नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा
ज्याची मनास भीती तेची घडे अताशा
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?
मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने
त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा
दूरातूनी विराणी सनई उदास गाते
ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा
इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा
पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा?
इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने
लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा
हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही
दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा
-स्वानंद
सुरेख..
झकास! एकेक शेर तोलूनमापून
अगदी याच
मस्त
जबरदस्त
छान!
छान गझल आहे.
सुरेख..
मस्त ....सगळेच शेर
अप्रतीम!
सुंदर अमोल केळकर
अर्थपुर्ण गझल आहे..
सर्वांचे खूप खूप आभार...