दहि

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
30 Aug 2010 - 10:18 pm
गाभा: 

मी एका होटेल मधे जेवायला गेलो होतो..शेवटी डाळ भात व दहि मागवले..दहि आल्यावर च्मच्याने एक लपका खाल्ला..
दहि खुप मधुर व घट्ट होते...
घरी दहि लावले..पण दह्यात बराच पाण्याचा अंश व दहि आंबट गोड चविला होते..
होटेल सारखे मधुर व घट्ट दहि लावण्यास काहि खास पद्धत असते का?
काहि टिप्प्स..असतिल तर कृपया सांगाव्यात..

सन्माननिय सभासदांनी या धाग्यावर विरजण घालु नये हि नम्र विनंति..

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

30 Aug 2010 - 10:28 pm | छोटा डॉन

अविनाशराव, हे अति होते असे तुम्हाला वाटत नाही का ?

बाकी जास्त अजुन लिहायची इच्छा नाही, फक्त सर्वांचाच अंत बघु नका ही विनंती.

>>सन्माननिय सभासदांनी या धाग्यावर विरजण घालु नये हि नम्र विनंति..
वा रे वा, उलट सदस्यांनाच टोला का ?
तुमच्या अशा धाग्यांवर कशा प्रकारचा दंगा होतो ह्याची तुम्हाला पुरेपुर कल्पना असतानासुधा तुम्ही असे धागे काढणे थांबवत नाही ह्याचे सखेद आश्चर्य वाटते.
असो, थंडे डोक्याने केलेली ही अंतिम 'नम्र विनंती' समजा ...

- ( सडेतोड ) छोटा डॉन

गोगोल's picture

31 Aug 2010 - 12:43 am | गोगोल

हग्या दम भरणे.

डॉन राव, ह्या धाग्यात वाईट काय आहे समजले नाही.
अविनाश रावांनी हा धागा काढला ते बरे झाले. कारण हा प्रश्न मलाही पडलेला होताच पण मिपावर विचारता येईल असे डोक्यात आले नाही.
बाहेर विकत मिळणारे दही घट्ट असते. आमच्या घरी तसे दही क्वचितच लागते. बरेचदा दह्यात पाणी रहाते . पाणी वेगळे काढले तरी बाहेरच्या दह्याची कन्सिस्टंसी येत नाही. विकत जे दही मिळते ते लावताना वेगळे काही करत असल्यास आणी ते कोणाला माहित असल्यास ते इथे समजले तर चांगलेच आहे की. त्यात असा तिरकस प्रतिसाद देण्याचा उद्देश समजला नाही.
आपण एकदा घरी दही लावुन बघा. म्हणजे नेमके काय प्रॉब्लेम त्यात येऊ शकतात ते समजेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Aug 2010 - 4:02 am | विश्वनाथ मेहेंदळे

डॉन राव, या धाग्यात काय वाईट आहे हे खरोखर कळले नाही. हल्ली अनेक निरर्थक धागे निघत आहेत हे खरे, पण हा मला तरी तसा वाटला नाही.

तसे पाहता अनेक जुने (आणि जुन्या सदस्यांनी काढलेले) धागे यापेक्षा निरर्थक होते. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत.) ते तत्कालीन धोरणात बसत असेल आणि आता हे बसत नसेल तर वेगळी गोष्ट आहे. कुणावरही वैयक्तिक हल्ला करायचा नाही म्हणून, नाहीतर इथे १० लिंक देता येतील अशा प्राचीन धाग्यांच्या.

(एक नवखा सभासद)

ज्या धाग्यावर दंगा होईल असे धागे हेतूपुरस्सर काढले जाणे निषेधार्हच असावे. पण धाग्यातील मजकूर पाहून तो धागा दंग्याधोप्याच्या, उथळ नि सवंग मनोरंजनाच्या उद्देशानेच काढला गेला आहे किंवा कसे का हे ठरवणे कठीण आहे. वरील धाग्यातील मजकुरात तसे आक्षेपार्ह काही दिसत नाही. मात्र या व अशा प्रकारच्या इतर धाग्यावर किती कसा दंगा करायचा(च) झाल्यास, याचे भान सर्वच सदस्यांनी - विशेषतः जुन्या, ज्येष्ठ सदस्यांनी - ठेवायला नको का?
(सभासद)बेसनलाडू

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Aug 2010 - 6:29 am | विश्वनाथ मेहेंदळे

बेसनलाडू यांच्याशी सहमत

>> वा रे वा, उलट सदस्यांनाच टोला का ?
>> तुमच्या अशा धाग्यांवर कशा प्रकारचा दंगा होतो ह्याची तुम्हाला पुरेपुर कल्पना असतानासुधा तुम्ही असे धागे काढणे थांबवत नाही ह्याचे सखेद आश्चर्य वाटते.
>> असो, थंडे डोक्याने केलेली ही अंतिम 'नम्र विनंती' समजा ...

दंगा करणारे कुठेही करतील. चांगल्या गंभीर धाग्याचा पण खरडफळा करतील. गल्लीतले गुंड मुलींची छेड काढत असतील तर त्यांना ठोकावे कि मुलींना बाहेर पडण्यास बंदी घालावी ? बरे प्रस्तुत मुलगी शालीन कपडे घालून बाहेर पडली होती :-)

असो, या निमित्ताने मिसळपाव चे धोरण परत एकदा वाचले. आणि मग लक्षात आले की या विषयावर काहीही लिहिण्यात सध्या अर्थ नाही. त्यामुळे सध्या इतकेच.

ज्यांना ह्या धाग्यात काही चु़कीच वाटल नाही त्या वरील सर्वांशी सहमत.
बाकी सकाळ्पासुन एक नेटकप्रेमी कैच्या कै कौल फोडायच काम करतायत तिथे एक चुकार शब्द नाही काढला आणि या धाग्यावर धमकी वजा विनंती का ते कळलं नाही.
जिसकी लाठी उसीकी भैस |

शिल्पा ब's picture

31 Aug 2010 - 9:23 am | शिल्पा ब

+ १

मस्त कलंदर's picture

31 Aug 2010 - 9:56 am | मस्त कलंदर

इथे प्रतिसाद लिहिण्या आधी त्या नेटक्याप्रेमींना खरडवहीत आणि धाग्यावरही स्पष्ट शब्दांत दम भरला आहे.
आणि नेहमी एका ओळीचे धागे काढायचे आणि नंतर त्या धाग्यावर फिरकायचेही नाही हा अविनाशकुलकर्णींचा शिरस्ता आहे. आणि बिचारे पब्लिक बसते चर्चा करत!!!! त्यामुळेच हा फक्त धागा वाचल्यानंतर तो खरेच काही माहिती हवी या उद्देशाने काढला आहे की नुसताचा रिकामपणाचा (स्वतःच्या आणि इतरांच्याही) हे सांगता येत नाही.

डॉनरावांशी सहमत.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Aug 2010 - 10:15 am | llपुण्याचे पेशवेll

पहीले १०ही प्रतिसाद विषयाला सोडून अरेरे....

छोटा डॉन's picture

31 Aug 2010 - 10:59 am | छोटा डॉन

( प्रस्तुत प्रतिसाद हा 'अनाम' ह्यांनाच उद्देशुन नसुन माझ्या प्रतिसादावर आक्षेप घेणार्‍या सर्वच सभासदांना अजुन काही माहिती देण्याच्या उद्देशाने आहे. )

वेल, टेक्निकली ह्या धाग्यात तुम्ही म्हणता तसे काही वावगे नाही / नसु शकते. पण प्रस्तुत लेखकाची वाटचाल जर तुम्ही पाहिलीत तर त्यांचे १ ओळीचे ह्याच प्रकारचे धागे व त्यावरचा दंगा व त्यावरच अशा धाग्यांवर ( व ते का उडवले जात नाहीत अशी विचारणा करणारे सदस्यांचेच ) आलेले प्रतिसाद जर आपण पाहिलेत तर मी का लिहले ते स्पष्ट व्हायला हरकत नाही.
कित्येकवेळा सदर प्रकार घडले आहेत व त्याची सुरवात अशाच १-२ ओळींच्या वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या ( किंवा असणार्‍या ) मजकुरानेच झाली आहे.
माझ्या अनुभवाप्रमाणे 'ह्या धाग्यावरही नंतर अशा अवांतर व दंगेखोर प्रतिसादांची रांग लागली असती जर मी पहिल्याच प्रतिसाद उपरोक्त विनंती केली नसती'.
सदर प्रकार ह्या धाग्याचे लेखक श्री. अविनाशकुलकर्णी ह्यांनाही ज्ञात आहेत व ह्या लेखाला दिलेला प्रतिसाद व त्याचा योग्य अर्थ त्यांना मंजुर आहे, तशी आमची खरडवहीत चर्चा झाली आहे. इच्छुकांनी ते तपासुन पहायला हरकत नाही.

माझ्या प्रतिसादाने किमान ह्या धाग्यावर अनावश्यक चर्चांचे व दंग्याचे प्रतिसाद आले नाहीत हे मी माझ्या प्रतिसादाचे यश मानतो ( कारण 'दही, विरजण' आदी शब्दांना पकडुन काय आणि किती लिहले जाऊ शकते व ते लिहण्याची क्षमता असणारे किती सदस्य इथे आहेत ह्याची इथल्या रेग्युलर सदस्यांना व्य्वस्थित माहिती आहे).

असो.

बाकी सकाळ्पासुन एक नेटकप्रेमी कैच्या कै कौल फोडायच काम करतायत तिथे एक चुकार शब्द नाही काढला आणि या धाग्यावर धमकी वजा विनंती का ते कळलं नाही.

मस्त कलन्दर ह्यांनी उत्तर दिले आहेच.
इच्छुकांनी आमच्या व इंटरनेटप्रेमी ह्यांच्या खव व त्यातील संभाषण तपासुन पहावे ही विनंती.
किमान माझ्याकडुन ह्या प्रकारचे 'बायस्ड' वर्तन होणार नाही व मी जे इथे लिहले आहे ते केवळ मिपाच्या शांततेच्या भल्यासाठीच लिहले आहे अशी माझी प्रामाणिक समजुत व विश्वास आहे.

श्री. अविनाश किंवा इंटरनेटप्रेमी यांच्यामध्ये कोणीही माझे दुश्मन नाही व कुणीही माझा जिवलग दोस्त नाही. त्यामुळे इथे मी एखाद्याला डावे-उजवे ठरवुन त्याला झुकते माप देण्याचा आरोप नाकारत आहे.

जिसकी लाठी उसीकी भैस |

:) हा हा हा.
ह्या वाक्याची अपेक्षा किंवा आवश्यकता नव्हती, किमान आम्ही तसे वर्तन कधीही केले नाही असा आम्हाला विश्वास वाटतो, वाटल्यास आमची वाटचाल तपासुन पहायला हरकत नाही.
केवळ उपरोक्त वाक्यामुळे मला वैयक्तिक "वाईट वाटले" हे स्पष्टपणे नमुद करतो.

बाकी असो, 'दह्याचे विरजण' ह्यावर चर्चा चालु द्यात, आम्ही त्याला अजिबात हात लावणार नाही.
आमच्या पहिल्या प्रतिसादाने योग्य ते 'विरजण' घालुन सदर धाग्याचे दही व्यवस्थित लागेल ह्याची काळजी घेतली आहे ह्याचा आनंद आहे.

- ( सुस्पष्ट ) छोटा डॉन

बेसनलाडू's picture

31 Aug 2010 - 11:59 pm | बेसनलाडू

तुमच्या किंवा संपादक मंडळाच्या उद्दिष्टांबाबत, धोरणांबाबत नि वेळात वेळ काढून केलेल्या कामाबद्दल तिळमात्र शंका नाही. पण धाग्यातील मजकुराबाबत भान न ठेवता सदस्याच्या लेखनाचा पूर्वेतिहास, खरडावह्यांमधून चाललेली संभाषणे इ. चे संदर्भ चाळत बसणे कोणत्याही सदस्याला शक्य नाही; नव्हे, ते तसे अपेक्षितही नसावे. त्यामुळे सामान्य सदस्याच्या चष्म्यातून पाहता लेखातील मजकूर आणि तुमच्या पहिल्या प्रतिसादातील विनंती यांचा परस्परसंबंध लागत नाही; आणि तुमची विनंती धमकीवजा दिसून जाते.

एकोळी, फुटकळ धागे, निरर्थक कौल, वायफळ काथ्याकूट यांचा वीट येत आहे, हे खरेच आहे. आणि असे धागे काढणार्‍या संकेतस्थळकंटकांवर काय कारवाई झाली आहे, हेही ज्ञात आहे. असे असताना मला असे वाटते की संपादक मंडळाला जे लेखन आणि प्रतिसाद वगैरे संपादनयोग्य किंवा काढून टाकण्यायोग्य वाटतात, त्यांवर कारवाई करताना त्याचे जाहीर (तसेच खाजगीही) स्पष्टीकरण देण्याची गरज भासू नये/देऊ नये. आणि सदस्यांकडून त्याबाबत होणारी विचारणा पूर्णतः दुर्लक्षित करावी. त्या विचारणांना उत्तरे देण्यासाठी संपादक मंडळ बांधिल नसावे. याबाबत अनेकदा मला इतर काही मराठी संकेतस्थळांच्या प्रशासकांचे धोरण गरजेचे वाटू लागते.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2010 - 11:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढचा-मागचा, खरडवह्या, धाग्यांमधला इतिहास बघायचा नाही; दिवसातून एकदा कधीतरी मिपा उघडल्यानंतर संपादकांनी संपादन करून झाल्यानंतरचं "सोज्ज्वळ" मिपा पहायचं आणि नंतर संपादक किंवा संपादक मंडळाने केलेल्या कृतीला दोष देणे हे प्रकार अजूनही संपले नाहीत याचं नवल वाटतं!

जिसकी लाठी उसीकी भैस |

आपली लाठी मिळवावी आणि मग म्हशीबद्दल चर्चा करावी हे इष्ट नाही का? दुरून पाण्यात दगड मारणं सोप्पंच असतं!
मिपा हे खासगी संस्थळ आहे आणि एका भल्या माणसाने आपल्याला बागडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. -- इति पूजावाले गुर्जी!

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

डॉन्रावांशी सहमत आहे. त्यांनी अतिशय योग्य त्या शब्दात आणि संयमाने आपले मत दिले आहे. मुळात ज्यांना आपण काही समजावले तर पटू शकेल असे वाटते, अशाच लोकांशी आपण सहसा बोलायला अथवा समजवायला जातो. डॉन्रावांनी अविनाश काकांच्या धाग्यावर हे लिहिले ह्याचा अर्थ अविनाश काका समजुतदार आहेत हे त्यांनी मान्य केल्यासारखेच होते.

बाकी लेखक सोडून इतरांनाच झोंबलेल्या मिर्च्या पाहून अंमळ मौज वाटली. तसेही सध्या स्वयंघोषीत मिपासदस्य कैवारी होण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु आहेतच, त्यात अजुन भर.

असो.. मकी आणि अदितीनी योग्य शब्दात समाचार घेतला आहेच त्यामुळे अधिक काही टंकत नाही.

अवांतर :- बघा डॉन्राव आम्ही उगा म्हणत नाही कि तात्या वागायचा तेच योग्य होते :) "आहे ते असे आहे, राहायचे तर रहा नाहीतर चालु पडा" हेच योग्य !!

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 12:19 pm | राजेश घासकडवी

आमचा उल्लेख झाल्यामुळे हा प्रतिसादप्रपंच. माझ्या मते प्रश्न 'हा विशिष्ट धागा निरागस आहे की नाही' हा नाही. तसा प्रत्येकच धागा ठरवलं तर जस्टिफाय करता येतो. पण गेले काही दिवस पाचकळ धागे, कौल, काकू यांनी सगळ्यांनाच बेजार व्हायला झालं आहे. कुठेतरी संपादकांनी उभं राहून म्हणायला पाहिजे की इनफ इझ इनफ. छोटा डॉन यांनी त्याला सुरूवात केली आहे हे पाहून बरं वाटलं. व्यक्तिश: मला तो प्रतिसाद संपादक मंडळ या आयडीकडून आला असता तर अधिक आवडलं असतं. पण जे काय असेल ते.

अनेक लेखक मनापासून चांगलं लेखन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या लेखनाकडे कचऱ्याच्या भरताडामुळे दुर्लक्ष झालं तर ती शोकांतिका ठरेल. शेवटी मिपाचा दर्जा उच्च राहावा यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Sep 2010 - 7:46 am | जाई अस्सल कोल्हापुरी

.....धाग्यामध्ये नसे काही चुकी | परी तु जागा चुकलासी ||
पण धागा पाककृती सदरात असायला हवा होता असे मला वाटते..
काथ्याकूट मध्ये टाकायची काय आवश्यकता ?
योग्य जागा पाककृती सदर च आहे.....
काथ्याकुट नाही....

कृपा करुन जागा हलवा!

मी अशीच आहे!

अविनाशकुलकर्णी's picture

30 Aug 2010 - 10:32 pm | अविनाशकुलकर्णी

ठिक आहे सुधारु..व व्यवस्थेशी जुळवुन घेवु

दुध चागले तापवायचे, थोडे आटवायचे त्यात थोडी साखर घालुन मग विरजण लावा
अदाजे अर्धा लिटरला १ टि स्पुन साखार

कार्लोस's picture

30 Aug 2010 - 10:39 pm | कार्लोस

एक ग्लस्स दुधमाधे एक मिर्चि हिर्वि कापुन रात्रि विर्जन लावा पन मिर्चि फक्त उभि कापुन ग्या अनि कै होतै ते कल्वा
मि स्वता घरि हा प्रयोग कर्तो.

मेघवेडा's picture

31 Aug 2010 - 12:48 am | मेघवेडा

दीड महिना झाला.. आणि अजून काहीच प्रगती नाही! लोकांना शिव्या घालायच्या फक्त.. कुठून येतात एकेक नग!

chipatakhdumdum's picture

30 Aug 2010 - 10:39 pm | chipatakhdumdum

वाटीमध्ये थोड विरजण घातलेल दूध घ्या. त्यामध्ये दोन तीन वेळा तुरटी फिरवा. बरोब्बर पाच तासात तुम्ही हॉटेलात खाल्लत तस दही तयार.
( आमचा हॉटेलवाला मित्र करतो ते आम्ही रोज बघतो.)

chipatakhdumdum's picture

30 Aug 2010 - 10:43 pm | chipatakhdumdum

सगळ्या स. स. ना दम बरोबर पोचला.

सुनील's picture

31 Aug 2010 - 2:17 am | सुनील

उत्तम स्वास्थ्यासाठी रोज उकडलेला पालक दह्याबरोबर खावा! मी खात नाही!!

दही लावण्यापुर्वी दुध किंचीत कोमट करावं. (अगदी न जाणवण्या इतपत.)
विरझण म्हणुन १ चमचा गोड/ताजं (जास्त जुनं/आंबट घेउ नये.) दही वापरावं. विरझण टाकल्यावर दुध नीट ढवळुन घाव.
जर शक्य असेल तर दही लावताना ते एखाद्या मातीच्या भांड्यात/छोट्या मडक्यात लावावं. आणि ते झाकुन शक्यतो धक्का लागणार नाही अश्या ठिकाणी किमान ७-८ तास ठेवुन द्यावं.

हॉटेलातली मंडळी जीलेटीनचाही वापर करतात.

पाषाणभेद's picture

31 Aug 2010 - 5:54 am | पाषाणभेद

खरोखर उपयोगी धागा आहे. घरी आई नेहमी म्हणत असते की हॉटेलसारखे दही होत नाही ते. chipatakhdumdum चा उपाय करायला सांगतो घरी.

नगरीनिरंजन's picture

31 Aug 2010 - 11:06 am | नगरीनिरंजन

मडक्यात लावा.

पर्नल नेने मराठे's picture

31 Aug 2010 - 12:24 pm | पर्नल नेने मराठे

दुधात पाणी असेल तरिही दही लागले कि पाणी रहाते.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार

पाणी ?? दुधात युरीया असतोना आजकाल ?

पर्नल नेने मराठे's picture

31 Aug 2010 - 12:58 pm | पर्नल नेने मराठे

तुमच्या पुण्यात असेल पध्द्त युरिआ घालायची..आमच्या मुबैत नाही ..अच्र्त मेला.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2010 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

चुचु आत्या हे वाच ग :-
http://www.esakal.com/esakal/20100622/5697492079969913970.htm

यशोधरा's picture

31 Aug 2010 - 5:28 pm | यशोधरा

हाय चुच्स! कशी आहेस? :)

मेघवेडा's picture

31 Aug 2010 - 5:30 pm | मेघवेडा

घातलं धाग्यावर विरजण! लै भारी!

=))

यशोधरा's picture

1 Sep 2010 - 8:18 pm | यशोधरा

आम्ही काकांचा वसा पुढे चालवायचा म्हणतो.

अश्विनीका's picture

31 Aug 2010 - 12:42 pm | अश्विनीका

गरम करुन गार केलेल्या दूधात दह्याच्या विरजणा बरोबर थोडा कॉर्न स्टार्च / कॉर्न फ्लोअर घातल्यास दही घट्ट लागते. मी स्वतः करुन पाहिले नाही. पण एकीला असे करताना पाहिले आहे.
प्रयोग म्हणून करून पहाण्यास हरकत नसावी.

दाद's picture

31 Aug 2010 - 2:12 pm | दाद

अत्यत फुट्क्ळ धागा !

वेताळ's picture

31 Aug 2010 - 5:19 pm | वेताळ

त्या हाटीलातुन रतीब लावा दह्याचा.कसे लावु ,अन कशात लावु किंवा कशाप्रकारे लावु हे प्रश्न उद्भणार नाहीत.

नाटक्या's picture

1 Sep 2010 - 12:11 am | नाटक्या

ते विरजण लावण्यात आणि घालण्यात अत्यंत पटाईत आहेत. फक्त घेताना 'आनंद' वाटला पाहिजे.. त्यांची सहीच सांगते हो हे सगळं!!

मिसळभोक्ता's picture

1 Sep 2010 - 12:20 am | मिसळभोक्ता

आम्ही फक्त पाण्चट दुधालाच विरजण लावतो. त्यामुळे दही पातळ होते. परंतु पातळ कढीसाठी पातळ दहीदेखील चालते.

घट्ट दह्याचा उपयोग म्हणजे चक्का लवकर लागतो. पण आम्ही चक्का डायरेक्ट बाहेरूनच आणतो हल्ली. त्यामुळे सदर धाग्याला फाट्यावर मारले आहे.

नाटक्या's picture

1 Sep 2010 - 12:40 am | नाटक्या

पाण्चट आनंदावर विरजण घालून मिळेल अशी तरी सही करा!! 'सर्व' प्रकारच्या लिहीलेत ना म्हणून तुमचे नाव सांगीतले.. किंवा मग सर्व प्रकारच्या पाण्चट आनंदावर लिहा .. जावू दे त्या पेक्षा धाग्याला फाट्यावर मारणे जास्त सोपे..

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Sep 2010 - 2:05 am | जाई अस्सल कोल्हापुरी

तुरटी really works.....!
.....धाग्यामध्ये नसे काही चुकी | परी तु जागा चुकलासी ||
पण धागा पाककृती सदरात असायला हवा होता असे मला वाटते..
काथ्याकूट मध्ये टाकायची काय आवश्यकता ?
योग्य जागा पाककृती सदर च आहे.....
काथ्याकुट नाही....

सुनील's picture

1 Sep 2010 - 2:07 am | सुनील

Curd आणि Yoghurt ही एकाच पदार्थाची दोन नावे आहेत की दोन स्वतंत्र पदार्थ आहेत?

जर हे दोन स्वतंत्र पदार्थ असतील तर, त्यांच्यात नक्की काय फरक आहे?

विकिपिडियावर - कर्ड आणि योगर्ट
कर्ड च्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे भारतात कर्ड आणि योगर्ट सारखेच समजले जाते :)
मात्र जीवाणूंच्या माध्यमातून होणारे किण्वन (बॅक्टेरिअल फर्मेन्टेशन) आणि गुठळीकरण (कोअ‍ॅग्युलेशन) दोन वेगळ्या प्रक्रिया असाव्यात असे वाटते. दही म्हणजे योगर्ट असावे, असे वाटते (लॅक्टोबॅसिलस अ‍ॅसिडिफिलस जीवाणूंमुळे होणारे किण्वन?)
(दहीप्रेमी)बेसनलाडू

सुनील's picture

1 Sep 2010 - 2:35 am | सुनील

धन्यवाद!

थोडक्यात Curd की Yoghurt हे विरजणाच्या प्रक्रियेवरून ठरते तर!

बेसनलाडू's picture

1 Sep 2010 - 2:39 am | बेसनलाडू

आणि कर्ड व योगर्ट दोन्हींचा फॉर्म फॅक्टर सुद्धा याच प्रक्रियांमुळे निश्चित होतो, असे वाटते. कर्ड हे योगर्टच्या तुलनेत अधिक शुष्क असते. दह्याचा घट्टपणा हा लिबलिबीतपणाकडे झुकणारा (कारण त्यात बर्‍यापैकी (कर्डच्या तुलनेत) द्रवांश असतो), तर कर्डचा त्यापेक्षा जरा जास्त घट्ट (म्हणजे द्रवांश (वे) कमी)
(शास्त्रज्ञ)बेसनलाडू

सुनील's picture

1 Sep 2010 - 2:55 am | सुनील

पुन्हा धन्यवाद!

(विरजणाचे पेटंट तुम्हालाच!)

सोम्यागोम्या's picture

1 Sep 2010 - 6:39 am | सोम्यागोम्या

"फुटकळ धागे" नावाचा नवा टॅब उघडून तिथे असे धागे काढत बसावे. जेणे करुन मिपावरच्या थोडासा वेळ घालवून विचार करुन लिहिलेल्या लेखांना योग्य न्याय मिळेल व ते भाऊ गर्दीत हरवणार नाहीत.

archana2285's picture

1 Sep 2010 - 10:53 am | archana2285

+१००००००००००००००
सहमत

archana2285's picture

1 Sep 2010 - 10:57 am | archana2285

ह्या धाग्याचे उत्तर जालावर सहज उपलब्ध आहे हो.
धागे काढायचे म्हणून काहीही धागे काढायचे का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Sep 2010 - 10:57 am | विश्वनाथ मेहेंदळे

http://www.misalpav.com/node/12769
हा ही तिथेच टाकायचा का ??

सोम्यागोम्या's picture

1 Sep 2010 - 8:08 pm | सोम्यागोम्या

वि. मेहेंदळे हा धागा तिकडे टाकायला आमची काही हरकत नाही. आम्ही दिवसाला एक या गतीने तरी धागे काढत सुटलो नाही आहोत. चौकशी, कौल सारखे सदर फुटकळ खाली समाविष्ट करता येतील.