आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - १)
आर्सेलर मित्तल मर्जर.. (भाग - २)
>>>२६ मे २००६ ला आर्सेलरने "सेव्हरस्टाल" बरोबर मर्जर ची घोषणा केली.
मित्तल स्टील साठी हा मोठा धक्का होता. इतके सारे प्रयत्न वाया गेल्यामुळे सगळेच जण सुन्न झाले. मित्तल स्टील ला पुढे अंधार दिसत होता.
चार महिने सर्व शक्तीनीशी लढलेल्या लढाईत त्यांच्या समोर दुसरेच कोणीतरी जिंकत होते...
स्वतः लक्ष्मी मित्तल, आदित्य, या डील वर काम करणारा 'कोअर ग्रूप', विविध क्षेत्रातले सल्लागार आणि तज्ञ सगळेच जण निराश झाले. नक्की कोणत्या गोष्टीमुळे अचानक सगळ्या गोष्टी बदलल्या याचा विचार सुरू झाला. या डीलसाठी वेगवेगळ्या कामात गुंतलेले व देशोदेशी विखुरलेले सगळे मॅनेजर्स एकत्र आले आणि अत्यंत वाईट मनस्थितीत मीटींग सुरू झाली..
आर्सेलरमध्येही त्याच वेळी एक भव्य मीटींग सुरू झाली. 'सेव्हरस्टाल' चा सर्वेसर्वा अलेक्सी मॉरडॅशॉव पहिल्यांदाच आर्सेलर च्या मीटींगमध्ये सहभागी होत होता. आर्सेलर मॅनेजमेंट सगळ्यांना धन्यवाद देत होते, आभार मानत होते. आपले अस्तीत्व जपल्याच्या, स्वत:चे नाव शाबूत ठेवल्याच्या आणि एक होस्टाईल बीड परतावून लावल्याच्या आनंदात सर्वजण मश्गूल झाले होते. स्वतःची पाठ थोपटून घेण्याची स्पर्धा सुरू झाली.
'आर्सेलर सेव्हरस्टाल' फ्रेंडली मर्जर ची इत्यंभूत माहिती मिळताच मित्तल स्टील आणि शेअरहोल्डर्स हादरून गेले. मित्तल स्टीलने दिलेली ऑफर सर्वच पातळ्यांवर सेव्हरस्टाल पेक्षा वरचढ होती तरीही आर्सेलरने सेव्हरस्टाल बरोबर हात मिळवावेत हे कुणालाच पटले नव्हते.
सेव्हरस्टाल बरोबरची डील आर्सेलरला कधीही फायदेशीर ठरणार नव्हती.
मित्तल आणि टीम याच क्षणाची वाट बघत होते.
इन्व्हेस्ट्मेंट बँकर्स, कम्युनीकेशन टीम, PR टीम सगळे जण कामाला लागले.
'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील आणि 'मित्तल आर्सेलर' डील मधला फरक, त्याचे स्टील उद्योग आणि युरोपीयन मार्केटवर होणारे दूरगामी परीणाम सगळीकडे झळकू लागले. आर्सेलरच्या इन्व्हेस्टर्स आणि शेअरहोल्डर्सचे फोन खणखणू लागले, मोबाईल गुणगुणू लागले आणि मेलबॉक्स भरून वाहू लागले. संपर्काचे एकही साधन शिल्लक न ठेवता मित्तल स्टीलचे वेगवेगळे टीम मेंबर्स बेगुमानपणे व अत्यंत सावधपणे हे सगळे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी मांडत होते. मित्तल स्टीलच्या बाजूने शेअरहोल्डर्सचे पारडे झुकू लागले.
ज्यांचे आर्सेलरमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत अशा काही खास शेअरहोल्डर्सना लक्ष्मी मित्तल स्वत: भेटून परिस्थीती विषद करत होते व त्यांचे मत मित्तल स्टीलच्या बाजूने वळवून घेत होते.
केवळ ४ ते ५ दिवसातच आर्सेलरच्या ३० % ते ३५ % शेअरहोल्डर्सना आपल्याकडे वळवून घेण्यात मित्तल स्टील यशस्वी झाले आणि आर्सेलर मॅनेजमेंट च्या पायाखालची जमीन सरकू लागली.
या सर्व घडामोडींवर युरोपीयन कमीशनर्स व रेग्यूलेटर्स खूप बारकाईने लक्ष ठेवून होते. विविध उद्योगांमध्ये युरोपचे रशीयावर असलेले अवलंबीत्व त्यांच्या चिंतेचा विषय होता. त्यात स्टील उद्योगाची भर पडू देणे युरोपीयन उद्योगांना परवडणारे नव्हते.
यादरम्यान मित्तल स्टीलच्या ऑफरला युरोपीयन कमीशनर्सनी हिरवा झेंडा दाखवला आणि मित्तल टीमचे मनोधैर्य आणखी उंचावले.
या परिस्थीतीत शेवटचा वार केला भारतीय सरकारने.
फेब्रुवारी २००६ मध्ये ज्यावेळी फ्रेंच राष्ट्रपती जॅक शिराक भारतभेटीवर आले होते त्यावेळी मित्तलनी होस्टाईल बीड ची घोषणा करून जवळ जवळ महिना होत आला होता. 'भारतीयत्वाच्या' मुद्द्यावरून युरोपीयन देशांचा या डीलला असलेल्या विरोध आणि पक्षपातीपणा विरूध्द भारतीय पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने निषेध नोंदवला होता..
तोच धागा पकडून भारताच्या वाणिज्य मंत्र्यांनी (कमल नाथ) 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील वर आणि त्यावर असलेली युरोपीयन देशांची दुटप्पी भूमीका यावर कडक शब्दात ताशेरे ओढले, वर्णभेदाचा निषेध म्हणून अप्रत्यक्षपणे "कॉमर्स वॉर" ची घोषणा केली.
तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून आर्सेलर मॅनेजमेंटने आपले मत रेटून नेत 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील वर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला.
आर्सेलरचे शेअरहोल्डर्स, कामगार संघटना, इन्व्हेस्टर्स (ज्यामध्ये व्यक्तींबरोबर कांही देशांचाही समावेश होता) आणि ते सर्व देश ज्यांचा आर्सेलरच्या डोक्यावर हात होता त्यांना हा निर्णय पटणे शक्यच नव्हते.
'शेअरहोल्डर्स चे हित जपले जात नाहीये' या कारणाने शेअरहोल्डर्सच्या प्रतिनिधींनी आर्सेलर मॅनेजमेंटला खडसावले.
युरोपीयन कमीशन ने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आणि आर्सेलरवर बरेच निर्बंध लादले.
कामगार संघटनाही मित्तल स्टीलच्या बाजूने उभ्या राहिल्या.
या दरम्यान झालेल्या एका ' आर्सेलर शेअरहोल्डर्स मीट' मध्ये विक्रमी संख्येने शेअरहोल्डर्स उपस्थीत राहिले व 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डीलच्या विरोधात मतदान करून मित्तल स्टीलचे पारडे आणखी जड केले.
परिस्थितीची अचूक जाण असलेल्या लक्ष्मी मित्तनी आपली ऑफर आणखी वाढवली व ३३.७ बिलीयन डॉलर्स पर्यंत नेवून ठेवली (त्यावेळचे १,५२,००० कोटी रूपये). कंपनीतला मित्तल कुटूंबाचा हिस्सा ४५%च्या खाली घेतला आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची संख्या १८ पर्यंत वाढवून त्यापैकी फक्त ६ जागा स्वतःकडे ठेवल्या.
या ऑफरला नकार देण्यासाठी आर्सेलर मॅनजमेंटला कारण सापडणे शक्यच नव्हते.
मित्तल स्टीलकडून सतत पाच महिने अव्याहतपणे काम करणार्या ३०० लोकांच्या टीमच्या प्रयत्नांना यश आले व २५ जून २००६ ला जगातली पहिल्या १००+ मिलीयन टन उत्पादन करणार्या "आर्सेलर मित्तल " ची घोषणा झाली.
जगातली सर्वात मोठी स्टील कंपनी.. जागतीक स्टील उत्पादनात व १०% वाटा असणारी 'आर्सेलरमित्तल' दुसर्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तिपटीने मोठी होती यावरून या कंपनीचा अवाका लक्षात यावा.
विजयी क्षण.
लक्ष्मी मित्तल - जोसेफ किंच (आर्सेलर चेअरमन) - आदित्य मित्तल
विजयी हास्य
सद्यस्थिती -
२००८ च्या मंदीमुळे आर्सेलरमित्तलचे उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी झाले पण २००९ नंतर मार्केटबरोबर तेही सावरत आहे.
स्टील उत्पादन - मिलीयन टन मध्ये
२००७ - ११६.४ MT
२००८ - १०३.३ MT
२००९ - ७७.५ MT
२०१० - ९८.२ MT
२०११ - ९७.२ MT
२०११फॅक्ट फाईल
Revenue..............-....US$ 93.973 Billion
Operating Income....-....US$ 04.898 Billion
Profit..................-....US$ 02.263 Billion
Total Assets..........-....US$ 121.88 billion
Total Equity..........-....US$ 56.690 billion
Employees...........-....261,000
'आर्सेलरमित्तल' ला जोरदार पर्याय उभा करण्यात चीन यशस्वी झाला आहे. जगातल्या ३० मोठ्या स्टील कंपन्यांच्या यादीत चीनच्या १० कंपन्या असून त्यांचे एकत्रीत उत्पादन ३०० मिलीयन टन च्या जवळपास आहे.
३० जून २०१० ला युरोपीयन कमीशन ने १७ स्टील कंपन्याना "Price Fixing Scandal" साठी ५१८ मिलीयन युरो इतका प्रचंड दंड ठोठावला. इथेही 'आर्सेलरमित्तल' आघाडीवर होते, 'आर्सेलरमित्तल' ला सर्वात जास्त दंड सहन करावा लागला. :-)
भारतीय स्टील उद्योगातील 'आर्सेलरमित्तल'चा सहभाग हा एक वादग्रस्त विषय आहे, बरेच मोठे प्रकल्प, बरीच वर्षे लालफितीत अडकले आहेत - पण ती चर्चा इथे नको.
*************** संदर्भ ***************
विकीपीडीया
इंटरनॅशनल स्टील स्टॅटिस्टीक ब्यूरो
२००६ च्या दरम्यान प्रसिध्द झालेली व जालावर उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे
http://strat.in
कोल्ड स्टील च्या संदर्भाने मिळालेली माहिती आणि जालावरची असंख्य पाने.
**********************************
लक्ष्मी मित्तल - जोसेफ किंच (आर्सेलर चेअरमन) - आदित्य मित्तल
विजयी हास्य
सद्यस्थिती -
२००८ च्या मंदीमुळे आर्सेलरमित्तलचे उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी झाले पण २००९ नंतर मार्केटबरोबर तेही सावरत आहे.
स्टील उत्पादन - मिलीयन टन मध्ये
२००७ - ११६.४ MT
२००८ - १०३.३ MT
२००९ - ७७.५ MT
२०१० - ९८.२ MT
२०११ - ९७.२ MT
२०११फॅक्ट फाईल
Revenue..............-....US$ 93.973 Billion
Operating Income....-....US$ 04.898 Billion
Profit..................-....US$ 02.263 Billion
Total Assets..........-....US$ 121.88 billion
Total Equity..........-....US$ 56.690 billion
Employees...........-....261,000
'आर्सेलरमित्तल' ला जोरदार पर्याय उभा करण्यात चीन यशस्वी झाला आहे. जगातल्या ३० मोठ्या स्टील कंपन्यांच्या यादीत चीनच्या १० कंपन्या असून त्यांचे एकत्रीत उत्पादन ३०० मिलीयन टन च्या जवळपास आहे.
३० जून २०१० ला युरोपीयन कमीशन ने १७ स्टील कंपन्याना "Price Fixing Scandal" साठी ५१८ मिलीयन युरो इतका प्रचंड दंड ठोठावला. इथेही 'आर्सेलरमित्तल' आघाडीवर होते, 'आर्सेलरमित्तल' ला सर्वात जास्त दंड सहन करावा लागला. :-)
भारतीय स्टील उद्योगातील 'आर्सेलरमित्तल'चा सहभाग हा एक वादग्रस्त विषय आहे, बरेच मोठे प्रकल्प, बरीच वर्षे लालफितीत अडकले आहेत - पण ती चर्चा इथे नको.
*************** संदर्भ ***************
विकीपीडीया
इंटरनॅशनल स्टील स्टॅटिस्टीक ब्यूरो
२००६ च्या दरम्यान प्रसिध्द झालेली व जालावर उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे
http://strat.in
कोल्ड स्टील च्या संदर्भाने मिळालेली माहिती आणि जालावरची असंख्य पाने.
**********************************| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9876
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख माला छान झाली पण
सहमत.
In reply to लेख माला छान झाली पण by सुकामेवा
उत्तम लेखमाला !!
आजच कोल्ड स्टील वाचायला
बरीच आटोपती घेतलीस रे, कारण
कॉपीराईट चे लफडे नको राव...
In reply to बरीच आटोपती घेतलीस रे, कारण by ५० फक्त
एवढ्यातच संपवलीस!! मला वाटलं
मस्त
संप(व)लं????????? बरं. आम्ही
वा लेखमाला तर छानच झाली. या
मृत्युन्जय साहेब,
In reply to वा लेखमाला तर छानच झाली. या by मृत्युन्जय
भारी बे मोदका. मस्त लिहिलंयस!
:)
सहमत..
In reply to :) by आत्मशून्य
सुंदर लेखमाला
मस्त, थोडक्यात पण व्यवस्थित
+ सहमत , पण विषयाचा अवाका
In reply to मस्त, थोडक्यात पण व्यवस्थित by सूड
लवकर आटोपती घेतली राव!
मालिका पटकन संपली असे वाटले
आवडली
मस्त लेखमाला. तरीही आर्सेलरने
मस्त लेखमालिका!
मोदकराव,
आवडले
छान.
छान
छान
उत्तरे...
In reply to छान by राजेश घासकडवी
आवडली
लेख आवडले.
मस्त. इतरांच्या 'लवकर संपवली'
एका वेगळ्या विषयावरची यशस्वी
छानच लिहीले आहेस..
धन्यवाद मंडळी...
क्या बात है !! लेख माला आवरती