✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राधाराणी जरा सावर

क — क्रान्ति, Mon, 08/22/2011 - 13:30
कालिंदीच्या तीरी वाजते पावरी प्रवाहात बुडे घागर राधाराणी जरा सावर || नंदाचा नंदन सावळा श्रीहरी भलता खट्याळ बाई गोधने डोलवी, गोपिका भुलवी, गोजिरा, वेल्हाळ बाई सूरमोहिनीत जाशील विरून वेळीच मनाला आवर राधाराणी जरा सावर || दहीदूधलोणी भरलेले माठ फोडून करतो चोरी गोपसखे जमवून हा छेडतो, किती याची शिरजोरी तक्रारी कृष्णाच्या किती ग कराव्या, यशोदेला नाही पाझर राधाराणी जरा सावर || कशाला फुकाच्या कागाळ्या, रुसवे? खेळ हा हवासा वाटे जरा होता कान्हा नजरेच्या आड, उरात काहूर दाटे जागता छेडतो, स्वप्नात वेढतो चोहिकडे याचा वावर राधाराणी जरा सावर ||

प्रतिक्रिया द्या
1628 वाचन

💬 प्रतिसाद (4)

अप्रतिम

जाई.
Mon, 08/22/2011 - 13:38 नवीन
जन्माष्टमीच्या मुहुर्तावर उत्तम काव्याची भेट दिलीत
  • Log in or register to post comments

सुंदर!!! सूरमोहिनीत जाशील

शुचि
Mon, 08/22/2011 - 18:41 नवीन
सुंदर!!! सूरमोहिनीत जाशील विरून वेळीच मनाला आवर
  • Log in or register to post comments

''तक्रारी कृष्णाच्या किती ग

५० फक्त
Mon, 08/22/2011 - 23:39 नवीन
''तक्रारी कृष्णाच्या किती ग कराव्या, यशोदेला नाही पाझर'' हे लॉजिक समजलं नाही जरा एक्स्पेल्नवता का ? किती ही तक्रारी केल्यातरी यशोदा प्रेमानं लाडानं कान्हाला नेहमी पाठीशी घालते असं असताना,' यशोदेला नाही पाझर' हे कसं ? या ऐवजी यशोदेला फार पाझर' असं काहि बसतंय का बघा की, अर्थात हे म्हणजे दुधीची भाजी आहे म्हणुन उपाशी राहणा-यानं अण्णा हजारेंच्या उपासाबद्दल बोलण्यासारखं आहे, पण जरा खटकंलं म्हणुन.
  • Log in or register to post comments

जरा होता कान्हा नजरेच्या आड,

मृगनयनी
Tue, 08/23/2011 - 11:39 नवीन
जरा होता कान्हा नजरेच्या आड, उरात काहूर दाटे जागता छेडतो, स्वप्नात वेढतो चोहिकडे याचा वावर खूपच सुन्दर...... :) :) :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा