हळूहळू हा व्यापच झाले संपादन...

केशवसुमार's picture
Login or registerto access quick links.

आमची प्रेरणा हळूहळू त्या व्यापत गेल्या सगळे मन...

हळूहळू हा व्यापच झाले संपादन
अवांतर प्रतिसाद जणू, व्हायरस ट्रोजन.

येतो कंपू 'तो' जसा जसा हा जाली
वेगाने प्रतिसादांचे होते वर्धन.

जीव घेतला त्यांनी सगळ्या धाग्यांचा
करती केवळ नियमांचे ते उलंघन!

हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
अवांतराचे रोज अता करतो कर्तन.

उगाच नाही ओठ निळे झाले नार्‍या
चौपाटी पाध्यांचे का घ्यावे चुंबन?

अजून नाही प्रसिद्ध का झाले धोरण ..
अजून चालु ड्रूपल सहाचे संशोधन...

कधी अरे तू सुधाणार "केश्या" मेल्या
कधी बंद करणार सांग कविता मुंडन

- केशवसुमार

उगी उगी!

कुणावर कात्री चालवायची असेल, तलवार फिरवायची असेल, कुणाचे मुंडन करवून घ्यायचे असेल, केश्याने अर्रर्र! केसाने गळे कापायचे असतील तर कळवा.

तलवार, कात्रींना धार काढली आहे. Wink गांधीकट, मोहाव्क वगैरे वगैरे कुठले कर्तन करायचे फक्त सांगा.

बाकी विडंबन ए-१. Smile

आपली,
प्रियाली सिजरहँड्स

लै

लै भारी
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

विडंबन

विडंबन भारी झाले आहे.
संपादकांचे म्हणणे या शब्दात मांडून आपण समस्त संपादक जमातीचा दुवा घेतला आहे.

रेवती

रेवती

हे हे हे लै भारी!!

(वस्तराधारी)चतुरंग

लोल हे

लोल =)) हे पाध्ये णक्की कोण ह्याचा कोणीतरी उलगडा करा रे =))

-(संपादकपिडीत) टारझन
कात्री संगे केसु || आणि रेवतीरंगा ||
टारु म्हणे आता || विसर धांगडधिंगा ||

टारझनशेठ,

चांगला प्रश्न आहे.. श्री.रा.रा. योग्य माणसाला विचारा...
(सुचक)केशवसुमार..

कात्री संगे केसु || आणि रेवतीरंगा ||
केसु म्हणे तरी||सुरू धांगडधिंगा ||

अरे

अरे केश्या, अजून तू संपादक आहेस वाटतं?! Smile

बाकी तुला मी आडनाव बंधू म्हणून उगाचंच संपादक केला होता म्हणा! Wink

पण तुला काही झडझडून संपादकीय काम करताना मी कधीच पाहिलं नाही! Smile

त्या रेवतीभाभीकडून शिक काहितरी.. तिची मिपावरची, मिपावर काय लिहिलं जावं/जावू नये या संबंधीची तळमळ मला वेळोवेळी जाणवली होती..

असो,

विडंबन बाकी मस्तच रे! Smile

नीलकांता, या केश्याला संपादकपदावरून हटव रे! Smile

केसुशेठ

केसुशेठ घ्या. लावा आतातरी शिकवणी.

(प्रशिक्षित सभासद)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे

आवाज

>> पण तुला काही झडझडून संपादकीय काम करताना मी कधीच पाहिलं नाही! <<
देवाच्या काठीला आवाज नसतो असं काहीसं ऐकलं आहे मी!!

असो. हे कंपू प्रकरण काय असतं?

अदिती

अदिती

धन्यवाद!!

आडनाव बंधू,
मंडळ आपले आभारी आहे..
(आजी संपादक)केशवसुमार

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार

© 2011 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy
Scroll to Top