दोन प्रश्न - शरद पवार आणि बालाजी तांबे.

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in काथ्याकूट
31 Aug 2011 - 6:50 pm
गाभा: 

दोन प्रश्न -

१) शरद पवार हे कधी चेंडू-फळी हा खेळ खेळले आहेत काय? आमच्या माहितीप्रमाणे ते अधिकृतपणे (रणजी, एक दिवसीय, २०-२० वगैरे सारखे सामने) कुठल्याही सामन्यात खेळलेले नाहीत. मग त्यांच्याकडे बी सी सी आय च्या अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद कसे आले? आपल्यापैकी कुणाला या संदर्भात काही टिप्पणी करायची असल्यास स्वागत आहे.

२) बालाजी तांबे यांच्याकडे नक्की कुठली वैद्यकीय पदवी (अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, युनानी वगैरे) आहे? आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही अधिकृत पदवी त्यांच्याकडे नाही. इथे या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया खुलासा करावा.

कॉमॅ.

प्रतिक्रिया

विकास's picture

31 Aug 2011 - 7:08 pm | विकास

दोन्हीचे उत्तर नाही असे आहे.

त्यांच्याकडे बी सी सी आय च्या अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद कसे आले ?

बी.सी.सी.आय. अध्यक्ष निवडनुकीसाठी, उमेदवाराने खेळाडुच असावे असा नियम नसल्याने, ती निवडनुक लढवुन शरद पवार हे बी.सी.सी.आय. चे अध्यक्ष झाले...

विकास's picture

31 Aug 2011 - 7:24 pm | विकास

मराठीत एक म्हण आहे, "ज्याच्या हातात ससा, तो पारधी" :-)

विकास अजून एक सांगतो.
"जिसकी लाठी उसकी भैस"

शिल्पा ब's picture

1 Sep 2011 - 12:02 pm | शिल्पा ब

जिसका घोडा उसकी पेटी

बालाजी तांबे यांच्याबद्दल चांगलेच ऐकले आहे. कित्येक डॉक्टर सरकारमान्य पदवी घेऊनही पेंशटला स्वत:च्या सदनास न पोहोचवता यमसदनास धाडतात याची अनेक उदाहरणे असतील. यांचे तसे नाही.
बाकी पवारांबद्दल काय बोलावे? सगळ्यांना माहितच आहे की!

नरेश_'s picture

2 Sep 2011 - 3:49 pm | नरेश_

बालाजी तांबे यांच्याबद्दल चांगलेच ऐकले आहे. कित्येक डॉक्टर सरकारमान्य पदवी घेऊनही पेंशटला स्वत:च्या सदनास न पोहोचवता यमसदनास धाडतात याची अनेक उदाहरणे असतील
'मनीष तिवारी' छापाचे विधान.

बालाजी तांबे यांच्याबद्दल चांगलेच ऐकले आहे. कित्येक डॉक्टर सरकारमान्य पदवी घेऊनही पेंशटला स्वत:च्या सदनास न पोहोचवता यमसदनास धाडतात याची अनेक उदाहरणे असतील. यांचे तसे नाही.
अगदी सहमत... माझेही श्री.बालाजी तांबे यांच्या बद्धल चांगले मत आहे.
शरदपवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी तांब्या़कडुन उपचार करुन घेतले आहेत.आता ही मंडळी त्यांचा उपचार कोणा येर्‍या गबाळ्या कडुन तर करुन घेणार नाहीत या बद्धल कोणाचे दुमत नसावे. ;)
संदर्भ :--- http://www.loksatta.com/daily/20090803/pnv16.htm

जाता जाता :--- ऑपरेशन झाल्यावर पेशंटच्या पोटात वस्तू राहिल्या होत्या त्या पुन्हा ऑपरेशन करुन बाहेर काढल्या अश्या अनेक बातम्या तुम्ही अत्ता पर्यंत ऐकल्या / वाचल्या आहेत की नाही ? गेला बाजार अमेरिके मधलेच उदाहरण घ्या. तिकडे तर श्रीदेवीच्या आईच्या मेंदुवर शस्त्रक्रिया केली,पण चुकीच्या भागावर ! बिचारी जिवास मुकली.
संदर्भ :--- http://www.nytimes.com/1995/06/25/nyregion/surgery-is-done-on-wrong-side...

आणि अजुन मोठे उदाहरण द्यायचे झाले तर हे वाचा.
अन्यथा.... : उद्याच्या ‘अ‍ॅपल’कारांसाठी..
http://alturl.com/as7pw
अ‍ॅपलचा शिल्पकार काय म्हणतो ते.(पदवीधर नसलेला व्यक्ती अनेक पदवीधरांचा पोशिंदा झाला की नाही ? ;) )

शरदपवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी तांब्या़कडुन उपचार करुन घेतले आहेत.आता ही मंडळी त्यांचा उपचार कोणा येर्‍या गबाळ्या कडुन तर करुन घेणार नाहीत या बद्धल कोणाचे दुमत नसावे.

“वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन…”; शरद पवारांनी जागवल्या बालाजी तांबेंच्या आठवणी
बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी; म्हणाले “बोलवा रे त्या सगळ्यांना!”


बालाजी तांबेंच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकारणी हळहळले; पाहा श्रद्धांजली अर्पण करताना कोण काय म्हणाले?

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन
आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती.

मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre

शुचि's picture

31 Aug 2011 - 7:46 pm | शुचि

बालाजी तांबे यांच्या "दत्तात्रेय" सी डी चा खूपच चांगला अनुभव आहे. संगीतातील जाण त्यांना खूप खोलवर आहे हे निश्चित
त्यांचे वैद्यकीय ज्ञान माहीत नाही. पण असे ऐकून आहे की हृदरोगाच्या रोग्यांना तूप खायला सांगणारे हे एकमेव वैद्य आहेत.

ह्रदय रोगाच्या रुग्णाना तुप खायला साग्णे यात विशेश असे काहि नाहिये !! साजुक तुपाने चरबि वाढ्त नाहि.

बालाजी तांबे यांच्याबद्दल मला जास्त काही माहित नाही ...

परंतु माझ्या गावातील (ऊरुळी कांचन येथील जगातील असे हे पहिले आश्रम आहे, स्थापक गांधीजी अनुयायी, विनोबा भावे) निसर्गोपचार आश्रमासारखेच त्यांनी पण संस्था चालु केल्या आहेत, इतकेच माहिती आहे.

नाव ऐकल्याने ते उत्कृष्ट मॅनेजमेंट करणारे असतील असे वाटतेच आहे. फक्त बाहेरील देशातील नागरीक आमच्या गावात येण्याचे त्यामुळॅ कमी झाले आहे..

मराठी_माणूस's picture

31 Aug 2011 - 8:39 pm | मराठी_माणूस

बालाजी तांबे यांच्या कडे उपचार घेतलेले आणि बरे झालेले आणि उपचारा बाबत समाधानी असलेले असंख्य जण भेटलेले आहेत. त्यांच्या पदवी बाबत माहीती नाही.
(अवांतरःलतादीदीं कडे सुध्दा संगीताची कुठली पदवी आहे हे माहीत नाही.:))

पहील्या व्यक्तीमत्वा बाबत मात्र असंख्य असमाधानी लोक भेटले आहेत.

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 9:07 pm | धमाल मुलगा

संपुर्ण प्रतिसादाशी सहमत.

विकास's picture

31 Aug 2011 - 9:09 pm | विकास

तसे देखील तांब्यांनी आपले भांडे लपवलेले नाही! ;)

अधिक एक.
त्या व्यक्तीकडे असलेली विषयाची सखोल जाण ही महत्वाची आहेच.
माझ्याकडे एक घरच्याघरी उपचाराचे पुस्तक आहे. त्याचे लेखक हे इंजिनियर आहेत.
मला तरी त्यांच्या उपायांचा फायदा झालेला दिसून आलेला आहे.
शिवाय तांबे यांचे उपाय समाजाच्या सर्व थरातील रुग्णांना परवडतील असे ठेवण्याकडे कल असावा असे वाटते.
काही वनस्पती/धातू महाग झालेत त्याला काय करणार?
तरीही हे लोकोपयोगी कार्य आहे. पवारांचे क्रिकेटोपयोगी आहे असे म्हणावयास वाव आहे काय?
ऐकीव माहितीनुसार रिलायन्सही (डॉ. नसून) आयुर्वेदिक औषधनिर्मीतीमध्ये उतरतायत (कि उतरले?).
त्यांचे कार्य कितपत लोकोपयोगी असेल?

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 12:16 am | बिपिन कार्यकर्ते

पवारांबद्दल मी काही बोलावे अशी माझी लायकीच नाही. ;)

पण तुमच्या "(अवांतरःलतादीदीं कडे सुध्दा संगीताची कुठली पदवी आहे हे माहीत नाही.)" या वाक्याबद्दल प्रच्चंड असहमती आहे. गाण्यातली कोणतीही पदवी वगैरे नसतानाही गायल्यामुळे गायकाच्या अथवा श्रोत्यांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता नाही असे वाटते. वैद्यकिय पेशाबद्दल मात्र तसे नसावे असा आमचा आपला एक अंदाज हो. कोणतीही पदवी नसताना जर का असे औषधे देण्याचे दुकान मांडले असेल तर आत्ता पर्यंत हा माणूस तुरूंगात जायला पाहिजे होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 9:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सचिनकडेही कुठे क्रिकेटची पदवी आहे?

काही विशिष्ट कीवर्ड्स देऊन गूगलला प्रश्न विचारला तर हे पहा काय मिळालं:
"...ओ सजना बरखा बहार आयी' हे "परख' चित्रपटातील गीत रानडे यांनी गायले. त्यावर भाष्य करताना डॉ. श्री. तांबे म्हणाले, ""या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्‍वराच्या मीलनाची आहे. मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.''

दुर्दैवाने त्या ब्लॉगात दिलेली बातमीची लिंक मोडलेली आहे. मिपाकर लिखाळ (हा एक कुठे गायब झालाय कोण जाणे!) याने एका प्रतिसादातच ही काडी टाकली होती; नंतर भडकमकर मास्तरांच्या सहीतच हे वाक्य आलं:
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

जातायेता: अलिकडच्या काळात काही राष्ट्रवादी निष्ठावंतांची मतं ऐकली. पवारसाहेबांमुळे बरीच बरकत आल्याचं सांगत होते.

या प्स्यूडो आयुर्वेदिक्वाल्यांचे हेच चुकते. "बरखा बहार आई" ऐकून काय होणार? (एखादेवेळी जेवताना बरखा खाल्ली असेल तर येईलही बाहेर,पण रोजच कसे चालेल हे प्रिस्क्रीप्शन?
खरोखर उपाय करायचा असेल तर 'आजा आजा मै हुं प्यार तेरा' गाणं ऐका किंवा म्हणा विधीपूर्वक (म्हणजे मोठ्या विधीपूर्वी)
शेवटच्या 'ओहो आजा ओह हा...'' पर्यंत नक्की सुटका होईल असं आमचं अ‍ॅलोपथी सांगतं.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2011 - 12:01 am | बिपिन कार्यकर्ते

=))

श्रावण मोडक's picture

2 Sep 2011 - 3:46 pm | श्रावण मोडक

साती, यू टू? ;)

इरसाल's picture

2 Sep 2011 - 4:54 pm | इरसाल

एका चाळीत सकाळी सकाळी........
टमरेल धरून सार्वजनिक.......च्या बाहेर भली मोठी रांग.
आतला बहुदा गायक किंवा तत्सम.....अर्धा अधिक कार्यभाग उरकून झालाय.....बाहेरून टकटक.
आतला: आधा है चंद्रमा रात आधी रह ना जाये तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी. आधा है चंद्रमा आआआआआआआआअ .
बाहेरचा( मागची लाईन पाहून) : लगी प्यासो कि भीड बारात आधी .
आतला : आधा है चंद्रमा आआआआआआआआआ

राजेश घासकडवी's picture

4 Sep 2011 - 8:20 am | राजेश घासकडवी

मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.

काहीतरी गडबड आहे या वाक्यात. 'दूर करणे' हे नक्की कुठच्या अर्थाने वापरलं आहे? आळस नाहीसा करणे ठीक आहे, पण मलविसर्जनच नाहीसं करायचं म्हणजे कठीण आहे. या उलट 'लांब जाऊन करणे' म्हटलं तर ते आळसाला नीट लागू होत नाही.

मराठी_माणूस's picture

4 Sep 2011 - 10:19 pm | मराठी_माणूस

पदवी असलेल्या आणि स्वत:चे रुग्णालाय (दुकान ?) असलेल्यांकडे स्वत:च्या पायाने चालत गेलेले रुग्ण शववाहीकेतुन ( अर्थातच पुर्ण बिल दिल्यावरच) घरी आणावे लागलेली असंख्य (अक्षरशः असंख्य) उदाहरणे आहेत. तेंव्हा अशा पदवीला कागदच्या कस्पटा एव्हढीच किंमत.

कोणतीही पदवी नसताना जर का असे औषधे देण्याचे दुकान मांडले असेल तर आत्ता पर्यंत हा माणूस तुरूंगात जायला पाहिजे होता.

मग असे आज पर्यंत का झाले नाही , कोणालाही वाईट अनुभव नाही का ?
डॉक्टराना(पदवी असलेल्या ) मारहाण करणे, रुग्णालयाची तोडफोड करणे अशी कैक उदाहरणे आहेत. मग इथे असे का घडले नाही ?

पवार, बालाजी तांबे

तांब्यांनी पवारांना काय खायला सांगितले ?

आचारी's picture

31 Aug 2011 - 9:57 pm | आचारी

पैसे

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2011 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

''पैसे'' .............अगागागागागा ह्हाहाहा :bigsmile: बाबो,आचारी कसली घनघोर छकडी लावली तुंम्ही, अबाबाबा फुटलो पार

प्रशु's picture

1 Sep 2011 - 7:56 am | प्रशु

भुखंड... चुकलो चुकलो श्रीखंड खायला सांगितले असेल

कोदरकर's picture

31 Aug 2011 - 11:52 pm | कोदरकर

पैसा तिथे पवार.... बाकी बालाजी ताम्बे आणि पवार यांचे संबंध असतील असे... सकाळ वरुन वाटते...

कुंदन's picture

1 Sep 2011 - 12:06 am | कुंदन

पैसा अति खाल्ल्यावर त्रास झाला की तांबे पवारांना उतारा देत असावेत.

बाळकराम's picture

1 Sep 2011 - 12:56 am | बाळकराम

पवारांबद्दल बोलायचे झाले तर ते सगळ्यांनाच माहित आहे- पण तांबे हा माणूस सकाळने मोठा केलेला आहे. आयुर्वेद आणि क्रिकेट याविषयात कसलेही अधिकृत ज्ञान वा पदवी नसताना हे दोघांनी जी लूडबूड त्या त्या क्षेत्रात चालवली आहे ती नक्कीच संतापजनक आहे. त्या त्या क्षेत्रांचं अपरिमित नुकसानच त्याने होत आहे. विशेषतः तांबे- कसलीही पदवी नसताना, केवळ राजकीय कॉन्टॅक्ट्स आणि मीडिया मॅनेजमेंट ने तांबे आपलं उखळ पांढरं करुन घेतायत- त्याबाबतीत त्यांचं पवारांशी असलेलं साधर्म्य विलक्षण म्हणावे लागेल!

नरेश_'s picture

2 Sep 2011 - 4:07 pm | नरेश_

हे बालाजी तांबे सकाळचे शेअरहोल्डर आहेत.

बाळकराम's picture

2 Sep 2011 - 5:12 pm | बाळकराम

ते आपला शेअर वाढवतायत!

त्यामुळे ते बी सी सी आय चे अध्यक्ष आहेत ..अणि त्या साठी लागणार्या कायदेशीर बाबींची पूर्तता त्यांनी केलि आहे ..
तांबे यांच्या बद्दल सांगाय् चे झाले तर ते पदवी नसताना किंवा मेडीक्ल कौन्सिल ची परवानगी नसताना औषधे देत असतिल तर्तो फौज्दारी गुन्हा आहे

आशु जोग's picture

1 Sep 2011 - 12:47 pm | आशु जोग

>> तरीही हे लोकोपयोगी कार्य आहे. पवारांचे क्रिकेटोपयोगी आहे असे म्हणावयास वाव आहे काय?

पवार आल्यावर २० - २० आणि वन डे असे २ वर्ल्डकप जिंकले

त्या दालमिया पेक्षा हा मराठा गडी भारतीय क्रिकेटसाठी बरा आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Sep 2011 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

छान छान.

बाकी ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर तो विदा कुठल्या उपयोगास आणणार आहात ? आणि मुख्य म्हणजे ह्या प्रशांच्या उत्तरातून तुम्हाला नक्की काय जाणून घ्यायचे आहे ? तुमचा नक्की प्रश्न आणि ह्या दोन व्यक्तिंबद्दल हरकत काय आहे ?

साती's picture

1 Sep 2011 - 11:49 pm | साती

प्रत्येक वेळि विदा उपयोगासच आणला पाहिजे का परा?
कॉमन मॅनला निव्वळ ज्ञानजिज्ञासा असू नये जरा ?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

प्रत्येक वेळि विदा उपयोगासच आणला पाहिजे का परा?

अज्जीबात नाही.
अशा प्रकारच्या चर्चेत 'विदा' हा शब्द कुठल्याही प्रतिक्रियेत आला नाही तर फाऊल धरतात, म्हणून विचारले होते.

कॉमन मॅनला निव्वळ ज्ञानजिज्ञासा असू नये जरा ?

ज्ञानजिज्ञासा असलेल्या माणसाला कॉमन मॅन कसे म्हणता येईल ? ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Sep 2011 - 12:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

पवारसाहेब आपले कृषीमंत्री आहेत, उद्या विचाराल त्यांनी कधी शेती केली आहे कां? :(

समीरसूर's picture

2 Sep 2011 - 1:48 pm | समीरसूर

१. पवारांबद्दल बोलत नाही असा एकही माणूस या महाराष्ट्रात आढळणे दुरापास्त असावे असे वाटते. ३-४ वर्षांपूर्वी लोकं सोसायटीच्या गेटवर किंवा कुठल्या समारंभामध्ये भेटल्यावर गप्पांची गाडी 'कसं काय?', 'काय चाललंय?' पासून 'पुण्यात ट्रॅफिक काय वाढलंय हल्ली' चा हलकासा मुक्का(म) घेत मग 'पुण्यात घर घेणं किती अवघड झालंय' मार्गे 'आम्ही २००४ मध्येच फ्लॅट घेतला; बारा लाखात पडला; आता १२ लाखात आमच्या भागात चार विटादेखील मिळतील की नाही शंका आहे....हीहीहीहीहीहीहीहीहीही....' अशा 'गर्व से कहो हम फ्लॅटमालक हैं' छाप भाषेचा धूर उडवत शेवटी 'बराय मग, भेटू कधीतरी' च्या फायनल स्टेशनला लागत असे. मागील १-२ वर्षांपासून या नेहमीच्या विषयांमध्ये 'शरद पवार' हा एक मुद्दा यायला लागला आहे. 'यू कॅन लव्ह हिम; यू कॅन हेट हिम बट यू कँण्ट इग्नोअर हिम' असा लौकिक लाभणारी फार थोडी माणसे असतात. सलमान खान, संजय दत्त, अण्णा हजारे, राखी सावंत, हिमेश रेशमिय्या, दिग्विजय सिंग अशी मातब्बर मंडळी या कॅटेगरीत असतात. पवारसाहेब त्यातलेच एक! राहता राहिला प्रश्न त्यांच्या क्रिकेटज्ञानाचा, त्यांना राजकारणाशिवाय दुसरा कुठला खेळ खेळायला कधी वेळच मिळाला नसेल यात त्यांचा काय दोष? राजकारणासोबतच सत्तेचे इतर खेळ खेळणार्‍या माणसाला आवड असूनदेखील एखादा मैदानी खेळ खेळण्याची संधी मिळू नये यात त्या माणसाचा दोष नसतो; आपल्या देशातल्या जनतेचा दोष असतो. एखाद्या माणसावर किती म्हणून जबाबदार्‍या टाकाव्या आपल्या निलाजर्‍या जनतेने? एका जनहितासाठी वाहून घेतलेल्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्षपद, एका मतदारसंघाचे खासदार पद, देशाचे कृषिमंत्रीपद, जागतिक क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्षपद, अजून सत्राशे साठ संघटनांचे अध्यक्षपद, कितीतरी समित्यांचे आणि संघटनांचे भारदस्त सदस्यत्व...किती म्हणून राबायचं एकट्या माणसाने? ऊस गोड लागला म्हणून काय जनतेने मुळासकट खावा? ते एक बिचारे भिडस्त स्वभावाचे, बुजणारे, कितीही भार झाला तरी तोंडातून शब्द न काढणारे, अगदी खालमानेने अहोरात्र बारा-बारा (म्हणजे एकूण चोवीस) तास बारामतीच्या अभेद्य बुरुजावरून देशाची, जनतेची सेवा करणारे, हळव्या मनाचे, कुणीही आपल्या साध्या शब्दानेही दुखावला जाऊ नये म्हणून नेहमीच ओठ शिवून आपल्या भावना दाबून ठेवणारे असे चंदनासम थोर असले तरी जनतेने म्हणून त्यांच्या कष्टांचा मान ठेवावा की नाही? जनतेने त्यांच्या भूखंड...सॉरी...अखंड सेवेचा काही मुलाहिजा बाळगावा की नाही? शेवटी जनतेचा काय बलवासा...आपलं भरवसा...ते काम देतच राहतील; म्हणून पवारसाहेबांनीच शेवटी निर्णय घेतला आणि क्रिकेटसेवेला त्यांच्या एकूण कष्टांचा एकपंचमांश भाग वाहून घेतला.

२. तांबे हे साम टीव्ही आणि सकाळचे ब्रँड अँबेसेडर आहेत असं कुणीतरी म्हटल्याचं आठवतंय. साम टीव्ही केव्हाही उघडा, 'गीतायोग वर्जन १९४७' पासून आता 'गीतायोग वर्जन २०११' पर्यंत पल्ला गाठला गेला आहे. मागे तर सकाळ उघडला की जवळ-जवळ रोज तांबेसाहेबांचे प्रसन्न दर्शन घडत असे. कधी कुठला पुरस्कार यांना तर कधी यांच्या हस्ते कुठला पुरस्कार त्यांना असा देवघेवीचा मामला सर्रास दिसत असे. कधी-मधी 'शिंकतांना तोंडाला रुमाल धरावा काय' किंवा 'सकाळी परसाकड होत नसल्यास दुपारी करावी काय' अशा अतिमहत्वाच्या विषयांवर व्हिडीओ-काँन्फरंसींगद्वारे चर्चासत्र आयोजिल्याच्या मोठाल्या जाहिराती दिसत असत. आत्मसंतुलन व्हिलेज जवळ आता २-३ बीएचके व्हिलांची स्कीम ('बिलनशी नागीण' सारखं वाटतं) निघाल्याचं ऐकीवात येतंय. तांबे अर्थातच 'वन ऑफ द प्रमोटर्स' आहेत. बाकी त्यांच्या ज्ञानाविषयी, पदवीविषयी मला फारशी माहिती नाही. परंतु आपलं उत्तम मार्केटिंग कसं करावं यात तांबेसाहेब वाकबगार आहेत हे नक्की. त्यासाठी कसे काँटॅक्ट्स निर्माण करावेत, कसे टिकवावेत, राजकीय वरदहस्त कसा मिळवावा इत्यादी सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित जमलेल्या आहेत. यात काही वावगं आहे असं मला तरी वाटत नाही. शेवटी तो त्यांचा व्यवसाय आहे आणि तो भरभराटीस यावा अशीच त्यांची इच्छा असावी. ती तर सगळ्यांचीच असते. सकाळचे ते एक महत्वाचे शेअरहोल्डर आहेत हे ही सगळ्यांना माहित असेलच. बर्‍याच लोकांना त्यांच्या औषधाचा चांगला अनुभव आल्याचे ऐकले आहे.

बाळकराम's picture

2 Sep 2011 - 5:08 pm | बाळकराम

+१ सुंदर!
रा. रा. तांबे सकाळचे शेअरहोल्डर आहेत हे मला माहित नव्हतं. तरीच!!
बाकी ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स का काय म्हणतात ते, त्याची पुरती आयमाय ***** टाकली आहे भारतात!

सातारकर's picture

2 Sep 2011 - 6:27 pm | सातारकर

राहता राहिला प्रश्न त्यांच्या क्रिकेटज्ञानाचा, त्यांना राजकारणाशिवाय दुसरा कुठला खेळ खेळायला कधी वेळच मिळाला नसेल यात त्यांचा काय दोष?

ते कबड्डीपटू होते. (आणि बहुतेक) यशवंतरावांची आणि त्यांची गाठ पडण्याचही ते एक कारण होत.

बाकी चालूद्या...

आशु जोग's picture

2 Sep 2011 - 6:42 pm | आशु जोग

छान लिहिले आहे, समीरसूर !

इथे असे लेखन पाहिले की बरे वाटते.

लेखन जरा विनोदी आहे, खुसखुशीत आहे, पण खरे आहे

मराठी_माणूस's picture

2 Sep 2011 - 2:39 pm | मराठी_माणूस

सलमान खान, संजय दत्त, अण्णा हजारे, राखी सावंत, हिमेश रेशमिय्या, दिग्विजय सिंग अशी मातब्बर मंडळी या कॅटेगरीत असतात

हा क्विझ मधला "ऑड मॅन आउट" साठीचा प्रश्ण वाटत आहे.

सुनील's picture

4 Sep 2011 - 7:43 am | सुनील

शरद पवार आणि रा. स्व. संघ यांच्यात काय साम्य आहे?

अनेक गोष्टींत त्यांचा हात असल्याचे बोलले जाते परंतु त्यांतील एकाही गोष्टीत त्यांचा पाय अडकल्याचे कोणीही अद्याप सिद्ध करू शकलेले नाही!

दोघेही राष्ट्रवादी आहेत. काही संशय ?

भीमाईचा पिपळ्या.'s picture

5 Sep 2011 - 4:45 pm | भीमाईचा पिपळ्या.

मा. पवारसाहेब हे संवैधानिक पध्दतीने लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले ह्या महाराष्ट्राच्या मातीतले लाडके नेत्रूत्व आहे. दालमियांच्या एकाधिकारशाही आणि मनमानीला घटनात्मक पध्दतीने चारी मुंड्या चित करणारा हा खरा मर्द मराठा आहे. ज्याचा संबंध भारतवर्षात डंका वाजत आहे.

मा. पवारसाहेबांनी बीसीसीआयचा पदभार स्विकारल्यानंतर्ची भारतीय संघाची दैदीप्यमान कारकिर्द भारतीय जनता कधीही विसरणार नाही. अनेक नेत्रदिपक विजय आणि आनंदाचे क्षणांचे दान आपल्या लढवय्या खेळाडूंनी मा. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तमाम देशवासियांना दिले आहेत. याबाबत दुमत नाही.

अत्यंत चतुरस्त्र, अष्टावधानी, रसिक, काव्य-साहित्याची उत्तम जाण, सुसंस्कारीत, कुशल संघटक,म्रुदू, करारी, स्वाभिमानी, जिद्द आणि चिकाटीची परमावधी असलेले मा. पवारसाहेब गुणांची खाण आहेत. त्यांचे गुणवर्णन करण्यास शब्द कमी पडतील. म्हणूनच त्यांना लोकांनी आवडीने "जाणता राजा" ही पदवी बहाल केली आहे. अश्या हिमालयाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या मा. पवारसाहेबांबद्दल अनेकदा एकांगी चर्चा ऐकू येते. किबहुणा आम्ही या ठिकाणी असे नमूद करु इच्छितो कि काही "द्न्याती"च्या व्यक्तिंनी आपल्या वैयक्तिक लाभासाठी सांहेबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, मा. पवारसाहेबांनी हा काव वेळीच ओळखून तो लबाड प्रयत्न वेळीच हाणून पाडला तेव्हापासून ह्या लोकांनी मा. पवारसाहेबांविरुध्द जाणिवपूर्व्क बदनामीची मोहीम चालवलेली आहे. परंतू अशा बध्दकोष्ठी लोकांची आम्ही "विष्ठावंत विचारजंत" अशी जाहीर संभावणा करतो.

जय हिन्द !
जय महाराष्ट्र !!

मराठी_माणूस's picture

5 Sep 2011 - 4:52 pm | मराठी_माणूस

हा प्रतीसाद उपहासात्मक समजावा का ?

अन्या दातार's picture

5 Sep 2011 - 5:28 pm | अन्या दातार

>>मा. पवारसाहेबांनी बीसीसीआयचा पदभार स्विकारल्यानंतर्ची भारतीय संघाची दैदीप्यमान कारकिर्द भारतीय जनता कधीही विसरणार नाही. अनेक नेत्रदिपक विजय आणि आनंदाचे क्षणांचे दान आपल्या लढवय्या खेळाडूंनी मा. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तमाम देशवासियांना दिले आहेत.

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

हसुन हसुन फुटायचा बाकी होतो तो पिपळ्याजी.
पवारसाहेबांनी बॅट घेऊन आंतरराष्ट्रीय सोडा, रणजी क्रिकेट तरी खेळले आहे काय? भारतीय संघाची दैदिप्यमान कारकीर्द घडवणारा कर्णधार तुम्ही बाजूला ठेवता आणि क्रिकेट कधीही न खेळलेल्या माणसामुळे कामगिरी उंचावली असे म्हणणार? क्रिकेट जे खेळतात त्यांच्यावर संघाची कामगिरी अवलंबून असते, क्रिकेट संघटनेचे नेते कोण आहेत यावर काही अवलंबून नसते असे माझे मत आहे.
अर्थात डोके गहाण न टाकता विचार केलात तर काहीतरी उजेड पडेल.

कुंदन's picture

5 Sep 2011 - 6:03 pm | कुंदन

अन्याभौ शी सहमत.
हां पवारसाहेबांनी नवख्या खेळाडूंसाठी नवी मैदाने , सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असत्या तर एक वेळ मानले असते.
पण मग मैदानांच्या भुखंडांचे श्रीखंड त्यांना कसे मिळाले असते ?

"विष्ठावंत विचारजंत"

लोट पोट लोट पोट

दोन निष्णात व्यावसायिकांबद्दलचे प्रश्न व त्याची (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गिर्‍हाईकांनी) दिलेली उत्तरे अशी ही चर्चा रंजक आहे. वाचतो आहे.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

5 Sep 2011 - 5:05 pm | भीमाईचा पिपळ्या.

दोन निष्णात व्यावसायिकांबद्दलचे प्रश्न व त्याची (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गिर्‍हाईकांनी) दिलेली उत्तरे अशी ही चर्चा रंजक आहे. वाचतो आहे.

@रुशिकेश,
मला वैयक्तिक मा. पवारसाहेबांमुळे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष्पणे काहीही फायदा झालेला नाही.

ऋषिकेश's picture

6 Sep 2011 - 9:12 am | ऋषिकेश

मला वैयक्तिक मा. पवारसाहेबांमुळे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष्पणे काहीही फायदा झालेला नाही.

गिर्‍हाईकांना फायदा झाला तर तो व्यावसायिक निष्णात कसा?
बाकी 'वैयक्तिक मा. पवार' आणि 'सार्वजनिक मा. पवार' हे वगळे आहेत हे सांगितल्याबद्दल आभार

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2011 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गिर्‍हाईक हा शब्द आवडला. मराठीत असे अनेक चान-चान शब्द आहेत असं निरीक्षण नोंदवते.
-- तर्‍हेवाईक (अदिती)

सुनील आणि राजेश घासकडवी यांना _/\_

मी_ओंकार's picture

5 Sep 2011 - 5:17 pm | मी_ओंकार

पवारांनी बीसीसीआय चे अध्यक्षपद सोडून काही काळ लोटलेला आहे. ते आता आयसीसी चे अध्यक्ष आहेत. भारताने ५० ओव्हरचा वर्ल्डकप जिंकला तेव्हा ते आयसीसी चे अध्यक्ष होते. अर्थात बीसीसीआय मध्ये त्यांचीच चालत असणार यात शंका नाही. आता मुंबई क्रिकेट असोशियन मध्ये विलासरावांना जिंकून देऊन (आणि वेंगसरकर सारख्या चांगल्या माजी खेळाडूला पाडून) ती पण आपल्या हातात ठेवली आहे.

- ओंकार.

आशु जोग's picture

6 Sep 2011 - 12:33 am | आशु जोग

जिथे योग्य तिथे पवारांना चांगले म्हणायला काय हर्कत आहे

आपण समत पिंपळेरावांशी