एका डॉक्टरच्या कविता: दोन: एक संवाद
एका डॉक्टरच्या कविता: दोन:
एक संवाद.....
थोड़ी मोकळी हवा घ्यावी म्हणून
बाहेर आलो, तो तिथं तू
दबा धरून बसलेला, वाट पाहात
सरकत होतास हळू-हळू
माझ्या पेशंट कड़े!
वैरी कां असेनास
पण आहे पुरातन ओळ्ख आपली
आपल्या लढाईत
अंतिम पराजय,
माझाच! आमचाच!
शुश्रूत, चरक, हिप्पोक्रेटीस, पाश्चर, नाईतिन्गेल
किती म्हणून नाव घ्यायची?
सर्वांच्या नशिबी हेच
आपल्याच समोर
आपल्याच वै-याचा विजय!
तरीही आम्ही लढणारच
कारण आम्ही आहोत आशावादी
नष्ट केलय तुझ्या कैक दोस्तांना
नामोनिशाण नाही आता त्यांचं !
आहेत आता आमच्याही जवळ
धारदार शस्त्र, लाधान्या साठी तुझ्याशी
तुझ्या काही दोस्तांना
बांधलय आम्ही दावणीला
राबताहेत ते छावणीत आमच्या
आमच्यासाठी !
अरे! चाललास कुठे?
माहित नाही तुला?
मी आहे इथं, लढायला तुझ्याशी?
चल, मी येतो बरोबर,
त्याच्या ऐवजी, चालेल?
नको म्हणतोस? Thank You !
पण, माहीत आहे मला
तू येशील परत
उद्या, कदाचित आजच
थोड्याच वेळात
हा विजय आहे क्षणिक
महायुद्ध अजून आहे दूरच
मीही करतो तयारी,
त्या महायुद्धाची तुझ्याशी
नसेन मी तेंव्हा, कदाचित
पण असतील योद्धे,
माझ्या सारखे ,
नसेन मी तेंव्हा, कदाचित
पण असतील योद्धे,
माझ्या सारखे , पण तू नसशील !
मी वाट पाहतोय ,त्या दिवसाची
जो येणार आहे ,कधीतरी,
नक्कीच !
-अशोक
स्तुत्य !! एका डॉक्टरच्या
छान कविता डॉक्टर.
डॉक्टर
अतिशय छान डॉ. तुमची मागील ही
चांगली आहे कविता. व्हेरी
छान
कविमनाचे डॉक्टर!
कविता खूप आवडली .
छान कविता
धनंजय.... तुमची प्रतिक्रिया
छान कविता आहे.
धन्यवाद !
पुर्वीसारखेच अप्रतिम लि़खाण.
वा चान चान! - प्रा. डॉ. सदा