✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (गीता सहित)

ग — गणेशा, Tue, 02/07/2012 - 16:58
झाडांच्या पानात वेलींच्या फुलात पाउस दाटुन आला रिमझिम सरीत भिजल्या मातीत आठव देवुन गेला ||२|| वार्‍याचा पदर नभीची चादर चिंबन करीत आला ओंजळ भरुनी मेघात न्हाऊनी ओटीत घालुनी गेला ||१|| बरसली ती.. झिरपली ती .. मल्हार वेल्हाळ आला थेंबांची आरती पानांची पालखी आंदण देवुन गेला ||२|| भिजल्या मनात सजल्या रानात केशर शिंपित आला झाडांची झावळी स्पर्शाने सोहळी ओलेती करुन गेला ||२|| स्वप्नांच्या चाहुली मिठीत साउली वसंत शिंपत आला कशाला आवरु मनाला सावरु माझ्यात गुंतुन गेला ||२|| झाडांच्या पानात वेलींच्या फुलात पाउस दाटुन आला रिमझिम सरीत भिजल्या मातीत आठव देवुन गेला ---- शब्दमेघ ( निसर्गकविता १: झाडांच्या पानात) गाण्याचे/कवितेचे नाव : झाडांच्या पानात अल्बमः ये ना तू सख्या ...
  • निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त
  • निसर्गकविता ३: कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
  • निसर्गकविता ४: पाऊस

Book traversal links for निसर्गकविता १ : झाडांच्या पानात (गीता सहित)

  • निसर्गकविता २ : प्रिय प्राजक्त ›

प्रतिक्रिया द्या
8077 वाचन

💬 प्रतिसाद (38)

सुंदर!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/07/2012 - 18:24 नवीन
बरसली ती.. झिरपली ती .. मल्हार वेल्हाळ आला थेंबांची आरती पानांची पालखी आंदण देवुन गेला
सुंदर!!
  • Log in or register to post comments

मस्त

मयुरपिंपळे
Tue, 02/07/2012 - 19:01 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments

ते मस्तच आहेत हो...पण तुमचा

पक पक पक
Wed, 02/08/2012 - 13:18 नवीन
ते मस्तच आहेत हो...पण तुमचा घाणा का ठंडावला आहे ....? ;)..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

गपे

मयुरपिंपळे
गुरुवार, 02/09/2012 - 22:39 नवीन
गपे पक पक Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

घाणा सुरु झालेला धुरावाटे

प्रचेतस
गुरुवार, 02/09/2012 - 23:04 नवीन
घाणा सुरु झालेला धुरावाटे जाणवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

घाणा ठंडावल्याची जाणिव खुप

पक पक पक
Fri, 02/10/2012 - 22:39 नवीन
:crazy: घाणा ठंडावल्याची जाणिव खुप उशिरा झालेली दिस्त्ये. ;) जिलब्या तळायला चुकुन तेलाएवजी रॉकेल ओतले कि काय..? :crazy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गणेशा जबरदस्तच रे

लीलाधर
Tue, 02/07/2012 - 19:28 नवीन
खुपच मस्त आणि जबरदस्तच रिमझिम सरीत भिजल्या मातीत आठव देवुन गेला
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
Tue, 02/07/2012 - 19:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हायकू?

प्रास
Tue, 02/07/2012 - 20:55 नवीन
आयला गणेशा, ही तर एखाद्या हायकू सारखी तीनोळी झालीय रे! आता ही खरंच हायकू आहे का नाही याची आपनेको फिकिर कायकू? ;-) आपल्याला पाऊस आवडतो नि पावसाने केलेली सगळी कामंही आवडतात, आता हे जे काही आहे ते तुझं पावसावरचं काव्यदेखिल आपल्याला आवडलंय भौ....! :-) बाकी ते नंबरींग असं काही खास कारणाने केलंय का रे? मध्येच ॥१॥ आणि मध्येच पुन्हा पुन्हा ॥२॥? तेवढं काही कळलं नै...
  • Log in or register to post comments

सर्वांचे प्रथम धन्यवाद ! @

गणेशा
Tue, 02/07/2012 - 21:25 नवीन
सर्वांचे प्रथम धन्यवाद ! @ प्रास भाऊ : अव ती खाली लिंक दिलीया , तिच्यात ते कडवे २ दा म्हंटले आहे म्हणुन ||2|| बाकी खास असे काही नाही .. आता ती लिंक ऐकली नाहि असे म्हणु नका.. नाहि तर गीतगुंजन कडे पाठ फिरावल्या जाईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

सुरेख शेवटच कडव छान जमलय

जाई.
Tue, 02/07/2012 - 20:58 नवीन
सुरेख शेवटच कडव छान जमलय
  • Log in or register to post comments

तुझे हे गाणे ऐकलेले आहेच रे.

प्रचेतस
Tue, 02/07/2012 - 21:48 नवीन
तुझे हे गाणे ऐकलेले आहेच रे. आज त्याचे बोलही पुन्हा एकदा वाचायला मिळाले. मस्त, ताजेतवाने पावसात भिजल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Tue, 02/07/2012 - 22:06 नवीन
एकदम पहिल्या पावसासारखी कविता! फक्त ती गाण्याची लिंक दिसत नाहीये. काय गडबड आहे बघ जरा.
  • Log in or register to post comments

jayshreeganesha.blogspot.com

गणेशा
Tue, 02/07/2012 - 22:11 नवीन
jayshreeganesha.blogspot.com मला दिसत आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तसा नाय रे!

पैसा
Tue, 02/07/2012 - 22:20 नवीन
लिंक तुझ्या ब्लॉगवर जातेय, पण तिथे प्लेयर नाहीये, एक पांढरा चौकोनच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

+१ सहमत आहे

प्रचेतस
Tue, 02/07/2012 - 22:23 नवीन
+१ सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आता, माझ्या येथे ब्लॉक आहेत

गणेशा
Tue, 02/07/2012 - 22:27 नवीन
आता, माझ्या येथे ब्लॉक आहेत ब्लॉग्स. आणि कसे तरी ते गाणे मी मागे मित्राकडुन तेथे लावुन घेतले होते. आता मला तसा प्लेयर नाहि देता येइचा, तेथे गाणे नसेन तर. पाहतो मी नंतर असो .. गाणे ऐकायला वाचण्यापेक्षा जास्त छान होते, संगितामुळे खुप शोभा वाढली होती .. ट्राय करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आँ??

अन्या दातार
Tue, 02/07/2012 - 22:44 नवीन
कविता मस्तच आहे. मलाही तिथे ब्लॉगवर फक्त पांढरा चौकोन दिसतोय.
संगितामुळे खुप शोभा वाढली होती .
इतके दिवस प्रितीचं झुळझुळ पाणी माहिती होते, आता या संगिता आणि शोभा कुठुन आल्या ब्वा?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आवरा, अशी एक स्माईली हवी होती

५० फक्त
Wed, 02/08/2012 - 01:09 नवीन
आवरा, अशी एक स्माईली हवी होती इथं, कॉलिंग भटजी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

सुंदर..

विसोबा खेचर
Wed, 02/08/2012 - 11:12 नवीन
सुंदर..
  • Log in or register to post comments

खुप सुंदर झाली आहे कविता.

जागु
Wed, 02/08/2012 - 11:24 नवीन
खुप सुंदर झाली आहे कविता.
  • Log in or register to post comments

छान

चैतन्य दीक्षित
Wed, 02/08/2012 - 11:45 नवीन
कविता मस्त. >चिंबन करीत आला यातला चिंबन हा शब्द थोडा खटकला. पाऊस नभीची चादर चिंब करीत आला, असेच म्हणायचे आहे ना?
  • Log in or register to post comments

गणेशा, तुला सरस्वती प्रसन्न

पक पक पक
Wed, 02/08/2012 - 13:09 नवीन
गणेशा, तुला सरस्वती प्रसन्न आहे का रे..? काय मस्त लिहीतोस तु , खुप मस्त वाट्त वाचायला.मिपा वरील काही ठराविक आवड्णार्‍या कविं पैकी तु नं.एक आहेस.... :) (आपला दोघात एक मासा नक्की ना...?) ;)
  • Log in or register to post comments

तो तर देइलच

मी-सौरभ
Wed, 02/08/2012 - 20:28 नवीन
(आपला दोघात एक मासा नक्की ना...?)
अन् पुणे गेट ला गेलात तर 'फ्रुट पंच' पण मिळू शकेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

तो पण लेयरवाला.

प्रचेतस
Wed, 02/08/2012 - 21:09 नवीन
तो पण लेयरवाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सुंदर

नगरीनिरंजन
Wed, 02/08/2012 - 13:19 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासुन आभार ...

गणेशा
Wed, 02/08/2012 - 13:34 नवीन
सर्वांचे मनापासुन आभार ... तरीही गाणे देण्याचा प्रयत्न नक्की करीन .. @ चैतन्य , शब्द थोडा फार खटकत असेलच असे वाटते आहे. चिंबन करीत आला. या ओळीतुन पाउस आठवणींसोबत चिंब भिजत /भिजवत वार्‍याचा पदरावर झुलत नभाच्या पंखाखाली बागडत आला असा अर्थ अपेक्षित होता. @ पक पक पक येव्हद्या स्तुतीची सवय नसल्याने, कसे तरी झाले एकदम.. तरीही मनापासुन धन्यवाद
  • Log in or register to post comments

येव्हद्या स्तुतीची सवय

पक पक पक
Wed, 02/08/2012 - 13:46 नवीन
येव्हद्या स्तुतीची सवय नसल्याने, कसे तरी झाले एकदम.. अस काय ते..? आता सवय करुन घ्यायला हवी तुम्हाला ..आम्ही खरच मनापासुन प्रतिसाद दिला आहे त्यामुळे कसेतरी व्हायचे काही कारण नाही.. (ते माशाच तेवढ लक्शात ठेवा..) :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

स्पा
Wed, 02/08/2012 - 14:14 नवीन
अप्रतिम.... आवडल्या गेली आहे अभिनंदन गणेशा भाऊ (सुरमयी फिक्स आता) ;)
  • Log in or register to post comments

(सुरमयी फिक्स आता) त्ये आमच

पक पक पक
Wed, 02/08/2012 - 14:24 नवीन
(सुरमयी फिक्स आता) त्ये आमच ठरल आहे.....५०/५०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(सुरमयी फिक्स आता) त्ये आमच

पक पक पक
Wed, 02/08/2012 - 14:25 नवीन
(सुरमयी फिक्स आता) त्ये आमच ठरल आहे.....५०/५० :crazy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुन्दर

इरसाल
Wed, 02/08/2012 - 14:40 नवीन
सुन्दर्,सुरेख आणी अप्रतिम.
  • Log in or register to post comments

भावर्थ छानच...

वपाडाव
Wed, 02/08/2012 - 15:16 नवीन
ही कविता वाचते वेळी "मी रात टाकली" हे गाणं सारखं आठौत होतं... त्यातली एक चाल गणेशाच्या कवितेला बसते, त्या ओळी अशा- 'हिरव्या रानात, हिरव्या पानात, सावळ सावर चालती'
  • Log in or register to post comments

आमचा परममित्र कविवर्य

प्रचेतस
Wed, 02/08/2012 - 21:39 नवीन
आमचा परममित्र कविवर्य गणेशाच्या या वरील कवितेचा आस्वाद येथे घ्या.
  • Log in or register to post comments

आम्चे कडून सदर काव्यास

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/09/2012 - 12:14 नवीन
आम्चे कडून सदर काव्यास Image removed.
  • Log in or register to post comments

नादखुळी कविता !

श्यामल
गुरुवार, 02/09/2012 - 13:09 नवीन
व्वा सुंदर ! नादखुळी कविता आणि नादमय गीत संगीत ! दोन्ही आवडले. मी गीत ऐकत होते. मुलाच्या कानावर पडले आणि त्याने ते लगेच डाऊनलोड करुन स्वतःच्या फोल्डरमध्ये सेव्ह केले. त्यालाही आवडले.
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासुन धन्यवाद

गणेशा
गुरुवार, 02/09/2012 - 13:57 नवीन
सर्वांना मनापासुन धन्यवाद ! वल्ली आणि संपादक मंडळाचे खुप आभार .
  • Log in or register to post comments

गणेश सर

मयुरपिंपळे
Fri, 02/10/2012 - 16:32 नवीन
ह्या गाण्यामुळे तुमचा मी fan झालो आहे. अप्रतीम आहे हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा