मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबन काव्यमाला-भाग-१ ''मी माझा''(मग तू कुणाचा?)

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
थोडी प्रस्तावना-''मी माझा'' हा चंद्रशेखर गोखले यांचा चारोळी काव्य संग्रह,अंदाजे१२ वर्षांपुर्वी आला होता.तो त्यावेळी जसा आला तसाच भरपूर गाजला देखिल होता...''त्या काळी''त्याची पारायंणं करण्यात आंम्ही अग्रेसर होतो.म्हणजे एके काळी मी त्यांचा fan होतो,त्यानंतर पुला खालुन बरच पाणी वाहुन गेल्यानंतर त्याचा पंखा झाला.तोपर्यंत चंगुचे २/३पुढील भागही प्रसारित झालेले होते.पण नंतर त्यात चव राहिली नाही म्हणुन म्हणा,किंवा त्याचा कंटाळा आला म्हणुन असेल...पण ते वाचण्या अईवजी त्याचं विडंबनच सुचू लागलं.तीच विडंबनं आता मुळ कवितांसह इथे भागशः प्रसारित करत आहे. (आधी मुळकाव्य व नंतर विडंबन असा क्रम मुद्दामच सोय म्हणुन ठेवला आहे.) १)नेहमीच डोक्यानं विचार करु नये....................नेहमीच बेसनाचा विचार करु नये कधी भावनांनाही वाव द्यावा...........................बटाट्यांनाही वाव द्यावा आसुसलेल्या डोळ्यांना..................................भुकेलेल्या पोटांना स्वप्नांचा गाव द्यावा.....................................'चांगला' वडापाव द्यावा २)खराट्यानं झाडतात ते.................................. तांब्यानी टाकतात ते प्राजक्ताचा सडा..............................................जिलबीचा वेढा आणि मी हळहळलो,तर म्हणतात.....................आणी मी कळवळलो तर हा खरा वेडा.............................................मला देतात पेढा ३)सगळं तुला देऊन पुन्हा..................................तुझ्यात कळशी ओतुनही माझी ओंजळ भरलेली....................................माझी कळशी भरलेली पाहिलं तर तू तुझी ओंजळ..............................पाहिलं तर,तू तुझी कळशी माझ्या ओंजळीत धरलेली............................. माझ्या कळशीवर धरलेली ४)झाडावरुन प्राजक्त ओघळतो...................... चौरंगावरुन नारळ पडतो त्याचा आवाज होत नाही...........................धप्प-कन आवाज होतो--नाही??? याचा अर्थ असा नाही.................................याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही..........................की पुजेत मजा येत नाही ५)मिठी या शब्दात.....................................मिठि नावाच्या नाटकात केवढी मिठास आहे..................................केवढी मिठ्ठी - आस आहे नुसता उच्चारला तरी..............................हस्तस्पर्श ही प्राथमिकता क्रुतीचा भास आहे....................................तर''चुंबन''फुकट पास आहे पराग दिवेकर

वाचने 10974 वाचनखूण प्रतिक्रिया 29

सतिश गावडे Sat, 10/18/2014 - 13:00
बरेच दिवस हा काव्यसंग्रह शोधत होतो. मात्र तो छपाईच्या बाहेर आहे. शेवटी एका सृहदाने त्याचा काही भाग मिपावर आहे असे सांगितले. लेखनाचा दूवाही दिला. http://misalpav.com/user/14767/authored?page=12 विडंबन काव्यमाला-भाग-१ ,२,३ बघा.

वेल्लाभट Mon, 10/20/2014 - 13:18
आम्ही कॉलेजात असताना मॅजेस्टिक मधे याची पुस्तकं चाळत (खिल्ली उडवणं हा उद्देश) खिदळत बसायचो. आणि मुलं-मुली कशी फिदा बिदा होतात या ओळींवर याचा आढावा घेत हसायचो.

बोका-ए-आझम Wed, 04/13/2016 - 11:45
म्हणजे १९९३-९४ पासून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चारोळ्या छान असायच्या. थोड्या उगाचच.काॅम असायच्या पण तेव्हा आवडायच्या एवढं नक्की. माझ्या एका मैत्रिणीला - घर हे दोघांचं, दोघांनी सावरायचं; एकाने पसरलं तर दुस-याने आवरायचं ही चारोळी खूप आवडायची - हे आठवतं.

सूड Wed, 04/13/2016 - 15:37
..तुझ्यात कळशी ओतुनही माझी कळशी भरलेली पाहिलं तर,तू तुझी कळशी माझ्या कळशीवर धरलेली
अत्यंत घैरी नि घंबीर चारोळी, कोणी कशात काय ओतलं ते शेवटपर्यंत कळत नाही.

In reply to by सूड

नाखु गुरुवार, 04/14/2016 - 11:13
टक्याने अता अनमान करू नये. गुरुसेवेचा असा प्रसंग वारंवार येत नाही.. प्रेक्षक नाखु