✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोंबडी म्हणाली कोंबड्याला

व — विदेश, Fri, 12/30/2011 - 19:07
'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-' कोंबडी म्हणाली कोंबड्याला, 'ऐकावी लागणार दिवसभर नंतर पक् पक् माझी तुला !' मांजर निघाले घाईघाईत शिकार उंदराची करायला - आडवा आला माणूस नेमका परतावे लागले मांजराला ! मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप निघाला तुरुतुरु खायला - मधेच एक माशी शिंकली माणसाच्या पायाखाली आला ! एक खेकडा सकाळी उठला पूर्वेकडून पश्चिमेला निघाला - संध्याकाळ होईपर्यंत उत्तरेला नेमका पोहोचला !

प्रतिक्रिया द्या
1358 वाचन

💬 प्रतिसाद (4)

हा हा हा मस्त चारोळ्या आहेत

पाषाणभेद
Sat, 12/31/2011 - 00:27 नवीन
हा हा हा मस्त चारोळ्या आहेत
  • Log in or register to post comments

लय भारि मस्त

निश
Sat, 12/31/2011 - 12:47 नवीन
लय भारी मस्त चारोळ्या आहेत
  • Log in or register to post comments

छान!

वैशाली माने
Sat, 12/31/2011 - 13:28 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

वा विदेसराव वा..! अत्यंत

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/31/2011 - 15:05 नवीन
वा विदेसराव वा..! अत्यंत मजेशीर आहेत... विशेषत: मुंगळ्याची -वाचताना तर अगदी टॉम&जेरी प्रमाणे प्रसंग उभा राहतोय डोळ्यासमोर... झकास..झकास...!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा