✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माळरान अन् ते दोघे!! -- ८

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 10/18/2011 - 10:40
माळरान अन् ते दोघे!! -- ७ अकस्मात सोसाट्याचा वारा सुटला ढग अन त्यांच्यासहित अवघे आभाळ मागे मागे सरकावयास लागले . त्या वृद्ध लावण्याला आता दिसतेय एक १७ वर्षांचे अल्लड नवयौवन.... नाजूक अन् अवखळ असेच एक दिवस, अनवधानाने या माळरानावर पोहचलेले . पण तिथे हे हिरवे झाड, ते दिसत नाही अन वठलेले झाड हा तर गुलमोहर, खूपच बहरलेला आहे जवळपास सगळ्याच फांद्यांवर हिरवा दाटला आहे . त्या झाडाखाली एक कवी, काहीतरी खरडणारा सगळे वेडा म्हणत त्याला खूप सारी कागदे विखुरली होती त्याच्या अवतीभोवती, पण, तो मात्र तिथे असूनही, तिथे नसल्यासारखा शून्यात नजर लावलेला आभाळाची पिसे मोजणारा . तिला खोडी सुचली तिने त्याच्या हातातला कागद हळूच ओढून, धूम ठोकली, घराकडे धपापत्या उराने, घरी पोहोचल्यावर हळूच तो कागद पहिला मात्र तिचा विश्वास बसत नव्हता कागदावर अगदी तळाशी एकच ओळ होती . . "अखेर तू आलीस तर..........." (क्रमशः) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१८/१०/२०११)

Book traversal links for माळरान अन् ते दोघे!! -- ८

  • ‹ माळरान अन् ते दोघे!! -- ७
  • Up
  • माळरान अन् ते दोघे!! -- ९ ›

प्रतिक्रिया द्या
1860 वाचन

💬 प्रतिसाद (4)

क्या बात है.. क्या बात.. मिका

गवि
Tue, 10/18/2011 - 12:36 नवीन
क्या बात है.. क्या बात.. मिका जबरदस्त रे...
  • Log in or register to post comments

मस्त

जाई.
Tue, 10/18/2011 - 12:55 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

भन्नाट. छानच....!!

प्रकाश१११
Wed, 10/19/2011 - 03:43 नवीन
भन्नाट. छानच....!!
  • Log in or register to post comments

यार तु फोडलंस तोडलंस.....

वपाडाव
Wed, 10/19/2011 - 11:46 नवीन
यार तु फोडलंस तोडलंस.....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा