✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

*आह्वानांची ऐशीतैश**

य
युयुत्सु यांनी
गुरुवार, 08/11/2011 - 12:07  ·  लेख
लेख
खरं तर मी कोणतच आह्वान दिलेले नाही. मी आह्वान स्वीकारायची तयारी दाखवली यात माझा काय हेतू होता, हे निसंदिग्ध पुढे यावे यासाठी हा लेख प्रपंच. मी आह्वान स्वीकारत नाही अशी काहींची तक्रार होती. अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्‍याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का? नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल. ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही. असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत. सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22524 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

सप्रेम भेट

स्पा
गुरुवार, 08/11/2011 - 12:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

Get Well Soon.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/11/2011 - 12:15 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ही घ्या well !!

सूड
गुरुवार, 08/11/2011 - 13:26 नवीन
Image removed. ह. घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कॉलिंग गवि..कॉलिंङ गवि,....

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 14:48 नवीन
वेल चा फोटू आलाय, आता गविंनी 'सूनेचा' फोटो देऊन (त्यांच्याच खवमधला. ;) ) मंडळाला उपकृत करावे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

विहिर आहे त्यावर बादली आणि

गणपा
गुरुवार, 08/11/2011 - 15:51 नवीन
विहिर आहे त्यावर बादली आणि दोरीपण दिसतेय म्हणजे पाणी असेलच. गविंची ललनाही येतेच आहे. तेव्हा ही घ्या Image removed. आणि ओता पाणी त्यावर आता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अग्ग्ग्ग्ग्ग्गं!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 15:56 नवीन
एव्हढी मडकी? काय जितेंद्र - श्रीदेवीचा ड्यान्स होणारै काय इथं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हे विसरलात काय ?

इरसाल
गुरुवार, 08/11/2011 - 16:48 नवीन
हे विसरलात काय ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अर्रर्रर्रर्र.....

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 17:02 नवीन
गेट राहिलंच होतं की राव! बरं झालं, भगदाड बुजवून घ्येतलंसा त्ये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

भडावचोत.... काय प्रतिसाद

वपाडाव
गुरुवार, 08/11/2011 - 12:34 नवीन
भडावचोत.... काय प्रतिसाद दिलाय..... ज्याम भारी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धंदेवाईक ज्योतीष्याने

रामदास
गुरुवार, 08/11/2011 - 12:42 नवीन
दडपणाला तोंड द्यायची तयारी ठेवायला हवी. तुम्ही आव्हान स्विकारण्याचा मेहनताना मागीतला .माझ्यासकट बर्‍याच जणांनी ती तयारी दर्शवली. अटी फक्त तुम्हीच टाकाव्या आणि पैसे देणार्‍यांनी टाकू नयेत असे काही नाही. यानंतर एक महत्वाचा मुद्दा .तुमच्या आधीच्या लेखात तुम्ही आव्हाने देणार्‍यांच्या अक्कलेचा उल्लेख केला आहे. एका रितीने तुम्ही कारण नसताना त्यांचा उपमर्द केला आहे .अर्थात तुमच्या कडून दिलगीरी अपेक्षीत आहे. तुमच्या प्रत्येक लेखात अर्धे लिखाण करून पुढील वाचनासाठी ब्लॉगचा हवाला टाकीत आहात. (हे निदान माझ्या वाचनात आलेल्या लेखांविषयी मी म्हणतो आहे). हे जत्रेत तंबूबाहेर उभे राहून ओरडणारा माणूस गर्दी/प्रेक्षक आत खेचतो त्यासारखेच आहे.असे असताना तुम्ही जाहीरात करता असा आरोप तुमच्यावर झाल्यानंतर नाराज होण्यात काय अर्थ आहे ? हे आमचे नशीब आहे की पती-पत्नी संबंधाबाबतीत तुमचे जे फुटकळ धागे अधूनमधून येत असतात त्यावर तुम्ही मनोरंजनाचा कर मागत नाही.माझ्यासारखे अनेक जण ज्योतीषास्त्राचा अभ्यास पडताळणी करून करू इच्छीतात.आता ऐनवेळी दडपणासारखे कारण सांगून त्यांना तुम्ही गैरसमजात टाकीत आहात. प्राचीन काळापासून अभ्यासात असलेल्या शास्त्राचा स्वतःच्या 'स्व' साठी वापर आणि दुरुपयोग करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? अभ्यासकाचा नम्रपणा तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेतून अभावानेच दिसतो. काही प्रतिसादक वयाने आणि अनुभवाने सान असतील. पण मी-गवी-सुनील यांनी तुमचे दडपण समजून सरळ मार्गाने पडताळणीची मागणी केली होती .त्यातही नविन खुसपट काढून तुम्ही शहाजोगपणे हा नविन धागा टाकला आहे. मग तुमचे हे लिखाण अधिकाधीक प्रसिध्दी मिळवण्यासाठी आहे असेच म्हणावे लागेल. मंच फुकट वापरायला मिळाला म्हणून त्याचा दुरुपयोग करू नका असे माझे नम्र निवेदन आहे.जाहीरात करायचीच आहे तर त्यासाठी असे धागे काडून सवंग प्रसिध्दी मिळवू नका. मी -सुनील आणि गवि आणि इतरांनी तयारी दाखवली आहे .मी अजूनही ते पैसे राखून ठेवले आहेत. या पुढे येऊन एका प्रयोगाला सामोरे जा. ही प्रतिक्रिया लिहीताना मला फार वाईट वाटते आहे पण आपण सगळेचजण सत्याला सामोरे जाऊ या .
  • Log in or register to post comments

पण आपण सगळेचजण सत्याला सामोरे

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 13:07 नवीन
पण आपण सगळेचजण सत्याला सामोरे जाऊ या .
सत्य काय आहे ते अगोदरच वर मांडले आहे. आपण सर्वच त्याला सामोरे आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ओ युयुत्सु....

पिलीयन रायडर
Fri, 08/12/2011 - 09:26 नवीन
प्लिज... एकदा तरी.... मनाला येईल त्या वाक्याला अधोरेखित करुन, तेवढ्या वरच '"जिलेबी" प्रतिक्रिया न देता.... त्याच प्रतिसादात बाकीची ५० वाक्य लिहिलि आहेत त्या वर पण काही तरी बोला की... तुमच्या बहुतांशी प्रतिक्रिया अशाच असतात... वर रामदास ह्यांनी इतकी सुंदर प्रतिक्रिया दिलिये त्याचा तरी मान ठेवा.... खुप वाचलं राव ह्या विषयावर... पण मला खात्री झालिये अता की तुम्हला बस्स पैसा छापायचाय... म्हणुन तर... "कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल." आणि मग त्या काहीतरी साठी श्रेय घेउन ते पैसे आपण लाटु.... सोप्पय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ओ युयुत्सु....

पिलीयन रायडर
Fri, 08/12/2011 - 09:39 नवीन
प्लिज... एकदा तरी.... मनाला येईल त्या वाक्याला अधोरेखित करुन, तेवढ्या वरच '"जिलेबी" प्रतिक्रिया न देता.... त्याच प्रतिसादात बाकीची ५० वाक्य लिहिलि आहेत त्या वर पण काही तरी बोला की... तुमच्या बहुतांशी प्रतिक्रिया अशाच असतात... वर रामदास ह्यांनी इतकी सुंदर प्रतिक्रिया दिलिये त्याचा तरी मान ठेवा.... खुप वाचलं राव ह्या विषयावर... पण मला खात्री झालिये अता की तुम्हला बस्स पैसा छापायचाय... म्हणुन तर... "कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल." आणि मग त्या काहीतरी साठी श्रेय घेउन ते पैसे आपण लाटु.... सोप्पय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

१६ आणे

श्रावण मोडक
गुरुवार, 08/11/2011 - 13:17 नवीन
१६ आणे दुरूस्त! युयुत्सुंनी पाचशे रुपयांत आपली प्रतिष्ठा विकायला काढली. पाचशे रुपये तर मिळाले नाहीत, पण प्रतिष्ठा मात्र हकनाक गेली. हे लिहिताना मलाही वाईट वाटते आहे, पण रामदास म्हणतात तसे सत्य कटू असतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

छोटा डॉन
गुरुवार, 08/11/2011 - 14:39 नवीन
असहमत होण्यासारखे काही नाही :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+२

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/11/2011 - 15:26 नवीन
हो ना... उलट सहमत होण्यासारखेच आहे! मात्र यानिमित्ताने युयुत्सुंनी मात्र खूपच अपेक्षाभंग केला आहे हे सांगावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अरेरे!

Nile
गुरुवार, 08/11/2011 - 15:30 नवीन
म्हणजे तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या? आम्हाला तर पहिले पासून खात्री होती ब्वॉ, तुम्हाला सांगितले पण होते. पण तुम्ही 'मोठे' लोक... :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

स्पा
गुरुवार, 08/11/2011 - 15:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१०००००००००००००००

आत्मशून्य
गुरुवार, 08/11/2011 - 16:44 नवीन
अगदी, पहील्या पासून खात्री होती हा माणूस काहीतरी कारण हूडकेलच माघार घ्यायचे आणी ते जमले नाही तर अशा चाचणीतून काही सिध्द होत नसते असे ठेकून देऊन हीच गोश्ट सिध्द करायला मी आव्हान स्विकारण्याचा प्रपंच केला होता असे नक्किच बोलेल हे १०००००००% माहीत होतं. बाकी अभ्यासातून नीर्माण होणारा आत्मविश्वास व नम्रता सोडा तर अत्यंत तीरसट्पणा, भडकपणा व परस्परविरोधी विधानांचा अविष्कार जो इथे अनूभवाला आला ते बघता मनापासून वाइट वाटले. इतका गाढा अभ्यास असताना अशी जेष्ठ व्यक्ती नवोदीताप्रमाणे दडपणाखाली येत असेल तर ही प्रवृत्ती अभ्यासातील मंदता वा शात्रातील फोलपणा अधोरेखीत करते. हे जर डॉक्टर अथवा खेळाडूच्या बाबतीत घडले तर त्यांच्यावर बंदीची कायदेशीर कारवाइ होण्याची तरतूद आहे पण ज्योतीशांच काय... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

म्हणजे, गाढवही गेले आणि

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 08/11/2011 - 15:39 नवीन
म्हणजे, गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? असो, इथे आम्ही काहीतरी नवीन बघायला, शिकायला मिळेल म्हणून सरसावून बसलो, तर युयुत्सुंनी डंकर्क ची यशस्वी माघारच घेतली की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

गाढवाबाबत खात्री नाही, पण

Nile
गुरुवार, 08/11/2011 - 15:42 नवीन
गाढवाबाबत खात्री नाही, पण ब्रह्मचर्य गेल्यामुळेच ते इतके मिसोजायनिस्ट झाले असावेत काय हो मेहेंदळे काका? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हाहाहाहाहा....गाढवाबाबत खात्री नाही...+१सहमत

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/11/2011 - 15:54 नवीन
अहो गाढवालाही काही मान असतोहो....:wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

पुरे की आता.....

गणपा
गुरुवार, 08/11/2011 - 12:50 नवीन
मला स्वतःला जोतिष्यशास्त्राचा बराच चांगला अनुभव आला आहे (भुतकाळ सांगणारे बरेच भेटले... पण एकान भविष्य वर्तवल होत जे ९५% खर ठरलय.) पण तरी सांगतो की आता हे सगळ (जाहिरातबाजी, मुदाम वाद उकरुन काढणे वगैरे) थांबवा. अती झाल अता हसुही येईनास झालय.
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
गुरुवार, 08/11/2011 - 13:11 नवीन
गणपाशी सहमत! -(भविष्यात डोकावण्याची हौस असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

कशाबद्दल सहमत आहात हो?

Nile
गुरुवार, 08/11/2011 - 15:47 नवीन
तिकडं गणपासेट युयुत्सुंना जोकर म्हणून राह्यलेत त्याबद्दल का? (आता त्यांना युयुत्सुंचं हसु येत नाही पण पुर्वी येत होतं, म्हणजे जोकरच ना?) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आव्हान

नितिन थत्ते
गुरुवार, 08/11/2011 - 13:09 नवीन
युयुत्सुंनी चाचणीची तयारी दाखवली होती हे पूर्ण खरे आहे. आणि मिपाकरांनी माघार घेतली हे थोडेसे खरे आहे. परंतु "विज्ञानाची कास धरणार्‍यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले" याच्याशी असहमत. >>प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का? दावे प्रत्येक तंत्रानुसार वेगळे असतील हे मान्य करू शकतो. पण मग दावे काय आहेत हे तरी क्लिअर करावे. युयुत्सूंचे ठोस दावे काय आहेत त्यांच्या त्या तंत्राचे दावे काय आहेत? हे नक्की सांगावे म्हणजे "त्या दाव्यांनुसार" चाचणी डिझाईन करता येईल. ते दावेच निश्चित नसले तर चाचणी काय करणार? उदाहरण म्हणून येथे आणि उपक्रमावर नाडी विषयांत घडलेल्या चर्चांचे घेता येईल, नाडीपट्टीत भविष्य असते असा दावा आहे अशी समजूत होण्याइतपत लेख शशिकांत ओकांनी लिहिले आहेत. त्याला दुजोरा देणारे लेख/प्रतिसाद** हैयो हैययो यांनी लिहिले. नंतर हैयो यांनी नाडीपट्टीतल्या भाषेविषयी काहीतरी प्रात्यक्षिक केले. त्यातून नाडीपट्टीत जुन्या तामीळ भाषेत लिखाण असते असे काहीतरी सिद्ध झाले म्हणे. **ओकांच्या लेखाला घेतलेल्या आक्षेपांना वकिली प्रत्युत्तरे देणारे प्रतिसाद. खालील दुवे उपयुक्त ठरतील. http://mr.upakram.org/node/2962#comment-49620 http://mr.upakram.org/node/2962#comment-49620 http://mr.upakram.org/node/2962#comment-54074 शेवटच्या दुव्यात विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे मिळाली हे त्याच पानावर खाली दिसेल. नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता. परंतु नाडीपट्टीविषयक दावा सिद्ध झाला असे सुचवणारे लेख-प्रतिसाद ओक/हैयो लिहू लागले. त्यांना जेव्हा नाडीपट्टीतील लिपी हा आक्षेपाचा दुय्यम किंवा तिय्यम मुद्दा आहे असे सांगितले तेव्हा हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला. आता हे उदाहरण युयुत्सुंचे नाही, पण त्या अनुभवामुळे आणि आव्हान धाग्यावरील युयुत्सुंच्या विधानांमुळे लोक मागे हटले असल्याची शक्यता आहे. तेव्हा उपाध्ये यांच्या तंत्राचे काय दावे* आहेत हे त्यांनी सांगितले तर आपण त्यात बसणारी चाचणी डिझाईन करू शकतो. *दावे निश्चित स्वरूपाचे आणि व्हेरिफाएबल असावेत ही तर पूर्व अट आहेच. चाचणीच्या निकालाने उपाध्ये यांच्यावर प्रश्नचिह्न निर्माण होऊ नये, ते वापरत असलेल्या तंत्रावर व्हावे.
  • Log in or register to post comments

थत्ते ...बास करा

ईश आपटे
गुरुवार, 08/11/2011 - 13:18 नवीन
असहमत. चाचणीचे निकष स्वतःच्या वेडसरपणातुन ठरवण्याचा दाभोळकरवाद्यांचा दावा मान्य होऊ शकत नाही. खरे ज्योतिषी असल्या रोगट व प्रसिध्दीलोलुप मनोवृत्तीला केराची टोपली दाखवतात. मग ते शास्त्र म्हणून सिध्द झाले नाही तरी बेहतर. ज्यांना भविष्य जाणून घ्यायचे आहे त्यांनी ज्योतिषाकडे यावे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ***** जावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ज्यांना भविष्य जाणून घ्यायचे

आत्मशून्य
गुरुवार, 08/11/2011 - 16:53 नवीन
ज्यांना भविष्य जाणून घ्यायचे आहे त्यांनी ज्योतिषाकडे यावे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ***** जावे
(कोणाचेही) ज्योतीष बघणे म्हणजे सैतानाची उपासना होय. याची सूरूवात उपासकच्या अपकीर्तीपासून होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

थत्ते, तेव्हा उपाध्ये यांच्या

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 13:33 नवीन
थत्ते,
तेव्हा उपाध्ये यांच्या तंत्राचे काय दावे* आहेत हे त्यांनी सांगितले तर आपण त्यात बसणारी चाचणी डिझाईन करू शकतो.
सध्या माझा एकच दावा आहे - "सर्व पौर्णिमा शुभ नसतात आणि सर्व अमावस्या अशुभ नसतात". हा दावा सभ्यतेच्या चौकटीत तपासायचा असल्यास संपूर्ण प्रस्ताव आणि कार्यवाहीची पद्धती हे तपासून सहकार्य करायचे की नाही हे मी ठरवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सध्या माझा एकच दावा आहे -

गणपा
गुरुवार, 08/11/2011 - 13:55 नवीन
सध्या माझा एकच दावा आहे - "सर्व पौर्णिमा शुभ नसतात आणि सर्व अमावस्या अशुभ नसतात".
सर्व पौर्णिमा शुभ असतात आणि सर्व अमावस्या अशुभ असतात. असा दावा कुणी केलाय ते आधी सांगा? तुम्ही फारच जनरलाईझ विधान केल आहे. यात भविष्य/ जोतिष्य ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

सर्व पौर्णिमा शुभ असतात आणि

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 13:58 नवीन
सर्व पौर्णिमा शुभ असतात आणि सर्व अमावस्या अशुभ असतात. असा दावा कुणी केलाय ते आधी सांगा?
अमावस्येला शुभ गोष्टी टाळण्याकडे आणी पौर्णिमेला शुभ गोष्टी करण्याचा भाविक/श्रद्धाळु लोकांचा कल असतो. तुम्ही म्हणता तसा लिखित दावा माझ्या वाचनात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

यात भविष्य/ जोतिष्य ते

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 14:01 नवीन
यात भविष्य/ जोतिष्य ते काय?
अमावस्या व पौर्णिमाचे शुभाभुभत्व ग्रह योंगांवर ठरते. हा त्यातला ज्योतिषाचा भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खीक्

नगरीनिरंजन
गुरुवार, 08/11/2011 - 14:06 नवीन
"सगळे दिवस सारखे नसतात" हा दावा मी कोणत्याही यंत्रतंत्राशिवाय करतो. हा दावा कोणीही खोटा ठरवू शकत नाही. म्हणून मी एक महान भविष्यवेत्ता आहे. गरजूंनी अधिक माहितीसाठी माझ्याशी फोनवर संपर्क साधावा. (अटी व शुल्क लागू). फोन नंबरः +91 URABIGFOOL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

टोल फ्री नाही?

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 14:25 नवीन
>>फोन नंबरः +91 URABIGFOOL नंबर असा द्यायचा नसतो. नीट द्यावा. ग्राहको देवो भव हे शिकवलं नाही का? +91 URA-BIG-FOOL असा द्यावा. नीट वजन येतं. शिवाय एखादा टोल फ्री नंबरही घ्या. जास्त चांगलं पडेल ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हा घ्या

नगरीनिरंजन
गुरुवार, 08/11/2011 - 16:01 नवीन
1800-PLS-CON-ME >>ग्राहको देवो भव शिकवलं नाही का? नाय बा! आम्ही फक्त 'मूर्खो ग्राहको भव' असं शिकलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 16:09 नवीन
मी कुंपनी काढली तर तुला मार्केटिंग डिपार्टमेंटचा डायरेक्टर करणार. ठरलं एकदम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

बरं!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 14:20 नवीन
>>सर्व पौर्णिमा शुभ नसतात आणि सर्व अमावस्या अशुभ नसतात ह्यात नविन ते काय? आमचं राजं बहुतांश मोहिमा ह्या अमावस्येच्या आसपासच्या काळात राबवत. अमावस्या अशुभ असती तर राजं, पेंढारी म्हणवले गेले असते..छत्रपती झाले नसते. असो. जोतिष्य ह्या बाबतीत माझा स्वतःचा विश्वास आहे, कित्येकदा मला स्वत:ला अनुभव आले आहेत. ते अनुभव इतके स्पष्ट आहेत की आमचे एक मित्र जे ज्योतिष्यविद्येचा अभ्यास करतात, त्यांनी स्वतः फोन करुन "तुझ्याकडून पुढच्या महिन्यात एक बातमी मिळण्याची वाट पाहतोय" वगैरे सांगून, मला काहीही ठाऊक नसताना अचानक पुढच्या महिन्यात खरोखर ती घटना घडून गेल्याचाही अनुभव गाठीशी आहे. पण, ह्याच विश्वासाच्या आधारे मी म्हणेन, की तुम्ही ज्या पध्दतीने आडमुठेपणाची भाषा करित आहात, ज्या पध्दतीनं इतरांनाच केवळ गरज आहे की हे सिध्द करायचंय किंवा खोटं पाडायचंय आणि तुम्ही त्यात आपली भूमिका बजाऊन इतरांवर उपकार करता आहात असं वाटण्याजोगा पवित्रा घेऊन आहात ते पुर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही प्रकारे स्विकारार्ह नाही. इतकंच नव्हे, तर तुमच्या ह्या प्रकारच्या पवित्र्यांमुळे ज्योतिषविद्येतल्या गोष्टी सिध्द होण्याऐवजी त्याची बदनामी आणि टवाळीच जास्त होते आहे हे तुमच्या लक्षात येत नाहीए का? असो. मी लहान माणूस. फार काय बोलणार? जे करताय ते योग्य नाही. इतकंच स्पष्ट मत नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

+१

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/11/2011 - 14:33 नवीन
धम्स बरोबर सहमत आहे. अतिशय संयमित प्रतिक्रिया. बहुदा आक्रमक व्हायच्या नादात युयुत्सुंकडून गडबडीत काही विचित्र (मनात वेगळे-लिखाणात उतरले वेगळे) लिहिले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. युयुत्सु स्वतःच पुन्हा एकदा त्यांना आलेले प्रतिसाद व त्यावर त्यांनी दिलेले उपप्रतिसाद वाचतील व योग्य भुमीका घेतील अशी आशा आहे. एकाच विषयावर भारंभार धागे येणे व दोन्ही बाजू वैयक्तिक पात़ळीवर उतरुन विज्ञान व ज्योतीष ह्या दोन्हीचा उपमर्द होणे दोन्ही बाजूंकडून टाळले जाईल अशी अपेक्षा. विज्ञानवादी ज्योतीषी परुत्सु बत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मी यांच्यावर आजपासून

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 08/11/2011 - 14:29 नवीन
मी यांच्यावर आजपासून माझ्यापुरता बहिष्कार टाकला आहे. ! मी अशी ठरवले आहे की रणछोडदास युयुत्सु यांचे कोठलेही लेखन मी आजपासून वाचणार नाही. हे लिहितांना मला वाईट वाटते व त्यांनी एक चांगली संधी गमावली याची खात्री वाटते. ( अर्थात तसे काही करायचे त्यांच्या मनात नव्हते हेच खरे आहे ) म्हणून पहिले वाक्य !
  • Log in or register to post comments

त्यांच्याकडे उत्तर नसते

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 14:35 नवीन
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
तुमच्या कडे उत्तरे नाहित म्हणून मी गप्प बसेन असं नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

काहीतरी नक्की होईल.

शाहिर
गुरुवार, 08/11/2011 - 16:54 नवीन
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. कोणत्यातरी माणसाची पत्रिका घ्यावी ..ति कोणत्या तरी सोफ्ट्वेयर मधे टाकवी..काहीतरी सां>गावे ..कुणाला तरी नक्की पटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

:०)

वपाडाव
गुरुवार, 08/11/2011 - 17:00 नवीन
दोन्ही हाताची बोटे तोंडात घालुन शिट्ट्या वाजवतोय अशी स्मायली कल्पावी......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

धमाल मुलगा , आमचे एक मित्र जे

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 14:28 नवीन
धमाल मुलगा ,
आमचे एक मित्र जे ज्योतिष्यविद्येचा अभ्यास करतात, त्यांनी स्वतः फोन करुन "तुझ्याकडून पुढच्या महिन्यात एक बातमी मिळण्याची वाट पाहतोय" वगैरे सांगून, मला काहीही ठाऊक नसताना अचानक पुढच्या महिन्यात खरोखर ती घटना घडून गेल्याचाही अनुभव गाठीशी आहे.
तुम्ही त्यांचे दावे हव असेल तर तपासा. मला माझा दावा काय आहे तो विचारला तो मी सांगितला. सभ्य पद्धतीने तो रिफाईन करायला माझी तयारी आहे.
  • Log in or register to post comments

बोंबला!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 14:45 नवीन
झक्क मारली आन धाग्यावर आलो असं झालं बा आता! >तुम्ही त्यांचे दावे हव असेल तर तपासा. ते मी काय करायचं ते पाहतो. माझा प्रतिसाद नीट वाचायची तसदी घेतली..किंबहुना तो समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला तर बहुधा कळावे मला नक्की काय म्हणायचंय! >>सभ्य पद्धतीने तो रिफाईन करायला माझी तयारी आहे. म्हणजे स्वतःच्या सोयीच्या अटी घालून? स्वतःच्या क्षुल्लक गर्वाला गोंजारण्यासाठी ज्योतिषविद्येची बदनामीही झाली तरी चालेल असा पवित्रा घेऊन? सरळ सरळ मैदानात न येता, आडून आडून माघार घेण्याची खेळी खेळून? काय? सभ्य म्हणजे नक्की काय? नक्की काय व्याख्या आहे सभ्य पध्दतीची? तुमच्यापुरती सभ्य पध्दतीची व्याख्या वेगळी असेल तर ती इतरांना कशी लागू पडेल? सर्वसामान्य सभ्य लोकांपैकी एकानं तरी तुमच्या अडेलतट्टू मुद्द्याला पाठिंबा दिलेला दाखवा... ५०० काय, मी स्वतः ५०००/- हरायला तयार आहे. असो! चालु द्या गोंधळ. फुकटची चिलीम मिळालीये तर बसतो मारत झुरके तिच्यायला! हौन जौंद्या...निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

नक्की काय व्याख्या आहे सभ्य

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 16:06 नवीन
नक्की काय व्याख्या आहे सभ्य पध्दतीची?
एक्मेकाना योग्य मान देऊन म्युचुअली अ‍ॅग्रिएबल अशी पद्धत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

प्लीज बॉस!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 16:14 नवीन
आता आणखी स्वत:च्याच शब्दात अडकून आणखी गोची करुन घेऊ नका.
एक्मेकाना योग्य मान देऊन
म्हणजे आव्हान देणार्‍याची अक्कल काढून? आव्हानासाठी तयार असणार्‍यांना वाट्टेल तशी उत्तरं देऊन?
म्युचुअली अ‍ॅग्रिएबल अशी पद्धत
नक्की? 'म्युचुअली' हा शब्द कोंडी करतोय तुमची. नीट तपासा तुमचीच विधानं! लोक तुमच्या अटींना तयार झाले असले तरी तुम्ही लोकांच्या अटी फाट्यावर मारता आहात. ह्यात 'म्युचुअली' कुठून आलं ते दाखवलंत तर आम्हालाही कळेल तरी. थोडक्यात, तुमच्याच व्याख्येनुसार असलेली सभ्य पध्दत तुम्ही स्वतःच वापरत नाही असं सिध्द होतंय का? पहा बरं एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

कित्ती वे़ळा बजावलं तुला की

गणपा
गुरुवार, 08/11/2011 - 16:24 नवीन
कित्ती वे़ळा बजावलं तुला की कुर्‍हाडीशी खेळु नकोस. शेवटी दिलासच ना पाय त्यावर. मोठ्यांच ऐकेल तो (ध)मुलगा कसला? भोग आता आपल्या कर्माची फळं. नंतर पोर्णिमेच्या नावाने गळा नको काढुस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

:(

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 16:32 नवीन
सॉर्री काका! :( - मुलगा ढ. अवांतरः बर्‍याच दिवसात शिल्पाताई नाही दिसल्या रे ऑनलाईन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तुमच्याच व्याख्येनुसार असलेली

युयुत्सु
गुरुवार, 08/11/2011 - 16:29 नवीन
तुमच्याच व्याख्येनुसार असलेली सभ्य पध्दत तुम्ही स्वतःच वापरत नाही असं सिध्द होतंय का?
माझ्या व्याख्येनुसार आपल अ‍ॅग्रिमेंट होत नाही एवढ्च म्हणता येईल ( सभ्यपणे)! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणि म्युचुअली?

धमाल मुलगा
गुरुवार, 08/11/2011 - 16:33 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा