चांदण्या रात्रीतले

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
4 May 2012 - 9:13 am

चांदण्या रात्रीतले

कलाकविता

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

4 May 2012 - 10:02 am | चौकटराजा

गोळे साहेब , आपण हे वरचे जे काय आहे ते पाठवून गोड कहर केलाय ! चौथे कडवे मी आजच पाहातोय.कारण ध्वनीमुद्रिकेत ते बहुदा नाही.
ते संस्कृत मधील काव्य ही छान आहे यावरून एक " ममपरि तयांनां प्रेम दृढम " उर्फ मजवरी तयांचे प्रेम खरे याची आठवण आली. पण खुळा या
शब्दाला मूढ हा शब्द योग्य आहे का ? मला वाटते मूढ म्हणजे मूर्ख . जरा मार्गदर्शन करावे.

चौथे कडवे मी आजच पाहातोय.कारण ध्वनीमुद्रिकेत ते बहुदा नाही.>>>>
हो. आपले म्हणणे खरे आहे.

मनोगत डॉट कॉम संकेतस्थळ सुरू झाले आणि मग परस्पर-प्रतिसादानिकूल-मंच उपलब्ध झाल्याने आंतरजालीय गप्पांना नवा बहर आला. त्या काळातली ही गोष्ट आहे. आम्ही काव्यांच्या ओळी लिहून एकमेकांचे प्रतिसाद अजमावत असू. त्यातूनच इतर भाषेतही अनुवाद लिहू लागलो. प्रतिसादही तसेच येत असत. वस्तुत: प्रवासी म्हणजे कोण ते तेव्हा मला माहीतही नव्हते. पण मी जसजसा हिंदी अनुवाद लिहू लागलो, तसतसा ते संस्कृत अनुवादही लिहू लागले. ते अनुवाद परस्परांना, तसेच इतर उपस्थितांनाही आवडत गेल्याने लिहिण्यास हुरूप येत गेला. नंतर कुणीतरी ते चौथे कडवेही पेश करून अनुवादास आव्हान दिले. मग त्याही कडव्याचा अनुवाद झाला. प्रवासींचा अनुवाद तर आम्हाला इतका आवडला होता की आम्ही त्या काळी घरात तोच गुणगुणत असू.

आता हे कळले आहे की प्रवासी म्हणजे प्रणव सदाशिव काळे. राहणार जर्मनी. म्हणून काय झाले, त्या दिवसांचा आनंद मी जसा विसरलेलो नाही तसाच तेही विसरले नसणार!

परस्पर-प्रतिसादानिकूल-मंच

याला आमच्याकडे एकमेकांची लाल करण्याची चावडी म्हणतात. ;)

तुमचं मराठीतून हिंदीत, हिंदीतून मराठीत, इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याचे कौशल्य वादातीत आहे. आणि तुम्ही कळकळीने जे एका भाषेतून दुसर्‍या भाषेत साहीत्य नेण्याचे महान कार्य सुरु केले आहे त्यामुळे विविध भाषिक वाचकांचे अनुभवविश्व समृद्ध होणार यात शंकाच नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2012 - 9:00 pm | अत्रुप्त आत्मा

@याला आमच्याकडे एकमेकांची लाल करण्याची चावडी म्हणतात.

सूड's picture

4 May 2012 - 7:49 pm | सूड

मस्तच हो चौराकाका !! 'मजवरी तयांचे' चा अनुवाद येऊद्या. तुमच्यासारखे अनुवादक आहेत म्हणून नाहीतर इथे वाचण्यासारखं असतंच काय !! वरचा संस्कृत अनुवाद बघता तुमच्याकडे संस्कृत शिकायला येईन म्हणतो.

'मजवरी तयांचे' चा अनुवाद येऊद्या.

अरे बाबा, मुळ गाणं संस्कृतमध्ये आहे. चौराकाका त्या "ममपरि तयांनां प्रेम दृढम" गाण्याचं "मजवरी तयांचे प्रेम खरे" असं मराठी सुलभ भाषांतर करणार आहेत.

खुळा कुठला.

असंय होय !! मला आपलं 'मजवरी तयांचे' हे गाणं संशयकल्लोळ मधलं वाटलं. सॉरी धन्यामान !!

चौकटराजा's picture

5 May 2012 - 10:38 am | चौकटराजा

संशयकल्लोळ या नाटकातील " मजवरी तयांचे प्रेम खरे" या नाटकातील या पदाची मूळ रचना संस्कृत असेल तर धन्या स धन्यवाद माहितीबद्द्ल ! हे नाट्क पुंण्यातील भरत नाट्य संशोधन मंडळाने संस्कृत मधे केलेले होते. त्यावेळी चौ रा वयाने लहान असल्याने त्या अनुवादात आपला काय हात नाय बा !

किसन शिंदे's picture

4 May 2012 - 6:31 pm | किसन शिंदे

इतक्या सुंदर मराठी गाण्याचा तुम्ही केलेला हिंदी अनुवाद वाचला आणि डोळे पाणावले.

नरेंद्र गोळे's picture

4 May 2012 - 6:33 pm | नरेंद्र गोळे

दु:खाश्रू असतील तर वाहून जाऊ देत. उगाच दु:ख जमा तरी किती करणार!

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2012 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

भोग हे भोगुनच संपवावे लागतात.

चौकटराजा's picture

4 May 2012 - 7:20 pm | चौकटराजा

तसे हे मराठी गाणे ऐकले की माझेही डोळे पाणावतात. !

अत्रुप्त आत्मा's picture

5 May 2012 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा

पहिल्या कडव्याचं शब्दांतर...अरे..रे..रे..रे.. नाय..नाय... रुपांतर.. रुपांतर.. वाचले. आणी आपली खात्री पट्ली गोळे काकांकडे कवितांचा एक्स-रे घायचं मशीन आहे...त्याशिवाय का इतकं मनाला आरपार भेदणारं लेखन कुणी करू शकत...?

इतर लोक्स काहिही बोलू देत,पण आपल्याला हा काढलेला एक्सरे लै आवडला,,,

संजय क्षीरसागर's picture

6 May 2012 - 3:50 pm | संजय क्षीरसागर

आयला, हजार शब्द जे काम करू शकत नाहीते ते एक फोटो करून जातो म्हणतात. सॉल्लिड!

तुमचा प्रतिसाद बघून इतकं बेफाम हसलो की बायको काय झालं? म्हणून विचारत आली!

माणिक वर्मांनी गायलेली काही निवडक गाणी आहेत, त्यापैकी हे एक. अतिशय भावपुर्ण गाणं, त्याचं हिंदी रुपांतर हे अतिशय हलक्या प्रतीचं झालेलं आहे असं सांगु इच्छितो.

काही नवकवि ट ला ट क ला क करत कविता करतात, त्याप्रमाणे शब्दाला प्रतिशब्द देउन कवितेचं किंवा गाण्याचं भाषांतर होउ शकत नाही, एका भाषेतुन दुस-या भाषेत फक्त शब्द बदलुन काय उपयोग, त्यात ज्या भावना आहेत त्या सुद्धा नेल्या पाहिजेत ना तिकडं. ' चांदण्या रात्रितले ते स्वप्न तु विसरुन जा' या गाण्याचं खरोखर हिंदी रुपांतर उपलब्ध आहेच ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ' .

'अब तु भुल जा ' ' जो बुना था गोफ ' ' खाली वो अल्फाज थे' हे प्रकार तर एकदम वाईटपणाची परमावधी आहेत, मराठी - हिंदी - उर्दु डिक्शनरी घेउन लिहिल्यासारखं वाटतंय.

आणि महत्वाचे हे सगळं जरी तुम्ही केलेलं असेल तरी निदान ते पुर्वप्रकाशित केलेलं आहे अशी तळ्टीप तरी द्यायची ना.

नरेंद्र गोळे's picture

5 May 2012 - 8:50 am | नरेंद्र गोळे

माणिक वर्मांनी गायलेली काही निवडक गाणी आहेत, त्यापैकी हे एक. अतिशय भावपुर्ण गाणं, त्याचं हिंदी रुपांतर हे अतिशय हलक्या प्रतीचं झालेलं आहे असं सांगु इच्छितो.>>>> आपल्या मताचा मी आदर करतो.

काही नवकवि ट ला ट क ला क करत कविता करतात, त्याप्रमाणे शब्दाला प्रतिशब्द देउन कवितेचं किंवा गाण्याचं भाषांतर होउ शकत नाही, एका भाषेतुन दुस-या भाषेत फक्त शब्द बदलुन काय उपयोग, त्यात ज्या भावना आहेत त्या सुद्धा नेल्या पाहिजेत ना तिकडं. ' चांदण्या रात्रितले ते स्वप्न तु विसरुन जा' या गाण्याचं खरोखर हिंदी रुपांतर उपलब्ध आहेच ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ' . >>>> माहितीखातर आभार!

'अब तु भुल जा ' ' जो बुना था गोफ ' ' खाली वो अल्फाज थे' हे प्रकार तर एकदम वाईटपणाची परमावधी आहेत, मराठी - हिंदी - उर्दु डिक्शनरी घेउन लिहिल्यासारखं वाटतंय. >>>> एरव्ही कसा करतात अनुवाद? त्याचेही मार्गदर्शन करावे!

आणि महत्वाचे हे सगळं जरी तुम्ही केलेलं असेल तरी निदान ते पुर्वप्रकाशित केलेलं आहे अशी तळ्टीप तरी द्यायची ना.>>>>> का ?

किसन शिंदे's picture

5 May 2012 - 10:09 am | किसन शिंदे

हर्षदरावांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत.

धन्या's picture

5 May 2012 - 10:57 pm | धन्या

पण जरा गोळेकाकांनी पन्नासच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर वाच. कपाळावर हात तर मारुन घेशीलच पण एका हिंदी "कहावतीचीही" तुला प्रकर्षाने आठवण येईल. ;)

स्पंदना's picture

7 May 2012 - 7:12 am | स्पंदना

>>शब्दाला प्रतिशब्द देउन कवितेचं किंवा गाण्याचं भाषांतर होउ शकत नाही, एका भाषेतुन दुस-या भाषेत फक्त शब्द बदलुन काय उपयोग, त्यात ज्या भावना आहेत त्या सुद्धा नेल्या पाहिजेत ना तिकड>>>>

या वरुन पु.लं. चा एक किस्सा आठवला. ते एकदा अगदी गंभीरपणे बोलुन गेले, "हो ! वर्तमानपत्राशी माझा फार लहाणपनापासुनचा संबंध आहे." आता हा 'संबंध' समजुन घ्यायला, एक आख्ख पान खर्ची पडेल नाही का? अन खर सांगायच तर त्या त्या भाषेतले असे छुपे अर्थ सहजा सहजी भाषांतरात येण अवघडच.

असा चांदण्यातला आलम तुम्ही जगला असाल
ज्या भाषेत व्यक्त व्हायचय तिच्या नजाकतीचं भान असेल
आणि विरही प्रियेची मानसिकता साधली , तर
तरल भावानुवाद होऊ शकतो

चांदनी रातेंके सपने
मेरे दिलबर भूल जा
हम कभी तेरे भी थे
वो सारी बाते भूल जा

चांदनी रातेंके सपने
मेरे दिलबर भूल जा

त्या तुम्हाला प्रत्यक्ष भेटायलाच आल्या असत्या... आचार्य अत्र्यांना घेऊन. क्या बात है!

तिमा's picture

6 May 2012 - 10:47 am | तिमा

इंग्रजी यायला लागल्या लागल्या काही शब्दांतरे केली होती.
दॅट मिल्क फ्रॉम युवर पॉट इज बेटर
व्हाय, आय डोंट नो, टेस्टस स्वीटर.

किंवा,
ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यू
आय बिकेम मदर, बिकॉज ऑफ यू.

संजय क्षीरसागर's picture

6 May 2012 - 3:44 pm | संजय क्षीरसागर

ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यू
आय बिकेम फादर, बिकॉज ऑफ यू.

अशी एक नवी कविता देखील होऊ शकते

भाषांतर शब्दश: झालं आहे असं वाटलं. "चांद था साक्षी जिसे" इथे तर खूपच जाणवलं.

पण त्यानिमित्ताने तुम्ही त्यात इनव्हॉल्व्ह झालात त्यामुळे तुम्हाला नक्कीच वेगळा आनंद मिळाला असणार.

मी नुकताच कॅट्'स इन द क्रेडल या गाण्याचं गद्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याचं तुम्ही कौतुकही केलंत.

निव्वळ गंमत म्हणून त्याचं शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न करतो...

कॅट्'स इन द क्रेडल अँड द सिल्व्हरस्पून..
लिट्ल बॉय ब्लू अँड द मॅन ऑन द मून..
व्हेन यू आर कमिंग होम? आय सेड आय डोंट नो व्हेन,
बट वुई विल बी टुगेदर देन..
यू नो वुई विल हॅव अ गुड टाईम देन..

पाळण्यात मांजर आणि चांदीचा चमचा..
लहान मुलगा निळा आणि चंद्रावर माणूस..
तुम्ही घरी कधी येणार? मी म्हणालो मला नाही माहीत.
पण तेव्हा आपण एकत्र असू.
तुला माहीत आहे, आपण तेव्हा चांगला वेळ घेऊ.

.........

:)

किसन शिंदे's picture

7 May 2012 - 11:07 am | किसन शिंदे

पाळण्यात मांजर आणि चांदीचा चमचा..
लहान मुलगा निळा आणि चंद्रावर माणूस..
तुम्ही घरी कधी येणार? मी म्हणालो मला नाही माहीत.
पण तेव्हा आपण एकत्र असू.
तुला माहीत आहे, आपण तेव्हा चांगला वेळ घेऊ.

:D

भावार्थाचा केला सोडा , शब्दांचा उसळे फेस
अर्थासाठी शब्दकोष आणि गाणे झाले ब्येस!