चटका.....एक विरह कविता.....
तुझी साथ असल्यावर
मरणातसुध्दा जगल्यासारखं वाटतं !
माझ्या तुझ्यावरील प्रेमाच्या उंचीपुढे
मला आभाळही ठेंगणं वाटतं !
प्रेम डोळ्यांतून डोकावतं
आणि स्पर्शामधे रेंगाळतं !
नि:शब्द भावांचा हा अनुभव,
जणू आपलंच बोलणं गेंगणं वाटतं !
कधीतरी बरस ना सखे माझ्यासाठी,
वळवाच्या पावसासारखी !
मला सम्पूर्ण वाचून पण तू थंडच !
जसं "पाण्याने" आगीला "डागणं" वाटतं !
------------------------------------------------------------------------------------
आपण मला इथेही भेटू शकता :
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
आणि
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/