✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उमज

स — स्पंदना, Tue, 04/10/2012 - 05:08
प्रेरणा:-http://www.misalpav.com/node/21293 मिथकांचे रचुनी भांडार, दिवाभितांचे सोपस्कार स्त्री होउन मी पुन्हा वाचते, भेद तव कथेचा वारंवार शापित जीवन सदा सर्वदा, राजयोग जरी दिसे दर्शना तळमळ सारी उरात लपवी , माता कुंती पांडव जोजवी बालिका तू कोवळी , बळी तू कुण्या एका जोगड्याची जन्म अभागी पुत्राचा अन मिथक प्रसवली मंत्रांची कलंकित त्वा मग जोड कोठली सामर्थ्यवान पुरुषाची म्हणुनच मग विवाह योगी ...पंडु...ज्या गरज भासे मंत्रांची दिसतो मज अत्याचार ठायी ठायी तव जीवनी कुस्करलेले बालपण अन तहानलेल्या तारुण्यी त्यागुनी सारे राजवैभव पतीसह तू वनवासी राखाया मग राज्य हक्क तू पुन्हा पुन्हा..पुन्हा बळी जाशी ठसठसणारी जखम उरीची , पोक्त मलाही जाणवते कुंती तव साम्राज्ञीपणाचे दारिद्र्य मला बघ खंतवते.

प्रतिक्रिया द्या
1304 वाचन

💬 प्रतिसाद (3)

कविता आवडली. कुंतीचे

प्रचेतस
Tue, 04/10/2012 - 09:01 नवीन
कविता आवडली. कुंतीचे व्यक्तिचित्रण पद्यरूपात व्यवस्थित उतरवले गेले आहे.
  • Log in or register to post comments

व्वाह

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/10/2012 - 13:12 नवीन
सुंदर रचना. हि कविता वाचुन आमचीच हि कविता आठवली.
  • Log in or register to post comments

क्या बात !!

सुहास..
गुरुवार, 04/12/2012 - 01:50 नवीन
क्या बात !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा