✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्तव्य

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 02/03/2011 - 13:25  ·  लेख
लेख
" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती" उठवायचस ना. "रात्री एक वा़जता"? काय म्हणत होती? "नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"? माहीत नाही ब्वॉ? "तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे" वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल. ----------------------------------------------------------------------------------------- "उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ." हॅलो. "प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन . जरा काम होते तुमच्या कडे." माझा नंबर कुणी दिला हो तुम्हाला. "तुमच्या इथल्या एका मित्राने" बोला काय काम काढलेत. लवकर सांगा. उगाच जिलेब्या पाडू नका. इथे रात्रीचा एक वा़जला आहे. "मला लग्न करायचे आहे" बर मग? त्याचा माझ्याशी काय संबंध. माझे लग्न होउन २५ वर्षे झालीत. आता ह्या वयात आणखी एक करायची काही एक इच्छा नाहीये. "अहो मला एका होतकरु भारतीय मुलाशी लग्न करायचे आहे. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सुचवा" सर्व जग सोडुन भारतीय? "अहो तुम्ही मायलेज ऑब्सेस्ड नेशन आहात ना म्हणुन." बर बर. काय अपेक्षा.? " स्मार्ट असायला हवा. शिकला सवरलेला. वर्जीन. देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर" वयाची अट? "वरील सर्व गुण असतील तर अधीक उणे चालतय. पण तुमची ओळख महत्वाची." ते कशाला बॉ? "ते लग्न झाल्यावर सांगेन. आत त्याची चर्चा नको." तुम्हाला प्री न्युप इ मेल करते. माझा फोटो पाठवायची गऱज आहे असे वाटत नाही. टाइम्स मधे परवा आला आहेच. अ‍ॅगल जर बोल्ड आहे. पण चालुन जाईल. हवे असले तर पत्रिका पण पाठवते. तुमच्या साईट वर जे महाराज आहेत त्यांच्याकडुन जुळवुन घ्या." अजुन काही? "ज्यांच्याशी माझी पत्रिका जुळेल त्याचा फोटो व प्री न्युप पाठवा. ___________________________________________________ मी जुळणारी पत्रिका करुन घेतो. जास्तीत जास्त काय महाराज 'विशिष्ट सेवा' म्हणुन जादा आकार घेतील. चालेल. नानासाठी मला दोन पाचशे काही मोठे नाहीत. ---------------------------------------------------------------------------------------- लग्न आमच्या बिल्डींग च्या गच्चीवर. शाकाहारी जेवण - सौ. मास्तर मांसाहारी जेवण-गणपा सनई वादन्-छोटा डॉन मद्यपान सेवा-पिंडा काका उठबस्-टारझन आलेल्या पाहुण्याबरोबर विचारांचे आदान प्रदान- रामदास पत्रिका छपाई-श्रामो मंगलाष्टके-शरदीनी आणि रेवती ताई बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा. सर्वात महत्वाचे नानाला प्री न्युप काय असायला पाहीजे त्या बाबत संपुर्ण सल्ला द्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12436 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

आयला...

श्रावण मोडक
गुरुवार, 02/03/2011 - 13:30 नवीन
आयला! मास्तर, हसून हसून लोळतोय... :) पत्रिका छापून मिळतील. मजकूर कळवा लगेच. ;)
  • Log in or register to post comments

पिठ्ठा !!

सुहास..
गुरुवार, 02/03/2011 - 13:29 नवीन
_/\_ अगगगग !! मास्तर , याला म्हणतात पिठ्ठा पाडणे . अवांतर : मास्तर अलीकडे अंमळ येन्जॉय करायला शिकले आहेत वाट्ट !!
  • Log in or register to post comments

लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/03/2011 - 13:37 नवीन
लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन नवरा हवा ही मागणी अंमळ रोचक वाटली...
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
गुरुवार, 02/03/2011 - 13:40 नवीन
स्थळ पाहून अटी ठरल्या आहेत असं दिसतंय, मास्तर*. ;) काय नाना, बरोबर आहे ना? हे मास्तर क्रमांक दोन. म्हणजे भडकमकर मास्तर. पहिले मास्तर प्रभूमास्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी

Nile
गुरुवार, 02/03/2011 - 13:44 नवीन
तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी शिकवायचा आनंद घ्यायचा असेल हो, तसंही याशिवाय अजुन तिला काही येत असेल की नाही कुणास ठावुक. ;-) (ह्या मास्तर लोकांना काही कळेल तर शपथ!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मी गिल्वर घेउन तय्यार आहे,

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 14:00 नवीन
मी गिल्वर घेउन तय्यार आहे, दिदि तेरा देवर दिवाना, हाय राम कुडियोंको ** **.
उठबस्-टारझन
बघुनच पळुन जातील कि हो सगळे.
  • Log in or register to post comments

मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या

गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 13:44 नवीन
मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या उत्सुकतेने लागलीच उघडला.... द्येवा एकदम पोपट केलात. =)) (नानाची परवानगी घेतली असाल अशी आशा करतो ;)) असा निखळ धागा हवा दंगा करायला. =))
  • Log in or register to post comments

सनई वादन्-छोटा डॉन =)) =))

Nile
गुरुवार, 02/03/2011 - 13:47 नवीन
सनई वादन्-छोटा डॉन
=)) =)) =)) =))
उठबस्-टारझन
=)) =)) =)) म्हंजे नक्की काय हो? ;-) बाकी नानाशेटना प्रिन्युप म्हणुन काही (श्रेय असलेली) चित्रं दाखवुन 'संसाराचे चार धडे' शिकवा मास्तर तुम्हीच. ;-)
  • Log in or register to post comments

अगायायाया

नंदन
गुरुवार, 02/03/2011 - 15:12 नवीन
सनई वादन्-छोटा डॉन
--- ऑबॉबॉबॉबॉ, पडोसन पिच्चरमधला शेवटचा शीन आठवला (मेहमूद डोळ्यात पाणी आणून सनई वाजवत असतो तो) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हम्म

रमताराम
गुरुवार, 02/03/2011 - 15:30 नवीन
नंदन, ही निव्वळ आठवण आहे की 'सुचवण' देखील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हे कात तुम्हा दोघा कोटी

गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 16:10 नवीन
हे कात तुम्हा दोघा कोटी बहाद्दरांना दाद द्यायला आलो तोवर दोन्ही कोट्या उडाल्या? असो.. आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आम्हाला त्या उडण्या आधी

सुहास..
गुरुवार, 02/03/2011 - 16:54 नवीन
आम्हाला त्या उडण्या आधी वाचायला मिळाल्या हे आमच भाग्यच म्हणायच >>> हम्म !! माझा ही प्रतिसाद उडविलेला दिसतो आहे...असो ..ज्याने कोणी उडविली त्याचे देव भले करो.. आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आता भले करो म्हणतोय तर तेही

अवलिया
गुरुवार, 02/03/2011 - 17:12 नवीन
आता भले करो म्हणतोय तर तेही उडवाल का ? अवांतर : मन कस शांत झाल असेल नाही आता ?
अलिकडे मी हे सगळं येंजॉय करायला शिकलो आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

विषय

विनायक प्रभू
गुरुवार, 02/03/2011 - 13:50 नवीन
एक महत्वाचे राहीले. हनिमुम प्रेसिडेंशियल सुट मधे असेल. घरभरणी च्या आधीचे स्मुप्देशन नान्स ला कोण करणार?
  • Log in or register to post comments

ओ मास्तर, ती हिल्टनकाकु

Nile
गुरुवार, 02/03/2011 - 13:56 नवीन
ओ मास्तर, ती हिल्टनकाकु शेवटी पाश्चिमात्य, आमच्या नान्यालादररोज साधं-वरण भात अन शिकरण कोण करुन घालेल? तीला कुकिंग कोण शिकवणार?? (विंक्षिप्त बाईंना नेमा, या कामावर. ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

घरभरणी?

आजानुकर्ण
गुरुवार, 02/03/2011 - 20:12 नवीन
गृहप्रवेशाबरोबरच वास्तुशांतीचेही समुपदेशन केल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

चुचु करवली का?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 13:56 नवीन
चुचु करवली का?
  • Log in or register to post comments

हल्कत बाव्लत आच्रतं =))

गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 13:58 नवीन
हल्कत बाव्लत आच्रतं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कान पिळायला कोन येनार हाय ?

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 14:06 नवीन
कान पिळायला कोन येनार हाय ?
  • Log in or register to post comments

कान

विनायक प्रभू
गुरुवार, 02/03/2011 - 16:04 नवीन
आरे बाबा, सर्वार्थाने नाना पिळला जाणार आहेच. कान तरी बा़की ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

उठबस्-टारझन म्हनजे बसनार्याना

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 14:13 नवीन
उठबस्-टारझन
म्हनजे बसनार्याना उठवुन उभे आहेत त्याना बसवनारे ते तर पार झोपव्तील वर्‍हाडाला
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
हा नरेशकुमार- संसारोपयोगी, पत्नीनिष्ठ, १ निष्ठ,घनिष्ट अशा टिप्स द्याय्ला. आनि शिन्दे - वरमाय
  • Log in or register to post comments

=)) चुचु सुपारी देते आता

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/03/2011 - 14:13 नवीन
=)) चुचु सुपारी देते आता मास्तराची!
  • Log in or register to post comments

अग्दी !!!!! त्रिच नान्स चुच्स

प्रीत-मोहर
गुरुवार, 02/03/2011 - 14:49 नवीन
अग्दी !!!!! त्रिच नान्स चुच्स ला भाव देत नाय असे कुठे तरि ऐक्ले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आग्गागागागागा... मुलीचे

प्यारे१
गुरुवार, 02/03/2011 - 14:26 नवीन
आग्गागागागागा... मुलीचे मामा(आवाज कमी), मुलीचे मामा (आवाज मध्यम) मुलीला (असेल तशी) घेऊन या. मुहूर्ताची वेळ टळून गेली असली तरी लग्न लागणारच. नवरा मुलगा आला का...??? घोड्याचं- अहो नवर्‍याचं नाही- खर्‍या घोड्यांचं काय???? आटपा, आटपा लवकर. टारु, त्याला नाही त्याला नाही, पलिकडचा. दोनच दे. चुचुला बघतोय बघ. निळ्या, अक्षता... अरे मुलगी नाही. तांदूळ मेल्या....
  • Log in or register to post comments

+१ प्यारे...

वपाडाव
Fri, 02/04/2011 - 14:29 नवीन
अव्वल लिवलाय बगा.. ह.ह.पु.वा. झाली आमची... परसंग जसाच्या तेसा उम्टीला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय मास्तर ? आज दुपारी ?

टारझन
गुरुवार, 02/03/2011 - 14:43 नवीन
काय मास्तर ? आज दुपारी ? :) हे उठबस मधे काय करायचं असतं बुवा ? हो , कोनी पंगा केला तर आडवा करायचे काम असेल तर आणंदाणे करु :) बाकी प्यारिस हिल्टण ? जगदंब .. जगदंब .. ह्यांनी म्हणे एका वॅलेंटाईन डे ला बेकहॅम काका बाहेरदेशी दौर्‍यावर असताना स्वत:ला विवस्त्र एका गिफ्ट पॅक मधे बंद करुन घेतलं होतं , आणि ते गिफ्ट पॅक बेकहॅम ला पोच केलं होतं ! आता हे असं वळवलेलं गिफ्ट णाणांणा चालेल काय ? ह्या वर त्यांचे विचार जाणुन घेण्यास उस्तुक .. बाकी पॅरिसकाकुंचं अ‍ॅव्हरेज काय आहे ? :) -(एलिशा कथबर्ट प्रेमी) टारझन उठाबशे
  • Log in or register to post comments

नान्या उष्टं खातो का?

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/03/2011 - 17:34 नवीन
नान्या उष्टं खातो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट

विकाल
Fri, 02/04/2011 - 12:44 नवीन
न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट चालतय न्हव...? नाय कवा कवा पाकीट फोडुन वाचत्यात...न मन्ग प्राबलेम म्नताना ईचारल ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वा व्वा अगदी लग्नघर करून

मी ऋचा
गुरुवार, 02/03/2011 - 14:43 नवीन
वा व्वा अगदी लग्नघर करून टाकलत की हो मिपाचं..मज्जाच मज्जा... हाहाहाहा हाहाहाहा ( हे राजश्री प्रोडक्शन्स च्या पिच्चर मधील लग्नात नवरीच्या भोंगड्या मैत्रिणी हसतात त्या चालीवर वाचावे ;) )
  • Log in or register to post comments

ड्या नीट टंकल्याबद्दल आभार.

अवलिया
गुरुवार, 02/03/2011 - 14:47 नवीन
ड्या नीट टंकल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

अगगागागागागागा ____/\_____ मा

अवलिया
गुरुवार, 02/03/2011 - 14:45 नवीन
अगगागागागागागा ____/\_____ मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) @गणपा - मास्तरला असे विचारतात? ऑ ! चावट ! * गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध
  • Log in or register to post comments

+१

रमताराम
गुरुवार, 02/03/2011 - 15:03 नवीन
* गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध सहमत. मग नाना 'घरजमाई' होणार का? तसे झाले तर मग 'हिरवा माज' क्याटेगरीत जाणार तर. सगळी समीकरणेच बदलतील की हो. अरे हो अभिनंदन करायचे राहिलेच. जोरदार हाबिणंदण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मास्तरने पार बाजार

वपाडाव
Fri, 02/04/2011 - 15:09 नवीन
मास्तरने पार बाजार उठवला मास्तरला आम्ही वास्को द गामाचा भाऊ गोबोगामा* म्हणतो *गोबोगामाचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही कॉलेजात गेला नाहित हे सिद्ध एक ७-८ वर्ष तरी मागे गेलो राव मी.. गोबोगामा :: तर टोपिक एवढा भन्नाट सुरु आहे... त्यात पुन्हा असल्या phrases... जाम मजा आलीये आज तर... ------------ बाकी चालू द्या... ------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पण नान्याचे वय लग्नाचे आहे?

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/03/2011 - 14:57 नवीन
पण नान्याचे वय लग्नाचे आहे?
  • Log in or register to post comments

+१ कालच थत्ते काका म्हणत

वारकरि रशियात
गुरुवार, 02/03/2011 - 17:24 नवीन
+१ कालच थत्ते काका म्हणत होते, "नानांना अजून थांबायला लागणार. वय १६ च वर्षांचं राहणार आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 02/03/2011 - 14:57 नवीन
माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले तर ह्यानी नानाच लग्नच लावुन टाकले.. आणी मी करवली...कुठे फेडाल हि पापे ?
  • Log in or register to post comments

चुच्स अजून लग्न लागायचय. खूप

शुचि
Fri, 02/04/2011 - 06:12 नवीन
चुच्स अजून लग्न लागायचय. खूप कामं आहेत बाई. मुंडवळ्या, लज्जाहोमाच्या लाह्या, अष्टगंध, नारळ, कलश, तांदूळ, सुपारी, विड्याची पाने, हळद, कुंकू, खण वगैरे सामुग्रीची व्यवस्था मी करेन. किती लोक केव्हापासून पुण्यात बोलवलेत? नाही फराळाचं करवून घ्यायला लागेल. पाहुण्यांची झोपायची व्यवस्था गच्चीवर करू. गुलाबी गारव्यात. ________________________________________ मुलगा कसा राजबिंडा आहे..... मुलगी अगदीच सो सो आहे त्यामानाने ........आता एकमेकांना पसंत पडलेच आहेत म्हणून काही बोलत नाही पण अगदी खरं सांगायचं तर आमच्या नानांना नाही हो शोभत ही पॅरीस .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

नियोजीत वधुवरास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

यकु
गुरुवार, 02/03/2011 - 14:59 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

बाकी नाना म्हणतात तसा खरंच

वारकरि रशियात
गुरुवार, 02/03/2011 - 15:11 नवीन
बाकी नाना म्हणतात तसा खरंच बाजार उठवलाय ! अवांतरः येश्वंत्राव, इतका उत्साह बरा न्हवं ! फटुंचा श्रेयाव्हेर कसं इसरता ? (लग्नाचा आहेर न्हवं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

म्हणजे? फोटू आत्तापासूनच

यकु
गुरुवार, 02/03/2011 - 15:20 नवीन
म्हणजे? फोटू आत्तापासूनच नानांना विचारून टाकावा असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बाकी इतर काही असेल तर चि. सौ.का.पॅरिस हिल्टन आणि चि. बॅटमॅन च्या कायदेशीर प्रतिनिधीला पाठवा; की तुम्हीच आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात

न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल,

वारकरि रशियात
गुरुवार, 02/03/2011 - 16:06 नवीन
न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, आंजा, वेबसाईट चा पत्या) मिळाले वगैरे ल्हीलं नाय तर त्यांना 'पंछी बनु उडते फिरु' आसं गानं म्हनावं लागल ना म्हनुन सुचवलं. बाकी आमी विजुभाऊंबरोबर (त्यांच्या संमतीने) आहेर जमा करायला ष्टेजवर असु की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सहमत आहे.श्रेय नोंद आवश्यक

अवलिया
गुरुवार, 02/03/2011 - 17:13 नवीन
सहमत आहे.श्रेय नोंद आवश्यक आहे असे सध्याचे आमचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात

चि. सौ.का.पॅरिस हिल्टन

टारझन
गुरुवार, 02/03/2011 - 16:13 नवीन
चि. सौ.का.पॅरिस हिल्टन
पॅरिस् बाई अजुन ही चि सौ का आहेत ? =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

नाही

रामदास
गुरुवार, 02/03/2011 - 19:55 नवीन
त्या अखंड चिसौकां असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ऑबॉबॉबॉबॉ........

धमाल मुलगा
गुरुवार, 02/03/2011 - 20:06 नवीन
=)) =)) =)) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

किंचितसा असहमत. त्या कदाचित

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/04/2011 - 08:11 नवीन
किंचितसा असहमत. त्या कदाचित अखंड सौभाग्यवती असाव्यात. ;) (गोंएकर) पेशवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

नेहमीचे क्रिप्टीक नाही

पाषाणभेद
गुरुवार, 02/03/2011 - 15:23 नवीन
नेहमीचे क्रिप्टीक नाही त्यामुळे मजा नाही आली.
  • Log in or register to post comments

मास्तर स्टेजवर आलेले "आहेर "

विजुभाऊ
गुरुवार, 02/03/2011 - 15:48 नवीन
मास्तर स्टेजवर आलेले "आहेर " घेण्याचे काम मी करेन. धम्या माझ्या सोबतच राहील. तेवढीच कंपनी होईल
  • Log in or register to post comments

ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण

मृत्युन्जय
गुरुवार, 02/03/2011 - 16:09 नवीन
ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण करणार आहे ते पण सांगा की. आणि शूटिंग मध्ये कशाकशाचा अंतर्भाव असेल ते पण सांगा. काय आहे की वधूच्या आवडीनिवडी लक्षात घेउन प्रश्न विचारला. गरज पडल्यास मी शूटिंग करायला तयार आहे. आणि हो, वॉर्डरोब डिझायनिंगचे काम कोणाकडे आहे ते पण सांगा.
  • Log in or register to post comments

व्हिडीयो शूटिंग

कुंदन
गुरुवार, 02/03/2011 - 16:29 नवीन
व्हिडीयो शूटिंग सर्वसाक्षी , जयपाल करतील , दोघेही ठाण्यातच राहतात. मिडिया पार्टनर : सहज राव अन मदन बाण ( जालावर प्रदर्शित करायची जबाबदारी यांची)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा