ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग १

अर्धवट's picture
अर्धवट in कलादालन
11 Jun 2010 - 5:07 pm

पर्शिया ह्या शब्दाशी माझा संबंध याआधी फक्त दोन वेळा आला होता, पर्शियन मांजर आणि प्रिन्स ऑफ पर्शिया हा संगणक खेळ. त्यावेळी अजिबात वाटले नव्हते कि या नावाचा देश अस्तित्वात असू शकेल.
काही दिवसांपूर्वी ईराणला प्रवचन देण्याची सुपारी आल्यावर गडबडलो.. ईराण विशयी माझ्या ईष्ट (आणि अनिष्टही) मित्रांकडुन बरेच ऐकुन होतो, त्यावरून ह देश म्हणजे अगदिच हा.. आहे आसे वाटले होते.

आता हा देश जगाच्या पाठिवर कुठे आहे ते शोधण्यापासून सुरूवात, आता सुपारी घेतलिये म्हणल्यावर वि़ज़ा वगैरे लफडि आली,तो घेउन.(ईराणी वि :? ज़ा विषयी नंतर कधितरी सांगेन) राजधानी तेहरान मधे उतरलो (तिकिट मिळे पर्यन्त मी ईराणची राजधानी पर्शिया समजत होतो.) फक्त रात्री २ वाजता.(चाल - गावडेवाडीचा पत्ता, वार्‍यावरची वरात)
ईमाम खोमेनी (हा ईसम जिवन्त आहे का हो? ) विमानतळावर असंख्य प्रश्नांनी वेढलेल्या अवस्थेत उतरलो (त्यातील पोटापाण्याचा प्रश्न जास्त जहाल) आणि माझ्या स्वागतला येणार असलेल्या चालकाला शोधु लागलो (हा आणखी एक प्रश्न, कारण आमचे अ‍ॅडमिनमामा, प्रत्येक शहरात तुम्हाला अगदि वाजतगाजत न्यायचि सोय केली आहे असे तोंड भरुन आश्वासन देतात (त्याच्या बापाचे काय जातय,प्रत्यक्षात लीफ्ट मागुन हॉटेल शोधायला जावे लागते))
त्या बिचारया चालकाने हातात नामफलक धरलेला असुनही मी येडबंबुसारखा त्याच्याकडे न बघता सगळा एअरपोर्ट शोधुन काढला. शेवटी तोच कीव येउन सामोरा आला( जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो का हो. :? ) आणी त्यानंतर आमचा संवाद असा.. फक्त रात्री २ वाजता

मी: फ्रॉम अबकड कंपनि?
चालक: सालाम (सलाम चा ईतका गोड उच्चार नवीन होता)(च्यायची.. हा अवसर्ग कसा देतात.)
मी: आय अ‍ॅम फ्रॉम पफबभ कंपनी
चालक: सालाम
मी: बोंबला
चालक: हॉटेल?
मी: आर वी गोइन्ग स्ट्रैट टू द हॉटेल?
चालक:... क ख ग ची अगम्य भाषा (ऐकायला चांगल वाटत होते पण त्याने पोट भरत असते तर नोकरी कशाला केली असती)
मी: हॉटेल? हॉटेल? X(
चालक: हॉठेल
मी: विल आय बि एबल टू ऑर्डर माय डीनर अ‍ॅट धिस अवर?
चालक: क ख ग.. (स्वगत : आयला हे अवघडच होत चाल्लाय)
मी: फूड, डीनर, ईट.. (हातवारे पण करून सम्पले thinking )
चालक: क ख ग.. (आणी तो माझी बॅग उचलून चालायला लागला, मी संपलोच )
मी: ईग्लिश?
चालक: नो ईन्ग्लिश.. पर्शियन?
मी: झक मारली अन विचारले ह्याला. (पोटाचा प्रश्न बिकट होत चाल्लाय)
चालक: हॉटेल (गपगुमान गाडीत जाउन बसलो,आणी गार वारं अंगावर घेत, थंड डोक्याने जेवण मिळवण्याचा कट रचायला लागलो )
मी: यू? तेहेरान?
चालक:... ( होकारार्थी काहितरी अगम्य )
मी: आय अ‍ॅम फ्रॉम ईंडीया.. ईंडीया..
चालक: ईंडीया.. ईंडीया.. हीदुस्थान? हीदुस्थान? ( हे त्याच्याच शब्दात) (त्याला अत्यानंद, माझा गोंधळ)
मी: येस हीदुस्थान (हुश्श्श्श्श्श्श्श्श)
चालक: सेंटर ईंडीया डेल्लि न्यु..? (त्याने हे ३ वेळा विचारले, बहुतेक माझी परीक्षा घेत असावा. नन्तर उजेड पडला - भारताची राजधानी नवी दिल्ली )
मी: येस येस.. सेंटर ईंडीया डेल्लि न्युच (संवाद तर होतोय ना..)
चालक: हीदुस्थान.. मूव्हि.. आमीताब बाछ्छान.. (युरेका युरेका .. मी सिटवरून केवळ सिटबेल्टमुळे पडतापडता वाचलो)
मी: येस येस आमीताब बाछ्छान.. मुव्हिज..

आणी त्यानंतर त्या चालकाने माझे हॉटेल शोधून देउन, त्या हॉटेलच्या मॅनेजरला माझ्या जेवणाविषयी सांगुन, मला जेवताना आग्रह करुन, मला रूममधे सोडुन, सकाळी लवकर न्यायला येतो हे सांगून बिचारा रात्री ३:४५ ला मार्गाला लागला (मला सारखी शंका येत होती की हा मलाच अमिताभ समजला का काय?)

क्रमशः

पुढिल भाग

हे ठिकाण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 5:12 pm | मदनबाण

पुढचा भाग वाचायला आवडेल... :)
हिंदुस्थानी चित्रपटातील कलावंत मात्र जगभरात प्रसिद्ध आहेत आणि त्यात अभिताभ खरच डॉन आहे. :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

बोका's picture

11 Jun 2010 - 7:19 pm | बोका

इराणमधे आमच्याकडे अमीताभ बरोबर श्रीदेवी चीही चौकशी व्हायची !
(त्यांना श्रीदेवी का आवडते कुणास ठाउक !)
त्याचबरोबर "ये दोसती हम नही तोडेंगे" हे गाणे गायचा आग्रह व्हायचा.

अनिल हटेला's picture

11 Jun 2010 - 5:53 pm | अनिल हटेला

पू भा प्र :)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 6:00 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखमाला वाचतोय. छान लिहिताय. पुढचे काही भाग वाचले आहेत. सही जा रहे हो...

एक सूचना... रूळलेली वाटेबाहेरचे काही अनुभव असतील तर लिहा. माझ्या काही इराणी मित्रांकडून इराणविषयी बरेच ज्ञान मिळाले आहे. शिवाय, इराणबद्दल एक कुतूहल नेहमीच होतं. या निमित्ताने अजून माहिती कळेल.

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री कुलकर्णी's picture

11 Jun 2010 - 6:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त.पुढील भाग वाचायला आवडतील.

विदुषक's picture

11 Jun 2010 - 6:18 pm | विदुषक

नुकतेच मीना प्रभू चे 'गाथा इराणी' वाचाले त्यात पण इराण बद्दल खुपच नवीन आणि चांगली माहिती मिळाली
तुमच्या कडून वाचायला ला पण मजा येईल
मजेदार विदुषक

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

कलादालन + मोहिनी असे बघुन आत आलो तर घोर निराशा झाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

11 Jun 2010 - 6:54 pm | टारझन

मलाही प्रश्ण पडला होता ... धाग्याचे नाव असे मोहीणी वगरेची फोडणी घातलेले :)
अजुन कसा दिसतोय :) टार्‍या-पर्‍या बरोबर संपादकांचीही णिराषा झाल्याचा योग संभवतो :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमची बागायती

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2010 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या-पर्‍या बरोबर संपादकांचीही णिराषा झाल्याचा योग संभवतो

आजची अमावस्या चांगलाच निराशेचा दणका देऊन गेली म्हणायची :(

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अर्धवट's picture

11 Jun 2010 - 7:05 pm | अर्धवट

>>मलाही प्रश्ण पडला होता ... धाग्याचे नाव असे मोहीणी वगरेची फोडणी घातलेले

पुढचा भाग लवकरच टाकतोय.. तेव्हा उलगडा होईलच तोपर्यंत निराशेबद्दल क्षमस्व..

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2010 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार

पुढचा भाग लवकरच टाकतोय.. तेव्हा उलगडा होईलच तोपर्यंत निराशेबद्दल क्षमस्व..

पुढच्या भागात मोहिनी (न्या) पण टाका म्हणजे झाले ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 10:30 pm | शिल्पा ब

कलादालन+इराण+ मोहिनी म्हंटल्यावर आम्हाला लगेचच समजले....अजिबात निराशा वगैरे नाही...बाकी भटकंतीचे छायाचित्र (आम्हाला आपले मराठी बरोब्बर सुचते) टाका अशी एक सूचना...बाकी लेख आवडला.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शुचि's picture

12 Jun 2010 - 1:11 am | शुचि

>>मला सारखी शंका येत होती की हा मलाच अमिताभ समजला का काय? >>
=)) =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

भडकमकर मास्तर's picture

12 Jun 2010 - 3:21 am | भडकमकर मास्तर

सुरुवात झकास..
थोडे मोठे लेख टाकले तर बरे होईल

आनंदयात्री's picture

12 Jun 2010 - 8:21 am | आनंदयात्री

लिखाण छान आहे, येउद्या अजुन.
खोबार बद्दल वाचुन झाले मागल्या वर्षी .. या वर्षी आता तेहरान !

अर्धवट's picture

12 Jun 2010 - 9:02 am | अर्धवट

>> खोबार बद्दल वाचुन झाले मागल्या वर्षी .. या वर्षी आता तेहरान
गैरसमज होत असावा का? :? हे खोबार काय आहे बरं...

आनंदयात्रीजी मी यावेळी पहिल्यांदाच लिहीत आहे.

:?

सहज's picture

12 Jun 2010 - 9:18 am | सहज

अहो तुम्ही गैरसमज करुन घेउ नका. आखातातल्या अश्याच एका स्थळाबद्दल लेखमाला आली होती.

माझं खोबार - बिपीन कार्यकर्ते . त्याबद्दल आनंदयात्रीजी बोलत होते.

तेहरानमाला वाचत आहोत. लवकर पुढचे भाग येउ द्या. :-)