ठेवणार्या गोष्टी त्याने लिहिल्याचं आठवतं. अस्सल जिवंत आणि खरीखुरी, दिल से भाषा हा यकुचा खास ट्रेडमार्क आहे. भारतातल्या मध्यरात्री दीड-दोन वाजता ही वल्ली न चुकता ऑनलाईन दिसत असायची. अमेरिकेतली जनता त्या वेळी ऑनलाईन असेल हे तर समजायचं, पण यकु नक्की भारतातच असतो ना अशी मला शंका यायची. नंतर ब्लॉग माझामधे माझं बक्षीस घ्यायला माझ्यातर्फे तो गेला आणि टीव्हीवर दिसला तेव्हा तो इथेच असतो याची खात्री पटली. हल्ली नर्मदातीरी जाऊन आल्यापासून मेल्याने जिवाला घोर लावून ठेवला आहे..
शिल्पा ब हे कॅरेक्टर अधूनमधून प्रतिसादांमधे दिसायचं. दिसायचं म्हणजे काय, अजूनही दिसतं. घाबरतात की काय त्या? त्यांना मात्र सगळे घाबरतात.. या ताई त्यांच्या कीबोर्डची "वाय" ही कळ नवीन बसवून अथवा दुरुस्त करुन का घेत नाहीत हा प्रश्न मी आजपर्यंत त्यांना विचारलेला नाही. यांच्या धारदार जिभेला बरेच मी तरी घाबरुन असायचो. पण कधीकधी "चांगलं आहे" "आवडलं" असंही लिहितात, तेव्हा पोटातला खड्डा जरा कमी होतो.
"ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा" अशा जब्रा ज्वलनशील षिर्षकाचा लेख वाचून राजेश घासकडवी हे नाव एकदम पाठ झालं. तार्किकतेचा अर्क कोळून प्यायलेला मुद्देसून मनुष्य म्हणून यांना गुर्जी म्हणत असावेत अशी समजूत मी करुन घेतली आणि कायम ठेवली आहे. कंसातली दर्जेदार विडंबनंही यांचीच खास ठेवणीतली चीज..अगदी झ झ झ झ झोपडीत चारपाई या हल्लीच्या विडंबनापर्यंत. बाबागिरीच्या साबणाचा पहिला गिर्हाईक, किंवा मिपावर स्लटवॉक असल्या अफलातून कल्पना यांच्याच सुपीक डोचक्यात उगवतात.
परिकथेतील राजकुमार, अवलिया, मृत्युंजय, असुर या सर्व एकाच माणसाच्या आयडी आहेत अशी माझी समजूत होती. किती वेगवेगळं बेअरिंग मेंटेन करतो ना हा मनुष्य, असं आश्चर्यही वाटायचं.. कोणत्या आयडी डुप्लिकेट आहेत हा मिपाजन्मापासून आजतागायतचा हॉट टॉपिक आहे.
कौल हा सेक्षन त्यावेळी इथे होता. कराटेप्रमाणे हय्या करुन कौलं फोडणारे खूप कौलपटू दिसायचे. इफ आय अॅम नॉट राँग, इंटेश, ऊर्फ इंटरनेटस्नेही हा याचा चँपियन होता.
काथ्याकूट हा मिपाचा अंतरात्मा. बाकी काही असो नसो.. जोसवर काथ्याकूट आहे तोसवर मिपा आहे. अनेक विषय आले गेले, पण गे-लेस्बियन, स्त्री-पुरुष, देव, धर्म, ज्योतिष, शाकाहार मांसाहार, निवासी अनिवासी हे विषय म्हणजे मराठा मंदिरमधे सतरा वर्षं चालू असलेल्या "दिलवाले दुल्हनिया"सारखे आहेत. ब्राह्मण अब्राह्मण याविषयी काही बोलायचीच सोय नाही. ब्रा म्हणता ब्रह्महत्या असा प्रकार होतो.
.....
(अपूर्ण..)
वाचने
37550
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख...
सुरेख...
पुढचा भाग पुढच्या वर्षासाठी
मस्त. बर्याच आठवणींना उजाळा
व्वा!! मिपावर(हा शब्द दोन्ही
अगदी अगदी ...
In reply to व्वा!! मिपावर(हा शब्द दोन्ही by किसन शिंदे
वाह . मिपा ताळेबंद आवडला.
मस्त लेख
सही...
छान
छान. मी मराठी संकेतस्थळावर
काथ्याकूट हा मिपाचा
लेखाला
धन्यवाद गवी.
वस्त्रहरण करतो म्हणुन लगेच
In reply to धन्यवाद गवी. by कवटी
गविंच्या या आढाव्याच्या कल्पनेला सॉल्यूट !
बाबा रे...
In reply to गविंच्या या आढाव्याच्या कल्पनेला सॉल्यूट ! by यकु
याचा अर्थ लगेच परिकथेतील
याचा अर्थ लगेच परिकथेतील
हे सर्व आयडी प्रतिसादांतुन
In reply to याचा अर्थ लगेच परिकथेतील by मृत्युन्जय
खुप छान... आणि तुम्ही हे अगदी
च्यायला
सही..
चिगो, सर्वात पहिल्यांदा
In reply to सही.. by चिगो
धन्यवाद..
In reply to चिगो, सर्वात पहिल्यांदा by प्रसाद प्रसाद
आज मस्त वाटले !
छान. अगदी मनातले लिहिलेत.
गवि साहेब , अतिशय मस्त लेख
रोजची फेरी
ओये गवि,
मस्त!
+१
In reply to मस्त! by पैसा
अत्यंत टुकार धागा
सकाळी सकाळी मेल, फेसबूक आणि
अपूर्ण...
+१
In reply to अपूर्ण... by मन१
छान. लेखनाशी सहमत. काही
संशय
अगदी!
In reply to संशय by प्रदीप
नाही हो. सोडून कशाला जाईन.
In reply to अगदी! by नगरीनिरंजन
मनोबाने व्यक्त केलेल्या ह्या
छान लिहिलय गवि...
छान लिहिलय गवि...
ऐकच नंम्बर
व्वा गवि साहेब!
मस्त मस्त मस्त हो गवि!!!
आवडला.
चांगलं लिहिलंय. मिपासारखा
अस्सल मिसळपाव पासुन खुप लांब आहात !
In reply to चांगलं लिहिलंय. मिपासारखा by शिल्पा ब
.... काय बोलणार. तुझं सडेतोड
In reply to अस्सल मिसळपाव पासुन खुप लांब आहात ! by सुहास..
अजूनही एक भाग लिहीणार होतो.
In reply to .... काय बोलणार. तुझं सडेतोड by गवि
+अगणित
In reply to अजूनही एक भाग लिहीणार होतो. by पैसा
मी जरा ...
In reply to अजूनही एक भाग लिहीणार होतो. by पैसा
एरवी
In reply to अस्सल मिसळपाव पासुन खुप लांब आहात ! by सुहास..
बाप रे !
In reply to एरवी by श्रावण मोडक
१००% मान्य
In reply to बाप रे ! by सुहास..
:-)
In reply to बाप रे ! by सुहास..
वाघुळ मित्रा , ते वाक्य माझं
In reply to :-) by श्रावण मोडक
सगळा प्रतिसाद काही पटला नाही.
In reply to अस्सल मिसळपाव पासुन खुप लांब आहात ! by सुहास..
चला आता अजुन सविस्तर लिहावे लागेलच !
In reply to सगळा प्रतिसाद काही पटला नाही. by रेवती
मला कचरा डेपो बघण्याची इच्छा
In reply to चला आता अजुन सविस्तर लिहावे लागेलच ! by सुहास..
लई भारी ओ गवि, अवांतर -
मस्तच ! आवडल्या गेले आहे.
फारच छान
छान
In reply to फारच छान by पाषाणभेद
मतितार्थ म्हणजे आमचा परा महा
ब्येश्ट....
गवि राव एकदम झ्कास !!!!
गविंना हे असं लिहीण्याची काय
हम्म्म्म