"तीन दीवे" एक कोडं !!

महेश काळे's picture
महेश काळे in काथ्याकूट
19 Jan 2011 - 3:55 pm
गाभा: 

एका घरात तीन खोल्या अहेत.

पहिल्या खोलित ३ स्विच (बटणं) अहेत.

अणी तिसर्र्या खोलित ३ दिवे (बल्ब) अहेत (४० वेट)

(सर्व वायरिंग अंतर्गत आहे)

तुम्ही पहिल्या खोलितुन तिसर्या खोलीत जाउ शकता.. परन्तु पुन्हा पहिल्या खोलीत येउ शकत नहि.

तर कोणत्या दिव्याचा कोणता स्वीच अहे हे कसे ओळखाल ??

प्रतिक्रिया

एक स्वीच ऑन करायचा, थोडा वेळ थांबायचं आणि ऑफ करायचं. नंतर दुसरं स्वीच ऑन करून तिसर्‍या खोलीत जायचं. एक बल्ब गरम असेल एक सुरु आणि एक बंद. गरम बल्बचं स्वीच पहिलं, ऑन बल्बचं स्वीच दुसरं आणि बन्द बल्बचं स्वीच तिसरं.

प्रॉब्लेम सॉल्व्ड! धन्यवाद..!!

चिरोटा's picture

19 Jan 2011 - 4:20 pm | चिरोटा

अरे मग मधल्या खोलीत काय करायचे?

मधल्या खोलीत ,असल वायरींग करणार्‍या वायरमन ला शिव्या द्यायच्या.

महेश काळे's picture

19 Jan 2011 - 4:49 pm | महेश काळे

धन्यवाद ..!!

utkarsh shah's picture

19 Jan 2011 - 5:22 pm | utkarsh shah

आणि समजा १ ला बल्ब गेलेला असेल तर ?????

चिरोटा's picture

19 Jan 2011 - 6:00 pm | चिरोटा

मग तो टाकून त्या जागी 'रोशनी चा बजाज' लावायचा आणि पुन्हा कोडे सोडवायचे.

बर हे सगळे कशासाठी ओळखायचे???

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2011 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

हि अशी कोडी घालणार्‍यांचे मला कायमच खुप कौतुक वाटत आले आहे.

खुप विचार करुनही कोडे सुटले नाही. शेवटी मग हार मानली आणि प्रतिक्रीया वाचायल्या घेतल्या.

तिमा's picture

19 Jan 2011 - 6:43 pm | तिमा

बर हे सगळे कशासाठी ओळखायचे???

" दिवे लावण्यासाठी"

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 6:52 pm | नरेशकुमार

कोडे खुप म्हनजे, खुप म्हनेज, खुपच अवघड आहे

आक्खे के घर,
त्याला तीन तीन खोल्या, त्यात तीन तीन दिवे, त्याची तीन तीन बटने.
ती बटने दाबत बसायची, परत या खोलितुन त्या खोलीत जायचे.

आपल्याला नाय जमत बुवा एवढं अवघड.