✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

ग — गंगाधर मुटे, Tue, 08/23/2011 - 12:09
भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा कशी झाली देशाची गती, कुंठली मती लाचखोरीचे पीक आले भ्रष्ट पुढारी नेते झाले नोकरशाहीची मस्ती चाले भ्रष्टाचार्‍यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥ एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे बॅंकेला गहाण सातबारा अवदसा होती घरादारा मग तो सत्तेमध्ये गेला पाहता मालामाल झाला कसा हा चमत्कार झाला? रं जी जी .... ॥२॥ एक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी मांडीवर उभी फाटलेली चप्पल पायात तुटलेली मग तो नोकरीत गेला घरी पैशाचा पूर आला सांगा कुठून पैसा आला? रं जी जी .... ॥३॥ गरीबाच्या घरी जन्मला, पदवीधर झाला वणवण फिरे गल्लोगल्ली डोनेशन मागे सारे हल्ली संस्थेमध्ये हर्रासीला पंधरा लाख भाव झाला वाली गरीबांस नाही उरला, रं जी जी .... ॥४॥ सत्तेचे सर्व दलाल, करती हलाल लुटीचा सारा बोलबाला सरकारे खाती तिजोरीला स्विस बॅंकेत पैसा गेला अवकळा आली भारताला रसातळाला देश नेला, रं जी जी .... ॥५॥ अरे मायभूच्या लेकरा, भानावर जरा आता तरी ये रे देशासाठी भविष्या उजाळण्यासाठी भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी दोन ठुसे नी एक लाठी अभय मणक्यास आण ताठी, रं जी जी .... ॥६॥ हो जीजीजीजीजी, हो जीजीजीजीजी हो जीरंजीरंजी, जीरंजीरंजी, जीरंजीरंजी जी . बोला भारतमाता की जय! वंदे मातरम्!                                       गंगाधर मुटे ------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
1534 वाचन

💬 प्रतिसाद (4)

वाहव्वा..नेहमी प्रमाणे कडक...

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/23/2011 - 15:28 नवीन
मुटे साहेब...लीखते रहीये...पढाते रहीये...
  • Log in or register to post comments

छान, आवडला

पप्पु अंकल
Tue, 08/23/2011 - 20:37 नवीन
चाल लाउन म्हटला, मस्त्
  • Log in or register to post comments

परागजी, पप्पुजी धन्यवाद. चाल

गंगाधर मुटे
Tue, 08/23/2011 - 22:12 नवीन
परागजी, पप्पुजी धन्यवाद. चाल लाउन म्हटला, मस्त् --- विशेष धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे मुटे जी.

निनाव
Wed, 08/24/2011 - 00:08 नवीन
छान लिहिले आहे मुटे जी. प्रत्येकातली मौलिकता जागलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा