मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी:

दंभकुठार's picture
दंभकुठार in जनातलं, मनातलं
8 Jun 2008 - 9:42 am

सकाळची वेळ होती.कुणीतरी दाराखालच्या फटीतून एक पाम्फलेट सरकवले..पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी , मी सदर पाम्फलेट लगोलग वाचून संपविले..सदर पाम्फलेटात काही महत्वाची माहिती अहे असे जाणून समग्र मिपास्थांच्या सेवेशी चिकटवीत आहे ..

आपला ( बहुत जनांसि अप्रियू ,)
दंभकुठार

***********************************

मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी:

मधुमेहापासून आपले रक्षण करण्याची सदिच्छा बाळगणारया वाचक / कवींनी खालील कवींच्या कवितांपासून सावध रहावे..तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या वाचन / श्रवणाने रक्तातील साखरेची पातळी धोकादायक स्तर गाठू शकेल अशी शक्यता आमच्या सायंटिस्टांनी वर्तविली आहे :
१.पंगेश व्याडगावकर
२.अधीर रोघे
३. नशोक वायगावकर
४.तलेश काटील
५.भौमित्र
६.समीप झरे

..तसेच तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांपासून आपले रक्षण करण्याची सदिच्छा बाळगणारया वाचक /( होतकरू ) कवींनी खालील कवींच्या कवितांपासून सावध रहावे. :

१.फिलीप दित्रे
२.अतीश बाळ्सेकर
३.केमंत पिवटे
४.वलील घाग
५.कचिन लेक्चर
६.गर्जेश तोलंकी

( अर्थातच अवार्डेच्छू कवींनी सदर टोळक्यात मिंगलण्यास मंडळाची हरकत नाही !! )

ह्या यादीत समावेशेबल नावांचे ( वाचकांतर्फे )स्वागत आहे !!

मंडळाचे आगामी उपक्रम :
१.गेल्या दीडशे वर्षातील वाईट कविता संग्रह
२.साहित्य लांच्छन पुरस्कार ..
३.ओळखा पाहू !!

***उपक्रमांची डिटेलावळ लवकरच उपलब्ध करण्यात येईल .***

म.सू : ही एक स्वायत्त संस्था असून , सदर संस्थेस कुठल्याही फाऊंडेशनाचे / साहित्यिक गटाचे / सरकारी संस्थेचे अनुदान ( अद्याप तरी )मिळालेले नाही !! शिवाय हा आगाऊ सल्ला आहे ,पट्ला तर पटला !!
तूर्तास इतके पुरे !!

********

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

रामदास's picture

8 Jun 2008 - 10:17 am | रामदास

नाही समजले मला काही. थोडं सोपं करून सांगा.

मुक्तसुनीत's picture

8 Jun 2008 - 10:48 am | मुक्तसुनीत

समजले मलाही विशेष नाही पण काही " एन्-क्रिप्टेड" मजकूर समजला तेव्हढा सांगतो :

१.पंगेश व्याडगावकर = मंगेश पाडगावकर
२.अधीर रोघे = सुधीर मोघे
३. नशोक वायगावकर = अशोक नायगावकर
४.तलेश काटील = नलेश पाटील
५.भौमित्र = सौमित्र
६.समीप झरे = संदीप खरे

१.फिलीप दित्रे = दिलीप पुरुषोत्तम चित्रे
२.अतीश बाळ्सेकर = सतीश काळसेकर
३.केमंत पिवटे = हेमंत दिवटे
४.वलील घाग = सलील वाघ
५.कचिन लेक्चर = सचिन केतकर
६.गर्जेश तोलंकी = वर्जेश सोलंकी

बाकीच्या तिमिराचे कुठार साहेबानी येऊन हरण करावे :-)

विसुनाना's picture

9 Jun 2008 - 11:11 am | विसुनाना

पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी -
पहाट'सुलभ'? लगबगीपोटी की पोटी -(पक्षी 'पॉटी')- लगबगीमुळे?

तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या
-स्वदुपाकी हा शब्द नवीन आहे. अर्थ कळावा.

तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांपासून
-पहाटसुलभ लगबगीपोटी टॉवेल न गुंडाळताच मी स्वर्गाचे दार उघडले आणि मोक्ष मिळाला असे काहीसे वाटत असतानाच बंद केलेल्या दारावर टकटक करणारा सुतार पक्षी आपल्या पंखांवर कुणाचा तरी उबदार हात फिरेल या अपेक्षेने आपली शेपटी फुलारून एक मनी मांजरी त्याच्यावर झेपावत आहे हे पहाणारा भित्तीचित्रातला काळाशार आदिवासी अस्फुटसा हसत हातातला विळा कमरेला खोचून हातोडा आणि तारा यांच्यामध्ये भांडण लावून मोकळा होईल किंवा कसे या विचाराने माझ्या पोटात गोळा उठू नये म्हणून मी चारमिनारचा एक कश मारला. त्यासरशी ....

असे मला होते आहे.
'कधीपासून?' - दिगंत कालापासून अनाहत नादाप्रमाणे टाळक्यात घणाघणा घण घालत राहणारा हा प्रश्न डोक्यातून उपटून टाकण्यासाठी काय करावे? असाही एक उपप्रश्न मेंदूनामक घंटेचे आता ताशात रूपांतर झाल्याने राखाडी रंगाच्या कातडीवर तडतडत आहे.

अवार्डेच्छू कवींनी सदर टोळक्यात मिंगलण्यास
-इची भनं! (गमंभनं नव्हे! ;))
जाव दे झाडून....

लेखकाचे वक्रोक्तीवरचे प्रभुत्व पाहता यापुढील लेखात यापेक्षाही जास्त अस्वली गुदगुल्या व्हाव्यात ही अपेक्षा आहे.

दंभकुठार's picture

11 Jun 2008 - 10:26 am | दंभकुठार

मला स्वादुपाक म्हणावयाचे होते..!!

दंभकुठार's picture

11 Jun 2008 - 10:40 am | दंभकुठार

पहिल्या दोन रिस्पॉन्सदात्यांप्रमाणेच , मलाही या कवींच्या ( विशेषतः पहिल्या यादीतील ) लोकप्रियतेचे गूढ अद्याप उमगलेले नाही !!!