Skip to main content

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

Published on शनीवार, 16/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी
आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी, मी तुझी काठी एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ|| आजोबा: हलते हे जड डोके, डुगडुगते मान कवळी कुठे चालली, नाही कसले भान आजी: केसांच्या बटा झाल्या, त्यांची नाही वेणी स्वार्थी जगात फिकीर करावी कुणी? चिंता नको, आता जगायचे एकमेकांसाठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||१|| आजोबा: किती खस्ता खाल्या अन किती कष्ट केले उमेदीच्या वेळी कामाला झोकून दिले आजी: जुने दिवस आणतात माझ्या डोळा पाणी आपलेच दाम खोटे, उगा फसवते का कुणी? अहो, शरीर थकल्यावर आशा मनाची ठरते मोठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||२|| आजोबा: किती काळजी करावी किती वहाव्या चिंता म्हातारपणी शरीराचे भोग आले आता आजी: तेच सांगणे, तेच बोलणे का उगा करता साठी आली असता शरीरासवे का वागता चिंता सोडून शरण जावूया जगजेठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||३|| आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी, मी तुझी काठी एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/१०/२०१०
लेखनविषय:

याद्या 1186
प्रतिक्रिया 2
काव्यरस

पाशाणभेद, ह्या विषयावर ह्याप्रकारचे काव्य मराठी मध्ये मी तरी वाचलेले नाही . आजोबा आजी चे युगुल गीत ! सही . आवडले.