मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!...
भोगीच्या दुसर्या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली!
संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा!
आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा....
हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका...
स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-?
पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल!
उतरत्या वयातही नवर्याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल"
रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम!
"जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!
मग आठवले गेले अनेक पेन्डिन्ग इश्यू आणि पुणे-मनपा'च्या गळ्याला लागली कात्री.
आपलंच पिल्लू म्हणून माजवून ठेवलेली.. अचानक भुन्कायला लागली की कुत्री!!!!
आपण सज्ञान झाल्याचा कुत्र्यांनाही झाला साक्षात्कार!
बुढ्ढ्या सरदारानेही घेतला... कुत्र्यांचाच कैवार!
'आमी लिव्हिला त्योच्च इतिहास खर्रा!'.. असे कोकाटले श्रीमन्त!
पु. ल. उद्यानात "क्षणभर" विश्रान्ती घेतायेत "दादोजीपन्त"!
कलमाडींचेही पालक झाल्याप्रीत्यर्थ "दादां"नी सुरु केली "संभाजी बिडी"!
रात्रीचे सी-ग्रेडी परक्रम करण्यातच धन्यता मानतात बिग्रेडी!(ब्रिगेडी)!
"अरेरे!.. काय झाले पुण्याचे!" असे म्हणत कदाचित कळवळले असते शिवबा!
सम्भाजीही उद्वेगाने म्हटले असते," मेल्यानन्तरही माझ्याच नावाला का लावलात धब्बा?"
असो, पण एक नाव घेतलं की दिशा बदलतात खारे आणि मतलई वारे!
& he is only.....none another than Mr. RAJ THAKRAY! :)
ते 'होस्ट' झाले महाराष्ट्राचे, आणि आपपल्या राज्यामध्ये गेले सगळे 'गेस्ट'!
पु.पे. (पुणेरी पेशवे) नी म्हटलंच आहे, " East or West, RAJ THAKRAY is the Best!"
बेस्ट'वरून आठवतात पुण्याच्या बसेस- पीएमपीएमएल!
लेडीज-सीटवरून "नॉन्-लेडीज"ला उठवताना होते रोजच घालमेल!
"पुणं तिथं काय उणं" म्हणता म्हणता, बदलला पुण्याचा चेहरा मोहरा.
रोज त्याच त्याच बातम्या ऐकून पुणेकर नको व्हायला बहिरा!
जोतिबा श्रेष्ठ की लोकमान्य? असा वाद न घालता पाळूया ना त्यांची तत्वं!
कळलं पाहिजे सगळ्यांना कुणाला कधी आणि किती द्यायचं महत्व!
सुष्टांशी सुजन, षठाशी षठ.. अशीच ठेवावी वृत्ती!
परशुरामाच्या आशीर्वादाने कदाचित होईलही इतिहासाची पुनरावृत्ती!
.............
.......... मला वाटतंय.. जरा अति होतोय डोस.. त्यामुळे इथेच थांबते...
वैचारिक वारूच्या वेगमर्यादेला जरा प्रगल्भतेने लगाम घालते!
तूर्तास आज आहे संक्रांत... झाले प्रियजन गोळा!
भेदभाव विसरून सारे, तिळगूळ घ्या आणि गोड बोला!
- मकरसंक्रांतीच्या मन्गलमय शुभेच्छा!
---
मृगनयनी.
झक्कास! एकदम खुमासदार पण
.......... मला वाटतंय.. जरा
खणखणीत लिहिली आहेस! मस्त!!
+१
अगदी नयनी सारखीच तिची कविता !
जबरी!!!
आवडली
यावरून आठवली...
रोफ्ल ... एकंच नंबर एक
मस्त !!!
सगळ्यांना धन्यवाद!
+१
छान मस्त
जबरा कविता..! लैच भारी..!
ज ह ब र्या !! परशुरामाच्या
हाण्ण !! पयल्या धारेचा कडक
पयल्या धारेचा कडक माल ! हा
ही ही !!
सही!!!!
मस्त
छान गं मॄग्गा !!!
धन्यु! मदन! मृग्गा!
छान!!
वा वा वा पुण्यावरची
छान छान. आमच्या रीप्लायचा असा