Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मस्त कलंदर on Mon, 05/17/2010 - 23:26
थकलेल्या जीवावर ओझ्यांची लादणी विसाव्यासाठी आतुरलेले सारे शरीर अन् कांती आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||१|| आठवड्यांच्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी आणि म्हणुनी "हे घ्या ताई" लागतात ते पाठी आता संपेल, झाला शेवट, वेडी आशा खोटी तोवर पाह्ती आणखी दुकाने, या पुन्हा उचकण्यासाठी आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||२|| व्हावी खरेदी.. चुटकीसरशी!!! अशी स्वप्ने पाहताना हळूच ठरतो प्लॅन यांचा मला ध्यानीमनी नसताना आपसूक होते माझी आठवण प्लॅनिंग करता यांना आणि मग येतो हाती भारा दिवास्वप्न भंगवणारा आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||३|| भाऊ असता हमाल कशाला हीच भावना यांची आणि चढवले झाडावर मज गोड बोलून यांनी खरेदीवर खरेदी करण्याचा झटपट सपाटा यांचा माझ्या सगळ्या हरकतींवर ओतून घडाभर पाणी आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||४|| प्रेरणा(ज्यांना कळाली नसेल त्यांच्यासाठी): सनई चौघड्यांमधले कांदे पोहे.. भाऊ आम्हा बहिणींबरोबर खरेदीला यायला नेहमी नाखूष असतो.. काल बर्‍याच दिवसांनी आम्हा तिघी बहिणींनी त्याचा पुन्हा एकदा बकरा केला... तेव्हा सुचलेलं हे विडंबन.. पहिलाच प्रयत्न आहे... त्यामुळे अर्थातच मात्रा वगैरे गोष्टींना योग्य जागी मारण्यात आले आहे!!! :)

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 05/18/2010 - 01:12

Permalink

जबरदस्त...

कविता छान झालेली आहे. बायकोसाठी भावाला चांगलं ट्रेनिंग मिळालं आहे - रेझ्युमेवर छान दिसेल. गुलामी, आपलं, नोकरी आधीच लागलेली असेल तर प्रश्नच नाही म्हणा..
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 05/18/2010 - 07:08

Permalink

मस्त!

हा हा हा! सही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 05/18/2010 - 17:51

In reply to मस्त! by सहज

Permalink

+१

सही आहे विडंबन निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 05/18/2010 - 09:17

Permalink

हा हा

हा हा हा बिचारा तिन बाजूला तिघी व समोर दुकानदार असा चहुबाजूनी वेढला गेला असेल. राजेश म्हणतात त्याप्रमाणे चांगलं ट्रेनिंग चालु आहे ;) (भावाचे आणि मक चेही) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 05/18/2010 - 09:30

Permalink

मस्त

झालीय ग खरेदी [अर्थात कविता!] :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/18/2010 - 09:33

Permalink

हाहाहाहा

हाहाहाहा... बादवे, ऋषी म्हणतोय की तुझंही ट्रेनिंग सुरू आहे. कसलं?
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Tue, 05/18/2010 - 10:24

In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक

Permalink

ते त्यालाच

ते त्यालाच माहित.. बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते. त्याचे ट्रेनिंग वगैरे काही घ्यावे लागत नाही.. त्याला काम कसे टाळायचे याचे ट्रेनिंग हवे असेल तर ये म्हणावं.. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 05/18/2010 - 10:29

In reply to ते त्यालाच by मस्त कलंदर

Permalink

हुश्श

बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते.
हुश्श!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 05/18/2010 - 18:41

In reply to हुश्श by श्रावण मोडक

Permalink

खरं बोलते

खरं बोलते आहे हो ती! भांडी घासण्याचं ट्रेनिंग पोरांनाच द्यावं लागतं! मके, विडंबन झकास!! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 05/18/2010 - 10:29

In reply to ते त्यालाच by मस्त कलंदर

Permalink

घ्या

>बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते. मग आमचे युयुत्सुराव काही बोलले की गळे काढायला तुम्ही मोकळे :D
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 05/18/2010 - 10:38

Permalink

छान

विडंबन आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by राधा१ on Tue, 05/18/2010 - 10:44

Permalink

मस्त

छान आहे हो विडंबन
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Tue, 05/18/2010 - 18:49

Permalink

वाचताना

वाचताना 'कांदेपोहे'च्या गाण्यातल्या ओळी आठवत होत्या, पण खाली वाचत आलो नि खात्री पटली. मस्त जमलंय विडंबन. बाकी बायकांची खरेदी म्हटली की 'दोन पावलांवर अवघे शरीर तोलून धरणार्‍या पायांची सहनशक्ती' किती आहे याची 'जाणीव' होते. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 05/18/2010 - 18:58

Permalink

वाह वाह

वाह वाह मके. छान केल आहेस हो विडंबन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3168 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com