खळ्ळ खटॅक
बाबा मोबाईलवर कोणाचे तरी डॅमेजिंग एक्झरसाईज घेताहेत. आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे. सोनु वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो आहे.
सोनु : बाबा बाबा, खळ्ळ खटॅक म्हणजे काय ?
बाबा : अरे, व्हिडिओमधे चेहेरा दाखवू नका म्हणजे झालं तर. बाकी साहेब सांभाळून घेतील.
सोनु : आई, खळ्ळ खटॅक मंजे काय ?
आई : ते तुझ्या बाबांना विचार रे! अगं, तर मी काय म्हणत होते ? .......
सोनु : बाबा सांगाना ! (तेवढ्यात बाबांचा फोन संपतो)
बाबा : हं, सोन्या, मी सांगतो हं! कांच फुटली की आवाज कसा येतो माहिती आहे ना ? तोच तो आवाज.
सोनु : बाबा, पण मॉलमधे कशी काच फुटेल ? तिथे तर कितीतरी पहारा असतो.
बाबा : हो, पण हॉकी स्टिक मारली ना की मस्तपैकी काच फुटते.
सोनु : पण काच का फोडायची ?
बाबा : अरे काच ही फोडण्यासाठीच असते.अरे काय छान वाटतं तो आवाज ऐकला की !
सोनु : पण बाबा, परवा ताईनी ग्लास फोडला तर तुम्ही कित्ती रागावलात !
बाबा : अरे ग्लास आपला घरातला होता. घरातल्या काचा फोडल्या तर आपलं नुकसान होतं. म्हणून बाहेरच्या फोडायच्या.
सोनु : मग मी पण उद्या शाळेतल्या फोडतो. कित्ती कित्ती मज्जा येईल.
बाबा : अरे वेड्या, शाळेतल्या फोडल्यास तर प्रिंन्सिपॉल तुला शिक्षा करतील. हे बघ, मोठं झाल्याशिवाय काचा फोडायच्या नाही बरं का ! तू उद्या मोठा झालास ना माझ्यासारखा, की वाट्टेल तेवढ्या काचा फोड हं !
सोनु : पण मोठ्या लोकांना का नाही शिक्षा करत ?
बाबा : असं नाही काही, मोठ्या लोकांना पण शिक्षा होते पण फार मोठ्ठ्या लोकांना नाही करता येत. कारण हे शिक्षा करणारे काचेच्याच घरात रहातात आणि त्यांना या मोठ्ठ्या लोकांचीच भीति वाटते.
सोनु : पण का वाटते ?
बाबा : ते तू मोठठ्ठा झालास की कळेल .
बाबा काचवाल्याला फोन करतात. त्याला मोठ्ठे काम मिळालेले असते, त्यातल्या कमिशनची आठवण करायला.
प्रतिक्रिया
हे लिखाण सरकॅस्टिक आहे पण
काच फुटण्याचा आवाज खळ्ळ खटॅक .....
हम्म
छान लिहिलंय...आधी काही फारसं
राज ठाकरे हा आपल्या
आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते
लेखनाचा Format आवडला
असो काही लोकांना ठळ्ळं आणि
नाक दबल्याशिवाय तोंड उघडत
मराठी multiplex
हा चांगला न्याय आहे, पदरचे
इंजेक्शन