टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))
आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)'
कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे
कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे...
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली
हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची
शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!...
चतुरंग
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

शिर्षक
शिर्षक वाचून कायतरी येगळंच वाटलं ह्वतं..... एका बैलाचे 'मनोगत'
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
या ओळी आवडल्या...
(सुकलेला)-इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
असेच म्हणते..
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे
'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे...
हे एकदम मस्त...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
:)
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
मस्त!
बैलाचे 'मनोगत' आवडले रे रंगा!
आपला,
तात्याबैल.
हे हे हे!
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली

हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...
बाकी इनायकभौ, एका बैलाचे 'मनोगत' हे तर मस्तचं
वाव
उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची

शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!...
शीतकपाट हा शब्द कसा बरं सुचला असेल?
एकदम फिट!
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली

हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे...
कालच पुरणपोळी आणि वालाचं बिरडं खाल्याने या स्थितीशी एकदम रिलेट करू शकलोय!
मस्त विडंबन!
डांबिसकाका,
अहो, पुरणपोळी + वालाचं बिरडं = आर.डी.एक्स. की हो!!
चतुरंग
नायतर काय!:))
हा हा हा..
रंगाशेठ
,
एकदम झकास विडंबन... =D> =D>
शितकपाट ..
चालू द्या...
(3:-O )केशवसुमार
स्वगतः-केश्या तू अता हरी हरी करायला मोकळा
लई ब्येस
वाहव्वा, चतुरंग सायेब, लई म्हन्जे लईच ब्येस. आमचा पण नगाराच झालाय या असल्यापाई!
जबरी!
चतुरंग..... एकदम भारी हं
भन्नाट!
लै भारी..........
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
लै भारी !!!
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो
विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे...
चतुर,
एका 'बैलाचे' मनोगतलै भारी बरं का !!!
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!
चतुरंग