पौराणिक विमाने
In reply to शेवटी काय ठरले? त्या नाझ्का by कवितानागेश
In reply to गपे! by पैसा
In reply to असे कसे? असे कसे? आपल्याला by कवितानागेश
नाझ्का लाईन्सचे काय झाले? काय झाले? काय झाले? ..झाले?..झाले?नाझ्का लाईन्स आहेत तिथेच आहेत. आहेत तिथेच आहेत. तिथेच आहेत. ..आहेत. ..आहेत. स्वाक्षरी बदला. लिहा, "ए कोणे बे आमच्या नाझ्कावर लैनी मार्तोय?" ;-)
In reply to आमच्याकडे by कपिलमुनी
In reply to लेख by नितिन थत्ते
In reply to हाच लेख मदनबाण यांनी आधी सादर by बॅटमॅन
In reply to ऐशी की तैशी by क्लिंटन
In reply to ऐशी की तैशी by क्लिंटन
In reply to ? by विकास
In reply to नावात काय आहे? by सुनील
In reply to ऐशी की तैशी by क्लिंटन
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
त्यासाठी उच्च तपोबल असलेल्या सात्विक योग्यांची आवश्यकता आहे. पण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे, फास्टफूड आणि कोकाकोलाच्या सेवनामुळे (आणि त्यापूर्वी मुसलमानी आक्रमणामुळे स्त्रिया भ्रष्ट झाल्याने) असे लोक मिळत नाहीत.ठ्ठो....!!!!
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
In reply to उत्तरे by नितिन थत्ते
In reply to ऐशी की तैशी by क्लिंटन
In reply to जाऊ द्या राव !! by अर्धवटराव
In reply to तुला अजूनही कळले नाही का? by कवितानागेश
आपल्याला 'इझी प्रे' लोक शोधून त्यांच्या नावानी गळे काढायची हुक्की येते तेंव्हा सँपलींग चुकीचेच करायचे असते. आणि चुकून एखादे बरोबर सँपल सापडले तर ते खड्यासारखे वगळायचे असते.माझे सँपलींग चुकीचे आहे की बरोबर हे मला माहित नाही. पण माझे सँपलींग चुकीचेच आहे आणि मी मुद्दामून बरोबर सँपल वगळले आहे हा लाखमोलाचा दृष्टांत तुम्हाला कुठून झाला?का ते पण हजारो वर्षांपूर्वी कोणत्या तरी ग्रंथात कोणीतरी लिहून ठेवले आहे?
आणि संशोधन तुम्हीच करुन आम्हाला काय ते बसल्या जागी सांगा अशी बरोबर सँपल घेउन आलेल्यांना ऑर्डर सोडायची असते.अर्थातच. जे लोक एखादा दावा करतात त्यांच्यावरच तो योग्य आहे की नाही हे सिध्द करायची जबाबदारी येते आणि इतरांना या दाव्याविषयी प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे. इथे प्रश्न कधी उभा राहतो?जेव्हा माझ्यासारखे लोक असा दावा करत असलेल्यांना प्रश्न विचारतात तेव्हा असा दावा करणारे लोक कधीच त्याचे उत्तर देत नाहीत. उलट प्रश्न विचारत असलेल्याच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उभे करतात किंवा "काळा इंग्रज" इत्यादी विशेषणांनी संबोधतात. आपण स्वतः अगदी धुतल्या तांदळासारखे आणि सगळ्या जगाच्या वर्तणुकीचा न्यायनिवाडा करायचा अधिकार केवळ आपल्यालाच असाही या संस्कृतीवाद्यांचा आविर्भाव असतो.म्हणजे तुम्ही म्हणता म्हणून डोळे झाकून कोणताही दावा स्विकारावा का?ते अजिबात होणे नाही. बाकीच्यांचे माहित नाही पण तुम्ही मात्र अशा चुकीच्या सँपलपैकीच आहात असे वाटते. (काळा इंग्रज असल्याचा अभिमान असलेला) विल्यम जेफरसन क्लिंटन
In reply to ?? by क्लिंटन
In reply to तुला अजूनही कळले नाही का? by कवितानागेश
In reply to जाऊ द्या राव !! by अर्धवटराव
In reply to ऐशी की तैशी by क्लिंटन
In reply to स्टॅलिनच्या हिंसेचा, त्याच्या by मृत्युन्जय
जर एखाद्याला स्वतःच्या संस्कृती केवळ उणेच उणे दिसत असेल आणि चांगले आहे असे काही वाटतच नसेल तर त्याला काळा इंग्रज किंवा तत्सम विशेषणांनी संबोधणे चुकीचे ठरु नये.जर का तथाकथित संस्कृतीवाद्यांनी केलेल्या दाव्यांना "नक्की आधार काय" हा प्रश्न विचारला किंवा एखादा शोध लागल्यानंतर पश्चातबुध्दी म्हणून "आमच्या ग्रंथांमध्ये हे आधीच लिहून ठेवले आहे" असे म्हटल्यावर मग "ती माहिती यापूर्वी का उघड केली नाहीत किंवा आधुनिक विज्ञानाला न कळलेले असे आणखी काय जुन्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे?" असे प्रश्न विचारले तर याचा अर्थ "आपल्या" संस्कृतीत उणेच उणे असे वाटते किंवा काही चांगले नाही असे वाटते असा बादरायण संबंध कुठून जोडला जातो हेच कळत नाही. म्हणजे यांनी काहीही दावे करावेत, "आमच्या" संस्कृतीच्या नावावर काहीही खपवावे आणि इतरांनी त्याला साधे प्रश्नही विचारू नयेत असा अर्थ का? आणि कोणतेही प्रश्न विचारले तरी "कुतुहल नाही केवळ कुशंका आहेत", "माहिती मिळवायची प्रामाणिक इच्छा नाही तर टर उडवायची आहे" ही बोंब करायला परत हे मोकळे!! दुसरे म्हणजे "आमच्या" संस्कृतीचे कौतुक मला तरी अजिबात सांगू नका. व्यक्तिश: माझ्यासाठी तरी जे जे मला पटते/आवडते/भावते ते कुठूनही आलेले असले तरी माझेच असते. तेव्हा इतरांची "आमच्या" संस्कृतीची व्याख्या आणि माझी व्याख्या यात खूप फरक आहे.
चरक, सुश्रुत, चाणक्य, कालिदास, राम, कृष्ण प्रभूतींनी येउन तुम्हाला माती खायला सांगितलेली नव्हती. ती तुम्ही स्वतःच खाल्ली. मग त्यांची लाज कशाला वाटते आहे?कोणी सांगितले मला चरक,सुश्रूत, चाणक्य,कालिदास आणि भगवद्गीता सांगणारा कृष्ण यांची लाज वाटते? (रामाचा उल्लेख यात मुद्दामून केलेला नाही पण तो या चर्चेचा मुद्दा नसल्यामुळे त्यावर लिहित नाही). मी भगवद्गीतेवरील थोडीफार पुस्तके वाचली आहेत इतकीच माझी आणि वरील लीस्टमधील महापुरूषांची ओळख आहे. चरक आणि सुश्रूत हे आयुर्वेदाचार्य होते, चाणक्याने अर्थशास्त्र लिहिले आणि चंद्रगुप्ताला सम्राट बनविण्यात महत्वाचा वाटा उचलला आणि कालिदास हा मेघदूतासारखी काव्ये लिहिणारा महाकवी होता यापलीकडे मला यांच्याविषयी काहीही माहित नाही.पण एक गोष्ट अगदी निक्षून सांगतो.एखाद्या व्यक्तीमत्वाविषयी मला अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास करताना त्या व्यक्तीचा देश/धर्म/जात/भाषा इत्यादी गोष्टींचा मी अजिबात विचार करत नाही तर त्या व्यक्तीचे कार्य आणि त्यामागील प्रेरणा मला भावते की नाही याच गोष्टीचा मी विचार करतो. त्यामुळे केवळ भारतीय होते याच कारणाने चरक et al. मला अधिक जवळचे वाटतील याची शक्यता अगदी शून्य. आता यातून मला जर चरक et al. विषयी लाज वाटते असा अर्थ काढत असाल तर खुषाल काढा.
आधीच म्हणल्याप्रमाणे हे एक चक्र आहे. त्या चक्राच्या उच्चावर आज पाश्चिमात्य आहेत. काल आपण होतो. उद्या कोणी अजुन असेल. कदाचित आपणही असु. तत्वज्ञान, भाषा, साहित्य, कला, विज्ञान, वैद्यकशास्त्र या सर्वात एकेकाळी आपण प्रगत होतो. कलौघात आपण माती खाल्ली. प्रगतीची कास सोडली. धड ना अध्यात्म जोपासले न विज्ञान. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की आपली प्रगती खुंटली.Exactly. माझा मुद्दा नेमका हाच की आपण नक्की कुठे कमी पडलो याची कारणे शोधून काढायचे सोडून आपण जर वेदकालीन जंगलात भटकायला लागलो तर त्याचा उपयोग काय?पण हे भारतीय संस्कृतीवादी लोक कायमच भूतकाळात अडकून पडलेले असतात. त्यांना त्यातून बाहेर कोण आणणार?
इनोव्हेशन असे जे म्हणतात ते आपल्याकडे फारसे होताना दिसत नाही. त्याचा बराच दोष शिक्षणपद्धतीलाही जातो आणि त्याचे श्रेय मला वाटते मेकॉलेकडेच जाते.काय सांगता?आपल्याकडे असलेली "गप्प बसा" संस्कृती इनोव्हेशनच्या मार्गातला फार मोठा अडसर आहे. ती नक्की कधी रूढ झाली याची कल्पना नाही.प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे असे म्हणतात.या गप्प बसा संस्कृतीने सोन्याचा तर सोडाच कोळशाचा पण धूर निघायची शक्यता नाही तेव्हा ही संस्कृती भारतात नंतरच्या काळात रूढ झाली असावी.मी स्वत: अमेरिकेत ५-६ वर्षे राहिलेलो आहे. तिथे मुलांना असलेले निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य बघून मला तर खूप हेवा वाटायचा त्यांचा. आपल्याकडे काहीही करायचे झाले तरी इतरांना (read मोठ्यांना आणि "जुन्या वळणाच्या" लोकांना) काय वाटेल हाच विचार जास्त करायला लागतो!! आता हा मुद्दा मांडला तर भारतीय संस्कृतीवादी "बघा तिकडचे कसे सगळे चांगले वाटते आणि इकडचे सगळे टाकाऊ वाटते" ही हाकाटी करायला मोकळे!! दुसरे म्हणजे शिक्षणपध्दतीचे म्हणाल तर दोष त्यात आहेच. आणि शिक्षणपध्दतीत सगळा सावळा गोंधळ आपल्या लोकांनीच घातला आहे. भारतात जे काही मोठे शास्त्रज्ञ झाले (सी.व्ही.रामन, जगदीश चंद्र बोस, मेघनाद साहा, सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा इत्यादी) इंग्रज काळातच झाले. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, आशुतोष मुखर्जी यासारखे शास्त्रज्ञ नाही तरी मोठे academicians पण त्याच काळातले. आपल्या पिढीत त्या तोडीचे शास्त्रज्ञ होत नसतील तर तो दोष मेकॉलेचा नाही तर शिक्षण पध्दतीत प्रत्येक ठिकाणी सावळागोंधळ घालणाऱ्या आपल्याच लोकांचा आहे.
अहो जर मूळात ते ग्रंथ उपयोगी आहेत हेच मान्य नसेल किंवा ते टाकाऊच वाटत असतील तर हे काम करणार कोण? आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असल्याशिवाय हे जमावे कसे?ग्रंथ टाकाऊ वाटायच्या मुद्द्यावर माझे उत्तर वरीलप्रमाणेच. आणि इतिहासाचा जाज्वल्य अभिमान म्हणत असाल तर माझ्या मते तो जाज्वल्य अभिमान त्रासदायकच. असा अभिमान आला की वस्तुनिष्ठ अभ्यास करताना लागणारा तटस्थपणा गेलाच म्हणून समजा आणि जाज्वल्य अभिमान असला तर अशा लोकांच्या हातून मिशीला पीळ देण्याव्यतिरिक्त फारसे काही होणार नाही याची खूणगाठ बांधा.मुळात आपले नक्की काय कमी पडले हा विचार तरी करू शकतात का हे जाज्वल्य अभिमानी? माझेच उदाहरण द्यायचे झाले तर करियरच्या बाबतीत मी खूप भरकटलो होतो.एक वेळ अशी आली होती की जर क्लिंटन आयुष्यात मोठे failure बनणार अशी पैज कोणी लावली असती तर ती पैज आपण अगदी सहजच जिंकू असे त्याला वाटले असते.अशावेळी माझ्या करियरची गाडी परत रूळावर आणण्यासाठी माझे नक्की काय चुकले हा वस्तुनिष्ठ अभ्यास आणि आत्मपरिक्षण गरजेचे होते की मी शाळेत असताना मिळविलेल्या शैक्षणिक यशाबद्दल जाज्वल्य अभिमान?एक गोष्ट सांगतो की मी त्यावेळी जर असा फालतूचा अभिमान मी ठेवला असता तर माझी गाडी रूळावर येऊच शकली नसती आणि आता मी हे ज्या लॅपटॉपवर टाईप करत आहे तो विकत घेणेही मला शक्य झाले नसते. बाकी इतर सगळ्या मुद्द्यांना उत्तरे देत राहिलो तर त्याच त्याच मुद्द्यांची पुनरावृती होईल तेव्हा एकाच मुद्द्याला उत्तर देतो आणि आवरते घेतो.
अतिशय पक्के विचार असलेला आणि ते बदलु न इच्छिणारी एक हुषार व्यक्ती एवढेच म्हणेन.मी विचार बदलायला तयार नाही? काय सांगता? मी मिसळपाववरचेच माझ्याच जुन्या लेखनाचे दुवे देतो. आणि माझी ती भूमिका चुकीची होती हे मला जाणवल्यानंतर माझ्यातला फरकही सांगतो: १. २६/११ च्या हल्ल्यानंतर मी लिहिलेले ही एक इष्टापत्ती ठरो हे मिपा संपादकीय. त्या हल्ल्यानंतर आलेला तात्कालिक संतापाचा भर ओसरल्यानंतर माझा मीच विचार केला तेव्हा असे आपण असा कसा विचार करू शकलो असेच मला वाटले. अर्थात आपल्या चुका पुस्तक लिहून जगजाहीर करायला महात्मा गांधींकडे असलेला प्रांजळपणा माझ्याकडे नव्हता म्हणून तसे मी जाहिरपणे मान्य केले नाही.पण माझ्या वैचारिक प्रवासात तो २६/११ चा हल्ला खरोखरच इष्टापत्ती ठरला हे नक्की. ही गोष्ट नोव्हेंबर २००८ मधली. त्यानंतर दीड-एक वर्षात २२ जून १८९७ ही मिसळपाववरील चर्चा मी माझे विचार (माझी चूक लक्षात आल्यानंतर) बदलले याचा पुरावा नाहीत का? २. एकेकाळी गांधींचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जात असे. तिथपासूनच गांधींना ’टकल्या" पासून "महात्मा गांधी" असे म्हणण्यापर्यंतचा प्रवासच बरेच काही सांगून जातो. त्याविषयी आणखी काही लिहायला नको. तेव्हा "आपले विचार बदलायला तयार नसलेली व्यक्ती" असे तरी कृपया म्हणू नका.जसे अधिक जग बघितले, इतरांचे ऐकून पोपटपंची करायचे बंद केले आणि स्वत:चा विचार करून मते बनवली तेव्हा हा बदल घडला इतकेच.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to मलाही राहवत नाही. by चित्रा
पण भूतकाळात अडकणारी माणसे ही वेगवेगळ्या पद्धतीने भूतकाळात वावरत असतात असे वाटते. काहीजण भूतकाळच सुंदर होता म्हणून अडकलेली असतात तर काहीजण भूतकाळात घडले ते सर्वच वाईट होते म्हणून सध्याच्या हवेत तरंगत असतात.योगायोगाने आताच सकाळचा प्राणायाम करून बघायला आलो तर हा प्रतिसाद आलेला. हा प्राणायामही "तुमच्या" किंवा "आपल्या" भारतीय संस्कृतीतला बरं का आणि भूतकाळातला! (आणि त्या प्राणायामाचा उगम भारतात न होता सोमालिया किंवा बुर्किना फासो मध्ये झाला असता/असला तरी मला त्याच्या उगमात काहीही इंटरेस्ट नाही तर तो प्राणायाम माझ्यासाठी उपयुक्त ठरला आहे ही गोष्टच माझ्यासाठी महत्वाची). तेव्हा मी काही प्रश्न विचारले तर "भूतकाळ सगळा वाईट" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ करून घेतल्यास त्याला माझा नाइलाज आहे. (आणि असा अर्थ करून घेत असलेल्यांना माझा हा शेवटचा प्रतिसाद. दरवेळी तीच तीच गोष्ट लिहायचा कंटाळा आला आहे).
तुमचा संतापही विशेष कळला नाही. त्या वडिलांचा सल्ला काळाला अनुसरून नसावा, पण तुम्हाला त्यांनी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाबद्दल फारतर इतक्या वर्षांनंतर त्यांची कीव यावी. अजूनही एवढा संताप आणि राग कशाला? त्याला स्ट्रगल करावे लागावे ही वडिलांची इच्छा नसावी असे वाटते. कितीही जुनाट, बुरसटलेल्या विचारांचे असोत.हीच तर मजा असते. असे नुकसान झाले तरी मोठी मंडळी "मी तुझ्या हिताचेच सांगितले" हे म्हणून कधीच पसार होऊ शकतात आणि त्याचे परिणाम मात्र त्या मुलांना भोगायला लागतात (कदाचित आयुष्यभरासाठी). माझा संबंधित नातलग मिपाचाच सदस्य आहे आणि मीच त्याला मिपाविषयी सांगितले. अर्थात त्याचे नाव उघड करावे असे त्याला नक्कीच वाटत नसणार म्हणून त्या सदस्याचे टोपणनाव मी इथे लिहित नाही. पण त्याचा स्ट्रगल मी अगदी जवळून बघितला आहे. आणि झाल्या प्रकाराचा मला तरी संताप आल्यावाचून राहिलेला नाही. भारतीय कुटुंबांमध्ये अशी सक्ती झाल्यास त्याला तितक्या सहजपणे डिफाय करता येत नाही पण पाश्चिमात्य "संस्कृतीत" ते करणे अधिक शक्य असते याविषयी फारसे मतभेद असू नयेत. आणि मला तिकडला हा प्रकार जास्त अपील होतो. आता यावर मला काळा इंग्रज म्हणायचे असेल तर खुषाल म्हणा.
शेवटचे म्हणजे ज्यांची आयुष्ये अशा चुकांनी तुमच्या मते "वाया" गेली आहेत त्यांनी (तुमचेच म्हणणे पुढे चालवायचे तर) तुमचे तरी का ऐकावे? तुम्ही सध्या यशस्वी आहात म्हणून? तुम्ही कशावरून चुकीचे ठरणार नाहीत? (ह. घ्या).कोणी सांगितले की मी म्हणत आहे की अशांनी माझे ऐकावे? त्यांनी स्वतःच्या मनाला जे योग्य वाटते तेच करावे. (थ्री इडियटमधला संवाद आठवा: आमीर खान करिनाच्या बहिणीच्या पोटातल्या बाळाला सांगतो-- तू तेरा दिल केहता है वही कर). पण जे काही होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर घ्यायची हिंमत असली पाहिजे. तशी नसेल तर मात्र असल्या भानगडीत न पडलेले अधिक चांगले. माझे तरी तत्व आहे-- मी शंभर चुका करेन पण those mistakes should be attributable only to me and nobody else. इतरांचे ऐकून खड्ड्यात पडण्यापेक्षा मी माझ्या मार्गानेच खड्ड्यात पडेन. तेव्हा इतरांनी माझे ऐकावे असे मी अजिबात म्हणत नाही.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to हम्म by चित्रा
बाकी पाश्चिमात्य संस्कृतीत जर काही सर्वात चांगले असले तर ते आपल्या निर्णयांचे परिणाम शेवटी आपल्यावर होणार आहेत ही कल्पना.देअर यु गो.
तुमच्या रागाचा रोख अजूनही त्या जुन्या पिढीतल्या वडिलांवर आहे ते माझ्या दृष्टीने चुकीचे आहे एवढेच म्हणते.आणि काही प्रश्न विचारले म्हणजे भारतीय संस्कृतीतले सगळे वाईट दिसते, मुद्दामून सँपलींग चुकीचेच केले आणि बरोबर सँपल मुद्दामून खड्यासारखे वगळले, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही महानतम लोकांना एकाएकी गोर्यांची संस्कृती ती काय श्रेष्ठ असे वाटायला लागते, आपल्याकडे 'कुतुहल' नसते, केवळ 'कुशंका' असतात आणि त्यालाच शोधक वृत्ती असे लेबल लावायचे असते! इत्यादी इत्यादी जनरलायझेशनही चुकीचे आहे हे त्याच दमात म्हणणार का तुम्ही? काही प्रश्न उभे केले तर मुद्दामून सँपलींग चुकीचेच केले किंवा तत्सम काही लिहायचे आणि वर असे लिहिताना "मी व्यक्तिशः तुम्हाला काहीच म्हणत नाही" असे म्हटले तर त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? असो. बाकी जनरलायझेशन करू नये यात वादच नाही.मी मुळात लिहिलेल्या गोष्टीत त्या व्यक्तीविषयीचा माझा संताप ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि ती अयोग्य होती याचे मलाही भान आहे. पण ज्या आवेशाने त्या जनरलायझेशनला विरोध केला गेला तेवढाच विरोध प्रश्न विचारत असलेल्या समोरच्या माणसाच्या उद्देशालाच खोटे पाडणे, त्याला भारतातले काहीच चांगले दिसत नाही वगैरे प्रकारच्या स्टेटमेन्ट्सना का केला जात नाही? असो. मी इंटरनेट वापरायला लागल्यापासून म्हणजे २००० सालापासून मी विविध फोरमवर हेच प्रश्न उभे केले आहेत. तेव्हा I am veteran at this game. पूर्वी युजनेट म्हणून डिस्कशन फोरम होते (त्यानंतर ते गुगलने विकत घेतले). तिथेही मला तेव्हापासून नेमका हाच अनुभव आला. त्यातील जय महाराज या नावाने लिखाण करणाऱ्या व्यक्तीबरोबर मी अगदी भीडलो होतो. शेवटी त्यानेच मला विचारले होते की "तू मुस्लिम की ख्रिस्ती"? माझा भ्रमनिरास तेव्हा व्हायला लागला. या सगळ्या चर्चेत अर्धवटराव यांचा sampling चा प्रतिसाद हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे हे इथेच लिहितो. गेल्या १२ वर्षात विविध चर्चेत मला कदाचित चुकीचे सँपलींग मिळाले असेल आणि बरोबर सँपलींग मिळायची मात्र नक्कीच वाट बघत आहे. असो. माझ्या प्रतिसादावर उपप्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद. माझ्याकडून या चर्चेला पूर्णविराम (आणि त्याबद्दल ज्या मिपाकरांना हायसे वाटेल त्यांना आधीच धन्यवाद).
In reply to धन्यवाद by क्लिंटन
In reply to ज्यास्त काई नाई! by पिवळा डांबिस
In reply to >>मला जो जीन पूल मिळाला आहे by बॅटमॅन
(साध्या बायनरी डिसिजन व्हेरिएबल चे अॅनॉलॉगीकरण झालेले पाहून वैतागलेला)वेलकम टू गोवा, सिंघम !!!
In reply to (साध्या बायनरी डिसिजन by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हा धागा अजुन चालु आहे तर by मदनबाण
In reply to हा कसला प्रश्न? by नितिन थत्ते
In reply to हा धागा अजुन चालु आहे तर by मदनबाण
In reply to पुराणातली विमाने नेमकी by यकु
In reply to अरे धागा दोन पानी झाला की by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हुश्श्श्श........( झाले लिहून एकदाचे) by बॅटमॅन
In reply to नुकतीच वाचलेली एक बातमी ... by सुनील
भारत आणि श्रीलंका यांच्यात तेव्हापासूनच विमान सेवा होती हे आता पूर्णपणे सिद्ध झाले आहे. मात्र ही सेवा फारच महाग असून फक्त उच्च्भ्रूच त्याचा लाभ घेत असावेत. सामान्यांना सागरी सेतूचा वापर करावा लागत होता.म्हणजे आताचे काँकोर्ड आणि साधे एअरबस म्हणजे तेव्हाचे विमान आणि सेतू असंच का हो सुनीलशेट? का त्यात आर्थिक आरक्षण नसून राजघराण्यात जन्म अथवा लग्न असा आरक्षणाचा निकष होता? बॅटमॅनचा वरचा आख्खाच प्रतिसाद यूसलेस आहे, पण चुकारतट्टू हा शब्द अती-यूसलेस आहे.
In reply to भारत आणि श्रीलंका यांच्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to दिल्ली मधला लोह स्तंभ by कपिलमुनी
In reply to साक्ष वगरै ठिक आहे हो. पण by कवितानागेश
In reply to चर्चेचा सारांश by पैसा
In reply to कळविण्यास अत्यंत खेद :) वाटतो की, by कवितानागेश
In reply to चर्चेचा सारांश by पैसा

गपे!