✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मदत हवी आहे - एनआरआय लोन चे रेसिडेंट लोन मधे Conversion

अ
अंतु बर्वा यांनी
Tue, 08/16/2011 - 09:15  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर मंडळी, मी सध्या भारताबाहेर असुन भारतात घर घेण्यासाठी NRI लोन घ्यायचा विचार करत आहे. परंतु काही गोष्टींवर मला खुप धुंडाळुनही काही माहीती मिळत नसल्याने मिपाकरांना शरण आलो आहे. जर NRI लोन घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव (असाईन्मेंट संपल्यामुळे म्हणा किंवा ईतर काही कारणाने) भारतात जावे लागले, तर लोनचे प्रोसेसिंग कसे होते? म्ह्णजे ideal केस मधे ते रेसिडेंट लोन मध्ये बदलले जायला हवे परंतु समजा मला इथे राहुन महीना ४५००० EMI देणं परवडत आहे, पण भारतात परत गेल्यावर जर माझा भारतातला पगार ही अमाऊंट कवर करु शकत नसेल तर काय होईल? जर मी भारतात असताना लोन घेतलं तर मला माझ्या भारतीय पगारानुसार महीना ३०००० EMI पर्यंतचे लोन मिळाले असते जे आता NRI to Resident बदलल्यामुळे ४५००० होत आहे (मान्य की भारतात Tenure वाढल्याने EMI कमी होईल पण मुळातच भारतातील पगार कमी असल्याने टेण्युअर वाढ्वुन मिळाले तरीही जास्त काही फरक पडणार नाहिये :-)). मी अजुनही माझे बाकीचे खर्च कमी करुन ही अमाऊंट कवर करु शकेन, पण इथे बँकेचा बेसिक eligibility चा नियम (हातात येणार्‍या पगाराच्या ५०-६०%) मोडला जात असल्यामुळे पुढे काय होइल ते समजत नाहिये. आश्चर्याची गोष्ट अशी की कस्ट्मर केअर ला फोन केल्यावर त्यांच्याकडे या situation वर काहीच उत्तर नव्हते. माझी क्वेरी लिहुन घेउन we will get back to you असे सांगण्यात आले आहे. तेव्हा अशा एखाद्या केसला कुणी मिपाकर सामोरे गेले आहेत काय किंवा अशी situation कुणाच्या नजरेसमोर घडली असल्यास कुणी थोडाफार प्रकाश टाकु शकाल का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2125 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

NRE लोन

पप्पुपेजर
Tue, 08/16/2011 - 12:40 नवीन
मी घेतले होते तेंव्हा विचारले होते आता कसे आहे माहित नाही पण माझ्या माहिती प्रमाणे NRE लोन ६ महिन्या नंतर रेसिडेंट मध्ये बदलता येते.(भारतात परतल्यावर). ELGIBILITY criteria वर काही फरक पडत नाही तुम्ही refinance पण करून घेऊ शकता, अधिक माहितीसाठी व्यनी करा.
  • Log in or register to post comments

व्यनी केला आहे...

अंतु बर्वा
Wed, 08/17/2011 - 06:35 नवीन
व्यनी केला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पुपेजर

इतका

कुंदन
Tue, 08/16/2011 - 14:32 नवीन
इतका विचार करु नका , ओन साईटला मजबुत छापा आणि परत आलत की लोन फेडुन टाका. ;-)
  • Log in or register to post comments

परत आलत की लोन फेडुन टाका ३

स्पा
Tue, 08/16/2011 - 15:48 नवीन
परत आलत की लोन फेडुन टाका ३ टक्क्याने का ? :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा