त्रिशंकुच ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in काथ्याकूट
1 Nov 2010 - 3:23 pm
गाभा: 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १०७ पैकी १०६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

शिवसेना-३१,
भाजप-९
राष्ट्रवादी-१५
काँग्रेस-१५,
मनसे-२६,
अपक्ष-११

चित्र जवळपास स्पष्ट आहे.
महापालिकेत शेवटी "त्रिशुंक" परिस्थीती निर्माण झाली आहे.

आता शक्य सोल्युशन्स असे आहेत.
राष्ट्रवादी + काँग्रेस = ३० / ३१
सेना-भाजपा = ४० / ४१
मनसे = २६ / २७
इतर = ११

सरकार बनवण्यासाठी हवे आहेत किमान ५४ नगरसेवक.
मग उपलब्ध शक्यता अशा बनतात किंवा ह्यातले काहीच शक्य नाही असे वाटते.

१. काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे ( बाहेरुन पाठिंबा ) = ५६ / ५७
२. मनसे चे सरकार + राष्ट्रवादी - काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा = किमान ५६

आता बाकीचा हिशोब :
सेना भाजपाला जरी सगळ्या अपक्षांनी ( पक्षी : इतर ) पाठिंबा दिला तरी त्यांची गाडी ५२ च्या पुढे जात नाही.
आता राहता राहिले मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस.
मग इथे तिसारा पर्याय येऊ शकतो तो म्हणजे ..... पुणे फॅक्टर
३. सेना + राष्ट्रवादी + भाजपा ( बाहेरुन पाठिंबा ) + इतर = किमान ५६ ... इतरांची गरज नाही.

काय शक्यता वाटते ?
१. "मनसे" ह्यावेळी किंगमेकर बनणार की स्वतःच खुर्चीवर बसणार ?
२. मनसेला रोखण्यासाठी सेना-भाजपा-राष्ट्रवादी अशी मोट बांधली जाणार का ?

येऊद्यात आपली मते.
मी अजुन जराश्या सवडीने सविस्तर खरडेनच :)

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

1 Nov 2010 - 3:26 pm | अमोल केळकर

सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन

अमोल केळकर

प्रचेतस's picture

1 Nov 2010 - 3:33 pm | प्रचेतस

कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करा. :)

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 3:36 pm | छोटा डॉन

राष्ट्रपती राजवट ?

अहो ती महानगरपालिका आहे, तिथे कशी राष्ट्रपती राजवट लागता येईल ?

फार्फार तर फेरनिवडणुका घेता येतील.
लेट्स सी काय होते आहे ते.

प्रचेतस's picture

1 Nov 2010 - 3:40 pm | प्रचेतस

घटनेत बदल करून महापालिका कायद्यात पण राष्ट्रपती राजवटीचा अंतर्भाव करता येईल. ;) नाहीतरी बदल हा जीवनाचा स्थायीभावच आहे.

आंबोळी's picture

1 Nov 2010 - 3:58 pm | आंबोळी

घटनेत बदल करून महापालिका कायद्यात पण राष्ट्रपती राजवटीचा अंतर्भाव करता येईल. नाहीतरी बदल हा जीवनाचा स्थायीभावच आहे.
सहमत!
निदान गेलाबझार राज्यपाल राजवट तरी आणा.... तशी सोय नसेल तर घटना दुरुस्ती करून सोय करून घ्या.

राज्यपाल राजवट नसते.
पण अशा अराजकीय स्थानीक स्वराज्य संस्थात शासनाचा प्रतिनीधी ( प्रशासक ) नेमला जातो
तो आयुक्त दर्जाचा असतो.

मी-सौरभ's picture

2 Nov 2010 - 6:54 pm | मी-सौरभ

चोता दोन यांची राजवट कुठेही येउ शकते मग कडोंम (अनुस्वार बरोबर आहे) मधे का नाही. :)

निखिल देशपांडे's picture

1 Nov 2010 - 3:33 pm | निखिल देशपांडे

सर्व प्रथम ११ निवडुन आलेल्या अपक्षांपैकी ७ हे शिवसेना पुरस्कृत असल्याचे आत्ताच ऐकले..
म्हणजे
शिवसेना ३२
+
भाजप ९
+
शिवसेना पुरस्कृत अपक्ष ७
=४८
बाकी मनसेला २५ जागा म्हणजे उत्तम मुसंडी मारली आहे. आता शिवसेनाला सत्तेत येण्यासाठी घोडाबाजार करण्याशिवाय पर्याय दिसत नाहीच.

कॉग्रेस+ राष्ट्रवादी+मनसे हे समीकरण शक्य वाटत आहे.

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 3:39 pm | छोटा डॉन

मी वर लिहले आहेच की.
समजा सगळ्याच्या सगळ्या "इतर" जणांनी सेनेला पाठिंबा दिला तरी मॅजिक फिगर गाठली जात नाही.
टोटल बसते आहे ४१+ ११ = ५२, बाकी कमी पडलेले २-३ जण कुठुन आणणार ?

घोडाबाजार करुन तरी काय फायदा ?
ते जर राष्ट्रवादी / काँग्रेस / मनसे मधुन आणायचे म्हटले तर आख्खा पक्षच फोडायला लागेल.
नायतर "पक्षांतरबंदी कायद्याचा" झटका बसुन आहे ते गमवायची पाळी त्या नगरसेवकांवर येईल.

>>कॉग्रेस+ राष्ट्रवादी+मनसे हे समीकरण शक्य वाटत आहे.

माझे मत "सेना + राष्ट्रवादी + भाजपा ( बाहेरुन ) " ह्याला.

- छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

1 Nov 2010 - 3:46 pm | निखिल देशपांडे

माझे मत "सेना + राष्ट्रवादी + भाजपा ( बाहेरुन ) " ह्याला.
हेही होउ शकते नाही असेच नाही..
अंबरनाथ पॅटर्न ची शक्यताही नाकारता येत नाही.
बाकी सध्या आय बि एन लोकमत म न से च्या २५ जागा दाखवत आहे. बाकी सर्व ठीकाणी २६ दाखवत आहे. नक्की आकडा काय आहे???

श्रावण मोडक's picture

1 Nov 2010 - 3:58 pm | श्रावण मोडक

बाकी सध्या आय बि एन लोकमत म न से च्या २५ जागा दाखवत आहे. बाकी सर्व ठीकाणी २६ दाखवत आहे. नक्की आकडा काय आहे???

तिथेच जाऊन चौकशी कर की. काय एक-दोन जिने चढायचे किंवा उतरायचे. किंवा लिफ्ट असेलच. हाकानाका!!!

निखिल देशपांडे's picture

1 Nov 2010 - 4:08 pm | निखिल देशपांडे

आता ऑफिस बदलेले आहे.. त्यामुळे जिने चढुन माहिती मिळणार नाही.

असो फायनल आकडा २७ आहे :-)

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 4:15 pm | छोटा डॉन

फायनल आकडा नाही मालक.
राष्ट्रवादीच्या १५ चे १४ झाले आहे म्हणुन मनसे १ ने वाढले आहे.
तुर्तास निकाल १०६ जागांचाच माहित आहे, अजुन १ पेंडिंग आहे.

निखिल देशपांडे's picture

1 Nov 2010 - 4:18 pm | निखिल देशपांडे

नाही हो..
१०७/१०७
कॉग्रेस १५
राष्ट्रवादी १४
शिवसेना ३१
भाजपा ९
मनसे २७
अपक्ष ११

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2010 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll

बरोबर. गेल्या निवडणूकीत भाजपाला १६ जागा होत्या ज्या आता ९ झाल्या आहेत. तसेच शिवसेनेला ३० जागा होत्या त्यांच्या ३१ झाल्या आहेत. म्हणजे मनसेने शिवसेनेला नाही तर उलट भाजपलाच खाल्लं आहे. :)

प्रचेतस's picture

1 Nov 2010 - 3:44 pm | प्रचेतस

शिवसेना + मनसे असा अंबरनाथ पॅटर्न पण येउ शकेल. शेवटी युद्धात, प्रेमात आणि 'राज'कारणात सर्वच क्षम्य.

अवलिया's picture

1 Nov 2010 - 3:44 pm | अवलिया

सत्तेवर कोण येईल, महापौर कुणाचा होईल यापेक्षा मला अतिशय महत्वाची वाटणारी बाब म्हणजे "मराठी फॅक्टर" !

जे कुणी मराठी विरोधात किंवा डावलुन किंवा मराठी मुद्याकडे कानाडोळा करत होते त्यांना मराठी जनतेने हिसका दाखवला आहे हे निश्चित आहे.

बीजेपी गुजरातेत गुज्जु, कर्नाटकात कन्नडीगा बनते पण महाराष्ट्रात राष्ट्र मोठे असा नारा देते... दिला फटका ! करा आता पुनर्विचार आपल्या धोरणांचा नागपुरातल्या गल्ल्याबोळात ! जय हो !

कॉग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल काय बोलायचे .. नकोच !त्यांचे वरती बसलेले करतील विचार ! न करतील तर जास्त चांगले.. :)

आता मनसे आणि शिवसेना या दोघांपैकी मला कुणाचेही विशेष प्रेम असे नाही आणी द्वेष नाही. मराठीचा मुद्दा घेत जो लढेल त्याला माझा पाठिंबा असतो... मग तो कूणीही असो. पण मराठीचा जो द्वेष करेल त्याला मी पाठींबा देत नाही.

इथे मराठी म्हणजे केवळ मराठी भाषाच नाही तर एकंदर मराठी माणसे, जनजीवन, संस्कृती, पोटापाण्याचे धंदे वगैरे वगैरे... असो. विचारवंत याला नीच मानसिकता आणि प्रवृत्ती म्हणतात. म्हणेनात बिचारे... ! आपल्याला माहीत आहे आपण काय करत आहोत आणि काय नाही ! संपले !

ज्या कुणाला मराठीचा द्वेष करायचा असेल त्यांनी तो आता जास्त प्रमाणात करावा ! कारण मराठी मुद्द्याला पाठींबा मिळतो हे पहाताच सत्तेला लालचावलेली आणि यावेळेस सत्तेपासुन दूर गेलेली मंडळी मराठीचा मुद्दा हातात घेतील.. तेव्हा विचारवंतानी नाही करायचा तर कुणी करायचा मराठी लोकांचा द्वेष? काय खरे ना? असो. जास्त मराठी बद्दल बोललो तर जगभरातील विचारवंतांच्या डोक्यात अणूबॉम्ब फुटतील ! :)

या निमित्ताने मी सर्व मराठी बांधवांचे अभिनंदन करतो !!

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

अमोल केळकर's picture

1 Nov 2010 - 4:20 pm | अमोल केळकर

सहमत. प्रतिसाद आवडला :)

अमोल

प्रवक्ता नाही पण ..

जे बोलणे थोड्या वेळापुर्वी फोनवर झाले ते असे आहे.

सेना (कार्यकारी संपादक , अजुन दुसर कोण असणार . ) आणी मनसे एकमेकांशी संपर्क करत आहे(११ पैंकी ९जण ही संपर्क करत आहे आहेत)
...कदाचित बाकी सर्व ऊद्या जाहीर होईल(३१+२६) +

तिकडुन जो निर्णय बाळासाहेब घेतील त्याला शिवसैनिक पुर्ण (आतुन जळ-जळत का व्हायना ) पाठिंबा देतील अशी आशा आहे. तिच गत मनसैनिकांची होणार आहे असे दिसते...

देखते हय !!(शेवटी निर्णय होण्यास बराच वेळ जाणार आहे असे दिसते आहे.)

सेनेनीही (दोन्ही) जरा राजकारण केले तरी मला हरकत नाही.

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 3:48 pm | छोटा डॉन

>>...कदाचित बाकी सर्व ऊद्या जाहीर होईल(३१+२६)
खल्लास !!!
ह्याहुन उत्तम अजुन काय असेल ?
असे झाले तर आम्हाला सर्वात जास्त आनंद होईल.

>>सेनेनीही (दोन्ही) जरा राजकारण केले तरी मला हरकत नाही.
+१, सहमत.

- छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

1 Nov 2010 - 3:55 pm | निखिल देशपांडे

झाले तर उत्तमच आहे.. घोडेबाजार, तोडफोड किंवा पुर्ननिवडणुकांपेक्षा हा निर्णय मला आवडेल.

त्याला शिवसैनिक पुर्ण (आतुन जळ-जळत का व्हायना ) पाठिंबा देतील अशी आशा आहे. तिच गत मनसैनिकांची होणार आहे असे दिसते...

अशा निर्णयात या कार्यकर्त्यांची बिचार्‍यांची अवस्था वाईट होणार.

लेट्स वेट अ‍ॅण्ड वॉच

प्रचेतस's picture

1 Nov 2010 - 4:03 pm | प्रचेतस

त्याला शिवसैनिक पुर्ण (आतुन जळ-जळत का व्हायना ) पाठिंबा देतील अशी आशा आहे. तिच गत मनसैनिकांची होणार आहे असे दिसते...
शिवसैनिक आणि मनसैनिकांनाही आतून उद्धव-राज मनोमिलन हवेच असणार.
खरेतर सत्तेसाठी तरी राज-उद्धव यांनाच आतून जळतजळत का होईना पण एकत्र यावेच लागेल. अशाने जनांच्या मनातलीही त्यांची प्रतिमा उजळूनच निघेल. पुन्हा भांडायला पुढील वर्षाची बृहंमुंबई महापालिका निवडणूक आहेच.

आंबोळी's picture

1 Nov 2010 - 4:13 pm | आंबोळी

खरे म्हणजे काँग्रेस - राष्ट्रवादी हे एकमेकाला लाथा हाणत का होइना सत्तेला चिकटून रहातात.... एकमेकाशी भांडतात पण सत्तेसाठी एकत्र येतात तर मग २ सेनांना एकत्र यायला काय प्रॉब्लेम आहे?
खर बघायला गेल तर प्रॉब्लेम आहे. काँग्रेस मधुन कोणी बाहेर पडला तर त्याचा पक्षपातळीवर फार गाजावाजा करत नाहीत ... फार कटूता वाढवत नाहीत आणि त्यामुळेच परतीचा मार्ग उघडाच रहातो... त्याच्या उलट सेनेतून बाहेर पडणारा हा गद्दार असतो... आणि त्याला त्याच पद्धतीने वागवले जाते . पर्यायाने इतकी कटूता वाढते की परतीचे सर्व मार्ग बंद होतात..... (भुजबळ - ठाकरे नुसती कटूता कमी व्हायला १५ पेक्षा जास्त वर्ष गेली.) तेच कॉग्रेसवाला दर २-३ वर्षामधे आत्-बाहेर आरामात करु शकतो....

याच धाग्यात कुणीतरी म्हटल्याप्रमाणे २न्ही सेनेनी अता राजकारण करायला सुरवात करावी हेच खरे.

काँग्रेस्-राष्ट्रवादीच्या फॉर्म्युला वापरून दोन्ही सेना एकत्र याव्यात याला मत देतोय...

सिद्धार्थ ४'s picture

1 Nov 2010 - 3:56 pm | सिद्धार्थ ४

हे चित्र अतिशय संताप जनक आहे. मला अजून समाजात नाही कि लोक का नाही मतदान करत? त्रिशंकू परिस्थीती हि जनतेलाच मारक आहे. जर बहुमत नसेल तर कोणीच चांगले काम करू शकत नाही. ( इथे प्रश्न कॉंग्रेस चांगले कि शिवसेना भाजप हा नाही) मी स्वत कल्याण ला राहतो आणि माझ्या पुरते म्हणायचे तर मला म. न. से सत्ते वर आलेली (पूर्ण बहुमतात) बघायला आवडली असती.
गेली बरेच वर्ष कल्याण शहराची जी वाट लागली आहे ती अतिशात भयंकर आहे. माझ्या लहान पणी मी कधी शुक्रवार सोडून भारनियमन बघितले नाही. २४ तास महानगर पालिकेच्या नळाला पाणी असायचे. आज दिवसाची सुरवात कॅण्डल टी अंनि शेवट कॅण्डल डिनर ने होतो. दिवसातून फक्त १ ते १.५ तास पाणी येते ते सुधा कमी दाबाने.

मराठमोळा's picture

1 Nov 2010 - 4:06 pm | मराठमोळा

सरकार कोणतेही आले तरी क.डो. मधल्या रस्ते, वीज, पाणी, उघडी गटारे, कचरा व्यवस्थापन .etc यांचे प्रश्न सुटले म्हणजे मिळवली.

सूर्य's picture

1 Nov 2010 - 4:16 pm | सूर्य

कोणतेही सरकार येऊद्या पण प्रश्न सोडवा म्हणजे झाले.

- सूर्य.

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 4:25 pm | नितिन थत्ते

सध्या मी मुख्यमंत्री बनण्याच्या प्रयत्नात असल्याने कल्यान डोंबिवलीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. :)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Nov 2010 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार

थत्ते चाचा आमचे 'आदर्श' आहेत :)

बाकी पुणेकर असल्याने आमचे जग पुण्यापर्यंतच अस्तित्वात आहे.

धमाल मुलगा's picture

1 Nov 2010 - 4:38 pm | धमाल मुलगा

मला ए.के.हंगल ह्या नावाने एखादा फ्लॅट मिळू शकेल का परा? देणंघेणं वगैरे भेटल्यावर ठरवू.

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 4:41 pm | छोटा डॉन

ओ धमालराव, ते "आंतरजालिय शहिदां"च्या नावाने एखादी आरक्षित जागा मिळाली तर तुमची त्यात नक्कीच सोय करु.
तुर्तास गडबड नका करु, इथे लै जणांचे अर्ज आले आहेत ;)

- छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 4:45 pm | नितिन थत्ते

धमालराव तुम्हाला ही धमकी बरं का !!!!
तुम्ही लवकरच आंतरजालीय शहीद होणार बहुधा. :)

धमाल मुलगा's picture

1 Nov 2010 - 4:47 pm | धमाल मुलगा

मी घाबर्लो!
:D

मुख्यमंत्रीपदाच्या रांगेतल्या व्यक्तिच्या तोंडी असली भाषा शोभत नाही

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 4:53 pm | नितिन थत्ते

अहो, धमकी मी नाही, बाहेरून (पक्षी: बंगळूराहून) आलेल्या राजकीय निरीक्षकांनी दिली आहे. :)

बरं ते आमदार किती झाले आतापर्यंत?

त्याची नका चिंता करु.. फक्त हात मोकळा सोडा... !!

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 5:02 pm | छोटा डॉन

थत्तेचाचांनी मुख्यमंत्री होण्यास माझा ठाम विरोध आहे.
त्यांच्याविरुद्ध माझ्याकडे 'ट्रकभर' पुरावे आहेत.

थत्तेचाचांनी त्यांच्या अनुभव पक्षासाठी वापरावा अशी मी त्यांना विनंती करतो, त्यांनी पक्षवाढीच्या कामात स्वतःला गुंतवुन घ्यावे अशी मी विनंती करतो.
आता जरा तरुण रक्ताला संधी द्यावी, तुमचे 'पद' नको तर 'मार्गदर्शन' आम्हाला महत्वाचे आहे.

- छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 5:12 pm | नितिन थत्ते

अहो डान्राव, तुमचं काय ते पण बघू की आपण !!!!
तुम्हाला काही भूखंड वगैरे लागला तर सांगा. नाहीतर असं करूया. भूखंडांचे व्यवहार तुम्हालाच पहायला सांगू.
(ट्रकभर पुरावे आहेत असे म्हणालात म्हणून तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळेत अशी स्वप्ने पहायचे सोडा).

परिकथेतील राजकुमार's picture

1 Nov 2010 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही लवकरच 'एका अज्ञात आंतरजालीय शहिदाने सोडलेल्या धुराचे भाषांतर' लिहायला घेत आहोत.

धन्यवाद.
कलोभ

अवांतर :- महाराष्ट्रका नेता कैसा हो ? थत्ते चाचा जैसा हो

असुर's picture

1 Nov 2010 - 4:27 pm | असुर

१.
पुणे पॅटर्नला आता इतक्या शिव्या देऊन झाल्या आहेत की पुणे पॅटर्न परत येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सेना + राष्ट्रवादी + (भाजपा बाहेरुन पाठींबा) होणे नाही!

२.
अंबरनाथ पॅटर्न हा स्थानिक उस्फूर्ततेचा परिणाम आहे ज्याची शक्यता कल्याण-डोंबिवलीमध्ये सुतरामही नाही! त्यामुळे सेना + मनसेचा काही चान्स नाही!

३.
काँग्रेस + राष्ट्रवादी + (राष्ट्रवादीच्या आग्रहाखातर 'मनसे' बाहेरुन पाठींबा) ही मोट जमणे अवघड आहे, पण अशक्य नाही! राज ठाकरे आणि बारामतीकर यांचे परस्परसलोख्याचे संबंध पाहता हे होऊ शकेल, पण टिकायचे चान्सेस फारच कमी! त्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस याना मनसेचाच पाठींबा मिळवावा लागेल, कारण घोडेबाजार होऊन सगळेच 'इतर' सोबतीला आले तरी फायदा शून्य आहे!

४.
सेना + भाजपा + (भाजपाच्या आग्रहाखातर 'मनसे' बाहेरुन पाठींबा) हे समीकरण जमू शकते! याचीच शक्यता मला जास्त वाटते, कारण यामुळे मनसेला एका तरी महापालिकेत किंगमेकर होता येईल, प्लस बाहेरुन पाठींबा असल्याने स्वत:ची रोखठोक भुमिकासुद्धा जपता येईल! इथेही सगळे 'इतर' सोबतीला आले तरी फायदा शून्य आहे!

५. 'इतर' लोकांना फारसा आवाज नाही! कारण त्यांचा संपूर्ण पाठींबा घेऊनही कोणालाही फायदा नाही!

३, ४ आणि ५ पर्यायांमुळे मनसेची किंगमेकर बनायची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. कारण संख्याबळात तोच एक पक्ष आहे जो बाकी नौका तारुन नेऊ शकतो!
दुसर्‍या पर्यायाची शक्यता फारशी नसली तरी कल्याण-डोंबीवली सारख्या ठिकाणी हे झाले तर एक नवाच पर्याय उर्वरीत महाराष्ट्रासाठी यापुढे निर्माण होऊ शकतो!
'भाजपा'ला या सर्व खेचाखेचीत काही विशेष स्थान नसल्याने सेनेबरोबर त्यांची फरफट स्वाभाविक आहे.
.
.
त्यामुळे आपले मत पर्याय ४ ला!!

--असुर

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 4:32 pm | छोटा डॉन

एवढे सगळे असले तरी मनसे "किंग" का नसावा असा प्रश्न येतो आहे.

२.५ - २.५ वाटुन घ्यायला काय हरकत आहे ? :)
मनसे ह्यावेळी 'तोडपाणी' न करता एक तर सत्ता घेईल किंवा विरोधात बसुन रान उठवेल असे वाटते.

अर्थात मनसेने जर इरोधात रहायचे म्हटले तर मल सेना / भाजपा / रा.कॉ / कॉ ह्या ४ पैकी किमान ३ जणांना एकत्र यावे लागणार आहे.
बसा तिच्यायला मज्जा बघत ;)

अवांतर : "पुणे पॅटर्न" ला सोडचिठ्ठी विधानसभा निवडणुका आल्या म्हणुन दिली होती, शिव्यांचा राजकारणावर परिणाम होत नसतो, कुठल्याच ;)

- छोटा डॉन

मनसे जन्माला आल्यापासून विरोधातच आहे. आणि बाहेरुन पाठींबा देण्यात एक हुशारी अशी आहे की लोकोपयोगी कामं झाली तर क्रेडीट मिळू शकते, नाही झाली तर पाठींब्याच्या जोरावर ती करवून घेता येऊ शकतील. तरीही काम होत नसेल तर पाठींबा काढून नैतिक बाजू लावून धरता येईल! विरोधात राहून किती वर्ष राहणार? मनसेला स्वत:ची प्रतिमा उजळवायची ही आयती संधी आहे.

अधिक, मनसेला स्वत:च्या पद्धतीने राज्य करायचे असेल तर ही मोट बांधायचे प्रकार उपयोगाचे नाहीत. त्याना स्वत:चेच बळ वाढवून आणि वापरुन सत्तेत यावे लागेल. स्वत:चे महत्व आणि नवनिर्माणाचे विचार ठाम राखायचे असतील तर मनसेने या धेडगुजरी सत्तेत उडी घेऊ नये. फार तर बाहेरुन पाठींबा द्यावा!!!

बाकी 'पक्षांतरबंदीचा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू होतो का' याबद्दल शंका आहे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा!

--असुर

सुहास..'s picture

1 Nov 2010 - 4:40 pm | सुहास..

सेना + भाजपा + (भाजपाच्या आग्रहाखातर 'मनसे' बाहेरुन पाठींबा) हे समीकरण जमू शकते! याचीच शक्यता मला जास्त वाटते, कारण यामुळे मनसेला एका तरी महापालिकेत किंगमेकर होता येईल, प्लस बाहेरुन पाठींबा असल्याने स्वत:ची रोखठोक भुमिकासुद्धा जपता येईल! इथेही सगळे 'इतर' सोबतीला आले तरी फायदा शून्य आहे! >>>

ही शक्यता ही नाकारता येत नाही ....

पुणे पॅटर्न हा ऑल ऑफ अ सडन घ्यावा लागणारा निर्णय होता...

पण ईथे मात्र ,जवळपास सर्व पक्षांना त्याबद्दल पुर्व-कल्पना होती. म्हणुन अर्थातच किमापक्षी त्यावर विचार झाला असावा. मनसेपुरतं बोलायच झाल तर ऑल ऑप्शन्स आर ओपन , (अर्थात ऊध्दव ठाकरेंच काही निगेटिव्ह सेन्टेस आले नाही तरच मनसे त्या पर्यायाचा विचार करेल याची मला शाश्वती आहे.)

असुर's picture

1 Nov 2010 - 5:01 pm | असुर

मनसेपुरतं बोलायच झाल तर ऑल ऑप्शन्स आर ओपन , (अर्थात ऊध्दव ठाकरेंच काही निगेटिव्ह सेन्टेस आले नाही तरच मनसे त्या पर्यायाचा विचार करेल याची मला शाश्वती आहे.)

+१

मनसे आणि सेनेमध्ये 'राजकीय' संबंध तोडून टाकावेत असा टोकाचा दुरावा नाही असे कायम चित्र आहेच! हे पक्ष एकत्र आलेलेच नाहीत हीच काय ती उणीव आहे. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांनी काही भडक आणि नकारात्मक भुमिका घेतल्या नाहीत तर हाच एक पर्याय समर्थ पर्याय आहे असे दिसते!

--असुर

प्रशु's picture

1 Nov 2010 - 5:40 pm | प्रशु

मस्तच...

श्रावण मोडक's picture

1 Nov 2010 - 6:08 pm | श्रावण मोडक

राजकारण न कळणाऱ्याचे हे मत आहे. ते तसेच घ्यावे.
दोन दिशा, दोन पर्याय: म्हणजे प्रत्येक दिशेत दोन-दोन पर्याय.
३१+९+(२६) + (१) = इतर दोघांची सत्ता, मनसेही आत. निर्णय मनसेने करायचा आहे. मनसेचा राजकीय शहाणपणा वादग्रस्त.
३१+९ (+२६) + (१) = इतर दोघांची सत्ता, मनसे बाहेरून, निर्णय मनसेने करायचा आहे. मनसेच्या या निर्णयामागील राजकीय शहाणपणा पुढील काळात न दाखवलेल्या तोंडाळपणावर अवलंबून असेल. कामाची हुकमत हाती राहू शकते. कामे करून घेऊन आपले नाणे सिद्ध करता येते, कामे न झाल्यास दोष दोघांवर ढकलता येतोच. त्यापुरते तोंड चालवत रहायचे.
२६+(३१+९) + (१) = मनसे सत्तेत, इतर दोघांच्या जोडीने. निर्णय इतर दोघांनी करायचा आहे. मनसेचे काही बिघडत नाही. दोघांना हा निर्णय करणे मुश्कील.
२६ (+३१+९) + (१) = मनसे सत्तेत. इतर दोघे बाहेरून. निर्णय इतर दोघांनी करायचा आहे. मनसेची पंचाईत. इतर दोघांना हा निर्णय महामुश्कील, पण राजकीय शहाणपणाचा ठरू शकतो. मनसेचे नाणे खणखणीत नसेल तर ते सत्तेत आल्यानंतर जितक्या गतीने सिद्ध होईल तितके एरवी नाही. कारण येथे जबाबदारी आहे. प्रश्न इतकाच की हा शहाणपणा आत्ताच दाखवावा लागेल इतर दोघांना.

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 6:17 pm | छोटा डॉन

म्हणजे थोडक्यात मनसेसाठी आता "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ... " अशी परिस्थिती येण्याचे चान्सेस आहेत असे दिसते आहे.

असो, चान्स तर आला आहे.
अवघड आहे पण चान्स नक्कीच आहे, बाकीचे सुखाने जगु देणार नाही हे ही तितकेच खरे.

- छोटा डॉन

असुर's picture

1 Nov 2010 - 7:24 pm | असुर

मनसे हा चान्स घेईल??

घेतला, तर किमान कल्याण-डोंबीवलीपुरतं तरी तोंड बंद ठेवून काम करावं लागेल! श्रामो म्हणाले तसंच, सत्तेमधील मनसे उजळ आणि वरचढ ठेरेल की नाही हे त्यांचा न दाखवलेला तोंडाळपणाच सिद्ध करेल!

आणि सेना-भाजपा हे नेहेमीचे सत्ताखेळाडू असा मनसेकडे एकाहाती तंबू देतील??? त्यानी तर आपापसातसुद्धा कधी असं केलं नाहीये! त्यामुळे मनसे एकटेच सत्तेत येणं जवळजवळ अशक्य वाटतंय!

डान्रावांचा हिशोब सांगतो ते "सेना + राष्ट्रवादी + भाजपा ( बाहेरुन ) " सुद्धा अतिशय अवघड आहे. असे करुन हे तीनही पक्ष मनसेला बाहेर ठेवायचा प्रयत्न करतील, तर ते मनसेच्या पथ्यावर पडाणारेच असेल. हे शक्य झालं तर मनसे हा मुख्य विरोधी पक्ष असेल, आणि मनसे विरोधात असताना सत्तेत राहणे म्हणजे सुळावरची पोळी होईल!

थोडक्यात, या त्रिशंकूमुळे मनसेचा जितका राजकीय फायदा दिसतो आहे, तितका बाकी कुणाचा नाही! आता फक्त मनसे स्वत: काय करतात ते पहायचे. :-)

--असुर

श्रावण मोडक's picture

1 Nov 2010 - 7:55 pm | श्रावण मोडक

थोडे आवश्यक. ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळं 'बाहेरून'चा अर्थ माझ्या उपरोक्त प्रतिसादापुरता स्पष्ट करणे गरजेचे. 'बाहेरून'चा अर्थ स्पष्टपणे बाहेरून. केंद्रात किंवा राज्यात सभापती किंवा सभागृह अध्यक्ष ही पदे अ-पक्षीय असतात आणि ती घेता येतात. पण इथे त्यास्वरूपात सभागृह नेता वगैरेही अपेक्षीत नाही. म्हणण्यापुरते बाहेरून, आणि दुय्यम का होईना, पण समित्यांची, प्रभाग समित्यांची सभापतीपदे मिळवायची हे अपेक्षीत नाही. जे आत आहेत, त्यांचीच माणसे मुख्य सभागृहात आणि त्यांचीच किंवा त्यात्या प्रभागानुसार बहुमतातील माणसे (मग ती बाहेरून पाठिंबा देणाऱ्यांचीही असतील, पण बहुमत त्यांचे स्वबळावर हवे, एरवी आत असलेल्यांच्या जोरावर नको) तेथील समित्यांवर असणे अपेक्षीत आहे.
थोडक्यात : 'बाहेरून' म्हणजे पदावर राहणार नाही, जाणार नाही हा (निदान बाळासाहेबांपुरता तरी) ठाकरी बाणा हवा. तसे झाले तरच मला या प्रतिसादात अपेक्षीत असणारा 'शहाणपणा' कळू शकेल.

असुर's picture

1 Nov 2010 - 8:05 pm | असुर

++!!!!

अगदी अगदी! एक नंबर पटलं!

श्रामो, मला एक शंका आहे. 'पक्षांतरबंदीचा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू होतो का' याबद्दल शंका आहे.
पक्षांतरानंतरही नगरसेवकाचे पद जात नाही असे कुठेतरी वाचले होते, पण संदर्भ हाताशी नाहिये.

तुम्हाला या पक्षांतरबंदीबद्दल काही माहीती आहे का? कारण जर हे असं असेल तर घोडेबाजाराला ऊत येणार नक्की!

--असुर

श्रावण मोडक's picture

1 Nov 2010 - 10:06 pm | श्रावण मोडक

माझ्या माहितीप्रमाणे, मूळ कायदा फक्त राज्याची विधानमंडळे आणि संसद यांना लागू होता/आहे. पुढे, किमान महाराष्ट्रात, बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. त्यानुसार स्थनिक स्वराज्य संस्थांमध्येही या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे/(कदाचित तरतुदीनुसार) काही कारवाया झाल्या. प्रामुख्याने विभागीय आयुक्तांकडे त्याविषयी तक्रारी झाल्याचे दाखले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांकडे अशा तक्रारी झाल्याचेही आठवते. पुढे सगळे मंत्रायलायत जाते. निर्णय टिकतात, फिरतात असे घडल्याचे अंधुक आठवते. पण या सगळ्या खेळात मुळात असे पक्षांतर करणाऱ्यांविरुद्ध पक्षप्रतोदाने तक्रार करणे, त्यासाठी वैध पक्षादेश असणे अशा गोष्टी गरजेच्या असतात. अनेकदा तसे होत नाही. स्थानिक साटेलोटेच महत्त्वाचे ठरते आणि मग अशा "पक्षांतरित" सदस्यांना पावनही करून घेतले जाते.

श्रामो, माहीतीबद्दल धन्यवाद!
मला त्यामुळेच शंका आहे की मनसेला डावलून बाकी पक्षांना काही करायचे असेल असेच काही करावे लागेल. आणि तसेही तत्व आणि आदर्श वगैरे गोष्टी हल्ली दुर्मीळ आहेत. त्यामुळे "जिथे माझा फायदा, तोच माझा कायदा" हेच तत्व अनुसरुन त्यालाच 'स्थानिक राजकारण' असे गोंडस नाव दिलंय! याला कुणीही अपवाद नाही हे विशेष! दिल्लीत एकमेकांचे गळे धरणारे लोक गल्लीत गळ्यात गळे घालून फिरतात हे पण मजेशीर आहे. दिल्लीतले गल्लीत नाही, गल्लीतले दिल्लीत नाही. सगळी आहे 'कूटनिती'!!!

--असुर

प्रिया देशपांडे's picture

1 Nov 2010 - 11:01 pm | प्रिया देशपांडे

हे मात्र खरे आहे.
कोकणात एका सेनेच्या नेत्याने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दोन नेत्यांना आंब्याच्या मोठ्या बागा विकल्या होत्या काही वर्शांपूर्वी. विधानसभेत मात्र ते एकमेकांचे शत्रु असायचे.

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार !!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Nov 2010 - 7:01 pm | परिकथेतील राजकुमार

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार !!

झी मराठी अ‍ॅवॉर्डस जास्ती बघत जाउ नका ;)

हो ना, रविवारी पाह्यलं त्याचा हँगओव्हर होता.

प्रिया देशपांडे's picture

1 Nov 2010 - 7:43 pm | प्रिया देशपांडे

विजयी उमेद्वारांचे अभिनंदन. मनसे आणि सेना खरोखरच एकत्र येतील? सामना मध्ये बाळासाहेबांनी राज ठाकरेंना बाळराजे टमरेलकर म्हंटले.राज ठाकरेंनी सेनावाल्यांना करवंटी का शेंदूर म्हंटले.
मनसेवाल्यांनी बाहेरून पाठिंबा द्यावा आणि कामे करुन घ्यावीत.

मनसेने फक्त शिवसेनेचीच कास धरावी,अन्यथा मराठीला तडा जाईल ह्यात शंका नाही.
अन्य सर्व पक्ष हे फक्त घाणेरडे राजकरण करुन आपला स्वार्थ साधायला बघतात.

त्या अन्य पक्षांना स्वःताला मराठी बोलवतच कस??

उपास's picture

1 Nov 2010 - 9:04 pm | उपास

सगळ्यांचीच कोंडी झालेय.. शिवसेनेने आणि मनसेने आधीच एकमेकांना जाहीर शिव्या दिल्या, आता एकत्र आले की सत्तेसाठी कोडगेपणाचा शिक्का बसणारच..
ह्यात एक म्हणजे मनसेने सत्तेत न जाता बाहेरुन किंवा विरोधात राहून वचक ठेवला ना तर पुढे मुंबई महानगरपालिकेत फायदा होऊ शकतो.. पण एकदम बघण्यालायक ठरणार आहे आता सगळ्या पक्श्याच्या हालचाली..
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन..
प्रश्न :
१. मनसे दुसर्‍या क्रमांकावर किती ठिकाणी आहे?
२. अशी किती ठिकाणी आहेत की मनसे फॅक्टर मुळे काँग्रेसने फायदा उचलल्ला?

मराठीचा ठसा उमटला हे नक्की.. हे ही नसे थोडके!

तिमा's picture

1 Nov 2010 - 9:13 pm | तिमा

दोघांनी एकमेकांच्या टमरेल व वरवंट्याला शेंदूर लावून एकत्र पंगतीला बसावे. पांच वर्षांत टमरेलांचे कमोड होतील आणि वरवंट्याचे पाटे!!!

अप्पा जोगळेकर's picture

1 Nov 2010 - 9:41 pm | अप्पा जोगळेकर

इकडे सगळे जण राजकीय फायद्या-तोट्याची गणितं मांडताहेत. पण या निकालामुळे कल्याण-डोंबिवलीच्या डोकेदुखीत भर पडली आहे त्याचं काय? एक तर सत्ता परिवर्तन झालं नाही . कल्याण-डोंबिवलीत आधीच उन्मत्त असलेली शिवसेना आता आणखीनच उन्मत्त होईल. (जसे सध्या केंद्रात झाले आहे. आपण काहीही केले तरी कोण काय उपटणार? सत्ता आमचीच अशी मस्ती काँग्रेसला आली आहे. कल्याण -डोंबिवलीत युतीची हीच मेंटॅलिटी आहे. पंधरा वर्ष सत्ता भोगली, शहराचा सत्यानाश केला आणि वरती ८५% कामं पूर्ण केल्याचे दावे. खाकी चड्डीवाल्यांची मात्र फाटली हे छान झालं. ) मनसे हा एक नविन पर्याय म्हणून आजमावायला खरोखरच चांगला होता. राज ठाकरे यांचा जाहीरनामा पण खरोखरच चांगला होता. रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि नविन बांधकामांना बंदी हे तर खूपच आकर्षक होतं. आणि ते स्वतः म्हणतात त्याप्रमाणे एक संधी द्यायला काहीच हरकत नव्हती. बरं, मनसे नाही तर नाही निदान काँग्रेस-राष्ट्रवादीला तरी मेजॉरिटी मिळाली असती तरी चाललं असतं. सत्ताबदल फार आवश्यक होता. सव्वीस वर्षांमध्ये मी डोंबिवलीची आत्ताएवढी वाईट अवस्था कधीच पाहिली नाही. अख्खी डोंबिवली जणू फुटली आहे. इतकी वाईट अवस्था असूनही फक्त ४६% मतदान याला काय म्हणावं. आता फक्त देवावर हवाला ठेवून दिवस काढायचे, दिवस कसले वर्षं. ५ वर्ष. तेच ते फुटलेले रस्ते, घाणीचं साम्राज्य, डास,रोगांच्या साथी,प्रचंड प्रदूषण, बेसुमार बांधकामं आणि अक्राळविक्राळ लोकसंख्या. एवढं सगळं असून जागेचा भाव अवघा ५००० रुपये प्रति स्क्वेअर फूट. परमेश्वरा आता तूच आमचा सहारा.
आता उद्या म्हा. ठाकरे काय बकतो ते पाहायचं?

प्रिया देशपांडे's picture

1 Nov 2010 - 10:19 pm | प्रिया देशपांडे

पण ह्यामुळे जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्यावर वचक असनार नाही का? तुम्च्यापैकी(मनसे सोडुन) नीट सत्ता राबवायला कोणीही लायक नाही असेच क्.डों.करांना सांगायचे असावे.

इनोबा म्हणे's picture

1 Nov 2010 - 10:53 pm | इनोबा म्हणे

सहमत आहे.

सुहास..'s picture

2 Nov 2010 - 1:44 am | सुहास..

अप्पा !! एक मिनीट !!

शांत हो जरा , अजुन धिंगाणा बाकी आहे ,

अख्खी डोंबिवली जणू फुटली आहे. इतकी वाईट अवस्था असूनही फक्त ४६% मतदान याला काय म्हणावं. आता फक्त देवावर हवाला ठेवून दिवस काढायचे, दिवस कसले वर्षं. ५ वर्ष. तेच ते फुटलेले रस्ते, घाणीचं साम्राज्य, डास,रोगांच्या साथी,प्रचंड प्रदूषण, बेसुमार बांधकामं आणि अक्राळविक्राळ लोकसंख्या. एवढं सगळं असून जागेचा भाव अवघा ५००० रुपये प्रति स्क्वेअर फूट. परमेश्वरा आता तूच आमचा सहारा. >>>

मग बाकीचे ५४% कुठे गेले आणी ४६% पैंकी आपण बोलणारे मराठी की अमराठी ? मग तुला डिटेल्स देतो...

अवांतर : वाश्या, ईथ लिहुन झाल ना !! जा आता मस्त भैय्याच्या हातची पांणट पाणी-पुरी खाऊन ये बर !!

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Nov 2010 - 9:43 am | llपुण्याचे पेशवेll

अवांतर : वाश्या, ईथ लिहुन झाल ना !! जा आता मस्त भैय्याच्या हातची पांणट पाणी-पुरी खाऊन ये बर !!

हा हा हा.. खल्लास. आणि हे ही म्हणतो भैय्या नसेल तर मुंबई बंद पडेल वगैरे वगैरे.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Nov 2010 - 9:41 am | llपुण्याचे पेशवेll

डोंबिवलीत पूर्णपणे या टर्मला युतीची सत्ता होती का? मी तर काल टिव्हीवर ऐकले की या वेळेला पहीली अडीच वर्षे राष्ट्रवादी - काँग्रेस + अपक्ष अशी सत्ता मनपात होती. नंतर शिवसेनेने अपक्ष फोडून सत्ता मिळवली . गेल्या वेळेला २० अपक्ष निवडून आले होते. या वेळेला ११ आले आहेत. जाणकार अधिक प्रकाश टाकतील काय?

अप्पा जोगळेकर's picture

2 Nov 2010 - 2:45 pm | अप्पा जोगळेकर

अडीच वर्षे राष्ट्रवादी - काँग्रेस + अपक्ष अशी सत्ता मनपात होती
माहिती बरोबर आहे.

तिमा's picture

2 Nov 2010 - 7:53 pm | तिमा

अहो, अनेक वर्षांपूर्वी इथे जनसंघाची सत्ता होती. तेंव्हाही ओरपत होते सगळे. बाकीच्या देशात काँग्रेस जावी असे त्याकाळी आम्हाला वाटायचे. पण ते जाउन हे जनसंघी तरी काय दिवे लावणार असे डोंबिवलीचा ग्रामपंचायतीचा कारभार बघितल्यावर वाटायचे.

बरं झालं पूर्वीच डोंबिवली सोडली ते.