टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
श्रध्दा
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
माणसामधले माणुसपण जाते
जगण्यामधले जीवन जाते
माणसाविना माणसाचे
खरचं का कुठे काही अडते ?
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
मनाची कवाडे भकास होतात
श्रध्देच मन निराश होते
प्रेमाला माणुस पारखा होतो
पण कुणाला असा किती फरक पडतो ?
श्रध्दा कुणावरही असु शकते,
देवावर मानवावर अथवा भावनांवर
पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
देव , माणुस भावना
सगळेच निषिध्द होते .
मला कुणी सांगेल का
श्रध्देच्याच वाट्याला हे का येते ?
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

मस्त
कवीता चांगली जमलेयं
लगे रहो
चेतन
अवांतरः ही श्रध्दा कोण आहे
श्रध्दा
अधिक स्पष्टतेची आवश्यकता.
छान
पुढल्या कवितेला शुभेच्छा !
आवडली
कविता जमते आहे . ही तर आवडली . पुढील येउ द्या.