प्रेम

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 Sep 2010 - 3:04 am

"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं
एक जण आत्मविश्वासानी म्हणाली - "सोप्प आहे प्रेम अथांग समुद्रासारखं असतं. सर्व चूका पदरात घेणारं. परमेश्वराच्या कृपेसारखं"
दुसरी जरा अवखळ होती, म्हणाली "शुचि प्रेम मला झर्‍यासारखं वाटतं ग. येणार्‍या वाटसरूला निर्मळता बहाल करणारं, सदोदीत खळखळून वहाणारं."
ह्म्म .... माझं काही या उत्तरांनी समाधान झालं नाही.
पुढे काही मैत्रिणींनी देखील अशीच उत्तरं दिली - कडक उन्हात सावली देणार्‍या वृक्षासारखं परोपकारी तर कुणी म्हटलं शीतल चांदण्यासारखं.
मी ठरवलं व्यक्ती तितक्या प्रेमाच्या व्याख्या.
पण मग माझी प्रकृती कशी? माझं का समाधान होत नव्हतं कोणत्याच व्याख्येनी? मला जी तीव्रता, अनिवार आकर्षण, इच्छा , प्रेमाची स्वतःमधे सर्वस्व विलीन करून टाकण्याची ताकद हे प्रेमाचे पैलू कळत होते त्यावर कोणाच कवीनी काही लिहीलं नव्हतं की माझं वाचन कमी पडत होतं? नक्कीच माझं वाचन कमी पडत होतं.
मधे काही काळ .... खूप काळ गेला ज्यात मला प्रेमाला उपमा मला रुचेल अशी उपमा माहीत नव्हती.
समुद्र, झरा, झाड, चांदणं या उपमा मला रुचत नव्हत्या.
पण एक गंमत झाली - कारमधून फिरायला जात असताना माझ्या मुलीनी तिला आवडणारं एक "कन्ट्री सॉन्ग" लावलं. जे मी ऐकलं आणि परत लावलं, परत लावलं, परत परत परत लावत राहीले इतक्या वेळा की नवरा म्हणाला "काय हे कितीदा ऐकणारेस? काहीतरी आपलं चळ लागल्यासारखं!"
हा हा .... मला चळच लागला होता. कारण मला प्रेमाची चपखल व्याख्या सापडली होती.
जॉनी कॅश चं हे ते गाणं "रिंग ऑफ फायर"-
Love is a burning thing
And it makes a fiery ring
Bound by wild desire
I fell into a ring of fire .....

I Fell Into A Burning Ring Of Fire
I Went Down, Down, Down
And The Flames Went Higher

The Taste Of Love Is Sweet
When Hearts Like Ours Meet
I Fell For You Like A Child
Oh,But The Fire Went Wild

अतिशय इन्टेन्स आणि सु-रे-ख गायलेलं हे गाणं आहे एकेकाळी टॉप वर असलेलं. जरूर ऐका.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

हर्षद आनंदी's picture

7 Sep 2010 - 4:35 am | हर्षद आनंदी

खरंच, प्रेम ही संपणारी आग..जी तुमच्या अंतरात सदैव धगधगत राहते, मनाला जाळत राहते अगदी आजन्म!! ती प्रज्वलित होते तो क्षण म्हणजे माणुस ईश्वराच्या बरोबरीला जाऊन बसतो. प्रेम मग ते कुठले ही का असेना कशावरही असेना, देशावर प्रेम करणारे त्याच्यासाठी हसत मृत्युला कवटाळतात, तर माणसांवर प्रेम करणारे आयुष्यभर व्रतस्थ राहुन त्या प्रेमाचा आनंद लुटतात.

प्रेम हे शब्दांच्या पलिकडचे, मनाच्या पलिकडचे.. त्याला शरीराच्या बंधनात अडकवु पहाणार्‍यांना वेडावुन दाखवत ते कधीच त्यांच्या हातातुन नाहीसे होते, पार परागंदा होते, मग फाटलेल्या मनांची थकलेल्या शरीरांची लक्तरे घेऊन माणुस जगत राहतो, मरणाची वाट बघत!! मग मरणही सावकाश येते, त्याची परीक्षा बघत... जीवनाचे धिंडवडे काढत तो जगत राहतो, मरत नाही म्हणुन!

प्रेमाला कुठल्या व्याख्येत बसवणे, हा प्रेमाचा अपमान आहे.. कारण प्रेम हे प्रेम आहे आणि प्रेमच राहणार आहे. प्रत्येक प्राण्याच्या स्वभावानुसार प्रेमाची व्याख्या बदलणार तरी प्रेम हे प्रेमच राहणार, अगदी आदीपासुन अंतापर्यंत प्रेमच आहे, प्रेमच राहणार.... प्रेमच राहणार!!!!!!

रंगलो प्रेमानंदी.. म्हणुनच सदानंदी
हर्षद आनंदी

सुंदर लिहीलय हर्षद साहेब. खरच मस्त! चार चाँद लगाये आपने|

हर्षद आनंदी's picture

7 Sep 2010 - 11:51 pm | हर्षद आनंदी

खरे सांगायचे याच विषयावर एका मित्राशी वाद चालु होता. त्याच प्रवाहात लिहिले गेले.

विलासराव तुमचेही आभार..

नुसती आग?
कधी जन्मभर पुरत तर कधी उभ जाळत !
कधी श्वास गंधाळत तर कधी गुदमरवत !
कधी उभार देइ तर कधी घायाळ मनी !
लाभल तर स्वर्ग ना तर मरण क्षणोक्षणी !

जिन्क्स's picture

7 Sep 2010 - 10:05 am | जिन्क्स

"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं

कसल्या अवघड विषयांवर गप्पा मारता बाबा तुम्ही.

पैसा's picture

7 Sep 2010 - 10:47 am | पैसा

मंगेश पाडगावकरांची कविता आठवली.
"प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!"

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

7 Sep 2010 - 10:54 am | जाई अस्सल कोल्हापुरी

...प्रेमाला अशा कोणत्याही व्याख्येत बसवलं तर त्याची grace कमी होईल...ते अनुभवतच राहिल पाहिजे...
करत राहिल पाहिजे....
निरपेक्ष.. नितांत आणि निरंतर....
ज्यावर करता त्याचा सहवास मिळाला तर नशिबवान! पण नाही मिळाला तरीहि त्यावर ते करत राहणं..प्रत्येक श्वासातुन ते अनुभवणं ! प्रेमाचा ultimate end म्हणजे लग्न किंवा एकत्र येणं असं मला नाही वाटत!...it's faaar beyond it....faaar beyond any other feeling ever!
प्रेम हे एक infinite feeling आहे... कोणतंही क्षितिज दाखवणं म्हणजे त्याची नजाकत कमी करण्यासारखं आहे.
...just feel it....just feel it around you..... when you are in love!

विलासराव's picture

7 Sep 2010 - 12:09 pm | विलासराव

+१००% सहमत.

विलासराव's picture

7 Sep 2010 - 11:21 am | विलासराव

शब्दात सांगणे महाकठीन काम आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे असे वाटते. जेवढे वर्णन करु जाल तेवढे ते निसटुन
जाण्याची शक्यताच जास्त.

तरीही एक प्रयत्न:
ज्याच्या उपस्थितीत आपला अहंकार संपुर्णपणे गळुन पडतो तेव्हा ति प्रेमाची सर्वोच्च अवस्था असते. तो जो
क्षण असतो जेथे मि उरत नाही त्यावळेस जे असते त्याला प्रेम म्हणता येईल.

अवांतरः ती उपस्थिति म्हण्जे प्रिय व्यक्तीच असावी असेही नाही. निसर्गात असे बरेचदा होते, आपन एकदम हरखुन जातो.

बाकी हर्षद यांचा प्रतिसाद खुप आवडला

वा विलासजी , सुंदर प्रतिसाद.

मनात जेव्हा असंख्य फुलपाखरं उडतात तेव्हा प्रेम झालं असं समजण्यास हरकत नसावी... ;)

प्रेमाची व्याख्या करायला माझ्याजवळ "शब्द" च नाहीत..!!!

पुस्तके वाचली पाहिजेत हे नवीनच आज समजले.
बर आता कोणती पुस्तके वाचली पाहिजेत ते एकदा सांगा.