यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का करत नाहीत ?

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in काथ्याकूट
8 Dec 2010 - 9:36 pm
गाभा: 

डॉ. स्वामी हे एवढे शिकलेले सवरलेले आहेत तरीही आमच्या एका सगळ्यात ताकद्वान अशा राष्ट्रीय नेत्याची बदनामी करत हिंडत आहेत. यांना नेहरू गांधी ( महात्मा नव्हे) या घराण्यांची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ? आणि काँग्रेसचे लोक काय करत आहेत ? ते झोपा काढत आहेत की काय. का हे सर्व खोटे आहे ?
आपले मत जरूर नोंदवावे. मला तर यात स्वामींचा काहीतरी कावा दिसतोय. !
आपल्याला हे खरं वाटते का ? मला तर हे सगळे बनावट आहे असे वाटते. पण त्यांनी त्यांच्या साईटवरहे धडधडीत टाकले आहे.

प्रतिक्रिया

हे इडियो बहुधा सहजरावांनी आधी इथे दिले व्हते...

अवांतर :--- सहजराव, जयपाल हल्ली इथे दिसत नाहीयेत...

देवदत्त's picture

8 Dec 2010 - 10:42 pm | देवदत्त

अब्रुनुकसान? ते काय असते?
ज्या गोष्टींमध्ये स्वत:चा फायदा करून घेता येईल त्याच गोष्टींचा मुद्दा बनविला जातो.
आणि उगाच उचलला तर आणखीही गोष्टी निघायची भीती असेल. त्यापेक्षा लक्ष न दिलेले बरे असे वाटत असेल.

जयंतराव कृपया प्रतिसादाबद्दल वाईट वाटून घेऊ नका.

सर्वप्रथम व्हिडीओ इथे टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
डॉ. स्वामींना त्यांना काय वाटते ते बोलताना लाज वाटायला पाहिजे असे तुम्हाला का वाटते?? अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लिखित भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेला अधिकार आहे.
डॉ. स्वामींचा काही कावा असेल तर कांग्रेस केंद्रसरकार वेळीच त्यांना ठेचून काढायला कमी करणार नाही.
चुकीचा असो, बरोबर असो मला तर हा माणूस आवडला कारण सत्तेवर बसलेल्यांच्या विरोधात बोलण्याचं धैर्य तो दाखवतोय.

बाकी देवदत्त म्हणतायत ते बरोबर वाटते.

गांधीवादी's picture

9 Dec 2010 - 9:02 am | गांधीवादी

सहमत.

>>कांग्रेस केंद्रसरकार वेळीच त्यांना ठेचून काढायला कमी करणार नाही.
'काही करायले गेलो तर फुकट अजून जास्त चव्हाट्यावर येउ' म्हणून गप्प असतील.

बाकी काही मान्यवरांच्या प्रतीक्षेत.

क्लिंटन's picture

21 Dec 2010 - 1:42 pm | क्लिंटन

सुब्रमण्यम स्वामी हा राजकारणात दुर्लक्षला गेलेला आणि काहीही करून प्रसिध्दीच्या झोतात राहावे यासाठी धडपड करणारा मनुष्य आहे.१९९१ मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना यानेच लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना चंद्रशेखर यांच्याबरोबर फुटलेल्या ५ मंत्र्यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवायच्या प्रश्नावर "मी तुम्हाला अटक करीन" अशी धमकी दिली होती असे वर्तमानपत्रात वाचल्याचे पक्के आठवते ( संदर्भ ). पुढे जयललितांविरूध्द याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. १९९८ मध्ये वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे अलम दुनियेला माहित होते.त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्याच जयललितांबरोबर त्यांनी युती करून निवडणुक लढवली आणि खासदारकी पदरात पाडली आणि पुढे तीन महिन्यात "जातीयवादी" सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा शाहजोगपणा त्यांनीच दाखवला. २००४-०५ मध्ये रामसेतू या अजिबात महत्वाच्या नसलेल्या प्रश्नावर त्याने रान उठवायचा व्यर्थ प्रयत्न केला. ए.राजाने २जी स्पेक्ट्रम मध्ये सरकारी खजिन्याचे मोठे नुकसान केले आहे असे २००८ पासून वर्तमानपत्रात येतच होते.त्यावरूनच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून स्वामींनी फुकटची प्रसिध्दी लाटायचा प्रयत्न मात्र जरूर केला. आज ते सोनियांवर गरळ ओकत आहेत.अशा माणसाला कितपत महत्व द्यावे?

काळेकाकांनी दिलेल्या लिंकविषयी काही प्रश्न उभे राहतात.

१. स्वामी म्हणतात की सोनियांनी आपली शैक्षणिक पात्रता, जन्माचे ठिकाण या गोष्टींविषयी खोटी माहिती दिली आहे.हे स्वामींना माहित असेल तर ते त्याविरूध्द कोर्टात का जात नाहीत? ती माहिती खरोखरच खोटी असेल तर Representatives of peple act अंतर्गत सोनियांची खासदारकी या कारणामुळे रद्द व्हायची शक्यता आहे असे वाटते.
२. स्वामी म्हणतात की सोनियांनी आपले जन्माचे ठिकाण खोटे लिहिले कारण त्यामुळे सोनियांना त्यांच्या वडिलांची मुसोलिनी कनेक्शन लपवता यावीत! सोनियाच्या वडिलांची मुसोलिनीशी कनेक्शन असतीलही पण म्हणून त्यासाठी सोनियांना दोष देणे हे "भारतीय संस्कृतीत" बसते का?त्यांच्या वडिलांचे मुसोलिनी कनेक्शन होते म्हणजे सोनियांचेही फॅसिस्ट कनेक्शन झाले का?
३. याच लिंकवर पुढे स्वामी म्हणतात की सोनियांचे रशियातील के.जी.बी बरोबर संबंध होते! असो. मुसोलिनी आणि रशियातील के.जी.बी यांच्याशी एकाच वेळी संबंधांचा उल्लेख वाचून मनोरंजन झाले.
४.Sonia Gandhi is modern Robert Clive या लिंकवरील पानावर म्हटले आहे की राजीव गांधींच्या जवळच्या लोकांना माहित होते की राजीव गांधी १९९१ च्या निवडणुकांनंतर सोनियांना "सरळ" करणार आहेत.सुब्रमण्यम स्वामी हे राजीव गांधींच्या जवळचे होते का?तसे ते नसतील तर त्यांना हा दृष्टांत कुठून झाला?
५. वरील पानावरच म्हटले आहे की सोनियांनी इंदिरा गांधींचे हत्यारे सतवंत-केहार आणि धनंजय चॅटर्जी यांना फाशीतून सूट द्यावी अशी मागणी न करता केवळ राजीव खुनातील आरोपींना राष्ट्रपतींनी माफी द्यावी अशी मागणी का केली याचे कारण-- सुब्रमण्यम स्वामींच्याच शब्दात--The explanation for this special consideration for the LTTE perhaps lies in what Rajiv had told her about their future. May be therefore Sonia feels obliged to the LTTE for the assassination.
५अ. सोनियांना सरळ करायची गरज राजीव गांधींना वाटत असेल (म्हणजे सोनिया त्यांच्या दृष्टीने विश्वासार्ह नसतील) तर ते त्यांची एल.टी.टी.ई विरोधी भूमिका (किंवा राजकारणातील कोणतीही गोष्ट) सोनियांना का सांगायला जातील?
५ब. Sonia feels obliged to the LTTE for the assassination असे जेव्हा स्वामी म्हणतात तेव्हा याचा अर्थ सोनियांना राजीवजींची हत्या व्ह्यायला हवी होती असा होत नाही का?याच पानावर ते पुढे म्हणतात की सोनियांच्या राजीव हत्याकांडातील सहभागावर त्यांचे investigation चालू आहे. असे investigation करायचा अधिकार स्वामींना कोणी दिला? त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टासमोर ठेवावेत. दुसरे म्हणजे कायद्याच्या परिभाषेत May be ला काय अर्थ आहे? उद्या उठल्यासुटल्या कोणीही May be च्या पडद्यामागे लपून हवे ते बोलेल.

असो.सुब्रमण्यम स्वामी या तद्दन मूर्ख माणसाविषयी लिहावे तितके थोडे.

आता सोनिया याविरूध्द अब्रूनुकसानीचा खटला का दाखल करत नाहीत? याचे कारण (मला वाटते) की अशा मुर्खांमुळे सोनियांना आपोआप लोकांची सहानुभूती मिळते कारण लोक अशा गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवतील इतके मूर्ख नाहीत.त्यामुळे सोनियांचे काम अशा मूर्ख लोकांनी केलेल्या आरोपांमुळे सोपे होते. राजीव हत्याकांडातील दोषींना माफी द्यावी अशी मागणी त्या का करतात? त्याचे कारणही तेच.ती एक राजकीय खेळी आहे.लोकांना दिसताना दिसते की बघा सोनिया आपल्या पतीला मारणाऱ्यांनाही माफ करू शकतात. आपल्या समाजात नाही म्हटले तरी अशा क्षमाशीलतेला महत्व मिळते.

स्वामींकडे खरोखरच काही कंटेन्ट असेल तर त्यांनी तो न्यायालयासमोर ठेवावा. उगीच धुराळा उडवून लोकप्रियता मिळवायचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा वाटतो.

(मान्यवर) क्लिंटन

वाहीदा's picture

21 Dec 2010 - 2:09 pm | वाहीदा

computer जी इसे Lock कर दिया जाये !
मस्त ! सोनियांचे काम अशा मूर्ख लोकांनी केलेल्या आरोपांमुळे सोपे होते.

सोनिया अतिशय हुश्शार स्त्रि आहे हेच एक अधोरेखित सत्य आहे !

गांधीवादी's picture

21 Dec 2010 - 3:47 pm | गांधीवादी

>>computer जी इसे Lock कर दिया जाये !
माननीय वहिदा मॅडम,
आपल्याला ह्या वाक्यातून नक्की काय सुचवायचे आहे ते जरा कृपया स्पष्ट करून सांगाल काय ?
जसे,
१) संपादकांनी आता 'माननीय क्लिंटन यांच्या प्रतिक्रियेला कोणीच उत्तर देऊ शकू नये' अशी व्यवस्था करावी काय ?
२) क्लिंटन यांनी जे कथन केले आहे ते यथासांग सत्य आहे आणि त्यापुढे कोणी विचारच करू नये.
३) कि आपली अशी इच्छा आहे 'आता सोनिया गांधींबद्दल कोणीही काहीहि बोलू नये'. असे असेल तर सांगा, आपला मान राखून (निदान आम्ही) गप्प बसू.

बाकी आपल्याला झालेल्या आनंदाची मी कल्पना करू शकतो, पण हे आनंद दीर्घकाळ टिकत नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2010 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी आपल्याला झालेल्या आनंदाची मी कल्पना करू शकतो, पण हे आनंद दीर्घकाळ टिकत नाहीत.

श्री. गांधीवादी आपल्या प्रतिक्रीयेतल्या ह्या वाक्याची खरच गरज होती का ?

क्लिंटन's picture

21 Dec 2010 - 4:23 pm | क्लिंटन

श्री. गांधीवादी,

तुमचा प्रतिसाद वहिदा यांच्यासाठी असला तरी त्यात माझे नाव आले असल्यामुळे मी तुमच्या प्रतिसादाला उत्तर देत आहे.

खाली प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे मला एवढेच वाटते की प्रत्येक राजकीय व्यक्तीचे अडनाव/पक्ष आणि तत्सम गोष्टी बाजूला ठेऊन डोळसपणे मूल्यमापन करावे.सुब्रमण्यम स्वामींनी केलेल्या आरोपांवर तोच दृष्टीकोन ठेऊन मला जे वाटले ते मुद्दे मी इथे लिहिले.वरकरणी मी तुम्हाला सोनिया समर्थक वाटत असेनही पण वस्तुस्थिती तशी नक्कीच नाही.खरे म्हणजे मी कोणाचाच समर्थक नाही असे म्हटले तरी चालेल.सोनियांना राजकीय विरोध जरूर करावा. जर सोनियांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल, त्यांचा राजीव हत्येत हात आहे असे वाटत असेल तर त्याचे पुरावे जरूर कोर्टापुढे द्यावेत.पण सध्या हा प्रकार जो चालू आहे तो माझ्या लेखी तरी फुकटची लोकप्रियता मिळवायचा प्रयत्नच आहे.आपण केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि ते न्यायालयापुढेच मांडले पाहिजेत, लोकांमध्ये धुराळा उडवून उपयोग नाही हे सुब्रमण्यम स्वामींसारख्या माजी कायदामंत्र्याला माहित नसेल हे जरा कठिणच वाटते.तरीही ते योग्य संस्थेपुढे आपले पुरावे सादर न करता नुसता धुराळा उडवत आहेत याचा अर्थ त्यांना फुकटची लोकप्रियता हवी आहे असे वाटले तर त्यात काय चुकले?

मागे गो.रा.खैरनारांनी शरद पवारांविरूध्द "आपल्याकडे ट्रकभर पुरावे आहेत" अशी आरोळी ठोकली पण त्यापैकी एकही पुरावा त्यांनी कधी कोर्टाला दिल्याचे ऐकिवात नाही.त्यातलाच हा प्रकार आहे दुसरे काही नाही.स्वामींनी प्रकरण धसास लावून कोर्टात नेले आणि सोनिया दोषी आहेत हे सिध्द झाले तर जरूर सोनियांवर टिका करावी पण सोनिया दोषी हे आधीच गृहित धरून आधीपासूनच टिका सुरू करणे अयोग्य आहे.

तेव्हा "माननीय क्लिंटन यांच्या प्रतिक्रियेला कोणीच उत्तर देऊ शकू नये" किंवा "क्लिंटन यांनी जे कथन केले आहे ते यथासांग सत्य आहे आणि त्यापुढे कोणी विचारच करू नये" असे मला म्हणायचे आहे असा आपला ग्रह झाला असेल तर माझा नाइलाज आहे.

http://www.misalpav.com/node/15763#comment-269286

तुम्हाला आम्ही काय म्हणतो हे कधीच कळले नाही पण प्रदिप अन काळेकाकांना बरोबर समजले
मला काय सुचवायचे आहे ते ..
असो, परत एकदा एकच म्हणणे
फालतू गॉसिपींग, एकामागोमाग होत रहाणारी स्कँडल्स ह्यांविषयींच्या चर्चांना अर्थ नाही. राजकारणी हे एक नंबर धुर्तच असतात. भारतातील गलिच्छ राजकारणात रहाण्यासाठी हे Minimum Required Qualification आहे हे वेगळे सांगणे न लगे

सुधीर काळे's picture

21 Dec 2010 - 3:22 pm | सुधीर काळे

क्लिंटन,
इतिहास काय आहे याच्यापेक्षा सत्य काय आहे इकडे लक्ष द्यायला हवे. कारण हे सारे (गरळ) स्वामींनी जनता पक्षाच्या नावावर लिहिले/ओकले आहे. म्हणजे हे आरोप वैयक्तिक नसून पक्षाचे आहेत.
"मूर्खाकडे काय लक्ष द्यायचं" म्हणून गप्प बसल्या आहेत कीं "खरं आहे" म्हणून गप्प बसल्या आहेत देव जाणे?
पण वाहीदा म्हणते ते खरे आहे. ती महा धूर्त बाई आहे.

टारझन's picture

21 Dec 2010 - 3:28 pm | टारझन

ती महा धूर्त बाई आहे.

द्विरोक्ती होते आहे. श्री. काले जींना वेगळा अर्थ अभिप्रेत असावा :)

क्लिंटन's picture

21 Dec 2010 - 4:46 pm | क्लिंटन

इतिहास काय आहे याच्यापेक्षा सत्य काय आहे इकडे लक्ष द्यायला हवे.

मान्य. समजा सुब्रमण्यम स्वामी या गृहस्थाचा पूर्वेतिहास बाजूला ठेवला किंवा हेच आरोप स्वामींऐवजी मौजे दगडवाडीच्या एखाद्या गुलाबराव काटेवाले यांनी केले आहेत असे गृहित धरले तरीही तपास करणे,सत्य काय आहे याचा छडा लावणे हा अधिकार कोणाचा?अर्थातच कोर्टाचा.आणि जर स्वामींकडे ट्रकभर पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टापुढे जरूर द्यावेत आणि त्यातून सोनिया दोषी हे सिध्द झाले तर त्यांच्यावर जरूर टिका करावी.पण स्वामी म्हणतात म्हणून सोनिया दोषी असे म्हणून कसे चालेल?जर कोर्टापुढे स्वामींनी पुरावे दिले नाहीत तर लोकांमध्ये त्यांनी उडविलेला धुराळा आणि गावच्या जत्रेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी "फुगे घ्या फुगे" किंवा "चणे घ्या चणे" असे विविध आवाजात ओरडणे यात फारसा फरक नाही आणि ते फारसे सिरीयसली घ्यायची गरजही नाही.

हे सारे (गरळ) स्वामींनी जनता पक्षाच्या नावावर लिहिले/ओकले आहे. म्हणजे हे आरोप वैयक्तिक नसून पक्षाचे आहेत.

मग या आरोपांना जबाबदार कोण?पक्ष की सुब्रमण्यम स्वामी स्वत:?समजा याबद्दल सोनियांनी खटला दाखल केला तर तो कोणाविरूध्द करावा? स्वामींविरूध्द की पक्षाविरूध्द?यावर कारवाई झाली तर काय? स्वामी तुरूंगात जाणार की पक्षाची मान्यता रद्द होणार?

पक्ष जबाबदार असेल तर फारच उत्तम. मग आमची दहा-वीस मित्रमंडळी बरोबर घेऊन मी पण एखादा "आय.आय.एम विद्यार्थी पक्ष" स्थापन करतो आणि वाटेल ते बरळतो.त्याचे परिणाम झाले तर माझ्यावर होणार नाहीत तर पक्षावर होणार म्हणजे पक्षाची मान्यता रद्द होणार की मी परत नामानिराळा!म्हणजे मी परत दुसरा "अहमदाबाद जनता पक्ष" काढायला मोकळा!

तेव्हा स्वामी असल्या आरोपांच्या जबाबदारीतून मोकळे होऊ शकत नाहीत.

"मूर्खाकडे काय लक्ष द्यायचं" म्हणून गप्प बसल्या आहेत कीं "खरं आहे" म्हणून गप्प बसल्या आहेत देव जाणे?

हे सांगता येणे खरोखरच कठिण आहे.

ती महा धूर्त बाई आहे.

याविषयी कोणालाही शंका वाटायचे कारण आहे असे वाटत नाही.

अरे बाबा,
मी पक्षाचे नांव लिहिले एवढ्यासाठी कीं त्यांनी जर फालतूपणा केला असेल तर पक्ष त्यांना जाब विचारेलच. पण विचारला नसेल तर पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे असे झाले. अर्थात् त्यांच्या पक्षात त्यांच्याखेरीज किती लोक आहेत ते माहीत नाहीं.
एक व्यक्ती जेंव्हां आरोप करते त्यापेक्षा एक पक्ष जेंव्हां आरोप करतो तेंव्हां त्याला जरा जास्त वजन असते.
पण मुख्य म्हणजे इतर कुणीच (म्हणजे अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली) ही केंद्रस्थानी असलेली नेते मंडळी गुक्मसुम आहेत. त्यांच्या मौनाचा मला अर्थच समजत नाहीं. पण हल्ली ही 'भाजपा'ची नेते मंडळी दात नसलेल्या वाघासारखी वागू लागली आहेत. त्यामुळे त्यात नवीन कांहींच नाहीं. एक नरेंद्र मोदीच कांहींसे गुरगुरताना दिसतात.
आता विरोधी पक्षच संपला आहे मग सोनियाताईंना काय गरज आहे स्वतःचा बचाव करायची?
जय हो!

जयंत कुलकर्णी's picture

25 May 2011 - 11:09 pm | जयंत कुलकर्णी

2G च्या बाबतीत सुब्रमण्यम्स्वामींचे बरेच खरे ठरले आहे. या माणसाला आता मुर्ख व प्रसिध्दिला हपापलेला म्हणावे काय ? तो हपापलेला असेल तरीही २जी त्याच्यामुळेच बाहेर आले नाही का ?

त्याने केलेले बाकीचे आरोपही खरे निघणार नाहीत हे आपण कशावरून म्हणायचे ?

गोगोल's picture

28 May 2011 - 6:38 am | गोगोल

..

प्रत्येकजण फेमस व्हायला काही तरी संधी शोधतोच....खरं खोटं कोणाला माहीतं?

पण तरीही ज्या अर्थी हा माणूस एवढ्या जाहीररीत्या सगळे कनेक्शन सांगतोय आणि कोणताही गांधी किंवा कोन्ग्रेस वाला त्याविषयी अक्षरसुद्धा काढत नाही त्याअर्थी त्यात काहीतरी तथ्य असणार असे मला वाटते.

पण त्यांनी त्यांच्या साईटवरहे धडधडीत टाकले आहे.

क्लिक केल्यावर पुढील संदेश मिळत आहे.

पान सापडले नाही.
The requested page could not be found.

गांधीवादी's picture

9 Dec 2010 - 10:16 am | गांधीवादी

http://www.janataparty.org/pressdetail.asp?rowid=26
नुसते इकडेच नाही तर जालावर अजून बर्याच ठिकाणी नेहरू-गांधी घराण्याबद्दल माहिती सापडते.
खरे-खोटे काही कळत नाही.

आमचे मित्र कुठे गेले? त्यांची प्रतिक्रिया वाचायची होती.

नितिन थत्ते's picture

9 Dec 2010 - 12:56 pm | नितिन थत्ते

चालू द्या

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार

कॉलिंग थत्ते चाचा.......

अवांतर :- साला नान्या हे म्हणजे आता मी तुला विचारजंत म्हणालो तर तु माझ्यावर अब्रुलुस्कानिचा दावा लावणार काय? आणि तुला-मला अब्रु हाये का नाही हे कसे सिद्ध करायचे ?

अवलिया's picture

9 Dec 2010 - 12:35 pm | अवलिया

अब्रु फक्त विचारवंतांना असते... तुम्हा आम्ही हिंदूना नाही हे कधी कळणार तुला?

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

ओह्ह असे असते काय ?
धन्यवाद रे बामणा, ज्ञानात अमुल्य भर पडली.

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:37 pm | शिल्पा ब

हिंदू विचारवंत नसतात असं म्हणायचंय का नानुजी ?

अवलिया's picture

9 Dec 2010 - 12:40 pm | अवलिया

कुणीही विचारवंत झाला की स्वतःला हिंदू समजत नाही. हिंदू विरोध हीच विचारवंत होण्याची प्राथमिक पायरी आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार

हिंदू विरोध हीच विचारवंत होण्याची प्राथमिक पायरी आहे.

+१
खरे सांगायचे तर समान्य माणुस ज्या कशाचे कौतुक करेल त्या सगळ्यालाच विरोध करणे हे महत्वाचे.

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 12:48 pm | शिल्पा ब

काय म्हणता? मग आम्ही काही विचारवंत वगैरे कधी होणारच नाही...अरेरे!!!
आता आम्हाला फक्त लोकांचे "बास कि राव आता"च ऐकावे लागणार दिसतेय..

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 1:19 pm | चिंतामणी

हिंदू विरोध हीच विचारवंत होण्याची प्राथमिक पायरी आहे.

सहमत

थोडी दुरूस्ती करून म्हणेन "पुरोगामित्व सिध्द करायला हिंदू विरोध" दर्शवायलाच पाहिजे.

वरिल भाष्य हे Yellow journalism चा एक भाग आहे असे वाटते.
आता Yellow journalism ला मराठीत काय म्हणतात हे मला ठाऊक नाही त्याबध्द्ल क्षमस्व !

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 2:43 pm | छोटा डॉन

>>आता Yellow journalism ला मराठीत काय म्हणतात हे मला ठाऊक नाही त्याबध्द्ल क्षमस्व !

मराठीत त्याला 'पित-पत्रकारिता' असे म्हणतात.
धन्यवाद. बाकी अलमोस्ट सहमत.

- डॉन्या वाळिंबे

चिंतामणी's picture

9 Dec 2010 - 11:36 pm | चिंतामणी

धन्यवाद. बाकी अलमोस्ट सहमत.

- डॉन्या वाळिंबे

कोणाशी??

सुधीर काळे's picture

21 Dec 2010 - 3:25 pm | सुधीर काळे

'पित-पत्रकारिता'? छे, छे. 'पीत-पत्रकारिता'!!

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Dec 2010 - 5:01 pm | बिपिन कार्यकर्ते

नव्हे नव्हे! 'पीत पीत पत्रकारिता' :)

सुधीर काळे's picture

21 Dec 2010 - 5:19 pm | सुधीर काळे

हाहाहा! लई ब्येस!!

जयंत कुलकर्णी's picture

9 Dec 2010 - 7:20 pm | जयंत कुलकर्णी

डॉ. स्वामींनी हे आरोप अत्यंत गांभिर्याने केलेले दिसत आहेत. एवढेच नव्हे तर ते म्हणतात की त्यांनी वेळोवेळी आपल्या पंतप्रधानांनाही पत्रे लिहीलेली आहेत. म्हणजे जशी राजाच्या बाबतीत लोकांनी आपल्या पंतप्रधानांना पत्रं लिहीलेली आहेत. हे सगळे मला वाटते Yellow J मधे मोडत नसावे. तज्ञांनी प्रकाश टाकावा. मी तर म्हणतो काँग्रेसकडे एवढे नावाजलेले वकील आहेत. त्यांनी या स्वामीला चांगला धडा शिकवला पाहिजे. चांगला २००/३३० कोटीचा भरपाईचा खटला भरावा त्यांच्यावर. आयुष्यातून उठला पाहिजे हा माणूस. हे जर केले नाही तर जनता आपल्या लाडक्या सोनीयांबद्दल हेच म्हणणार की काहीतरी गडबड आहे म्हणून ते खटला भरत नाहीत.

"YJ" चा अर्थ मला समजला नसावा कदाचित.

मी तर म्हणतो काँग्रेसकडे एवढे नावाजलेले वकील आहेत.
त्यांच्याविरूद्धही काहीतरी माहिती गोळा केली असेल ;)

चांगला २००/३३० कोटीचा भरपाईचा खटला भरावा त्यांच्यावर. आयुष्यातून उठला पाहिजे हा माणूस.
ह्या वरच्या वर्गातील व्यक्तींबाबत असे काही होत नाही हो आजकाल.
आणि 'लाडक्या' सोनियांसोबतच संपूर्ण काँग्रेसच काहीतरी गडबड आहे त्यामुळेही तसे काही होणार नाही.

सुधीर काळे's picture

21 Dec 2010 - 11:29 am | सुधीर काळे

Do You Know Your Sonia ?
http://www.janataparty.org/sonia.html
वरील दुव्यावर पुराव्यासकट खूप माहिती आहे. मी कांहीं भाग वाचला पण बराच वाचावयाचा आहे. पण प्रत्येकाने वाचण्यासारखा आहे. जरूर वाचायचीच शिफारस करेन.

गांधीवादी's picture

21 Dec 2010 - 12:44 pm | गांधीवादी

माहिती जरूर वाचेन.
यातील बरीचशी माहिती अगोदरच माहित आहे. इथे हा लेख येण्यागोदारच ह्या गोष्टी माहितही होत्या.

पण पुढे काय ?

हे सर्व सत्य आहे का नाही ? याचा छडा माझ्यासारखा सामान्य माणूस लावू शकणार नाही. भाजप हे सर्व माहित असून सुद्धा गप्प कसे, हे सुद्धा एक कोडेच आहे.

विधायक पद्धतीने आपण काय करू शकतो ?

प्रदीप's picture

21 Dec 2010 - 3:53 pm | प्रदीप

पहा पटली तरः

विधायक पद्धतीने आपण काय करू शकतो ?

ह्या फालतू धूळवडीप्त सक्रीय भाग न घेता त्यापासून दूर रहाणे; राजकीय पक्षांच्या कार्याचे (त्यांतील व्यक्तिंचे नव्हे)डोळस मूल्यमापन करून, त्यांच्या जाहीरनाम्यांचे तुलनात्मक अभ्यास करून त्याप्रमाणे मते देणे हे आपल्या हातात आहे. त्याव्यतिरीक्त समाजासाठी आपण स्वतःही आपापल्या कुवतीनुसार जसे पटेल तसे काही न काही करीत रहाणे हेही आपल्या हातात आहे. हे सर्व जे आपल्याला शक्य आहे त्यावर फोकस ठेवावा, फालतू गॉसिपींग, एकामागोमाग होत रहाणारी स्कँडल्स ह्यांविषयींच्या चर्चांना अर्थ नाही आणी ते अजिबात विधायक नाही. (कृपया हे वैयक्तिक घेऊ नये. हे मी जे स्कँडल्सवर इ. लिहीले आहे तो माझा सर्वच भारतीय समाजावरील आक्षेप आहे).

नर्मदेतला गोटा's picture

21 Jun 2011 - 10:48 pm | नर्मदेतला गोटा

कुलकर्णी,
बाकी काही म्हणा
इथे हे सारं मटेरीयल टाकलत बर झालं

तुमचा हेतू साध्य झाला

>> मला तर हे सगळे बनावट आहे असे वाटते

असं म्हणून आपणही हे आणखी पसरवत आहात

छानच