नुकतेच वाचनात आलेले त्यात लेख नंबर ३ ...
विप्रंचे लेखन नेहमीच विचारात गुंतवते....
मला एकानी माझ्या त्याच परिस्थितीत (पहीले शिक्षण संपल्यावर) असताना सांगीतले होते, "हाच वेळ एन्जॉय कर मग काय आहेच आयुष्यभर"....
चिलॅक्स! शुभेच्छा.
माझ्या माहीतीतल्या एकाला जॉब नसताना त्याच्या हितचिंतकाने सल्ला दिला होता की आताच लग्न कर आणि हनिमून उरकुन टाक.एकदा जॉब लागल्यावर रजा मिळण्यासाठी मारामार !
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
आत्ता जी नोकरी करते आहे ती थोडी उशीरा सुरू करण्याचं हेच कारण होतं! अर्थात तेव्हा मला ही नोकरी मिळणार याची ९९% खात्री होती!
(पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात) अदिती
>>> मला एकानी माझ्या त्याच परिस्थितीत (पहीले शिक्षण संपल्यावर) असताना सांगीतले होते, "हाच वेळ एन्जॉय कर मग काय आहेच आयुष्यभर"....
--- सहमत आहे. अशाच परिस्थितीत असताना केलेली मनसोक्त भटकंती एरवी कधी जमली नसती असं आता वाटतं. मास्तर, लेख मस्तच.
वयोमान वगैरेनी सुरुवात करतात कशाला हे शिंचे?
सुरुवात सबुरीने घ्या की आणि शेवट - काहीतरी हालचाल करा की.
छान विरोधाभास आणलाय लेखात.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
लै दिसांनी आला लेख मास्तुरे!
आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या मुलांची काळजी जास्त असते की काय असे वाटते कधीकधी.
आमचे चिरंजीव तिसरीत जातील आता पण आत्तापासूनच - "लक्ष देताय की नाही त्याच्या सायन्स आणि मॅथ्सवर? उगाच लँग्वेजेस मधे फार काही करु देऊ नका हां, पुढे त्याचा तसा काही उपयोग नसतो!"
"तुम्ही स्वतः इंजिनिअर ना? मग लेकाला काय इंजीनिअरच करणार असाल!"
आता इतकी वर्ष आधी त्यानं काय करावं हे मी कोण आणि कसा ठरवणार? आता त्याचं खेळायचं वय आहे ते त्याला छान एन्जॉय करुदेत की, पण नाही लोकांची खोड जात नाही!
चतुरंग
बर्याच दिवसांनी लेख आला तुमचा.. ;)
बाकी, लोक भोचकपणा करायचे सोडायचे नाहीतच.. मस्त सुटी मिळालीय.. एंजॉय कर म्हणावं.. नंतर आहेच सगळं!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
वा वा वा मास्तर बर्याच दिवसांनी लेख आला वाचनात तुमचा.
अश्या चोंबड्या माणसांच्या वार्यालाही उभे राहु नये.
आपली तर कवटई सरकते अशी माणस भेटली तर, सरळ वाटेला लावतो आपण त्यांना.
लेखात "गाडी दिली आहे की" असे वाचले. त्यावरून आठवले.
मी शाळेत असल्यापासून आमच्या घरी स्कूटर होती (लॅम्ब्रेटा- माहिती आहे का कुणाला ही?).
तर मी नोकरीला लागल्याच्या सुमारास वडिलांनी ती वापरणे बंद केले होते. मग काय मला बरेच होते. मी ती वापरू लागलो.
मी ती स्कूटर वापरतो हे पाहून वडिलांनी ती विकून टाकायचे ठरवले. मी त्यांना "कशाला विकताय? मी वापरतोय की!!!" असे म्हटले.
तेव्हा "तुला वापरायला तू नवीन स्कूटर तुझी तू घे" असे वडिलांनी सांगितले.
त्यावेळी मला राग आला. कारण नवीन नोकरी असल्याने स्कूटर घेण्याएवढे पैसे माझ्याकडे नव्हते.
आज मागे वळून पाहताना वडिलांनी योग्य तोच धडा मला शिकवला/घालून दिला असे वाटते. कारण त्या निमित्ताने का होईना मी काही ठराविक रक्कम शिल्लक ठेवू लागलो.
इथल्या सदस्यांना याबद्दल काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
नंतर फ्लॅट घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी मला 'मदत' केलीच. पण शक्य असूनही फ्लॅट घेऊन दिला नाही. तोपर्यंत मी शहाणा झालो होतो.
मुलांना स्वावलंबी करण्याचा मार्ग म्हणजे जबाबदार्या घ्यायला लावणे. स्वतः एखाद्या गोष्टीच्या सगळ्या टप्प्यातून गेल्याशिवाय त्यातले त्रास कळत नाहीत आणि ती गोष्ट मग जपली जाते!
लँब्रेटा माहीत आहे. ह्या स्कूटरच्या पुढल्या चाकावरचा पत्रा हा मुख्य चासीला जोडलेला असल्याने तो हँडलसोबत वळायचा नाही बाकी बजाज स्कूटर्सचा वगैरे वळायचा त्यामुळे मी एकदा गोंधळून गेलेलो आठवते आहे. ;)
चतुरंग
अरे वा! छानच!
बरं झालं सांगितलस.
आमच्या मुलाने एकदा विचारलं कि आपण गरिब आहोत का?
एखादी वस्तू जी बाकिच्यांकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणजे आपण पुअर आहोत असा त्याचा समज होता.;)
रेवती
=)) बसवला ऑटोत ..
भेंडी ... मास्तर मला वाटलं मधल्या काळात पोर्याच्या ईंटरव्यु चा अभ्यास घेत बसलेत असं मला उगा स्वप्ण पडत होती .. बरं झालं लै दिवसांनी का होईना मास्तर ने हातात घेतली ... लेखणी हो :) आणि लिहीते झाले ... तुमच्या हाताला धरुन अजुन काही जणांना लिहायला शिकवलंत तर मराठी ला मोलाची मदत होईल =))
असो ... डु यु गॉट द मेसेज यु वाँटेड ?
अवांतर : एखाद्या रैवारी ठाण्याला येऊ म्हणतो मास्तर , तुम्ही बोलवणार की डायरेक्ट येऊ ? जेवायच्या टायमाला ? ;)
- टारायक टॅबु
आणि वाईट परिस्थिती आली तर तोंड कसं द्यायचं ह्याची तयारी होते. आधी चांगल्यातून मग वाईटात गेलात तर हाल फार होतात कारण माहितीच नसते!
(पुण्यात माझा मित्र त्याच्या दहा वर्षे वयाच्या मुलाला अधून मधून त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स यूनिट मधे घेऊन जात असे. टेबले पुसून ठेवणे, सोल्डरिंगचे साहित्य साफ करुन ठेवणे, टेबलावरची इतर उपकरणे नीट ठेवणे, फाईल्स आणि इतर कागदपत्रे नीट लावून ठेवणे अशी कामे त्याच्याकडून करुन घेई. कस्टमरशी बोलणी चालू असताना त्याला सोबत ठेवत असे. घरचा धंदा आयताच अशी मुलांची भावना होता कामा नये हा उद्देश.)
चतुरंग
बाकी ह्या लोकांना अस बोलुन काय भेटत असेल??
किंवा काही लोक जाणीवपुर्वक नाही करत अस मला वाटत तेव्हा एखाद्याशी असलेल्या संबंधावरुन निष्कर्ष काढावेत अस मला वाटत उगाच गैरसमज नकोत.
खूप खूप महिन्यांनी वाचला आपला लेख. मी एकदम बिझी होते. वाचन अशक्य होते म्हणून. चक्क क्रिप्टिक नाही. ;) मस्त जमला आहे...
इतरांची (चांभार)चौकशी करणे हा मानवाचा स्वभाव आहे असे वाटते. ते करून उणी दुणी काढली की स्वतःची दु:खे, वंचना क्षणभर विसरल्यासारखे होत असावे.
बायदवे, घरात गाडी [चार चाकी] आहे म्हणून चालवायला दिली आहे की नावावर करून टाकली आहे? उगीच माझीही चौकशी हं! ;) ह. घ्या.
प्रतिक्रिया
टेक ईट इझी..
अगदी
माझ्या
हॅ हॅ हॅ!
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वयोमान
हम्म
नशिब
तुम्हीपण??
मास्तरने एका चांगल्या पोरा ला
झकास!
लोकांना
छान
मास्तर एकदम सही लेख
मास्तर,
मास्तर ईज
माष्टर लेख
अरे
वा वा वा
उद्बोधक.....
आठवण
+ बरोबर आहे
त्याखेरीज
हा हा हा! जबरा!!
+२
अरे वा!
थत्ते काका ही घ्या
ही होय
आमच्या
लँब्रेटा
मास्तर,
बसवला ऑटोत
जेवढा कमी पगाराचा मिळेल तेवढे चांगले.
+ सहमत
घरचा धंदा आयताच अशी मुलांची भावना होता कामा नये हा उद्देश..
+१
बाकी ह्या
खूप दिवसांनी वाचला लेख
मजेदार लेख
कालपासून
सरांचा
लेख आवडला . .