✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

ब
बन्याबापू यांनी
Fri, 01/20/2012 - 21:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरानो ! आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे. मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
212853 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

मला तिला काहीही करुण पटवायचे

मृगनयनी
Fri, 01/20/2012 - 22:10 नवीन
मला तिला काहीही करुण पटवायचे आहे. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!! तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय.. :|
  • Log in or register to post comments

हा हा हा

छोटा डॉन
Fri, 01/20/2012 - 22:13 नवीन
>>खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!! हा हा हा. मॅटर खतम करुन टाकलात की तुम्ही पटकन. असो, प्रतिसाद वाचण्यास उत्सुक, तूर्तास आम्हाला तसा काही अनुभव नसल्याने काही माहितीपर लिहु शकेन असे वाटत नाही. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर

मृगनयनी
Fri, 01/20/2012 - 22:22 नवीन
आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते. यामध्ये नक्की काय म्हणायचे आहे? एखाद्या सुन्दर दिसणार्‍या किन्वा तुम्हाला सुन्दर वाटणार्‍या मुलीला "माल" म्हणून तुम्ही तिची पातळी अगदीच "हीन" तरी करून ठेवताय... किन्वा मग सगळ्याच सुन्दर मुलींना.. मग भले त्या कितीही सोज्वळ का असेनात...(आशा काळे टाईप).. त्या सगळ्यांना "माल" या एकाच मापनमूल्यात तोलून तुम्ही स्वतःचीच्च हीन पातळी सगळ्यांसमोर आणताय... :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१००, तुम्ही हा उगीचंच चीप

५० फक्त
Fri, 01/20/2012 - 22:29 नवीन
+१००, तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय.. दंगाच होणं अपेक्षित असेल तर, उगाचच संमंचं काम वाढणार आहे. सध्याच्याच कोणत्याश्या धाग्यावर बिरुटे सरांनी लिहिलंय या अशा धाग्याबद्दल. असो, संमं समर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर

बन्याबापू
Fri, 01/20/2012 - 22:33 नवीन
आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.
माफ करा काकु ! मला 'आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी मला खुप खुप आवडते.असे लिहायचे होते.पण, 'मला' च्या ऐवजी 'माल' असा शब्द चुकून टाईप झाला. :(
यामध्ये नक्की काय म्हणायचे आहे? एखाद्या सुन्दर दिसणार्‍या किन्वा तुम्हाला सुन्दर वाटणार्‍या मुलीला "माल" म्हणून तुम्ही तिची पातळी अगदीच "हीन" तरी करून ठेवताय... किन्वा मग सगळ्याच सुन्दर मुलींना.. मग भले त्या कितीही सोज्वळ का असेनात...(आशा काळे टाईप).. त्या सगळ्यांना "माल" या एकाच मापनमूल्यात तोलून तुम्ही स्वतःचीच्च हीन पातळी सगळ्यांसमोर आणताय...
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

हुकुमीएक्का
Fri, 02/24/2012 - 17:46 नवीन
जर पोरगी पटवायची असेल तर एकच काम करा. फक्त त्या पोरीला हे कळू देउ नका की "ती सुंदर आहे" ... कारण किंमत 'जास्त' मिळाली की ती मुलींच्या डोक्यात जाते. . . .तिला "hi" करा आणि तिच्या मैत्रिणीला "smile" द्या.....problem solved!!! ... try करून पहा!!!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

हा तर

मी-सौरभ
Fri, 02/24/2012 - 19:00 नवीन
तेजाब मधला फॉर्मूला नं. ४४... तो जमाना गेला आता काका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

हुकुमीएक्का
Sat, 02/25/2012 - 00:39 नवीन
आहो काका , मुलगी मुर्ख असेल तर कुठलाही formula चालतो. . . . आपल्यात दम असेल तर काही अशक्य नाही. . . . . आणि rule विसरायचा नाही . . . . मुली तिथेच जातात जिथे त्याना जास्त भाव मिळत नाही .... जर तुम्ही ह्युमन सायकॉलॉजीचा अभ्यास केला असेल तर समजेल तुम्हाला... आणि मुलीना (किंवा कुठल्याही माणसामाणसाला)सहज मिळत नाही तेच हवे असते ... especially attention.. . . आजसुध्धा मुली चिखलात माखलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला cute म्हणतात .. .. आणि facebook वर स्वतःच्या photo ला स्वतः LIKE करतात ... मला काल आलेला एक sms post करतोय . . . She Says: You are Just a Good Friend! Her Eyes Say: I Can’t See U to be Anyone’s Boyfriend! She says: Go Away! Her Eyes Say: Don’t Ever Go Far From Me. She says: Don’t Kiss Me! Her Eyes Say: Don’t Follow My Words! She says: I am Confused! Her Eyes Say: I Just Love You! That’s Why Eyes are the Most Beautiful Part of a Girl!! Girls Say Something.. But, Their Eyes Reveals the Fact. Feelings Can’t be Hidden!! That’s Why Girls Seems to be Complicated. ......हुकुमी एक्का ( काळाच्या चौकटीबाहेर राहून विचार करणारा) ... Note :- अजुन खुप हुकुमाची पाने शिल्लक आहेत. . . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

तो जमाना गेला आता तिला

आशु जोग
Fri, 02/24/2012 - 22:19 नवीन
तो जमाना गेला आता तिला सुंदरच काय पण ती मुलगी आहे हेच डोक्यात गेलेले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

तुम्ही हा उगीचंच चीप

बन्याबापू
Fri, 01/20/2012 - 22:22 नवीन
तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय.
पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी काय विचारले आहे..त्या बद्दल बोला..नाही मदत करता येत तर गप्प बसा काकु ! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी

मृगनयनी
Fri, 01/20/2012 - 22:30 नवीन
पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी काय विचारले आहे..त्या बद्दल बोला..नाही मदत करता येत तर गप्प बसा काकु ! तुमच्या एकन्दर विचारसरणीवरून आणि दृष्टीकोनातून "ती" मुलगी तुम्हाला पटेल.. असं वाटत नाही हो... :) कारण ज्यांच्यात खरोखर मुलगी पटवायची धमक असते ना.. ती मुलं अशी धागे टाकून ... ह्याला त्याला विचारत नाही बसत... त्या मुलांमध्ये एक वेगळीच जिगर असते.... :) जाऊ देत... शेवटी 'ऐकावे जनाचे... करावे मनाचे"... येवढे लक्षात ठेवा.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

तुमच्या एकन्दर विचारसरणीवरून

बन्याबापू
Fri, 01/20/2012 - 22:47 नवीन
तुमच्या एकन्दर विचारसरणीवरून आणि दृष्टीकोनातून "ती" मुलगी तुम्हाला पटेल.. असं वाटत नाही हो..
बोललात ! :(
कारण ज्यांच्यात खरोखर मुलगी पटवायची धमक असते ना.. ती मुलं अशी धागे टाकून ... ह्याला त्याला विचारत नाही बसत.
ओ काकु... ह्याला-त्याला काय ? मी मिपावरील चांगल्या लोकांना विचारले आहे.मिसळपाव हे काय परक आहे का आपल्यासाठी.
त्या मुलांमध्ये एक वेगळीच जिगर असते.... जाऊ देत..
आता तुम्हीच सांगा 'वेगळीच जिगर' कशी असते ? आता येवु देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मृगनयनी

चिंतामणी
Sat, 01/21/2012 - 09:19 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हम्म्म्म........बन्याबापु

पियुशा
Sat, 01/21/2012 - 15:18 नवीन
हम्म्म्म........ बन्याबापु मुलगी सुन्दर आहे म्हणता ! मग इथे धागे काढुन वेळ का दवडता आहात ? ;) तुमच्यासारखे इतर होतकरु तरुण पण असतील ना लाइनमध्ये ;) इथे धागा काढुन प्रती. तुन मदत्/सल्ले घेइपर्यन्त तिला दुसर्या कुनी पटवले मग ? ;) " तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत " ;) नुसते हात हलवत बसावे लागेल मग ! अन पुन्हा एखादा धागा काढाल " पोपट झाल्यावर काय करावे म्हनून " ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

बात मे दम हे

स्पा
Sat, 01/21/2012 - 16:07 नवीन
" तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत " Wink नुसते हात हलवत बसावे लागेल मग ! बात मे दम हे -स्पविनाश मुठकर्णी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मेलो...

श्रावण मोडक
Sat, 01/21/2012 - 16:15 नवीन
मुठकर्ण्या मेल्या, तिनं पुढं लिहिलंय की पोपट झाला वगैरे धागे काढाल, असं. मेलो... =)) =)) पोपट असा होतो तर... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

नकळत का होईना एक वैश्विकसत्य

गणपा
Sat, 01/21/2012 - 16:17 नवीन
कळत नकळत का होईना एक वैश्विकसत्य निघालं तोंडुन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हो ना ! तुम्हांला आता हात

बन्याबापू
Sat, 01/21/2012 - 16:51 नवीन
हो ना ! तुम्हांला आता हात हलवत बसावे लागत नाहीये ना म्हणुन ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

-स्पविनाश मुठकर्णी खुर्चीतून

सुहास झेले
Sun, 01/22/2012 - 22:04 नवीन
-स्पविनाश मुठकर्णी
खुर्चीतून पडलो की लेका एकदम..... वॉर्निंग वगैरे देत जा आधी ;) :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

नुसते हात हलवत बसावे लागेल मग

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/24/2012 - 23:56 नवीन
@नुसते हात हलवत बसावे लागेल मग ! @-स्पविनाश मुठकर्णी Image removed. थांबा..पहा..व(मग) पुढे जा..!Image removed.या धाग्यावरची सगळ्यात निसरडी जागा हाय ही..! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

" तब क्या करोगे बन्नी ,जब

गणेशा
Mon, 01/23/2012 - 19:43 नवीन
" तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत " नुसते हात हलवत बसावे लागेल मग !
बरोबर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मिपा चा अवस्था करुण झालीये

मालोजीराव
Mon, 01/23/2012 - 19:45 नवीन
खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!!
अहो त्यांची अवस्था करुण नाहीये तर मिपा चा अवस्था करुण झालीये...असे धागे आल्याने ;) - मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तिला जाऊन सरळ सांगा - तु मला

यकु
Fri, 01/20/2012 - 22:14 नवीन
तिला जाऊन सरळ सांगा (अर्थात दोन चार कदम लांब उभा राहून ;-) ) - तु मला आवडतेस म्हणून.. सिंपल. (अनुभवी) यशवंत
  • Log in or register to post comments

काय फायदा ?

छोटा डॉन
Fri, 01/20/2012 - 22:21 नवीन
अहो यकुशेठ, नुसते असे सांगुन काय फायदा ? त्या मुलीला ते 'पटायला' नको का ? तिला हे पटलेच नाही तर ती अशी कशी पटेल ? ;) बाकी ह्या मार्गाने जर पटकन पटणे शक्य झाले असते तर .... असो ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

डाणराव, पटते हो.. फक्त थोडेसे

यकु
Fri, 01/20/2012 - 22:27 नवीन
डाणराव, पटते हो.. फक्त थोडेसे होमवर्क आणि स्वतः जाऊन सांगण्याची तयारी पाहिजे. बन्याबापू आगे बढो, हम तुम्हारे साथ हय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

उगी, उगी

श्रावण मोडक
Fri, 01/20/2012 - 23:06 नवीन
असे सांगुन काय फायदा ? त्या मुलीला ते 'पटायला' नको का ? तिला हे पटलेच नाही तर ती अशी कशी पटेल ? Wink बाकी ह्या मार्गाने जर पटकन पटणे शक्य झाले असते तर .... असो
खंत समजू शकतो. उगी, उगी. गार्ड घ्यायचा पुन्हा. सुधारणा करायची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हम्म्म्...

छोटा डॉन
Fri, 01/20/2012 - 23:13 नवीन
>>खंत समजू शकतो. उगी, उगी. गार्ड घ्यायचा पुन्हा. सुधारणा करायची. :) धन्यवाद. तुमच्या प्रदिर्घ अनुभवासमोर पुढे काही बोलण्याची आमची टाप आहे का ? असो, तुम्ही म्हणता तोच उपाय योग्य असेल, पुन्हा गार्ड घेऊन उभे रहावे लागेल. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

असो, तुम्ही म्हणता तोच उपाय

अन्या दातार
Fri, 01/20/2012 - 23:16 नवीन
असो, तुम्ही म्हणता तोच उपाय योग्य असेल, पुन्हा गार्ड घेऊन उभे रहावे लागेल.
ते ठिक आहे, पण 'होम'गार्ड घेऊ नका हं डाण्राव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

समजा पटलीच तर मी प्रपोज कसे

पक पक पक
Fri, 01/20/2012 - 22:13 नवीन
समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? चाय्ला पात्रच आहे.......
  • Log in or register to post comments

'शाळा' बघून या.

प्रचेतस
Fri, 01/20/2012 - 22:17 नवीन
'शाळा' बघून या.
  • Log in or register to post comments

वल्लि शेठ , ते शाळा बघणारं

पक पक पक
Fri, 01/20/2012 - 22:21 नवीन
वल्लि शेठ , ते शाळा बघणारं नाही , शाळा करणार ब्येण हाये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

"ए केवडा, आपल्याला लाईन देते काय?!"

मेघवेडा
Fri, 01/20/2012 - 22:36 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी 'हॉस्टेल' बघुन आलो

बन्याबापू
Sat, 01/21/2012 - 16:36 नवीन
मी 'हॉस्टेल' बघुन आलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मग घाबरला असाल.

प्रचेतस
Sat, 01/21/2012 - 16:37 नवीन
मग घाबरला असाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

पट्ल्यावर काय प्रपोज करणार

पक पक पक
Fri, 01/20/2012 - 22:18 नवीन
पट्ल्यावर काय प्रपोज करणार तु...????????
  • Log in or register to post comments

अहो पक पक पक, एकदा पोरगी

५० फक्त
Sat, 01/21/2012 - 07:44 नवीन
अहो पक पक पक, एकदा पोरगी पट्ल्यावर प्रपोज करण्यासारख्या ब-याच गोष्टी असतात की, पोरगी पटली म्हणजे संपलं नाही सगळं, तिथुन तर सुरु होतं, कधी करायचं, किती वेळा. कुठं करायचं, कसं करायचं, डिटेलमध्ये की फोटोपुरतं, करताना फक्त फोटो काढायचे की व्हिडो शुटिंग पण करायचं, केलेलं दोघातच ठेवायचं की फेसबुकला अपडेटायचं, करण्याचा आनंद दोघांनीच घ्यायचा की समविचारी अन पाठिंबा देणारे मित्र मैत्रिणी यांना बरोबर घ्यायचं , का घरचे सुद्धा चालतील करताना, कुणी कपडे काय घालायचे काय नाहीत , कायदेशीर की बेकायदेशीर, हॉल मध्ये का हॉटेल मध्ये, आपल्या गावात का परगावी, - आणि एकदा इथुन सल्ला मिळुन पोरगी पटली तर मग बन्याबापु काढतीलच की ह्या साठी पण धागे तेंव्हा पुन्हा सल्ले देण्यासाठी तयारी करुन ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

_/\__/\__/\_ आमुचा दंडवत

प्रचेतस
Sat, 01/21/2012 - 08:28 नवीन
_/\__/\__/\_ आमुचा दंडवत घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आँ??

अन्नू
Sat, 01/21/2012 - 08:47 नवीन
पोरगी पटली म्हणजे संपलं नाही सगळं, तिथुन तर सुरु होतं, कधी करायचं, किती वेळा. कुठं करायचं, कसं करायचं, डिटेलमध्ये की फोटोपुरतं, करताना फक्त फोटो काढायचे की व्हिडो शुटिंग पण करायचं, केलेलं दोघातच ठेवायचं की फेसबुकला अपडेटायचं, करण्याचा आनंद दोघांनीच घ्यायचा की समविचारी अन पाठिंबा देणारे मित्र मैत्रिणी यांना बरोबर घ्यायचं , का घरचे सुद्धा चालतील करताना
आँ...???!!!! हे काय आता? आक्रीतच म्हण्णाय्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कॉलिंग प्रभू मास्तर!!

चतुरंग
Fri, 01/20/2012 - 22:18 नवीन
मास्तर एकदा समुपदेशन घ्याच हो बन्याबापूंचे, फारच बेसिक प्रश्न पडलाय त्यांना!! :) (पटवेकरी) रंगा
  • Log in or register to post comments

अरे त्या गविकाकांना कुणीतरी

यकु
Fri, 01/20/2012 - 22:38 नवीन
अरे त्या गविकाकांना कुणीतरी अगोदर बोलवा आधी!
  • Log in or register to post comments

भंकस

प्रास
Fri, 01/20/2012 - 22:42 नवीन
आणि भंपक धागा
सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?
शीर्षक वाचूनच डोकं औट झालं.
  • Log in or register to post comments

य्..वा धागा,स्साला वेळ जात

पक पक पक
Fri, 01/20/2012 - 22:43 नवीन
य्..वा धागा,स्साला वेळ जात नाय काय. पोरीच्या बापाला भेट तो सांगेल काय ते...
  • Log in or register to post comments

य्..वा धागा,स्साला वेळ जात

बन्याबापू
Fri, 01/20/2012 - 23:06 नवीन
य्..वा धागा,स्साला वेळ जात नाय काय. पोरीच्या बापाला भेट तो सांगेल काय ते...
चांगलेच नाव आहे आपले 'पक पक पक' माझापेक्षा तुमचाच वेळ जात नाहीये असे मला नेहमी वाटत असते..कारण बघेल तेव्हा दुसऱ्यांच्या धाग्यावर जाऊन नावाप्रमाणेच 'पक पक पक' करत असता. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

.कारण बघेल तेव्हा

मृगनयनी
Fri, 01/20/2012 - 23:19 नवीन
.कारण बघेल तेव्हा दुसऱ्यांच्या धाग्यावर जाऊन नावाप्रमाणेच 'पक पक पक' करत असता. ह्म्म... काय हो "पक पक पक" जी... आता मात्र हद्द झाली हं... ;) बघावं.. तेव्हा तुम्ही "दुसर्‍यांच्या" धाग्यावर असता बॉ!!!!! त्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच धाग्यावर तुम्ही लोकान्ना प्रश्न विचारून स्वतःच त्याची उत्तरे का ओ नाही देत? श्शी बाब्बा... दुसर्‍यांच्या धाग्यावर का म्हणून सारखं डोकवायचं ते.... !! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आणि पोरीच्या बापाला भेटायची हिम्मत असती, तर इथे कशाला धागा टाकला असता हो!!... ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

ह्म्म... काय हो "पक पक पक"

पक पक पक
Sat, 01/21/2012 - 16:01 नवीन
ह्म्म... काय हो "पक पक पक" जी... आता मात्र हद्द झाली हं... हॅ हॅ हॅ चला नं मग ओलांडून टाकु.... हॅ बघावं.. तेव्हा तुम्ही "दुसर्‍यांच्या" धाग्यावर असता बॉ!!!!! मला सवय आहे दुसर्‍याचं वाकुन पहायची ,तुम्हि कधी काढ्ताय..? धागा!! श्शी बाब्बा... त्याला काय होतय..? करु दे की थोडं..आवांतर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आता तुझी कशी ही फालतु सवय

पक पक पक
Sat, 01/21/2012 - 16:24 नवीन
आता तुझी कशी ही फालतु सवय आहे की नाही..? काही तरी भंपक प्रश्न तयार कराय्चा आणि त्यासाठी सल्ले मागत बसायच.अगदी तशीच माझी पण सवय आहे ,प्रश्नाच्या लायकीचाच सल्ला देण्याची . कळल का बन्या तुला.....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

आता तुझी कशी ही फालतु सवय

पक पक पक
Sat, 01/21/2012 - 16:25 नवीन
आता तुझी कशी ही फालतु सवय आहे की नाही..? काही तरी भंपक प्रश्न तयार कराय्चा आणि त्यासाठी सल्ले मागत बसायच.अगदी तशीच माझी पण सवय आहे ,प्रश्नाच्या लायकीचाच सल्ला देण्याची . कळल का बन्या तुला.....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

' पक पक पक ' sssssssssssssss

बन्याबापू
Sat, 01/21/2012 - 16:46 नवीन
' पक पक पक ' sssssssssssssss पकाउ sssssss :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

तुमचा

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/20/2012 - 23:22 नवीन
तुमचा ओरीगिनल आयडी कंचा हो? ;)
  • Log in or register to post comments

मला ओरिगिनल आयडी इंस्ने

सूड
Sat, 01/21/2012 - 11:38 नवीन
मला ओरिगिनल आयडी इंस्ने वाटतोय. बाकीचे काय म्हणतात बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा