दिर्घकथा : जलजीवा (भाग- ३)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
4 Jan 2011 - 7:39 pm

त्याचे बोलणे थांबवत अ‍ॅना त्याला पुढे म्हणाली,

" होय. आणि मग एके दिवशी तुझा मित्र तुझ्या सोबत त्या जंगलात आला नसताना ती तुला भेटली होती. तुम्ही दोघे दिवसभर सोबत होते. संध्याकाळी ती अचानक नाहीशी झाली, तू तीला नाव गाव काहीच विचारले नव्हते, पण ते तुझे पहिले प्रेम होते, ते तू बरेच दिवस विसरला नव्हतास आणि ती खुप सुंदर होती, दुसर्‍या दिवशी तुझा कॅमेरा गायब झाला होता. तुझी सगळी मेहेनत वाया गेली पण मग तुला दुसरीकडचा कुठलातरी व्हि. डी. ओ. शूट करावा लागला होता.

नंतर या चॅनेलतर्फे तू सिलेक्ट झालास, पण तुझा तो प्रथम व्हीडीओ हा त्या जंगलातला नव्हता याचे तुला वाईट वाटते वगैरे वगैरे...बरोबर?"

"हो. पण ती मुलगी तेथे आली कशी आणि ती नाहीशी कशी झाली हे मला तुला सांगायचे होते... ते सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही आणि हे तुला आत्ताच सांगावेसे मला वाटले कारण मला तेथे जाण्याचा योग पुन्हा येतो आहे..आणि.."

"होय रे. पुन्हा कधीतरी सांग. ते मी कधीतरी ऐकेनच, अमेय.
आता मला एक गोष्ट फक्त महत्त्वाची वाटतेय, ती म्हणजे आपण आपल्या लग्नाचे ठरवू या. आईची ही इच्छा आहे तशी. लवकरात लवकर!"

"वाव. दॅट्स ग्रेट देन. इन फॅक्ट मीच तुला हे सांगायचे ठरवले होतेच. मी ही यावेळेस बोलतो घरच्यांशी. मला खात्री आहे ते अर्थातच नाही म्हणणार नाहीत."

एव्हाना त्यांचा लंडन आयचा सेल सर्वात उंचावर होता.

" तू एकदा का तुझी ही असाईनमेंट पूर्ण केली, की आपण पुन्हा भेटू आणि मग लग्नाचे प्लान करूया. तू तोपर्यंत घरच्यांशी बोलून घे.." - अ‍ॅना.

"ओ.क्के. ठिक." - अमेय.

काही वेळाने त्यांचा लंडन आय मधला "प्रवास" संपला.

रात्री मार्केट मध्ये फिरून स्वत: साठी, घरच्यांसाठी आणि अ‍ॅनासाठी खरेदी केल्यानंतर झाल्यानंतर तो तीच्या आईला भेटायला गेला आणि दुसर्‍या दिवशी सोमवारी रात्री भारतात- मुंबईत घरी पोहोचला.

अ‍ॅना ला त्याने पोहोचल्याचा फोन केला.

दुसर्‍या दिवशी मंगळवारी त्यला जाग आली ती सकाळी अकरा वाजता.

चर्चगेटला असलेल्या नाफ्ट च्या ऑफिस मध्ये रिपोर्टींग करून तो परत आला. तेथे त्रीशा ला भेटला. इतर क्रू मेंबर्स ना भेटला.

बर्‍याच दिवसांनंतर त्यांना तो भेटत होता. त्रीशा सोबत ऑफिशियल बोलणे झाल्यानंतर तो सगळ्यांचा निरोप घेवून परतला. ती आणि इतर क्रू मेंबर्स त्याला शुक्रवारी जॉईन होणार होते.

ईमेल मध्ये सविस्तर असाईनमेंट होतीच.

घरी आल्यानंतर सगळयांसाठी केलेली खरेदी आणि चॉकलेट्स वगैरे दिल्यानंतर त्याने सर्वांसमोर अ‍ॅना शी त्याने ठरवेलेल्या लग्नाचा विषय काढला. तीचा, तीच्या आईवडीलांचा इतिहास थोडक्यात सांगितला.

आधी सगळ्यांना थोडी कल्पना होतीच. फक्त आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. विविध विषयांवरच्या गप्पा- गोष्टी झाल्या. जेवणं वगरे झालीत.

लग्नाची तारीख वगैरे अजून ठरायची होती. त्या संदर्भात त्याने अजून अ‍ॅना आणि तीच्या आईशी चर्चा केली नव्हती.

बुधवारी पहाटे त्याचा प्रवास सुरु झाला. तसे त्याला फ्लाईटचे तिकिट मिळाले असते पण त्याने ट्रेन निवडली. जस्ट फॉर एन्जॉय. तो आसंद येथे जाण्यासाठी निघाला होता. सोबत कॅमेरा, लॅपटॉप, वायरलेस इंटरनेट व इतर अनेक वस्तू असलेली पाठीवरची सॅक आणि आणखी एक कपड्यांची बॅग.

त्रीशा आणि भार्गवीला त्याने कॉल करून तो आल्याचे कळवले.

ट्रेनने प्रवास करत प्रवासात अ‍ॅनाचा विचार चालू होता. लग्नाचा मार्ग आता मोकळा झाला होता. अ‍ॅनाशी लग्न होणार. आवडीच्या क्षेत्रात करियर करायला मिळाले आणि तेही व्यवस्थित सुरु आहे. त्याच्या चेहेर्‍यावर समाधानयुक्त हास्याची लकेर उमटली.

येथे त्याला आलेले अनुभव जरी विचित्र होते तरी एका गोष्टीमुळे त्याने हे असाईनमेंट स्वीकारले होते - "त्या" मुलीची पुन्हा भेट होईल अशी एक मनात कुठेतरी त्याला आशा होती. असा विचार हास्यास्पद होता, बालिश होता तरी त्याला तसे वाटत जरुर होते.

अनाकलनीय अनुभव कुणी सहसा विसरत नाही आणि पहिले प्रेम सुद्धा. अनाकलनीय असले तरी!

त्या दिवशीच्या एका दिवसात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या. त्या मुली शी झालेली भेट त्याने फक्त अ‍ॅनाला सांगीतली होती.

...एवढे मोठे ब्रम्हांड.
त्यात अनेक आकाशगंगा...
त्यात अनेक ग्रहतारे..
आणि त्यात आपली छोटीशी पृथ्वी.
त्यावरचे प्राणी आणि इतर दृश्य- अदृश्य जीव.
पृथ्वीवर मानवाने वाटून घेतलेले अनेक देश.
अजस्त्र ब्रम्हांडाच्या तुलनेने अगदी नगण्य असलेल्या या पृथ्वीवर असलेल्या भारतातल्या एका धावत्या ट्रेनमधला तो एक तुलनेने नगण्य जीव- अमेय.

आपण म्हणतो सगळे काही आपल्या हातात असते. पण, या ब्रम्हांडात, या पृथ्वीवर, या निसर्गात अशा अनेक गूढ, चमत्कारीक, गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि आपणच बनवलेल्या विज्ञानाच्या आकलनशक्तीच्या इतक्या पलीकडच्या आहेत की त्यांचे रहस्य अजूनपर्यंत कुणालाही समजले नाही. आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. काही फार थोडे जीव फक्त अशा काही गोष्टींच्या थोडेफार जवळ जावून त्यातले रहस्य काही प्रमाणात समजून शकले आहेत. फार थोडे!

ट्रेनमधल्या त्या एका डब्यात असलेल्या आणि चेहेर्‍यावर समाधानाची लकेर असणार्‍या अमेय च्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्यालाही माहिती नव्हते.

माहिती नव्हते म्हणूनच तो आनंदात, मजेत होता.

काकांच्या घरी पोहोचल्यावर त्याचे जंगी स्वागत झाले.

जितिन ला तो येणार याची आधीपासून खबर मिळाली होती. तो आधीच त्याच्या आजोबांकडे - काकांकडे येवून बसला होता.

आजोबांकडे पोहोचल्यावर सेटल वगैरे झाल्यानंतर तो त्याच दिवशी संध्याकाळी जितिनला घेवून काकांच्या जीपमध्ये भटकंती करायला निघाला.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

4 Jan 2011 - 8:10 pm | प्रीत-मोहर

लौकर टाक पुढचा भाग :)

थोड्या ऑवूट्डेटेड थीम्स टाळता नाही का येणार तूम्हाला ? :(

ऑटडेटेड थीम नाहीये. टायटल पुन्हा वाचा आणी कीप गेसिंग...
आणि कथा वाचत राहा

खडूस's picture

5 Jan 2011 - 9:27 am | खडूस

ती mermaid असेल बहुतेक मत्स्यकन्या किंवा मग वनराणी वगेरे

नन्दादीप's picture

5 Jan 2011 - 9:49 pm | नन्दादीप

(क्रमशः) र्‍हायल की वो...लवकर टाका पुढच....