संस्कार
परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय.
बिल्डिंगमधून मी, माझा ८ वर्षाचा मुलगा आणि त्याची आजी असे बाहेर पडत होतो. मुलगा नेहमीप्रमाणे धावत सर्वात पुढे होता. बाहेर आल्या आल्या त्याला वर्तमान पत्रातून येणारी पत्रकं असतात तसला एक कागद (इथल्याच कुठल्यातरी बिजनेसच्या जाहिरातीचा) पडलेला दिसला. त्याने तो उचलला. मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अंगावर ओरडलो "जमिनीवरचा कचरा कशा उचलतोस?" त्याची आज्जीपण त्याला समजावत म्हणाली "अरे असं जमिनीवर पडलेले कागद तू कशाला उचलतोस? तू टाकला नाहीस ना कागद, ज्याने टाकला तो उचलेल".. तो मला सांगायचा प्रयत्न करत होता की तो कागद उचलून जिथे पोस्ट बॉक्सेस असतात त्याच्याच खाली असली पत्रकं ठेवण्यासाठी जागा केलेली असते, तिथे तो टाकून देणार होता. पण वेळ निघून गेलेली होती. माझ्या ओरडण्यामुळे त्याने कागद खाली टाकून दिला आणि आम्ही पुढे गेलो.
तसा अगदी साधाच प्रसंग. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येणारा. पण बर्याचदा आपण त्याचा फार विचार करत नाही.
नंतर पुन्हा जेव्हा ह्या प्रसंगाचा विचार डोक्यात आला तेव्हा मला वाटलं, की माझं चुकलंच. खरं तर तो जे करत होता ते बरोबर होतं. मी उगाच त्याने रस्त्यातला कचरा उचलू नये म्हणून त्याला ओरडलो. त्याने स्वतः कचरा करू नये हे जितकं खरं आहेत तितकंच जर जिथे काही चूक असेल तर त्या बाबतीत काहीतरी करून ती चूक सुधारणंही तितकंच जरूरी आहे. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांवरच हे संस्कार होतात 'तू चूक करू नकोस .. पण जर दुसर्याने चूक केली असेल तर ती सुधारायला तूच एक उरला आहेस का?' आपणही नकळत हेच संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करतोय ? अशाने पुढची पिढीपण नाकर्तीच होणार! थोड्या व्यापक प्रमाणावर बघितलं तर समाजात सगळीकडेच चुका करणारे लोक असतात, नेत्यांपासून चपराशापर्यंत. पण त्या चुकांबद्धल काहीही न करता बहुतांशी लोक आपण बरं आणी आपला संसार बरा ह्याच मनोवृत्तीची का असतात? चूक करणारा चूक सुधारेल असा विचार केला तर त्या चूका कधीच सुधारल्या जाणार नाहीत. इथे 'चूक' हा शब्द मी 'जे जे काही बरोबर नाही' या अर्थी वापरतोय.. म्हणजे भ्रष्टाचारापासून आपल्याहून दुबळ्या लोकांना त्रास देणे किंवा अगदी सिग्नल तोडून जाण्यापर्यंत सगळंच! जे आपल्या अवती भवती नेहमी घडत असतात पण आपण त्याविषयी काहीच करत नाही. आणि हेच आपण आपल्या पुढच्या पिढीला तर शिकवत नाही का?
(मला शब्दांत नीट मांडता आलेलं नाही हे मला समजतंय.. मिपाकर सांभाळून घेतील अशी खात्री आहे)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखन आवडले.
+१
मी शेंगा खाल्या नाहीत
+१००
+२
आवडलं!
बरोबर
+१
तुमच्या लेखनातील प्रामाणिकपणा आवडला.
लेख आवडला.
माझी लेक शाळेत सार्वजनिक
>>>>नशीब इथे भारतासारखी
प्रत्येकवेळी शब्दश: अर्थ
याला म्हणतात नॉस्टाल्जिया
लेखन आवडले. मनापासून केलेले
@विमे, मी त्याच रात्री