पालकाची पातळ भाजी

शुचि's picture
शुचि in पाककृती
1 May 2011 - 1:33 am

साहित्यः

पालक - मध्यम गड्डी
लसूण पाकळ्या - ४/५
चण्याच्या डाळीचे पीठ - २ मध्यम वाट्या
हळद - चवीनुसार
मोहरी - चवीनुसार
जीरे - चवीनुसार
हिंग - चवीनुसार
गूळ - चवीनुसार
चिंच - चवीनुसार
तिखट - प्रकृतीनुसार
मीठ - चवीनुसार

कृती:
१. पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा.
२. लसणाचे बारीक काप करावे.
३. डाळीच्या पीठात पाणी घालून हाताने एकजीव करून घ्यावे किंवा सरळ मिक्सरमधून डाळीचे पीठ-पाणी हे मिश्रण काढावे.
४. चिरलेला पालक कुकरमध्ये घालून, वर हळद घालून एक शिट्टी करावी. हळदीने हिरवा रंग कायम रहातो.
५. शिट्टी झाल्यानंतर , वाफ गेल्यानंतर कुकर उघडून हाच पालक गॅसवर ठेवावा मात्र आता त्यात डाळीचे पीठ (पाणी घातलेले) घालावे. शिवाय चिंच, गूळ, मीठ, तिखट घालून चांगली उकळी येऊ द्यावी. (आपल्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी-जास्त ठेवावे.)
६. वरील मिश्रण उकळावयास ठेवले असताना दुसर्‍या गॅसवर जीरे-मोहरी-हळद-हिंग-तिखट यांची फोडणी करून त्यात लसणाचे काप खमंग परतावेत.
(७) सर्वात शेवटी पालकावर , वरून ही फोडणी घालावी.

टीप - बरेच लोक या भाजीत शेंगदाणे देखील घालतात.

प्रतिक्रिया

छान आहे ग पाकृ... करुन बघायला पाहिजे.

निवेदिता-ताई's picture

1 May 2011 - 8:31 am | निवेदिता-ताई

आम्ही पालकाची भाजी ताकातली करतो...शेंगदाणे, हरबरा डाळ पण घालतो शिजवताना.
आणी लसुण नाही घालत.मिरचीची फोडणी देतो.
त्याला नावच आहे ताकातला पालक, (जसे ताकातला चाकवत).

मी ताक घालते, मिर्ची घालते अन लसुण पण...छान चव येते.

शुचि, फोटु कुठंय?

रुपाली प्रा॑जळे's picture

1 May 2011 - 9:35 pm | रुपाली प्रा॑जळे

आम्ही याला दालभाजि म्हनतो
फोटू ?????????

रेवती's picture

1 May 2011 - 10:49 pm | रेवती

फोटू? फोटू?? फोटू???
दोन वाट्या चण्याचे पीठ जास्त वाटत नाही का?
तसे नसल्यास पुरावा म्हणून फोटू हवाच अशी मागणी करण्यात येत आहे.
बाकी ताकातला पालक किंवा बीनताकातला पालक, चाकवत, पातळ मेथी भाजी, अळू भाजी यांची आठवण यानिमित्ताने आली. त्यात खोबर्‍याचे काप, डाळ, दाणे .......अश्या आठवणी आल्या.;)

प्राजु's picture

2 May 2011 - 7:11 pm | प्राजु

हेच म्हणाते.
पातळ भाज्या.. ताकातल्या असो वा आणखी कशा, मस्तच लागतात.
अळूची भाजी, खोबर्‍याचे काप, शेंगदाणे घालून केलेली अतिशय आवडते मला.

पंगा's picture

1 May 2011 - 11:48 pm | पंगा

पालक - मध्यम गड्डी

कळले नाही.

दोहोंपैकी नेमक्या कोणत्या पालकाची पातळ भाजी करणे आहे? मध्यम आकाराच्या, की आकाराने गड्डी असलेल्या?

दोहोंची पातळ भाजी करणे असल्यास 'पालकांची पातळ भाजी असा बदल सुचवून व्याकरणदोष सुधारू इच्छितो. (पण मग त्या परिस्थितीत या प्रकारास 'पालकांची पातळ+धोतर भाजी' म्हणणे सयुक्तिक होणार नाही काय?)

१. पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा.

४. चिरलेला पालक कुकरमध्ये घालून, वर हळद घालून एक शिट्टी करावी. ('शिट्टी करावी'ऐवजी 'शिट्टी मारावी' असे हवे होते काय? 'क'चा 'मा' करून पहावा.)

हाच पालक गॅसवर ठेवावा

सर्वात शेवटी पालकावर , वरून ही फोडणी घालावी.

यांसारखी वाक्ये वाचून निव्वळ असुरी आनंद झाला आणि त्यास उकळ्या फुटल्या.

आम्हाला तर वुवा पंग्याला -६ मिळाल्याबद्दल आसुरी आणंद झाला आणि उकळ्या फुटुन वाफा निघाल्या .. ;) रुम फ्रेशनर मारा कोणीतरी :)

असो , पालक फक्त पनिर घालुन आणि अंडी घालुन आवडतो . ही पाकृ अंडी घालुन कशी करता येईल ?

पंगा's picture

7 May 2011 - 6:37 pm | पंगा

आम्हाला तर वुवा पंग्याला -६ मिळाल्याबद्दल आसुरी आणंद झाला आणि उकळ्या फुटुन वाफा निघाल्या .. ;)

आम्हालाही... द्या टाळी! ;)

(-२५ मिळाले असते तर अधिक बरे वाटले असते, पण असुराने नको तितक्या जास्त अपेक्षासुद्धा करू नयेत, नाही का? ;))

राघवेंद्र's picture

26 Jul 2015 - 4:39 am | राघवेंद्र

पाककृती आवडली. आज केली