✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

का रे असा अबोल तू

न — नरेंद्र गोळे, Wed, 05/02/2012 - 13:56
20080414 का रे असा अबोल तू तीः का रे असा अबोल तू, काहीतरी तू बोल ना । शब्दांना तुझ्या तहानले, मनातले काही बोल ना ॥ तोः तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा । सुरस कितीही बोललो, रुचेल का तुझ्या मना ॥ तीः स्फटिक जणू तुझे विचार, स्पष्ट किती तुझे आचार । मी गुंतते गुंतते सदा, शब्दांच्या तुझ्या आवर्तनांत ॥ तोः वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके । जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥ काही गीते स्वतःतच एक नाद घेऊन येत असतात. ती इतर गीतांच्या चालीत म्हणता येतीलही. मात्र ह्या कथेत स्वतःची एक सादही आहे. ही कविता माझीच आहे. हा कुठल्याही गीताचा अनुवाद नाही. वाटला, तर निव्वळ योगायोग समजावा. - नरेंद्र गोळे २००८०४१४

प्रतिक्रिया द्या
2394 वाचन

💬 प्रतिसाद (9)

व्वा!!!

मुक्त विहारि
Wed, 05/02/2012 - 14:07 नवीन
छान आहे कविता...
  • Log in or register to post comments

आहा मस्तच

स्पा
Wed, 05/02/2012 - 14:28 नवीन
आहा मस्तच
  • Log in or register to post comments

वा!

अक्षया
Wed, 05/02/2012 - 14:38 नवीन
वा! वाचता वाचता मी विचार करत होते कि कोणते असेल गाणे..:) सुंदर आहे कविता..
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
Wed, 05/02/2012 - 21:13 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 05/03/2012 - 16:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छान कविता

पैसा
Wed, 05/02/2012 - 22:21 नवीन
तुम्ही आम्हाला अनुवाद ओळखायची सवय लावलीय त्यामुळे "हे गाणं कोणतं" हा विचार आपोआप चालू होतो. पण यावेळी वेगळा धक्का दिलात!
  • Log in or register to post comments

वाउ

चौकटराजा
गुरुवार, 05/03/2012 - 04:47 नवीन
तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा । केशवकुमार ( आचार्य अत्रे) यांच्या या ओळींची आठवण आली काळा कङा मी फत्तरी तू काश्मीरातील गुलदरी वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके । जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥ ह्ये लई म्हंजी लईच भन्नाट ...( समोर मधुबाले सारखी कोणी आली काय गोळेसायेब ?)
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर रचना

लीलाधर
गुरुवार, 05/03/2012 - 08:49 नवीन
आवडली गेली आहे... :)
  • Log in or register to post comments

सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 05/03/2012 - 09:47 नवीन
मुक्त विहारि, मन्या फेणे, अक्षया, मदनबाण, पैसाताई, चौकटराजा आणि चचा, सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा