छान लेखमाला.
या निमित्ताने आपण इस्लामी जगताची ओळख सर्वांना करून देत आहात.
हे इस्लामी जगही प्रगत होते आणि आहे. इस्लामी राजवटींचा भाग चांगला नसता तर त्या राजवटी इतकी शतके राहूच शकल्या नसत्या.
चांगली बाजू उजेडात आणल्या बद्दल धन्यवाद!
>>हे इस्लामी जगही प्रगत होते आणि आहे.
नो डाऊट. ज्या अर्थी इतकी प्रचंड साम्राज्ये इस्लामी अधिपत्याखाली नांदली, अजुनही नांदताहेत, तेंव्हा त्या अवाढव्य सिस्टीमला चालवायला आवश्यक अश्या सर्व बाबी असल्याच पाहिजेत. तुम्हाला अधिक माहिती असल्यास कृपया लेखमाला टंकावी. इतिहास आणि वर्तमानाच्या सर्वंकष अभ्यासातुनच अधीक सामाजीक समृद्धी येईल...
अर्धवटराव
सगळे लेख वाचले. प्रतिसाद देणारच नव्हतो.
सगळ्या शाहा-सुलतानांच्या अडाण्यात एकाला लिहिता वाचता येत होते म्हणून त्याला जो तो सलाम ठोकायचा, या पेक्षा काही वेगळे यातून मला दिसत नाही.
कसली चांगली बाजू? यात नक्की काय चांगले होते? या राजवटींत चोर दरोडेखोर रस्त्याने उजळ फिरत हे? एकट्या दुकट्याने प्रवास करता येत नव्हता हे? की या राजवटीत इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे 'अधिकृतरित्या' उध्वस्त केली जात हे?
तलवारीच्या बळावर उध्वस्त समाजांची साम्राज्ये उभी केली यांनी. त्या साम्राज्यात फिरून येण्यात ती काय मर्दुमकी?
भारतावर आणि इतर समृद्ध प्रदेशांवर स्वार्या करायच्या, इथले प्रगत लोक गुलाम म्हणून पकडून न्यायचे, त्यांच्या कडून कामे करून घ्यायची. आणि वर पाहा किती कलाकुसरीचे काम केले म्हणून ढोल पिटायचे? अरे त्या वाळवंटात खांद्याच्यावर होतेच काय?
फुकाच्या डिंग्या मारू नका हो!
>> भारतावर आणि इतर समृद्ध प्रदेशांवर स्वार्या करायच्या, इथले प्रगत लोक गुलाम म्हणून पकडून न्यायचे, त्यांच्या कडून कामे करून घ्यायची. आणि वर पाहा किती कलाकुसरीचे काम केले म्हणून ढोल पिटायचे?
प्रगत लोकांच्या मनगटात दम नसल्यामुळे असेल...
खुदाच्या आशिर्वादाने साम्राज्ये उभी केली त्यांनी!
लढाईच्या डावपेचांनी खेळणारे लोक अडाणी असतील असे माझे मत नाही.
शेवटी जेते होते ते! समाजाला आवडणारी साम्राज्ये उभी राहिली.
गुलाम म्हणून लोक नेले तरी गुलाम म्हणून वागवले गेले का? खरे तर कुणीही खुदाच्या मार्गात सामील झाला की त्याला गुलाम म्हणून ठेवता येत नसे हे सत्य आहे!
तरीही लढाई असली की वाईट बाजू असणारच. आज अमेरिकेने इराकवर स्वारी केली ती काय सगळ्या बाजूंनी चांगलीच आहे का?
या सल्तनतींना वाईट बाजू होत्या म्हणून चांगले काहीच नव्हते का? काळी बाजू पाहात बसून तरी काय साध्य होते?
जर इतके प्रगत लोक होते तर मग हिंदुस्तानातच का नाही उभ्या राहिल्या अशा वास्तू? म्हणजे बंदे कारागीर होते पण ते जेथे राहत काहीच करत नव्हते?
गुलाम म्हणून लोक नेले तरी गुलाम म्हणून वागवले गेले का? खरे तर कुणीही खुदाच्या मार्गात सामील झाला की त्याला गुलाम म्हणून ठेवता येत नसे हे सत्य आहे!
गुलामांना चांगली वागणूक दिल्याचा उल्लेख तुम्हाला कुठे सापडला ? आजतागायत त्या सर्व अभागी जीवांच्या (आफ्रिकेतल्या कृष्ण्वर्णीयांपासून ते जंजिर्याच्या हबशी सिद्द्यांनी नेलेल्या लोकांपर्यंत) यातनाच काय त्या वाचनात आल्या आहेत.
आज अमेरिकेने इराकवर स्वारी केली ती काय सगळ्या बाजूंनी चांगलीच आहे का?
त्याचं सम्रथन कोण करतोय? WMD नाहीयेत हे माहिती असतानाही स्वारी केली ती तेल आणि इतर स्वार्थासाठी.
या सल्तनतींना वाईट बाजू होत्या म्हणून चांगले काहीच नव्हते का? काळी बाजू पाहात बसून तरी काय साध्य होते?
चांगल्या बाजू होत्या ना. या लेखात आणि इतरत्रही त्या फिल्या आहेत. मात्र आपल्या वाट्याला त्या कधीच आल्या नाहीत.
जर इतके प्रगत लोक होते तर मग हिंदुस्तानातच का नाही उभ्या राहिल्या अशा वास्तू? म्हणजे बंदे कारागीर होते पण ते जेथे राहत काहीच करत नव्हते?
हिंदुस्तानातील लोक प्रगत होते पण आक्रमक नव्हते.
आणि वास्तू आहेत की. उदा. कोणार्कचे सूर्यमंदिर-ज्याच्या चुंबकीय क्षेत्रामुळे चक्क बंदरातल्या जहाजांचे दिशादर्शक गोंधळत असे, अजिंठा-वेरुळच्या लेणी- कैलास मंदिर तर कळसापासून सुरुवात करून खाली पायथ्यापर्यंत, असे उलटे खोदले गेले आहे. असे उदाहरण अजून कुठेच पाहायला मिळाले नाही.
ताजमहाल बांधणार्या कारागिरांनी पुन्हा इतर तसे कुठे बांधू नये यासाठी त्यांचे हात तोडण्यात आले होते. हा ट्रेंड जर फोफावला असेल तर मग नंतरच्या काळात सुंदर इमारती अस्तित्त्वात येणं अवघड झाला असणार!
गुंडोपंत,
अहो, हे प्रवास वर्णन आहे. त्यावेळी तसे होते त्याला आपण काय करणार. आणि तो ज्या धर्माचा होता त्याला हे सगळे बघून थोडासा अभिमान वाटला असेल त्यात काय नवल ? त्याला थोडासा अलौअन्स द्यायलाच पाहिजे :-) . ७०,००० मैलांचा प्रवास करणे मला वाटते हे आजच्या काळातसुध्दा अवघड आहे असे नाही वाटत तुम्हाला ? उरला प्रश्न दृष्टिकोनाचा. मी पहिल्याच भागात लिहीले होते की जरा पूर्वग्रह बाजूला ठेवून हे वाचायला पाहिजे.
आज भारतात आपलेच राज्य आहे, तरी पण Red Corridor मधे हिंडण्याचे धाडस कितीजण दाखवू शकतील ?
असो. माझी विनंती आहे की आपण वाचत रहा...
माझी अशीच अवस्था झाली होती जेव्हा मी इंग्लंडच्या राणीचा राजवाडा बघायला गेलो होतो. माझ्या मनातून हे काही जात नव्हते की हे सगळे आपल्या पैशातून झाले आहे.
इब्नचे "डिटेलींग" फार इंप्रेसिइव्ह आहे. प्रवासवर्णने किंवा इतर नोंदी इतक्या व्यवस्थीत रितीने करण्याची स्वतः इब्नची हि पद्धत होती कि त्याकाळी ती जनरल प्रॅक्टीस होती ? आपल्याकडे असा कोणी इब्न झाला नाहि काय ??
अर्धवटराव
त्यापूर्वीच्या काळापासून ती पद्धत असावी. अलेक्झांडर जेव्हा जग जिंकायला निघाला तेव्हा त्यानेही अशा नोंदी ठेवणारे लोक बरोबर घेतल्याचा उल्लेख एक पुस्तकात वाचला होता.
प्रतिक्रिया
छान
आंसमा, वाईटाची चर्चा बर्याच
इस्लामी जगत !!
कसली
प्रगत
बाजू
हे खटकले !!
आंसमा शख्स
गुंडोपंत, अहो, हे प्रवास
सहमत
हम्म..लिखाण छान. या इस्लामी
सहमत आहे
छान चाललाय
प्रवास वर्णन !!
अर्धवटराव
संपादक साहेब,
लेख नी खालील चर्चा आवडली!