Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण मनोहर on Sun, 05/13/2012 - 04:31
क्षणामागूनी क्षण धावती, काट्यामागुनी काटा अंधारातुनी नित्य उजळती चहुबाजुनी वाटा सुवर्ण झगमग दूर दावते संधीप्रकाश खोटा मृगतृष्णेच्या पाठी व्याकूळ नीज हरविल्या खाटा शर्यतीतल्या बाजारातूनी माल विकाया सारा गुणवत्ता ना मोल ठरविते बोल वल्गना धारा कवडीमोल ती मोलमजूरी फोल डोईचा भारा शक्ती मिळवी घामच येथे तोल युक्तीचा न्यारा बुद्धीच्या राज्यात जिंकतो तर्कविचारी घोडा दौडत राही सतत धडाधड नाही उसंत थोडा रात्रंदिन जप मंत्र एकला झोडा तोडा जोडा मजल्यावरती मजले चढतो गगनचुंबी वाडा तरीही कुथती कर्मविरांच्या व्यस्त थकल्या रांगा भले शमविले परिवाराच्या पालन पोषण अंगा आम्हा जैसे फिरत रहा तू बद्ध घाणीच्या खांबा बुद्धीरक्षणा कर्म घट्ट धरी, कुणीतरी ह्याला सांगा अंगमेहनती शांत झोपतो धरुनी अश्म पलंगा लक्ष्मी बुद्धीजीवी-मष्तकी दिवसरात्र करी पिंगा पळापळीतूनी थकली गात्रे शोधती सुखांत थांबा जन्मभरीच्या धकाधकीला निवांत शेवट देगा, निवांत शेवट देगा

Submitted by प्रचेतस on Sun, 05/13/2012 - 11:28

Permalink

सुरेख.

सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 05/13/2012 - 11:39

Permalink

आवडली

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 05/14/2012 - 08:18

Permalink

__/\__

पहिल्या कड्व्यात इतका चित्रदर्शी प्रभाव आहे की काय सांगु काका? अगदी दंडवत.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Mon, 05/14/2012 - 08:54

Permalink

धन्यवाद. वल्ली, पैसा आणि

धन्यवाद. वल्ली, पैसा आणि अपर्णा, तुम्हाला कविता आवडली हे वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1229 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com