प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्या कळ्या संध्याकाळी टपोर्या झालेल्या पाहताना मला खूप मजा
वाटायची.
ह्या टपोर्या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट
अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. सकाळी उठून हा सडा पाहण्यासाठी
अंगणात जायचे. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले
पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची.
ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा
मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा. ह्या प्राजक्ताच्या फुलांच्या
पावसातील आनंद म्हणजे टप टप टप टप पडती प्राजक्ताची फुले ह्या
बालगीताच्या ओळी सार्थकी लावायच्या.
प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे
हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण
वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व
देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक
कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार
अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या
फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस.
लग्न झाले आणि सासरी आले. माझ्या सासर्यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. परत माझे बालपणीचे दिवस आठवले.
मग आता ह्या सड्याचा आनंद तर उपभोगायलाच हवा. पण पुर्वी सारखा वेळ आता
मिळत नाही म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.
आता बालपणी एवढा रांगोळी वगैरे काढण्यापर्यंत वेळ नसतो. पण प्राजक्ताची
फुले पाहिली की राहवत नाही. मग सुट्टीच्या दिवशी परडी भरून फुल गोळा करते
आणि सासूबाईंना त्याचे हार बनवून देते वेळ असेल तर स्वतःही घालते. रात्री
शतपावली करताना नवीन उमलणाऱ्या फुलांचा पुन्हा सुगंध भरभरून घेते. त्याने
रात्रही अगदी सुगंधी होऊन जाते.
ह्या फुलांच आणि माझं नातही अस आहे की माझं लग्न झाल आणि माझ्या
मिस्टरांनी त्यांच्या पराग ह्या नावाला मिळत जुळत म्हणून माझ नावही
प्राजक्ताच ठेवल. आमच एकत्र कुटुंब आहे. माझ्या जाऊबाई रोज ही फुले
देवपूजेसाठी गोळा करतात. माझी मुलगी श्रावणी २ वर्षांची असताना एक दिवस
लवकर उठली होती आणि तिने पाहील की तिची काकी फुल गोळा करतेय. तेंव्हा ती
जोरात ओरडली ए काकी ती माझ्या आईची फुले आहेत तू गोळा नको करुस. एक क्षण
मला काही कळले नाही. नंतर मला आणि सगळ्यांना समजल की आम्ही रोज
प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो त्याचा अर्थ माझ्या मुलीने माझीच
फुले असा घेतला होता. दुसर्या अर्थाने तिच प्राजक्ताच फुल आहे.
असा हा माझ्या अंगणात बहरणारा प्राजक्त. ह्याचे नि माझे मला काही
ऋणानुबंध आहेत अस वाटत. हे माझे प्राजक्ताच्या फुलांवरचे प्रेम म्हणून का
कोण जाणे पण जरी फुलांचा बहर ओसरला, त्यांचा हंगाम गेला तरी अगदी
उन्हाळ्यातही ७-८ तरी फुलांचा सडा आमची मैत्री निभावण्यासाठी, माझे मन
प्रसन्न करण्यासाठी अंगणात पडतो.
ह्या टपोर्या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट
अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. सकाळी उठून हा सडा पाहण्यासाठी
अंगणात जायचे. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले
पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची.
प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे
हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण
वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व
देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक
कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार
अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या
फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस.
लग्न झाले आणि सासरी आले. माझ्या सासर्यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. परत माझे बालपणीचे दिवस आठवले.
मग आता ह्या सड्याचा आनंद तर उपभोगायलाच हवा. पण पुर्वी सारखा वेळ आता
मिळत नाही म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा
संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
25096
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
---^--- काय म्हणु या
लेख आवडला ..
मस्त लेखन. पारिजातकाच्या
वा!!!
+१
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by गणपा
अत्रुप्त आत्मा तुमचा प्रतिसाद
पाहिले ना... नाहि मिळाले
In reply to अत्रुप्त आत्मा तुमचा प्रतिसाद by जागु
जागु, मस्त फोटो..त्यहुन मस्त
पारिजातकाचा सडा पडलेला फोटो
_/\_
रिप्लाय आवडला...
In reply to _/\_ by स्मिता.
वा !! गणेशा खुप सुंदर.......
In reply to रिप्लाय आवडला... by गणेशा
सुंदर काव्य रे मित्रा.
In reply to रिप्लाय आवडला... by गणेशा
गणेशा आणि जागुताई
In reply to रिप्लाय आवडला... by गणेशा
घाल घाल पिंगा वार्या ,माझ्या
In reply to _/\_ by स्मिता.
चांदण्या ल्यायलेलं झाड अतिशय
In reply to _/\_ by स्मिता.
खुप आनंद वाटला हे सगळं वाचुन
मस्तं !
स्मिता क्या बात है ! मनराव,
प्राजक्त
गणेशा सुंदर कविता. प्राजक्ता
मला माझ्या गावी मी स्वतः
फार दुख-या आठवणी आहेत
छान जागुतै
प्राजक्त पहिल्यापासूनच
५०, प्राजक्त म्हणजे आठवणींचा
आवडतं फुल
काय सुंदर सडा पडला आहे.. आहा.
अगदी सुगंधी लेखन.
सुंदर लेख
प्राजक्ताच्या फुलांसारखच
मस्त
अंजली पुरोहीत यांचे हे पेंटींग बघा
मस्त, अतिशय सुंदर लेख!
वरील २ ही फोटो दिसत नसल्याने
५५
In reply to वरील २ ही फोटो दिसत नसल्याने by गणेशा
आक्षी बरूबर........
In reply to ५५ by वपाडाव
खुपचं सुंदर
प्राजक्ताचा सडा पाहिला आणि
लेखन , फोटो सगळंच छान !!
सुंदर लेख आणि फोटो देखील.
वा वा! सुंदर, सुगंधी लेखन.
सुंदर
+१
In reply to सुंदर by मीनल
बरसात
सुमनताईंच्या गाण्यातील
मस्त
सगळ्यांचे मनापासून आभार. जे
वा!!!
अगदी असंच
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
कार्यकर्ते खरच अगदी
ऑफिस मधे धागा उघडल्यावर लगेच
<<माझ्या हाताने प्राजक्ताच
In reply to ऑफिस मधे धागा उघडल्यावर लगेच by टुकुल
रम्या (एकदम खास मित्राला
In reply to <<माझ्या हाताने प्राजक्ताच by रम्या
मस्त वाटलं पण एक शंका ???
In reply to <<माझ्या हाताने प्राजक्ताच by रम्या
प्रश्न असा आहे की आपला प्रश्न
In reply to मस्त वाटलं पण एक शंका ??? by वपाडाव
समझदार को काय ते...
In reply to प्रश्न असा आहे की आपला प्रश्न by प्यारे१
जागुताई
जागुतै, खूप प्रसन्न वाटलं
मदनबाण, स्मिता, सविता, राघव
फोटो
रम्या खरा आनंद
सुंदर लेख आणि सुंदर फोटो.
मस्त.....
मिरची कुंडीत जास्तीत जास्त एक
हो का?
In reply to मिरची कुंडीत जास्तीत जास्त एक by जागु
'प्राजक्त फुलांचे स्तोत्र'