अक्षता.. भाग १

निरंजन's picture
निरंजन in जनातलं, मनातलं
20 Oct 2010 - 6:50 pm

=====================================================

किती दिवसांनी मी आज गावाला जात होतो. किती बर झाले असतील दिवस ? १० वर्ष सहज, कदाचित जास्तसुद्धा असतील.

मुंबईला आल्यापासुन वेळच मिळाला नव्हता. १० वी गावाला झाल्यावर जो मी मुंबईला गेलो तो आज उगवत होतो.
गाव तसाच होत. बदललेलाच नव्हत. बदलण्यासारख त्या गावी काहि नव्हतच म्हणा. नाहि म्हणायला काही मोठी माणास म्हातारी झाली होती आणि काहि म्हातारी गचकली होती. काही घरांची डागडुजी झाली होती तर काही ओसाड झाली होती.

महाद्याचा बाप मशेरी लावत बाहेर बसला होता. मला पहाताच तसाच मशेरीच्या हातानी आणि तोंडानीच बाहेर आला.

"कधी आलास ?"

आता माझ्या हातात बॅग, मळलेला आणि दमलेला चेहरा, गावात काय बदललय हे जाणुन घेणारी नजर, सर्व सांगत होत की मी आत्ताच आलोय. मी फ़क्त हासलो. तस त्याला सुद्धा माझ्या उत्तराची आपेक्षा नव्हतीच.

मी तसाच काकाच्या घरात शिरलो. "काका" हाक मारली.

झोपलेल्या काकानी कुस बदलली. "आलास ? बस " माझ स्वागत संपल.

काकुनीच विचारपुस केली, चहा पाणी दिल.

जेवणाला आवकाश होता. जरा गावात फ़ेर फ़टका मारला. बर वाटल. जेवण काय असेल याचाच विचार करत घरी आलो, मटणाची सागुती आणि भात. वा ! गावच्या मटणाची आणि काकुच्या स्वैपाकची चवच काही और होती.

जेवण झाल्यावर मस्त झोप लागली. जाग आली तीच संध्याकाळी. आकाशात थोडे ढग होतेच. संधीप्रकाश पडला होता. अस आकाश तांबड झाल की आमचा गाव फ़ारच छान दिसतो. तांबड्या मुरमाचे रस्ते, घरांची कौल तांबडी, आणि त्यावर हा तांबडा रंग. मला अशा वेळी बाहेर फ़िरायला खुप आवडत.

मी काकुला "बाहेर जातो ग !" अस सांगुन रस्त्यावर आलो. लांब लांब पावल टाकत चाललो होतो. माझ्याच धुंदीत होतो मी.

किती वेळ चाललो काय माहिती. गावाच्या वाहेर आलो होतो.सुर्य अस्ताला जात होता. गावाला सुर्यास्त झाला की लगेच काळोख होतो. थोड्याच वेळात काळोख झाला. आणि मी भानावर आलो कुठे होतो मी ? आधी मी आहे कुठे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आतापर्यंत मंबईच्या दिव्यांना सरावलेल्या डोळयांना हळु हळु या अंधाराची सवय झाली.

मी सभोवार नजर फ़िरवली आणि मी कुठे आहे याचा मला हळु हळु अंदाज आला. वडारवाडी केव्हाच ओलांडुन मी पुढे अलो होतो. भिमाच खाचर सुद्धा मागे पडल होत मग आता मी नक्की कुठे आहे ?

आणि अचानक मला लक्षात आल मी नानाच्या टेकाडावर होतो. नानाचा वाडा इथुन जवळच होता. आता वाडा असेल का ? नाना जिता असेल का ? नानाची मुलगी काय बर नाव तीच ? हं अक्षता, किती दिवसांनी आठवल नाव. अक्षताचा रंग फ़टफ़टीत गोरा, डोळे घारे आणि बटबटीत, नाव चपटच, दात पुढे. पण अक्षता स्वतः व नाना तीला फ़ार सुंदर समजत होते.

नानाची बायको कधीच मेली होती. नानानी दूसर लग्न केल नाही. मुलीला सांभाळल. मुलगी तशी अभ्यासात हुशारच होती. नाना शेती सांभाळायचा व गावात पुजा पाठ करायचा. त्याला लिहिता वाचता येतच नव्हत. मंत्र खरच किती येत होते ते त्याला व त्या एका इश्वरालाच माहिती. पण त्याला लोक बोलवायचे. तांदुळ व थोडे पैसे द्यायचे. नाही म्हणायला सार्वजनिक पुजेला नाना बरीच कमाई करायला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

20 Oct 2010 - 6:57 pm | गणेशा

वर्णन छान .. पण कथा अजुन चालुअच नाही झाली असे वाटले

लिहित रहा .. वाचत आहे ...